मित्रांनो, पी.एस.आय. मुख्य परीक्षेची तयारी कशी काय चालू आहे?
कोणत्याही परीक्षेची तयारी घाईने कधीच होत नाहीये. आता पर्यंत तुमचा बराच अभ्यास झालेला असेल, होय ना?
मैत्रिणींनो, काय तुम्ही सुद्धा तयार आहात ना ह्या परीक्षेसाठी? नाही? का बर? काय प्रोब्लेम आहे? १९ सप्टेंबर २०१० ला काय घडलं माहित आहे की नाही? भारताच्या महिला बॉक्सर “एम.सी. मेरी कॉम” हिने जागतिक स्पर्धेत (world championship ) मध्ये इतिहास घडवून आणला, सलग पाचव्यांदा सुवर्ण पदक जिंकलं आहे आणि लंडन ओलीम्पिक्स २०१२ वर तिची नजर आहे, तेही सुवर्ण पदकासाठी!!! आहे की नाही मैत्रिणींनो अभिमानाची गोष्ट? मग तुम्ही का मागे राहता? मुलींनी अगदी पुढे राहायचं जसं तुम्ही आजकाल प्रत्येक क्षेत्रात असता तसंच. कोणी थांबवते का तुम्हास? नाही ना! मग व्हा पुढे आणि पी.एस.आय. च्या युनीफॉर्मवर नजर ठेवा व तो मिळवाच !!!
पी.एस.आय. मुख्य परीक्षा २३ ऑक्टोबर ला आहे तर आता फक्त १ महिनाच उरला आहे त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खाली असलेला एक महिन्याचा स्टडी प्लान सप्रेम भेट. ह्यापी प्रिपरेशन!!!
23rd Sep To 22 Oct 2010
विषय/शाखा | दिवस |
इंग्रजी: | 3 दिवस |
मराठी: | 3 दिवस |
कला शाखा: | 4 दिवस |
विज्ञान शाखा: | 4 दिवस |
वाणिज्य व अर्थशास्त्र शाखा: | 4 दिवस |
बुद्धिमापन: | 3 दिवस |
कृषी शाखा: | 4 दिवस |
जागतिक चालू घडामोडी: | 1 दिवस आणि इतर दिवशी दररोज २ तास |
मी ह्या प्लान मध्ये काही दिवस दिलेत प्रत्येक विषयाला/शाखेला तर तुमच्या सवडीनुसार तुम्ही हवा त्या विषयाचा अभ्यास करा, मी काहीच म्हणणार नाही.
कोणत्याही परीक्षेत सफल होण्यासाठी तिचा सराव करणे गरजेचे असते. दररोज नमुना प्रश्न पत्रिका सोडवायचा प्रयत्न करा, हा सरावच तुमच्या कामी येईल हे लक्षांत ठेवा.
गुड लक !!!
By - AnilMD