Hall Ticket – Rajyaseva Prelims 2013

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करिता प्रवेश पत्र २ मे पासून मिळायला सुरुवात होईल.
एमपीएससी ने परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) बद्दल काही सूचना जारी केलेल्या आहेत, त्या खालील प्रमाणे:
  • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करिता ज्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाईल मधील माहिती अद्ययावत केलेली आहे, अशा उमेदवारांनी परीक्षेस येताना आपल्या सोबत स्वत:चा अलीकडील काळातील फोटो चिकटविलेले प्रवेश पत्र (उपलब्ध चौकोनात स्वाक्षरी करून) सोबत आणावे.
  • प्रवेशपत्रात नमूद केलेल्या आपल्या माहितीत काही तृटि आढळल्यास आवश्यकतेनुसार सुधारणा करावी व परीक्षा संपल्यानंतर सदर प्रवेशपत्र समवेक्षकाकडे जमा करावे.
  • ज्या उमेदवारांनी आपली माहिती अद्याप अपडेट केलेली नाही व ज्या उमेदवारांना आपल्या प्रोफाईल मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध झालेले नाही, अशा उमेदवारांनी स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र व त्याची एक झेरोक्स प्रत, परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा, तसेच स्वत:च्या अलीकडील काळातील पासपोर्ट साईझ फोटो परीक्षेकरिता येताना सोबत आणावा. परीक्षा केंद्रावर उपलब्ध असलेले प्रवेशपत्र (फोटोसह संपूर्ण माहिती भरून), त्यासोबत उपलब्ध असलेले हमीपत्र, तसेच ओळखपत्राची एक प्रत समवेक्षकाकडे जमा करावी.
ओरीजनल सूचना ह्या मध्ये उपलब्ध आहे: About Hall-Ticket

List of candidates – not updated Profile

Posted on

खालील 25,911 उमेदवारांनी आपला प्रोफाईल अपडेट केलेला नाही तर त्यांनी त्यांच्या नावासमोर दिलेले आपले सेंटर पडताळावे व ताबडतोब एमपीएससीशी संपर्क साधावा अन्यथा त्यांचे तेच परीक्षा केंद्र समजले जाईल.

List of Candidates in PDF

ज्या उमेदवारांनी अजूनही प्रोफाईल अपडेट केला नाही त्यांनी ssp13@mpsconline.gov.in ह्या इमेल आय. डी. वर संपर्क साधावा अथवा खालील हेल्प लाईन वर संपर्क साधावा:

MPSC Helpline Numbers:
022-22102147
022-22102148
022-22102149
सोमवार ते शनिवार (कार्यालयीन वेळेत)
022-28582700
022-28582701
022-28582702
सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार सोडून कार्यालयीन वेळेत)


2014 – Success Mantra #2 – सफलता मिळत नसते, मिळवावी लागते


मित्रांनो,

मला बरेच जण (नेहमीच कुणी ना कुणी) विचारतात कि “मी हे हे शिक्षण करत आहे किंवा कम्प्लीट केल आहे मग मी एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल होईल का?”.

आता मलाच हा प्रश्न पडतो कि मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही आणि मी कस काय सांगू कि ते सफल होतील कि नाही?

…पण एक मात्र मी खात्रीने सांगू शकतो कि सफलता मिळत नसते तर ती मिळवावी लागते.

प्रत्येकाला सफल व्हाव अस वाटत असते आणि त्यात चूक काहीच नाही. एमपीएससीची कोणतीही परीक्षा असो किंवा युपीएससीची असो, त्यासाठी अभ्यास करायचा असतो हे तर सर्वांनाच माहित असते आणि प्रत्येक जन अभ्यास करतात हे तर आहेच. ज्यांना सफल व्हायचे असते ते दिवस-रात्र मेहनत करतात पण ते फक्त मोजकिच पुस्तके वाचून सफल व्हायचे स्वप्न बघत राहतात मात्र ज्यांना घवघवीत सफलता मिळवायची असते त्यांना पुस्तके वाचण्याची भूक लागते मग ते कुठूनही मिळवायचे आणि वाचून आपली अभ्यासाची भूक मिटवायची असते परंतु त्यांची ती भूक मिटतच नाही.

