VISHESH



"सागरा प्राण तळमळला "

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धुतां।
मी नित्य पाहिला होता ॥

मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥

तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले ॥

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणिन ॥

विश्वसलो या तव वचनीं । मी
जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी

तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येइन त्वरेकथुन सोडिले तिजला

सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी ॥

भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।
दशदिशा तमोमय होती ॥

गुणसुमनें मी वेचियली या भावें ।
की तिने सुगंधा घ्यावें ॥

जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा ॥

ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥

तो बाल गुलाबहि आतां ॥ रे
फुलबाग मलाहाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥



================================
माझी माय
हंबरून वासरले चाटती जावा गाय,
तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. 
 
आय बाया सांगत होत्या होतो जावा तान्हा,
दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पान्हा
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय,
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय. 
 
तान्या काट्या येचायला माय जाती रानी,
पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी,
काट्याकुट्या लाही तीच मानत नसे पाय,
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय. 
 
बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुमण,
 
बास झाल शिक्शान आता घेउदे हाती काम,
 
शिकून सान कुठ मोठा मास्तर होणार हाय,
  
तवा मले मास्तरमंदी  दिसती माझी माय. 
 
दारू पिऊन मायेले मारी जावा माझा बाप,
थर थर कापे अन लागे तिले धाप,
कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी  दिसती माझी माय. 
 
बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी,
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणी,
भरल्या डोळ्यां कवा पाही दुधावरची साय,
तवा मले सायीमंदी  दिसती माझी माय. 
 
म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी वटी,
पुन्हा एकदा जनम घ्यावा माये तुझे पोटी,
तुझ्या चरणी ठेऊन माया धरावे तुझे पाय,
तवा मले पायामंदी  दिसती माझी माय.
-----------------------------------------------
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती 



जगण्याच्या वारीत मिळेना वाटसाचले मोहाचे धुके घनदाट,

आपली मानसंआपलीच नातीतरी कळपाची मेंढरांस भीती,

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ||धॄ||

आजवर ज्यांची वाहिली पालखीभलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आताउगा माथेफोडीदगडात माझा जीव होता,
उजळावा दिवा म्हणुनिया कितीमुक्या बिचार्‍या जळती वाती,
वैरी कोण आहेइथे कोण साथीविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ||||

बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणंउभ्या उभ्या संपुन जाई,
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलंकुंपण हितं शेत खाई,
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरीझेंडे येगळेयेगळ्या जाती,
सत्तेचीच भक्तीसत्तेचीच प्रीतीविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ||||

गीतः अरविंद जगताप.

-----------------------

जीव दंगला गुंगला रंगला असा
जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची  आस तू 
जीव लागला  लाभला 
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू 

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा  चांद तू 

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची  आस तू 
जीव लागला  लाभला 
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल 
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू 

खुलं आभाळ ढगाळ 
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू 
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ 


जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची  आस तू 
जीव लागला  लाभला 
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

                    

चित्रपट : जोगवा
स्वर: हरिहरन आणि श्रेया घोशाल
संगीत : अजय अतुल 


------------------------------------------
वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
श्रुती धन्य जाहल्याश्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हादिसू लागली रात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
वर भिवयी चढलीदात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूरओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
जरी काल दाविली प्रभूगनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळेकिंचित ओले
सरदार सहासरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पायझेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सातनिमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सातदर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
खालून आगवर आगआग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥

                
कुसुमाग्रज


------------------------------------------------

खरा तो एकची धर्म - साने गुरुजी
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे 


जगी जे हीन अतिपतितजगी जे दीन पददलित 

तया जाऊन उठवावेजगाला प्रेम अर्पावे



जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती

तया जाऊन सुखवावेजगाला प्रेम अर्पावे



समस्तां धीर तो द्यावासुखाचा शब्द बोलावा

अनाथा साह्य ते द्यावेजगाला प्रेम अर्पावे



सदा जे आर्त अतिविकलजयांना गांजती सकल

तया जाऊन हसवावेजगाला प्रेम अर्पावे



कुणा ना व्यर्थ शिणवावेकुणा ना व्यर्थ हिणवावे 

समस्तां बंधु मानावेजगाला प्रेम अर्पावे 



प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी 

कुणा ना तुच्छ लेखावेजगाला प्रेम अर्पावे 



असे जे आपणापाशी असेजे वित्त वा विद्या

सदा ते देतची जावेजगाला प्रेम अर्पावे 



भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात

सदा हे ध्येय पूजावेजगाला प्रेम अर्पावे 



असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे 

परार्थी प्राणही द्यावेजगाला प्रेम अर्पावे 



जयाला धर्म तो प्याराजयाला देव तो प्यारा

त्याने प्रेममय व्हावेजगाला प्रेम अर्पावे

      - SANE GURUJI 
----------------------
या जन्मावरया जगण्यावर शतदा प्रेम करावे

या जन्मावरया जगण्यावर शतदा प्रेम करावे
चंचल वारा या जलधाराभिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी हीसजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचेहळवे ओठ स्मरावे
या जन्मावरया जगण्यावर शतदा प्रेम करावे

रंगांचा उघडूनीया पंखासांज कुणी ही केली
काळोखाच्या दारावरतीनक्षत्रांच्या वेली
सहा ॠतूंचे सहा सोहळेऽऽयेथे भान हरावे
या जन्मावरया जगण्यावर शतदा प्रेम करावे

बाळाच्या चिमण्या ओठातूनहाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचेजन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणासाठीगाणे गात झुरावे
या जन्मावरया जगण्यावर शतदा प्रेम करावे

या ओठांनी चुंबून घेईनहजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावीइथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरतीअवघे विश्व तरावे..
या जन्मावरया जगण्यावर शतदा प्रेम करावे
मंगेश              पाडगावकर
---------------------------------------
हर देश में तू हर वेश में तु

हर देश में तू हर वेश में तु
तेरे नाम अनेक तू एक ही है
तेरी रंग भूमी यह विश्व धरा
सब खेल में मेल में तू ही तू है

सागर से उथा बादल बनके
बादल से गिरा जल हो कर के
फिर नहर बना न दिया गहरि
तेरे भिन्न प्रकार तू एक ही है

मिट्ठी से ही अणु परमाणु ब्रम्हा
सब जीव जगत का रूप बना
यह ही पर्वत वृक्ष विशाल बना
सौन्दर्या तेरा तू एक ही है

यह दिव्य दिखाया है जिसने
यह है गुरूदेवकी पूर्ण दया
तुक्दया कहे कोइ न और दुजा
बस मैं और तू बस एक ही है

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
                            

                            ------------------------------
या भारतात बंधू भाव नित्य वसु दे 

या भारतात बंधू भाव नित्य वसु दे 

दे वरची असा दे 

मतभेद नसू दे 

नांदोत सुखे गरीब अमीर इक मतांनी 

मग हिंदू असो ख्रिश्चन व हो इस्लामी 

स्वतंत्र सुख या सकलामाजी वसु दे 

दे वरची असा दे 

सकाळसकळो मानवता राष्ट्रभावना 

हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना 

उद्योगी तरुण वीर शीलवान असू दे 

दे वरची असा दे 

जातीभाव विसुरुनिया इक हो आम्ही 

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी 

कलहानिन्दाका मनी हि सत्य न्याय वसु दे 

दे वरची असा दे 

सौंदर्या रामो घराघरात स्वर्गीयापारी

हि नष्ट होऊ दे विप्पती भीती बावरी 

तुकड्यास सदा या सेवेमाजी वसु दे 

दे वरची असा दे 
 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज