विविध राज्यांतील गणेश


विविध राज्यांतील गणेश काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात अनेक ठिकाणी गणेशस्थाने आहेत. त्यांपैकी काही परिचित, तर अनेक अपरिचित आहेत. त्यांपैकी काही स्थानांची थोडक्‍यात माहिती 

गोवा खांडोळ्याचा गणपती कामाक्षीदेवी कामरूपहून (आसाम) गोव्यात आली, त्याचप्रमाणे हा गणपतीही तिकडूनच आला अशी लोकांची श्रद्धा आहे. तिसवाडी तालुक्‍यात दिवाडी गावाच्या नावेली येथे हा गणपती होता. 1560मध्ये या गणपतीची मूर्ती फोंडे तालुक्‍यातील खंडेपार येथे आणण्यात आली. नावेलीचे शेणवी नावेलकर हे गणेशभक्त. गणेशाची मूर्ती हलविल्याने त्यांना खंडेपार येथे जाणे अवघड होऊ लागले.एका धनत्रयोदशीच्या रात्री नावेलकर मंडळींनी ही मूर्ती खंडेपार येथून पळविली. दिवाळीच्या पहाटे खंडेपारकरांना देवळात मूर्ती दिसेना म्हणून ते मूर्ती शोधण्यासाठी निघाले. भाणस्तारच्या खाडीतून मूर्ती नेताना नावेलकरांना त्यांनी पकडले. दोघांत प्रचंड वादावादी झाली, नंतर ठरले की दोघांनाही येण्याजाण्यासाठी सोयीच्या ठिकाणी मूर्ती ठेवावी. त्यानुसार पणजी व फोंड्यापासून सारख्या अंतरावर असलेल्या खांडोळे या गावी मूर्तीची स्थापना करण्यात आली. नरक चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती गावातून गेली म्हणून शेणवी खंडेपारकर अजूनही दिवाळी साजरी करत नाहीत, तर दिवाळीच्या दिवशी मूर्ती गावी आणता आली नाही म्हणून नावेलकरही दिवाळी साजरी करत नाहीत. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला समेट झाल्याने दोन्ही घराण्यांत दीपोत्सव साजरा करण्यात येतो. या गणपतीचे मंदिर खांडोळ्याला डोंगराच्या पायथ्याशी नारळांच्या आगरात आहे. पाषाणाची भव्य गणेशमूर्ती विराजमान आहे. 
पुनळेकरांचा गणपती बार्देश महालात बस्तांदे येथे पुतळे वाडी आहे. तेथे गणपतीचे देऊळ होते. ते पोर्तुगिजांनी उद्‌ध्वस्त केले. त्यामुळे तेथील मूर्ती पेडणे महालातील धारगळ गावी नेण्यात आली. या गणपतीस पुनळेकरांचा गणपती म्हणतात. 
हरमलचा गणेश हरमल येथे इतिहासप्रसिद्ध नारायणाचे देऊळ आहे. ते आता पडक्‍या स्थितीत आहे. या मंदिरात गणेशाची स्थापना केली आहे. पोर्तुगिजांनी गणेशपूजनास बंदी घातल्याने भिंतीवरील चित्राची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. अजूनही काही सारस्वत कुटुंबे कागदावरील गणपतीचे पूजन भाद्रपदात करतात.

कर्नाटक कौण्डिण्य महागणपती 
कुरुडुमळे (जि. कोलार) या गावात हे गणपती मंदिर आहे. कौण्डिण्य ऋषींचा आश्रय या ठिकाणी होता, त्यामुळे याला "कौण्डिण्य क्षेत्र' असेही संबोधिले जाते. त्रिपुरासुराशी लढायला जाण्यापूर्वी ब्रह्मा,विष्णू व महेश आणि इतर देवांनी या ठिकाणी महागणपतीची आराधना केली होती, म्हणून याला गणेशगिरी किंवा कुटाचल असेही संबोधले जाते. येथील महागणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय गणेशयात्रा पूर्ण होत नाही, अशी धारणा आहे. मंदिराच्या मुख्य देवळाच्या गर्भगृहात महागणपतीची मूर्ती नऊ फूट उंचीची असून, हिरव्या संगमरवराची आहे.
इडगुंजी महागणपती इडगुंजी गावातील हा गणपती पंचखाद्यप्रिय महागणपती म्हणून ओळखला जातो. हे गाव गोकर्ण क्षेत्रापासून 25 मैलांवर आहे. एकदा नारद पार्वतीकडे गेले होते, तेथे गणपती गोड खाऊसाठी रडत होता. त्या वेळी नारदांनी आश्‍वासन दिले, की तुला रोज पंचखाद्य इत्यादी गोड खाऊ देववितो, तू माझ्याबरोबर शरावती काठी इडाकुंज क्षेत्री चल. पुढे तेथे विश्‍वकर्म्याने गणेशाची स्थापना केली,अशीकथा आहे. ही गणेशाची द्विहस्त मूर्ती आहे. बालब्रह्मचारी रूपातील ही मूर्ती आहे. विशेष म्हणजे या मूर्तीचे डोळे अतिशय बारीक असून, दोन्ही सुळे सारख्या आकाराचे आहेत. इडलीसारखा पदार्थ मूर्तीच्या चारी बाजूंनी डोक्‍यापर्यंत अर्पण करण्याची पद्धत येथे आहे. दुपारच्या आरतीच्या वेळी पंचखाद्य नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे.