थोडेफार पुस्तके वाचून अभ्यास होत नाही असे नाही परंतु हवा तितका होत नाही. जितकी डेप्थ हवी तितकी मिळत नाही. जितकी जास्त पुस्तके वाचली तितके जास्त ज्ञान उपलब्ध होते आणि त्याचा वापर परीक्षेसाठी होतो. कोणत्याही मुद्द्यावर सखोल ज्ञान प्राप्त होते आणि त्या मुद्द्याच्या दोन्ही बाजू कळतात. मग त्यावर कोणताही प्रश्न आला तर तुम्ही तो सोडवू शकता मग ती पूर्व परीक्षा असो व मुख्य परीक्षा असो.

थोडेफार पुस्तके वाचून तुम्हाला अस वाटत असेल कि ह्या परीक्षेसाठी जितकी तयारी करायची होती ती मी केली आहे पण कदाचित ते धोकादायक असू शकते. ह्याने तुम्हाला सफलता मिळवता येणार नाही.

मग सफलता मिळवण्यासाठी अजून काय करावे?
सर्वात आधी “मला सफलता कोणत्याही परिस्थितीत मिळवायची आहे” असा संकल्प करावा. “त्यासाठी मी काहीही इमानदारीने करीन आणि कितीही अभ्यास करीन” असा दृढ निश्चय करावा. हीच सफलतेची पहिली पायरी आहे. जिथे संकल्प व दृढ निश्चय आहे तेथे पाणी काढता येतेच.

जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करावा आणि आपल्या ज्ञानात नेहमी भर पाडावी आणि पडतच राहिली पाहिजे अशी काळजी घ्यावी.

जेव्हा जेव्हा असा वाटेल कि माझा अभ्यास व्हावा तितका झाला नाही तर अजून जास्त अभ्यास कसा होईल ते पाहून तो पूर्ण करावाच.

ते करण्यासाठी स्वत:ला शिस्त लावावी म्हणजे तुमचा आत्मविश्वास डगमगणार नाही आणि मार्गात कितीही अडथळे आलेत तर तुम्ही ते पार कराल.

नेहमी सकारात्मक विचार करावा आणि मनात नकारात्मक विचारांना थारा देवू नये. कितीही प्रयत्न केलेत आणि नकारात्मक विचार जात नसतील तर थोडासा ब्रेक घ्यावा आणि एक छान हास्य चित्रपट पहावा किंवा आपल्या आवडीचे एक सुंदर गाणे ऐकत असताना सोबत सोबत ते गाणे मोठ-मोठ्याने म्हणावे. मन एकदम प्रसन्न होईल आणि आत्मविश्वास पुन्हा निर्माण होईल.

जेव्हा तुम्ही अगदी आनंदी असाल तेव्हा परत अभ्यासाला सुरुवात करा. तुमचे प्रयत्न तूम्ही करत रहा. सफलता सहजासहजी व आपोआप (automatic) मिळणार नाही परंतु तुम्ही केलेल्या प्रयत्नातूनच नक्कीच मिळवू शकाल.

जेव्हा तुम्हाला परीक्षेत असफलता मिळाली तेव्हा निराश होवू नका, त्या असफलतेपासून तुम्ही काही शिकलेत असा अर्थ घ्या. उगीच निराश न बसता पुढील मार्गक्रमण करा.

एकेवेळी तुम्हाला अस वाटेल कि हे सर्व निरर्थक आहे आणि त्यामुळे तुम्ही फार नाराज व्हाल तेव्हा तुमच्या अपेक्षेमागे काहीतरी कारण असेल ते शोधून काढा. जेव्हा ते कारण तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला बर वाटेल आणि त्यातून तुम्ही मार्ग काढू शकाल. मार्ग आहेत पण ते शोधावे लागतात.

तुमच्या जीवनात तुम्हाला काय व्हायचे आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्याकडे मार्गक्रमण करत रहावे. हे आर्टिकल तुम्ही वाचत आहात ह्याचा अर्थ हाच कि तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल व्हायच आहे, बरोबर न?

