विविध राज्यांतील गणेश


विविध राज्यांतील गणेश काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात अनेक ठिकाणी गणेशस्थाने आहेतत्यांपैकी काही परिचिततर अनेक अपरिचित आहेतत्यांपैकी काही स्थानांची थोडक्‍यात माहिती 

गोवा खांडोळ्याचा गणपती कामाक्षीदेवी कामरूपहून (आसामगोव्यात आलीत्याचप्रमाणे हा गणपतीही तिकडूनच आला अशी लोकांची श्रद्धा आहेतिसवाडी तालुक्‍यात दिवाडी गावाच्या नावेली येथे हा गणपती होता. 1560मध्ये या गणपतीची मूर्ती फोंडे तालुक्‍यातील खंडेपार येथे आणण्यात आलीनावेलीचे शेणवी नावेलकर हे गणेशभक्तगणेशाची मूर्ती हलविल्याने त्यांना खंडेपार येथे जाणे अवघड होऊ लागले.एका धनत्रयोदशीच्या रात्री नावेलकर मंडळींनी ही मूर्ती खंडेपार येथून पळविलीदिवाळीच्या पहाटे खंडेपारकरांना देवळात मूर्ती दिसेना म्हणून ते मूर्ती शोधण्यासाठी निघालेभाणस्तारच्या खाडीतून मूर्ती नेताना नावेलकरांना त्यांनी पकडलेदोघांत प्रचंड वादावादी झालीनंतर ठरले की दोघांनाही येण्याजाण्यासाठी सोयीच्या ठिकाणी मूर्ती ठेवावीत्यानुसार पणजी व फोंड्यापासून सारख्या अंतरावर असलेल्या खांडोळे या गावी मूर्तीची स्थापना करण्यात आलीनरक चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती गावातून गेली म्हणून शेणवी खंडेपारकर अजूनही दिवाळी साजरी करत नाहीततर दिवाळीच्या दिवशी मूर्ती गावी आणता आली नाही म्हणून नावेलकरही दिवाळी साजरी करत नाहीतकार्तिक शुद्ध प्रतिपदेला समेट झाल्याने दोन्ही घराण्यांत दीपोत्सव साजरा करण्यात येतोया गणपतीचे मंदिर खांडोळ्याला डोंगराच्या पायथ्याशी नारळांच्या आगरात आहेपाषाणाची भव्य गणेशमूर्ती विराजमान आहे
पुनळेकरांचा गणपती बार्देश महालात बस्तांदे येथे पुतळे वाडी आहेतेथे गणपतीचे देऊळ होतेते पोर्तुगिजांनी उद्‌ध्वस्त केलेत्यामुळे तेथील मूर्ती पेडणे महालातील धारगळ गावी नेण्यात आलीया गणपतीस पुनळेकरांचा गणपती म्हणतात
हरमलचा गणेश हरमल येथे इतिहासप्रसिद्ध नारायणाचे देऊळ आहेते आता पडक्‍या स्थितीत आहेया मंदिरात गणेशाची स्थापना केली आहेपोर्तुगिजांनी गणेशपूजनास बंदी घातल्याने भिंतीवरील चित्राची पूजा करण्याची प्रथा सुरू झालीअजूनही काही सारस्वत कुटुंबे कागदावरील गणपतीचे पूजन भाद्रपदात करतात.

कर्नाटक कौण्डिण्य महागणपती 
कुरुडुमळे (जिकोलारया गावात हे गणपती मंदिर आहेकौण्डिण्य ऋषींचा आश्रय या ठिकाणी होतात्यामुळे याला "कौण्डिण्य क्षेत्रअसेही संबोधिले जातेत्रिपुरासुराशी लढायला जाण्यापूर्वी ब्रह्मा,विष्णू व महेश आणि इतर देवांनी या ठिकाणी महागणपतीची आराधना केली होतीम्हणून याला गणेशगिरी किंवा कुटाचल असेही संबोधले जातेयेथील महागणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय गणेशयात्रा पूर्ण होत नाहीअशी धारणा आहेमंदिराच्या मुख्य देवळाच्या गर्भगृहात महागणपतीची मूर्ती नऊ फूट उंचीची असूनहिरव्या संगमरवराची आहे.
इडगुंजी महागणपती इडगुंजी गावातील हा गणपती पंचखाद्यप्रिय महागणपती म्हणून ओळखला जातोहे गाव गोकर्ण क्षेत्रापासून 25 मैलांवर आहेएकदा नारद पार्वतीकडे गेले होतेतेथे गणपती गोड खाऊसाठी रडत होतात्या वेळी नारदांनी आश्‍वासन दिलेकी तुला रोज पंचखाद्य इत्यादी गोड खाऊ देववितोतू माझ्याबरोबर शरावती काठी इडाकुंज क्षेत्री चलपुढे तेथे विश्‍वकर्म्याने गणेशाची स्थापना केली,अशीकथा आहेही गणेशाची द्विहस्त मूर्ती आहेबालब्रह्मचारी रूपातील ही मूर्ती आहेविशेष म्हणजे या मूर्तीचे डोळे अतिशय बारीक असूनदोन्ही सुळे सारख्या आकाराचे आहेतइडलीसारखा पदार्थ मूर्तीच्या चारी बाजूंनी डोक्‍यापर्यंत अर्पण करण्याची पद्धत येथे आहेदुपारच्या आरतीच्या वेळी पंचखाद्य नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे.

गोकर्ण 
राक्षसाधीश रावणाच्या हातून शंकराचे आत्मलिंग वाचविणारा ब्राह्मण बटूच्या रूपातील गणेश म्हणून गोकर्णच्या गणेशाची ख्याती आहेही दोन हाती उभी सुमारे पाच फूट उंचीची पाषाणमूर्ती आहेही मूर्ती पाचव्या शतकातील असावीया मूर्तीला मुकुट नाहीरावणाने ठोसा मारल्याची खूण या मूर्तीच्या डोक्‍यावर दाखविली जातेहा गणपती गोकर्ण महाबळेश्‍वरच्या आवारातचपण स्वतंत्र मंदिरात आहे.
तमिळनाडू शंकराचार्यस्थापित गणेश श्रीरंगम स्थानकाच्या जवळच जंबुकेश्‍वराचे मंदिर आहेत्याच्या शेजारीच जगदंबेचे मंदिर आहेया मंदिराच्या समोरच गणेशमंदिर आहेही मूर्ती शंकराचार्यांनी स्थापन केली आहेजगदंबेची मूर्ती पूर्वी तेजस्वी आणि उग्र होतीतिचे उग्र तेज शांत करण्यासाठी शंकराचार्यांनी गणेशाची स्थापना तिच्यासमोरच केली अशी कथा सांगितली जाते.
उत्तर प्रदेश धुंडीराज (श्रीक्षेत्र काशीकाशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिराच्या परिसरात ही गणेशमूर्ती आहेभारतातील 21 गणेशस्थानांपैकी हे एक स्थान आहेभस्मासुराचा मुलगा दुरासद याचा नाश करण्यासाठी देवांच्या प्रार्थनेवरून दिव्य अवतार धारण करून त्याचा नाश केलाअशी कथा आहेकाशी क्षेत्रात 56 विनायक असल्याची नोंद आहे.
sakal.com