गोकर्ण 
राक्षसाधीश रावणाच्या हातून शंकराचे आत्मलिंग वाचविणारा ब्राह्मण बटूच्या रूपातील गणेश म्हणून गोकर्णच्या गणेशाची ख्याती आहे. ही दोन हाती उभी सुमारे पाच फूट उंचीची पाषाणमूर्ती आहे. ही मूर्ती पाचव्या शतकातील असावी. या मूर्तीला मुकुट नाही. रावणाने ठोसा मारल्याची खूण या मूर्तीच्या डोक्‍यावर दाखविली जाते. हा गणपती गोकर्ण महाबळेश्‍वरच्या आवारातच; पण स्वतंत्र मंदिरात आहे.
तमिळनाडू शंकराचार्यस्थापित गणेश श्रीरंगम स्थानकाच्या जवळच जंबुकेश्‍वराचे मंदिर आहे. त्याच्या शेजारीच जगदंबेचे मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच गणेशमंदिर आहे. ही मूर्ती शंकराचार्यांनी स्थापन केली आहे. जगदंबेची मूर्ती पूर्वी तेजस्वी आणि उग्र होती. तिचे उग्र तेज शांत करण्यासाठी शंकराचार्यांनी गणेशाची स्थापना तिच्यासमोरच केली अशी कथा सांगितली जाते.
उत्तर प्रदेश धुंडीराज (श्रीक्षेत्र काशी) काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिराच्या परिसरात ही गणेशमूर्ती आहे. भारतातील 21 गणेशस्थानांपैकी हे एक स्थान आहे. भस्मासुराचा मुलगा दुरासद याचा नाश करण्यासाठी देवांच्या प्रार्थनेवरून दिव्य अवतार धारण करून त्याचा नाश केला, अशी कथा आहे. काशी क्षेत्रात 56 विनायक असल्याची नोंद आहे.
sakal.com

'रिझ्यूम' तयार करताना...


नोकरी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' असतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तम जॉब मिळवणं हे तर प्रत्येकाच्या आयुष्याचे 'मिशन' असते तर नोकरी मिळाली पण त्यात 'सॅटीसफॅक्शन' नाही, असे चांगल्या 'ब्रेक'च्या प्रतिक्षेत असतात. त्यासाठी तुमचा 'सीव्ही' अर्थात 'रिझ्युम' देखील तितकाच ताकदीचा हवा. आकर्षक हवा. तुमचा 'सीव्ही' पाहताच तुम्हाला 'ऑफर लेटर' मिळावे असा छाप पाडणारा असायला पाहिजे. त्यासाठीच या काही टिप्स...

तुमच्यात असलेली कौशल्ये व त्या- त्या जॉबसाठी आवश्यक असलेली कौशल्ये यांची सांगड तुमच्या सीव्हीमध्ये व्यवस्थीत घातलेली असवी. काही ठिकाणी तुमच्याकडे असलेला अनुभव पुरेसा नसतो तर अशावेळी तुम्ही त्या-त्या पोस्टसाठी कसे 'फिट' आहे, हे 'रिझ्युम'मध्ये 'प्रेझेण्ट' करता आले पाहिजे. 

तुमचा 'रिझ्यूम' चांगला बनवण्यासाठी काही टिप्स :

* तुमचा 'रिझ्यूम' हा मुलाखत घेणार्‍याला तुमची ओळख करून देत असतो. त्यामुळे तुमचे शिक्षण, वैयक्तीक माहिती, अनुभव, आवडी- निवडी, विशेष गुण ह्यांची मुलाखत घेणार्‍यास कल्पना आली पाहिजे. 

* तुम्ही केलेले शिक्षण, कोसेर्सची माहिती, ज्या संस्थेतून केले त्याचे नाव अशा सर्व गोष्टी त्यात असाव्यात. तुमचं 'लेटेस्ट क्वालिफिकेशन' सर्वात वर असायला हवं.

* 'रिझ्यूम' हा तुम्ही तयार केला असल्याने त्याबद्दल तुम्हाला सखोल माहिती असणे आवश्यक असते. मुलाखत घेणार्‍याकडून त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. 'रिझ्यूम'मधील एखादा मुद्दा समजावून सांगताना गोंधळ होता कामा नये. त्यामुळे 'रिझ्यूम' स्वत:च्या शब्दांत आणि सोप्या भाषेतच लिहिला पाहिजे. 

* तुम्ही शिक्षणात तसेच आधीच्या नोकरीत विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याला तुमच्या 'रिझ्यूम'मध्ये चांगले स्थान दिले पाहिजे. त्याची थोडक्यात पण संमर्पक माहिती दिली पाहिचे. 