तर आता पुढे मी जे काही सांगेल ते तुम्हीं कराच तरच तुम्ही सफलता मिळवू शकाल:
  • सर्वात आधी जी परीक्षा द्यायची आहे त्याचा अभ्यासक्रम बघा.
  • त्यानुसार जास्तीत जास्त पुस्तके खरेदी करा अथवा लायब्ररीतून मिळवा. त्या संपूर्ण पुस्तकांसाठी तुम्ही आमचे ई-प्रोस्पेक्ट्स बघू शकता.
  • आता समजा तुम्हाला राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत साठी ७० ते ८० पुस्तकांची गरज पडेल. सोबतच ५ मासिके लागतील, इंटरनेट वरील माहिती लागेल, दररोज २ वर्तमानपत्रे लागतील.
  • ह्या सर्वांचा अभ्यास करायला एक वर्ष लागेल तर सर्वात आधी मुख्य परीक्षेची तयारी करावी मगच पूर्व परीक्षेची तयारी करावी. पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षेचा सखोल अभ्यास करायला वेळ मिळणार नाही.
  • अभ्यास करत असताना स्वताचे नोट्स काढायला विसरू नका. ह्याला शोर्ट कट नाही किंवा दुसरा पर्याय नाहीच.
  • जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नियमितपणे रिविजन करायला विसरू नका. माझ्या एका पी.जी.पी. student (विणा शिंदे, पुणे) च सुद्धा हेच म्हणणे आहे कि “कधी कधी असे घडते कि फार दिवसानंतर रिविजन केल्यास काही वाचत असतांना अस वाटते कि मी हे वाचलच नाही”. त्यामुळे नियमितपणे रिविजन करणे योग्य ठरते.
  • सराव परीक्षा म्हणजे प्रश्न पत्रिका सोडवून पाहणे हे सफलतेच एक मुख्य कारण आहे. तुम्ही स्वत:ला तपासून बघा, तुमचा अभ्यास कितपत झाला आहे हे नेहमी पडताळून बघा. जास्तीत जास्त प्रश्न सोडवून बघा आणि तुमचा झालेला अभ्यास Mock Test च्या स्वरुपात तपासून बघा. ह्यासाठी तुम्ही प्रश्न संच सोडवा परंतु तो प्रश्नसंच विकत घेण्याआधी त्याची व त्यातील प्रश्नांची क्वालिटी बघा तरच तो विकत घ्या. तुम्ही http://www.anilmd.com वर मोफत टेस्ट सोडवून बघू शकता त्याने तुम्हाला अंदाज येईल कि परीक्षेत कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात.
  • जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर द्यायला तुम्ही चुकले असाल तर मात्र ही गंभीर बाब आहे कारण तुमची झालेली तयारी व्हायची तितकी झालेली नाही हे नक्की.
  • अशा वेळेस परत त्या विषयांची तयारी करावी आणि मग परत Mock Test च्या स्वरुपात स्वत:ची तयारी तपासून बघा.
अशा प्रकारे सफलता तुम्ही स्वत: मिळवू शकाल.

2014 – Success Mantra #1 – What, How Much To Read & Self Made Notes


Hi Friends

(This entire series of Success Mantra’s will be available at the bottom of this page)

Starting today, I am going to write a series of Success Mantra’s for those people who are preparing for 2014 exams. I hope this series will help not only for your preparation for Rajyaseva but also STI, PSI and Asst exams as well as UPSC Civil Services Exam.

परंतु मी हे सर्व मराठीतून लिहावे अशी माझी इच्छा आहे कारण माझ्या लिखाणाचा फायदा सर्वांनाच व्हावा आणि प्रत्येक जणाला ते समजायला सोपे असावे म्हणून. तर मित्रांनो पुढे आहे माझा पाहिला सक्सेस मंत्र आणि तो आहे “काय, किती पुस्तके वाचावेत आणि नोट्स का काढावेत” ह्या विषयावर!

Success Mantra #1

पहिला सक्सेस मंत्र – २०१४ साठी

मित्रांनो, तुम्ही आज फार खुश आहात, होय न? कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली म्हणून !!!
हो फार चांगलच आहे !!! पण कोणासाठी? जे राज्यसेवा २०१३ पूर्व परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी परंतु २०१४ ची तयारी करणाऱ्यांसाठी काय? जस्ट कुल !!! खास तुमच्यासाठी एक सक्सेस मंत्र देतोय २०१४ च्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी, ओके?

सफल होण्यासाठी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे तुमची तयारी आणि ती सुद्धा कशी? एकदम उत्तम! परंतु ती कशी करणार? तेच सांगतोय पण त्याआधी एक अनुभव सांगायचा आहे जो कारणीभूत झाला हे आर्टिकल लिहिण्यासाठी.

मागील २ ते ३ दिवसात मला जो अनुभव आला तो फार टचिंग होता. मी संध्याकाळी तुमच्यापैकी काही मुलांचे लोगिन करून त्यांचा प्रोफाईल अपडेट करत होतो तर कोल्हापूर जवळच्या खेडेगावात राहणारी एक मुलगी जवळच्या शहरात सायबर क्याफे मध्ये बसून प्रोफाईल अपडेट करण्याचा प्रयत्न करत होती. ते संपवून तिला घरी जायचे होते पण प्रोफाईल अपडेट होतच नव्हता तर तिचा मेसेज ब्लोगवर वाचला मग मी तिला बोललो कि तुमचे डीटेल्स मला पाठवा आणि जा घरी. मी त्या मुलीचा प्रोफाईल रात्री १ वाजून १३ मिनिटाला अपडेट केला आणि तिला मेसेज केला कि शांत झोप (ती आलरेडी झोपलेलीच असावी :)).

अशा परिस्थितीत खेडोपाडी राहणारे कशी आणि कितपत तयारी करत असतील!!! त्यांच्या जवळ काय मार्गदर्शन उपलब्ध आहे? मी मागील ३ वर्षांपासून हेच काम करत आहे कि त्यांच्या पर्यंत इंटरनेटद्वारे पोचावे आणि योग्य ते मार्ग दर्शन द्यावे.

मी स्वताही गाडी घेवून खेडोपाडी असलेल्या कॉलेजेस मध्ये फिरलोय २०११ मध्ये. ह्या बद्दल कदाचित तुम्ही वाचल असेल ब्लोगवर “Academy On The Move”. पण आता पेट्रोलचे भाव इतके झालेत कि मला स्व:खर्चाने फिरणे अशक्य आहे.

तर मित्रांनो, मी माझा प्रयत्न करत आहे (इंटरनेटद्वारे) सर्वांनाच सांगायचा की पुढील वर्षाच्या राज्यसेवेची तयारी कशी करावी.

तुम्हाला त्यासाठी तयारी कशी करायची?
माझ्या अनुभवानुसार सांगतोय कि जास्तीत जास्त उमेदवार फार कमीत कमी पुस्तकातून तयारी करतात आणि वर्षानुवर्षे परीक्षा दर परीक्षा देतच राहतात…तो मार्ग अगदी चुकीचा आहे. माझे ऐका आणि आता तुम्ही ज्या चुका केल्यात ते सर्व विसरून तुमची पुढील परीक्षा २०१४ मध्ये आहे त्यावर लक्ष केंद्रित करा.

तुमची तयारी कशावर आधारित आहे अगोदर ह्याचा विचार करा?
माझ्या मते तुम्हाला पुढीलप्रमाणे करायला पाहिजे:
  • पूर्व व मुख्य परीक्षेसाठी भरपूर पुस्तके (मी सुचवतो ७० ते ८०. ह्यामध्ये बेसिक ते अडव्हांस पुस्तके)
  • प्रत्येक महिन्यात ४ ते ५ मासिके (एक वर्षात – एकूण ४८ ते ६० प्रती)
  • दररोज कमीत कमी २ वर्तमानपत्रे (एक वर्षात – एकूण ७२० प्रती)
  • इंडिया इयर बुक
  • इंटरनेट: ह्या माध्यमातून तुम्ही बरीच माहिती विनापैश्यांची मिळवू शकता
वरीलपैकी सर्वच तुम्हाला लागेल जर व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर! तुमचं मुख्य ध्येय्य काय आहे ते विसरू नका त्यासाठी तुम्हाला हे करावेच लागेल.

