अकरावी प्रवेशाचे मार्गदर्शन



 
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत चा व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी 
 https://www.facebook.com/groups/271488426292523/ या संकेतस्थळावर जा
तुम्हाला तीतूनच व्हिडिओ डाऊनलोड करता येईल.

कधी नेट चालत नाही तर कधी पासवर्ड आठवत नाही. एकूणच अकरावीच्या ऑनलाइन अॅडमिशन प्रक्रियेबद्दल पालकांच्या आणि मुलांच्या मनात अनेक शंका असतात. त्याचंच निरसन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने , ठाण्याच्या टिप टॉप प्लाझामध्ये एक सेमिनार आयोजित केलं होतं. यावेळी दिलेल्या काही टिप्स. 

अकारावीच्या प्रवेश प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे ऑनलाइन फॉर्म भरणं. अपुऱ्या माहितीमुळे या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. म्हणूनच महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या सेमिनारला विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी राज्यशासनाच्या ऑनलाइन प्रवेश कोअर कमिटीचे सदस्य प्रा. विक्रम करंदीकर आणि प्रा. रमेश देशपांडे यांनी मार्गर्शन केलं. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे अर्ज कसे भरायचे हे समजणं सोपं जावं यासाठी सेमिनारमध्ये थेट वेबसाइटवरून एका विद्यार्थीनीचा लॉगइन आयडी क्रिएट करून तिचा अर्ज भरेपर्यंतच्या सर्व प्रक्रियेचं लाइव्ह डेमोन्स्ट्रेशन करण्यात आलं. नेमक्या चुका कुठे होतात , त्या कशा टाळायच्या आणि फॉर्मस कमीतकमी वेळात भरण्यासाठी काय काय करायचं याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. 

ऑनलाईन अर्ज भरताना ... 

ऑनलाईन अर्ज भरताना तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड हा लक्षात ठेवणे गरजेचं आहे. यासाठी आयडी आणि पासवर्ड याची डायरीत नोंद करुन ठेवावी. 

प्रवेश पुस्तिका घेताना आयडी आणि पासवर्ड दिला असला तरी तुम्हाला पासवर्ड बदलता येतो. तुमचं नाव , जन्मतारीख असा पासवर्ड शक्यतो टाकू नये. पासवर्डमध्ये स्पेस टाकू नये. पासवर्ड विसरल्यास सिक्युरिटी प्रश्नाच्या आधारे तुम्हाला लॉगइन करणं शक्य होतं. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात राहील असंच ठेवा. 

पासवर्ड विसरल्यास शाळेच्या प्रिन्सिपलकडून तो रिकव्हर करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. मात्र लॉग इन आयडी विसरल्यास तुम्हाला नवीन फॉर्म घ्यावा लागेल. 

अर्ज अतिशय काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे. तुमचा सीटनंबर चुकू देऊ नका. चुकल्यास तुमचं आणि तो सीट नंबर असलेला विद्यार्थी या दोघांचाही नुकसान होईल. 

जात , स्पोर्ट्स आणि माजी सैनिक कोट्यासाठी... 

जातीच्या आरक्षणाच्या कोट्यातून अर्ज केला असल्यास शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख किंवा जात प्रमाणपत्र दोनपैकी एक कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या कोट्यातून अप्लाय केल्यावर विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून यासंबंधीची कागदपत्रे प्रमाणीत करुन घ्यावीत. हीच पध्दत स्पोर्ट्स , माजी सैनिक कोटा यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी वापरावी. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्टिफिकेट काळजीपूर्वक तपासून घ्यावीत. 

आयसीएसई आणि सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी 

आयसीएसई आणि सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मार्कही भरावे लागतील. तुम्ही ज्या शाळेतून परिक्षेसाठी बसला होता त्या शाळेतून तुमचं मार्कशीट प्रमाणीत करुन घ्यावं. तर मुंबईबाहेरील आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील कोणत्याही आयसीएसईच्या शाळेतून त्यांची मार्कशीट प्रमाणीत करुन घ्यावी. सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने मुंबईत चार सेंटर्स तयार केली असून त्यांनी या सेंटर्समधून मार्कशीट प्रमाणीत करुन घेणं अपेक्षीत आहे. बाहेरच्या राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी ते राहात असलेल्या ठिकाणाहून जवळच्या गायडन्स सेंटरमध्ये जाणं योग्य ठरेल. 

कॉलेज निवडताना 

कॉलेजचा प्राधान्यक्रम ठरवताना विद्यार्थ्यांना एमएमआर , झोन आणि वॉर्ड असे तीन टप्पे देण्यात आले आहेत. हे तीन टप्पे मिळून विद्यार्थ्यांना किमान ३५ तर कमाल ६० कॉलेजचा पर्याय देणे आवश्यक आहे. यातील वॉर्डमध्ये कॉलेज निवडताना शाळेशी संलग्न असलेल्या ५ ज्युनिअर कॉलेजचा पर्याट देणं बंधनकारक आहे. काही कॉलेजेसमध्ये एडेड आणि अनएडेड असे दोन प्रकार असून यासाठी त्यांना कोडही वेगळे देण्यात आले आहे. कॉलेज निवडताना आधी एडेड आणि मग अनएडेडचा पर्याय निवडावा. बायफोकलसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचा पर्याय निवडताना त्या कॉलेजमध्ये बायफोकल आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. हे प्रवेश यंदा ऑफलाइन होणार आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यासाठी कॉलेजमध्ये जाऊन अर्ज भरावे लागतील. 

ऑनलाइन अर्ज भरताना सर्व माहिती भरा. एखादी माहिती नाही भरली तरी चालेेल असं करू नका. याचबरोबर तुम्हाला मिळणाऱ्या मार्कांच्या अंदाजावरून पुस्तकात देण्यात आलेल्या कटऑफ यादीनुसार तुम्हाला पाहिजे असलेल्या कॉलेजेसची प्रेफरन्स यादी तयार करून ठेवा. म्हणजे अर्ज भरताना वेळ वाचेल. 

प्रा. रमेश देशपांडे 

अर्ज भरण्यास आतापासूनच सुरूवात करा. निकाल लागेपर्यंत तुम्हाला बराच वेळ हातात असतो. त्या कालावधीत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ठेवा. यामुळे प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्यावेळी तुमचा वेळ वाचेल आणि धावपळही कमी होईल. कितीही अडचण आली तरी इतर कोणावर अवलंबून न राहता तुमच्या जवळच्या मार्गदर्शन केंद्रावर जा म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल. 

- प्रा. विक्रम करंदीकर 

विद्यार्थ्यांचे प्रश्न- 

सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज शाळेव्दारेच भरणे आवश्यक आहे का ? 

उत्तर - शाळेव्दारे फॉर्म भरणे बंधनकारक नसले तरी तसा फॉर्म भरल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील शंकाचे निरसन होईल आणि फॉर्ममध्ये चुका टाळता येतील. 

स्पोर्ट्स कोट्याच्या परवानगीसाठी काय करावं लागतं ? 

उत्तर - यासाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेल्या मागदर्शक पुस्तिकेतील नमुना प्रमाणपत्रावर सक्षम अधिकाऱ्यांची सही आणणं आवश्यक असतं. हे सक्षम अधिकारी कोण याची यादी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर देण्यात आली आहे
(हि माहिती महाराष्ट्र  taimes  मध्ये प्रसिद्ध झाली आहे )

फोटोग्राफी एक उज्ज्वल करियर




फोटोग्राफी ही एक कला आहे. छायाचित्रकाला एक चांगली दृष्टी असावी लागते, असे म्हटले जाते. तसेच त्याने या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानही अवगत करणे आवश्यक असते. मात्र फोटोग्राफी हे एकमेव माध्यम आहे की त्यात भाषेची आवश्यकता नसते. या क्षेत्रात शब्दापेक्षा प्रतिमेचा अधिक प्रभाव पडत असतो. एक छायाचित्रे दहा हजार शब्दांची गरज भागवते. फोटोग्राफी ही अशी कला आहे की त्यात आपल्याला उज्ज्वल करियर करण्‍याची संधी आहे.

एक यशस्वी छायाचित्रकार बनण्यासाठी आपल्याकडे वास्तविक सौंदर्य पाहण्याची दृष्टी व तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. आपले नाजूक डोळे कुठल्याही वस्तुचे छायचित्र व्हिज्यूलाईज करू शकतात. वरील सगळे गुण आपल्यात असून फोटोग्राफीमध्ये करियर करायची इच्छा आहे तर या क्षेत्रातील सगळी कवाडं आपल्यासाठी खूली आहेत... 