* तुमच्या आवडी-निवडी, छंद या बाबी देखील महत्त्वाच्या आहेत. त्यांनाही तुमच्या 'रिझ्यूम'मध्ये स्थान मिळाले पाहिजे. 

* 'रिझ्यूम'मध्ये अनावश्यक गोष्टी लिहणे कटाक्षाने टाळावे. 

नोकरी म‍िळावी, तिच्यावरच आयुष्य खपवावं आणि वयाच्या 58 व्या वर्षी 'रिटायर्ड' व्हावं. हा आपल्या वडिलांचा काळ केव्हाच मागे पडला आहे. आजचे युग हे फास्ट झाले आहे. त्यामुळे दोन- तीन वर्षात नोकरी 'चेंज' करणे आजच्या यंगस्टर्सचे तर वैशिष्ट्य झाले आहे.

नोकरीसाठी जाताना....

तुमचे व्यक्तिमत्व जितके विकसित तितका तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. कोणतेही काम करताना तुमचे त्या कामातून झळकणारे व्यक्तीमत्वच तुमची खरी ओळख असते. त्यामुळे आजकाल व्यक्तिमत्व विकासासाठी स्पेशल कोर्सही लावले जातात. या माध्यमातून तुम्हाला एक नवीन दृष्टीकोन मिळत असतो.

तुम्ही जेव्हा तुमचे शिक्षण पुर्ण करून नोकरी शोधण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला याची जाणीव होते, की इतरांच्या मानाने तुम्ही केवळ तुमच्या नकारात्मक व्यक्तिमत्त्वामुळे मागे पडलात. मग दु:ख करण्‍यात तुम्ही तुमचे पुढचे आयुष्यही बरबाद करता. त्यापेक्षा नोकरीवर जाण्यापूर्वीच काही गोष्टींची माहिती तुम्हाला होणे गरजेचे आहे.

संपूर्ण माहिती घ्या: 
ज्या कंपनीत तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला असेल त्या कंपनीची माहिती आधी जमा करा. त्या कंपनीचा अभ्यास करा. त्या कंपनीचा इतिहास, तिची होणारी वाढ आणि हो नुकसानही कंपनीच्या वरिष्ठांना सांगाल म्हणजे तुम्ही कंपनीचा केलेला अभ्यास त्यांना जाणवेल. तुमच्या आवाजात कोणताही आक्रमकपणा जाणवू देऊ नका. वायफळ बडबड टाळा. एका वाक्यात मुळीच उत्तरे देऊ नका.

अधिकार्‍याने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर प्रामाणिकपणे ते कबूल करा. उगाच खोटे उत्तर द्याल तर अडकाल.
कंपनीच्या कोणत्याही अधिकार्‍याला ओळखत असाल तरी त्याचे नाव सारखे सारखे इंटव्ह्यूमध्ये सांगू नका. अशाने अधिकार्‍यांचे तुमच्याबद्दलचे मत खराब होईल.

काही टेबल प्रोटोकॉल पाळा. तुमच्यासाठी चहा आणला असेल तरी तुम्ही अधिकार्‍यांनी तो चहा घेण्यापूर्वी पिण्याची घाई करु नका. कंपनीच्या आगामी दिशेविषयीच्या तुमच्या काही कल्पना असतील तर त्या अधिकार्‍यांना नुसत्या सांगूच नका तर त्यांना त्या पटवून देण्याचा प्रयत्न करा.

या बाबींकडे प्रकर्षाने लक्ष द्या: 
1. तुमचे पाय सरळ ठेवा. तुम्ही पाय जर विळखा घातल्यासारखे ठेवले तर याचा अर्थ असा होतो, की तुम्ही नकारात्मक विचार करत आहात आणि तुम्हाला भीती वाटत आहे.

2. इंटरव्ह्यू घेणार्‍या अधिकार्‍याच्या डोळ्यात डोळे घालून बोला. तुम्ही जर असे केले तर तुमचा आ‍त्मविश्वास त्यातून दिसून येईल आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी खर्‍या आहेत हे पटेल.

3. तुमच्या खाद्यांना जरासेच पुढच्या बाजुने झुकवत समोरच्या वक्तीशी संवाद साधा. याचा अर्थ असा होतो की तुमचे मन साफ आहे. हो पण जास्त पुढे झुकु नका. त्याने तुम्ही समोरच्याची खुशमस्करी करत असल्याचे दिसून येते.

4. समोरची व्यक्ती किंवा अधिकारी तुम्हाला काही सुचना करत असतील तर त्यांचे वाक्य पुन्हा बोलू नका. तो त्यांचा अपमान समजला जातो. तुम्ही केवळ मानेने होकार देऊ शकता.

5 चेहर्‍यावर तेज दिसण्यासाठी त्या दिवशी मनात सकारात्मक विचार करा.

6 उनाडपणा करणे टाळा.

या काही महत्वाच्या टिप्स पाळाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.