मी नेहमी सांगत आलोय की स्वत:चे नोट्स बनवायचे अभ्यास करत असतांना तर आता ते बघूया कि का बर बनवायचेत?

वरील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल आणि तितका अवधी दिलाच पाहिजे. हाच तर खरा सक्सेस मंत्र आहे!

ओके, वरील साहित्याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने नोट्स न बनवता अभ्यास केला. लक्षात ठेवा नोट्स न बनवता!!! तर काय होईल?

जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा तुमच्याकडे फार कमी वेळ असेल आणि भरपूर रिविजन करायचं असेल. काल परवा सारख काही झाल तर तेव्हा तुमची तारांबळ उडेल. जरुरी नाही कि असच घडेल पण hope for the best and always be prepared for the worst.

जरी वरील परिस्थिती उद्भवली नाही तर काय होईल?

परीक्षा अगदी जवळ आल्यावर रिविजन करण्यासाठी जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा काय कराल? माझ्या पुढील प्रश्नांचे उत्तर तुम्ही स्वत:लाच द्यायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल कि मला काय म्हणायचे आहे.
  • प्रत्येक पुस्तक कमीत कमी २०० पानांचं असेल तर किती पुस्तके तुम्ही रिविजनसाठी (त्यावेळी) वाचून रिविजन करू शकाल?
  • तुम्ही जरी त्या पुस्तकात खुणा केलेल्या असतील तर त्या शोधून वाचून काढून समजून घ्यायला किती वेळ लागेल आणि हे सर्व प्रत्येक पुस्तकातून कराव लागेल तेव्हा सर्वच पुस्तकांना न्याय देता येईल का?
  • मासिकांच्या ४८ ते ६० प्रती सुद्धा उघडून खुणा बघून वाचाव्या लागतील तर त्याला किती वेळ जाईल आणि ते सर्व करू शकाल का?
  • दररोज तुम्ही वर्तमानपत्रे वाचत होतात तर नोट्स काढलेले नसतील तर तुम्ही वर्षभराच्या एकूण ७२० प्रती रेफर करू शकाल का इतक्या कमी वेळेत आणि ते सुद्धा वरील पुस्तके व मासिकांच्या सोबतच?
  • इंटर नेटच्या माध्यमातून जो अगोदर वर्ष भर अभ्यास केला होता त्याच काय जर नोट्स काढलेले नसतील तर?
मित्रांनो, ह्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वत: जेव्हा अभ्यास करता तेव्हा प्रत्येक विषयाच्या प्रत्येक मुद्द्यावर स्वत: नोट्स काढा म्हणजे तुम्हाला अगदी कमी वेळेत त्यांचे वाचन करता येईल.

रेडीमेड नोट्स वापरू नका कारण त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. ह्याबद्दल यावर Anil MD यांनी फार पूर्वी लिहून ठेवलं आहे ते वाचा: Read HERE

फंडे सीईटीचे!


यंदापासून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. 'नीट' परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातील..
यंदाच्या वर्षांपासून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशपद्धतीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी निकष ठरणारी देशपातळीवर एकच प्रवेशपरीक्षा - नीट (NEET) घेण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय वैद्यक परिषद आणि सीबीएसई यांनी एकत्रितपणे हा निकष निश्चित केला आहे. दिल्लीच्या एआयआयएमएस आणि चंदिगढच्या जेआयपीएमईआर या महाविद्यालयांव्यतिरिक्त देशभरातील सर्व ठिकाणच्या वैद्यक महाविद्यालयांचे प्रवेश 'नीट' परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातील. त्यानुसार, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशही 'नीट'च्या आधारे होतील. या नव्या बदलानुसार, गेल्या वर्षांपर्यंत घेतली जाणारी एमएचटी सीईटी तसेच एआयपीएमटी, एएफएमसी या इतर परीक्षा रद्दबातल ठरल्या असून त्यांची जागा 'नीट' या प्रवेशपरीक्षेने घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून  वैद्यक प्रवेशपरीक्षेसाठीचा हा मोठा बदल आहे.