आवश्यक पात्रता-
फोटोग्राफी हे एक क्रिएटीव्ह माध्यम असल्याने त्यासाठी विशेष पात्रतेची आवश्यकता नसते. आपली दृष्टी एखाद्या कविसारखी पाहिजे. 'जे ना देखे रवी... ते पाहे कवी !' असे म्हटले जाते. कवीकडे ज्याप्रमाणे नवीन पाहण्याची दृष्टी असते, त्याप्रमाणे छायाचित्रकाराची दृष्टी असायला पाहिजे. 
फोटोग्राफीच्या प्रशिक्षणासाठी आपली शैक्षणिक पात्रता १०+२ असली पाहिजे. तसे पाहिले तर शाळेत विद्यार्थ्याना एक्स्ट्रा एक्टिव्हीटी म्हणून फोटोग्राफी शिकवली जाते. देशात फोटोग्राफीचा अभ्यासक्रम शिकवणार्‍या अनेक संस्था असून त्यात फोटोग्राफीतील पदवी, डिप्लोमा किंवा सर्टीफिकेट कोर्स उपलब्ध आहेत. फोटोग्राफीच्या अंगी कल्पनाशक्ती हा महत्त्वाचा गुण असतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याचा प्रात्याक्षिकाचे ज्ञानावर अधिक भर असतो. 

जाहिरात, पत्रकारीता व फॅशनसोबत मॉडेलींग क्षेत्रात फोटॉग्राफीचे क्षेत्र कमा‍लीचे विस्तारले आहे. त्यामुळे या क्षेत्रात होतकरू तरूणासाठी मोठ्या प्रमाणात करियरच्या संधी उपलब्ध आहेत. 

प्रेस फोटोग्राफर-
प्रेस फोटोग्राफरला 'फोटो जर्नलिस्ट' या नावाने ओळखले जाते. प्रेस फोटॉग्राफर स्थानिक व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र, मासिके तसेच वृत्तसंस्थेसाठी काम करत असतात. पत्रकाराप्रमाणे प्रेस फोटोग्राफरची ही प्रचंड धावपळ असते. कमी वेळात अधिक क्षण टिपण्यातच फोटोग्राफरचे कौशल्य असते. 

फीचर फोटोग्राफर-
एखादी कथा विविध छायाचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित करण्‍याची कला फीचर फोटोग्राफरच्या अंगी असते. फोटोग्राफरला संबंधित विषयाचे सखोल ज्ञान आवश्यक असते. छायाचि‍त्राच्या माध्यामतून विविध कथा, प्रसंग प्रेक्षकासमोर अथवा वाचकासमोर प्रसिद्ध केले जात असते. फीचर फोटोग्राफी क्षेत्रात विषय हे नेहमी बदलत असतात. वन्यजीवन, क्रीडा, यात्रा वृत्तांत, पर्यावरण यादी विषय असू शकतात. 

कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफर-
कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफरचे कार्य एका ठराविक कंपनी किंवा कारखान्यासाठी चालत असते. गृहपत्रिका, जाहिराती, यंत्राचे छायाचित्रे काढणे आदी कामे त्यांना करावी लागतात. आपल्या उत्पादनाविषयी आकर्षक छायाचित्राच्या माध्यामातून जनतेला माहिती करून देणे, हे कमर्शियल फोटॉग्राफरचे मुख्य कार्य असते. 

जाहिरात फोटॉग्राफर-
जाहिरात एजन्सी, मॉडेलिंग स्टुडिओमध्ये जाहिरात फोटोग्राफर नेमले जातात. बाजारात येणार्‍या नवीन उत्पादनाच्या लोकप्रियेतेमागे खरे कौशल्य जाहिरात फोटोग्राफरचे असते. त्यांचे कार्य सगळ्यात आव्हानात्मक असते. 

फॅशन फोटॉग्राफर-


फोटोग्राफी क्षेत्रात फॅशन फोटॉग्राफीची मोठी क्रेझ आहे. फॅशन क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. स्मार्ट वर्क आणि चांगली मिळकत तसेच स्वत:चे नाव होण्यासाठी तरूण-तरूणी मोठ्या संख्येने 'फॅशन फोटोग्राफी' हे क्षे‍त्र करियर म्हणून निवडतात. मॉडेलिंगच्या क्षेत्रातील जाहिरात एजन्सी व फॅशन स्टुडिओमध्ये कुशल फोटॉग्राफरची नेहमी आवश्यकता भासत असते. फॅशन फोटॉग्राफरला मुंबई व दिल्ली सारख्या मोठ्या शहरातच जास्त कामे मिळत असतात. तसेच फॅशन हाउस, डिझायनर, फॅशन जर्नल्स, वर्तमानपत्रे, खाजगी वाहिनी येथेही फॅशन फोटॉग्राफरला संधी मिळत असते. 

याचप्रमाणे पोर्टेट किंवा वेडींग फोटॉग्राफी, नेचर व वाईल्डलाईफ फोटॉग्राफी, फॉरेंन्सिक फोटॉग्राफी, डिजिटल फोटॉग्राफी, फाईन आर्ट्स फोटॉग्राफी, ट्यूरिष्ट फोटोग्राफी या विविध प्रकारातही आपल्याला करियर करता येते