1 Month’s Quick Study Plan- PSI Main Exam


मित्रांनो, पी.एस.आय. मुख्य परीक्षेची तयारी कशी काय चालू आहे?
कोणत्याही परीक्षेची तयारी घाईने कधीच होत नाहीये. आता पर्यंत तुमचा बराच अभ्यास झालेला असेल, होय ना?
मैत्रिणींनो, काय तुम्ही सुद्धा तयार आहात ना ह्या परीक्षेसाठी? नाही? का बर? काय प्रोब्लेम आहे? १९ सप्टेंबर २०१० ला काय घडलं माहित आहे की नाही? भारताच्या महिला बॉक्सर “एम.सी. मेरी कॉम” हिने जागतिक स्पर्धेत (world championship ) मध्ये इतिहास घडवून आणला, सलग पाचव्यांदा सुवर्ण पदक जिंकलं आहे आणि लंडन ओलीम्पिक्स २०१२ वर तिची नजर आहे, तेही सुवर्ण पदकासाठी!!! आहे की नाही मैत्रिणींनो अभिमानाची गोष्ट? मग तुम्ही का मागे राहता? मुलींनी अगदी पुढे राहायचं जसं तुम्ही आजकाल प्रत्येक क्षेत्रात असता तसंच. कोणी थांबवते का तुम्हास? नाही ना! मग व्हा पुढे आणि पी.एस.आय. च्या युनीफॉर्मवर नजर ठेवा व तो मिळवाच !!!
पी.एस.आय. मुख्य परीक्षा २३ ऑक्टोबर ला आहे तर आता फक्त १ महिनाच उरला आहे त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खाली असलेला एक महिन्याचा स्टडी प्लान सप्रेम भेट. ह्यापी प्रिपरेशन!!!

23rd Sep To 22 Oct 2010

विषय/शाखादिवस
इंग्रजी:3 दिवस
मराठी:3 दिवस
कला शाखा:4 दिवस
विज्ञान शाखा:4 दिवस
वाणिज्य व अर्थशास्त्र शाखा:4 दिवस
बुद्धिमापन:3 दिवस
कृषी शाखा:4 दिवस
जागतिक चालू घडामोडी:1 दिवस आणि इतर दिवशी दररोज २ तास
आता ही परीक्षा अगदी तोंडावर आलेली असल्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करणे जरुरी आहे. नोकरी करत असाल तर आता सुटी घ्या कारण वेळ कमी आहे ना! दररोज कमीत कमी ८ ते १४ तास अभ्यास करा नाहीतर तुमचं एक वर्ष अजून वाया जावू शकते. जो वेळेला महत्व देत नाही त्याच्यासोबत असंच घडत असते.
मी ह्या प्लान मध्ये काही दिवस दिलेत प्रत्येक विषयाला/शाखेला तर तुमच्या सवडीनुसार तुम्ही हवा त्या विषयाचा अभ्यास करा, मी काहीच म्हणणार नाही. :)
कोणत्याही परीक्षेत सफल होण्यासाठी तिचा सराव करणे गरजेचे असते. दररोज नमुना प्रश्न पत्रिका सोडवायचा प्रयत्न करा, हा सरावच तुमच्या कामी येईल हे लक्षांत ठेवा.
गुड लक !!!

By - AnilMD

शासकीय सेवा का बरं करावी


मित्रांनो, आज काल च्या ह्या धकाधकीच्या आणि अनिस्चीततेच्या जीवनात तुम्हाला प्रश्नच पडला असेल की करावं तरी काय? कसली नोकरी करावी? खाजगी क्षेत्रात जावं की सरकारी नौकरी करावी? थांबा, थांबा, इथेच थांबा! हा प्रश्न आजचा नाहीये, तर कित्येक वर्षांपासून हा प्रश्न तरुण पिढीला पडत आलेला आहे आणि पडत राहणार. फरक फक्त इतकाच की तुमच्यासारखे देशासाठी झटणारे सरकारी नौकरी मध्ये शामिल होतील आणि बाकी जण खाजगी नौकऱ्या करतील. बरोबर ना?
जावू द्या, ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो. तुम्ही, मी थांबवू शकतो का त्यांना? आणि मग सर्वांनीच सरकारी नौकरी करायची तर मग खाजगी क्षेत्रात कोणी जायचं? हम्म, बघूया ते नंतर कधी. आता मुख्य प्रश्न हा आहे की शासकीय सेवेत का बरं जावं?
हे तर सर्वांनाच माहित आहे की खाजगी नौकरी म्हणजे भरपूर पगार, हो ना? पण त्यामागे जी असुरक्षितता असते त्याचं काय? नौकरी केव्हाही जावू शकते ही टांगती तलवार डोक्यावर नेहमी असतेच ना, मग?
शासकीय सेवेत मात्र तसं नसते. तर चला बघूया काय फायदे आहेत शासकीय नौकरीत:
  • सुरक्षित नौकरी: शासकीय नौकरी एकदा मिळाली की ती वयाच्या ५८ ते ६० वर्षापर्यंत असते. जो पर्यंत तुम्ही इमाने इतबारे नौकरी करता तो पर्यंत तुमची नौकरी स्थायी असते. कोणी “माई का लाल” तुमच्या नौकरीला इजा पोहचवू शकत नाही.
  • पगार व पेन्शन च्या रूपाने आर्थिक सुरक्षितता: जर तुम्ही तुमच काम वेळेवर आणि इमानदारीने केलात तर पगार प्रत्येक महिन्यात मिळणार म्हणजे मिळणार. कोन्हीही थांबवू शकत नाही. वेलेवरती पगारवाढ पण होते, महागाई भत्ते सुद्धा वेळेवरच मिळतात. पदोन्नती सुद्धा मिळते. एकदा नौकरी संपली की आर्थिक अडचण येते पण सरकारी नौकरी संपली की पेन्शन च्या रुपात मात्र तुमचं आर्थिक जीवन सुरक्षित असते.
  • सामाजिक स्थान: ज्याला आपण “स्टेटस” म्हणतो ते सामाजिक स्थान काही औरच असते. बघा ना तुम्ही आज काही नाही पण उद्या उप-जिल्हाधिकारी झाले तर काय होईल! समजल ना मला काय म्हणायचे ते? साध्या सब इन्स्पेक्टर ला सुद्धा किती आदर मिळतो ना! तुम्ही एक क्लास १ किंवा २ चे अधिकारी बनता, होय की नाही? मग तेव्हा काय असेल तुमचा तोरा! त्यातल्या त्यात जर का तुम्ही स्त्री असाल तर मग तुमचा किती मान होतो ना! एक ओळख निर्माण होते स्त्री ची. स्वताच्या पायावर उभी असल्याचा स्वाभिमान आणि त्या बरोबरच स्वतःची ओळख ही फार मोठी गोष्ट आहे, बरं का!
  • सर्वात महत्वाचे म्हणजे काही केल्याचं समाधान: सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, शासकीय नौकरी मध्ये जे काही करायला मिळते ती एक जबाबदारी असते, देशासाठी, देशातील लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवता येतात. गरिबांसाठीच्या योजना पूर्ण केल्यावर, सामाजिक सेवा केल्याचा जो आनंद मिळतो तो खाजगी सेवेत १ लाख रुपये बोनस मिळाला तेव्हा आनंद होतो त्यापेक्षा कितीतरी मोठा असतो. एक प्रकारच हे सर्वात मोठं समाधान असतं जे पैसे देवूनही मिळत नाही.
तर मित्रांनो, जे मीठ तुम्ही खाल्लंत देशाचं, त्याची परत फेड करा, शासकीय सेवेत रुजू व्हा आणि काही केल्याचं समाधान मिळवा, तीच आजची गरज आहे. तुमच्यासारख्या होतकरू तरुणांची/तरुणींची गरज आहे हो देशाला, समाजाला. व्हा अधिकारी आणि करा तुमचे स्वप्नं पूर्ण, त्यासोबतच देशाचं आणि समाजाचं सुद्धा भलं होईल.
रस्ता जरी कठीण असला तरी काळजी करू नकोस मित्रा, मी आहे ना मार्गदर्शन करायला, मग घाबरतो/घाबरतेस कशाला?

By- AnilMD