वैद्यक प्रवेशाचा निकष ठरलेल्या या 'नीट' परीक्षेचा अभ्यासक्रम हा 'सीबीएसई'च्या अकरावी आणि बारावीच्या पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमावर बेतलेला आहे. 'नीट' परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल; ज्यात उत्तराचे चार पर्याय दिलेले असतील आणि त्यातील एका अचूक उत्तराची निवड विद्यार्थ्यांने करणे अपेक्षित आहे. या परीक्षेच्या गुणपद्धतीत निगेटिव्ह मार्किंग असल्याकारणाने चुकलेल्या उत्तरांसाठी गुण गमावण्याचा फटका विद्यार्थ्यांना बसेल. त्यामुळे नेमके उत्तर माहीत असलेले प्रश्नच विद्यार्थ्यांनी सोडवावेत.

'
नीट' परीक्षेची काठिण्यपातळी ही 'एआयपीएमटी'सारखी असणार आहे, जी 'एमएच-सीईटी'- या राज्यपातळीवर आतापर्यंत घेतल्या गेलेल्या प्रवेशपरीक्षेच्या तुलनेत जास्त कठीण मानली जाते. त्यामुळे अर्थातच १९९९ पासून २०१२ पर्यंत राज्यात जी 'एमएच-सीईटी' ही राज्यभरातील वैद्यक पदवी प्रवेशासाठीची सीईटी घेतली गेली त्या तुलनेत 'नीट' या प्रवेशपरीक्षेची काठिण्यपातळी अधिक असणार, यात शंका नाही. आणि म्हणूनच या नव्या परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाच्या पद्धतींमध्येही विद्यार्थ्यांनी योग्य बदल करायला हवा.

'
नीट' परीक्षेची परीक्षापद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १८० प्रश्न विचारले जातील. त्यातील प्रत्येकी ४५ प्रश्न हे पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र (physics, chemistry, botany and zoology) या विषयांवर विचारले जातील. अचूक उत्तराला चार गुण दिले जातील आणि उत्तर चूक असेल तर त्यासाठी प्रत्येकी एक गुण वजा करण्यात येईल. हे लक्षात घेता विद्यार्थी 'नीट' परीक्षेत - १८० ते + ७२० इतके गुण संपादन करू शकतो.  उलटपक्षी, आतापर्यंत घेतल्या गेलेल्या 'एमएच-सीईटी' परीक्षेत विद्यार्थ्यांला राज्यातील १८ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी २०० पैकी १७० हून अधिक गुण मिळवणे आवश्यक ठरत होते. यंदाच्या वर्षी 'नीट' परीक्षेत एकूण ७२० गुणांपैकी ३०० गुण व त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांला राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो.

'नीट' परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पुढील टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील -

१.    'नीट'मधील फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांला मॅथ्समधील वेक्टर्स, डिफरन्शियल अ‍ॅण्ड इन्टग्रल कॅलक्युलस, क्वान्ड्राटिक इक्वेशन्स, प्रोग्रेशन्स अ‍ॅण्ड स्ट्रेट लाइन या पाठांचा अभ्यास उत्तमरीत्या असणे आवश्यक आहे. म्हणजेच 'नीट' देणाऱ्या परीक्षार्थीने गणित विषयाचा सविस्तर अभ्यास करायला हवा. 'नीट' देणारे विद्यार्थी बरेचदा गणिताचा अभ्यास न करण्याची घोडचूक करतात. ती चूक विद्यार्थ्यांनी टाळायला हवी.

२.    फिजिक्स, फिजिकल केमिस्ट्री आणि ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांचा अभ्यास करताना पाठांतराऐवजी ते समजून घेण्यावर भर द्यावा. केवळ स्मरणशक्ती अथवा फॉम्र्युला सबस्टिटय़ूशन पद्धतीऐवजी संकल्पना समजून घेऊन उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) कौशल्य वापरावे. अशा पद्धतीने अभ्यास केल्यास या विषयामधील प्रश्न सोडवणे परीक्षार्थीला सुलभ जाईल.

३.    अनेक विद्यार्थी ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील रिअ‍ॅक्शन्स या नुसत्या पाठ करतात. मात्र 'नीट' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांने सुरुवातीला रिअ‍ॅक्शन मेकॅनिझम इन ऑरगॅनिक केमिस्ट्रीची तत्त्वे आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील बॉण्डिंग, रिडॉक्स आणि पिरिऑडिक टेबल ही तत्त्वे पूर्णत: समजून घ्यावीत आणि त्यात पारंगत व्हावे. त्यामुळे केमिस्ट्रीचा अभ्यास करताना पाठांतराची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही.

४.    'नीट'च्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी अरिहंत, दिशा, टाटा मॅक्ग्रॉ हिल्स, एमटीजी, सेन्गेज, पीअरसन्स आदी राष्ट्रीय पातळीवरील प्रकाशकांच्या पुस्तकांचा उपयोग करावा. राष्ट्रीय परीक्षांसाठी शिकवणीसाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. जे शिक्षक राज्य पातळीवर परीक्षांपुरतेच शिकवतात, त्यांना 'नीट' परीक्षेच्या अभ्यासक्रमातील अनेक धडे शिकवता येणे शक्य असेलच, असे नाही.
५.     बायोलॉजी हा माहिती देणारा विषय असून त्याच्या योग्य नोट्स काढणे आणि या विषयाचा वारंवार अभ्यास करणे आवश्यक ठरते, ज्यामुळे हा विषय चांगलाच लक्षात राहतो. त्याच वेळेस बायोलॉजी या विषयातील अनेक संकल्पनांचे पाठांतर करण्याऐवजी त्या सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक ठरते. ह्य़ुमन जेनेटिक्स, जेनेटिक इंजिनीअरिंग, बायोइन्फॉर्मेटिक्स, बायोमेडिकल इन्स्ट्रमेन्टेशन, अ‍ॅनाटोमी ऑफ कॉर्डेट्स अ‍ॅण्ड नॉन कॉर्डेट्स, बायोटेक्नोलॉजी आणि मॉलीक्युलर बायोलॉजी या विषयांकडे सर्वसाधारणपणे
सर्वाधिक विद्यार्थी दुर्लक्ष करणे पसंत करतात. मात्र हे विषय महत्त्वाचे आहेत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या विषयांचा सविस्तर अभ्यास करावा.

६.    'नीट' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांला बायोलॉजी या विषयाच्या अनेक संकल्पना उत्तमरीत्या माहीत असणे अत्यावश्यक आहे. फिजिक्समधल्या थर्मोडायनॅमिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नॅटिक्स तसेच केमिस्ट्रीतील आयोनिक इक्विलिब्रिया, ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि बायोमॉलिक्यूल्स या धडय़ांचा बायोलॉजीच्या अनेक संकल्पना समजून घेण्यास उपयोग होतो.

७.    'नीट' परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांच्या अभ्यासासाठी 'एनसीईआरटी'च्या पाठय़पुस्तकांचा सविस्तर अभ्यास करायला हवा.

८.    'नीट' परीक्षेचा पॅटर्न लक्षात घेत परीक्षेपूर्वी
तीन महिने अनेक चाचणीपरीक्षा दिल्या तर विद्यार्थ्यांना परीक्षेचा चांगलाच सराव होईल आणि 'नीट'मध्ये विचारल्या गेलेल्या अमुक एका प्रश्नाचे उत्तर आपण लिहू शकतो का, याचाही अंदाज विद्यार्थ्यांना येऊ शकेल. ही निर्णयक्षमता विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी चाचणी परीक्षांमधील आपल्या कामगिरीचे सातत्याने विश्लेषण करणे आवश्यक ठरते.

वर नमूद केलेल्या बाबी लक्षात घेतल्या तर वैद्यकीय अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना 'नीट' परीक्षा देणे आणि त्यातील आपल्या कामगिरीचा आलेख उंचावणे सहजशक्य ठरेल.  
संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र -दुर्गेश मंगेशकर