अमरावती जिल्हा
१८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित सर्व बेरार (वऱ्हाड / विदर्भ) ईस्ट इंडिया कंपनीकडे सुपूर्द केला. कंपनीने वहाड प्रांताचे दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन केले –
१)दक्षिण वऱ्हाड – त्याचे मुख्यालय हिंगोली येथे होते.
२)पूर्व वऱ्हाड – उत्तर वऱ्हाडाचे रुपांतर पूर्व वऱ्हाडात करण्यात आले.त्याचे मुख्यालय अकोला येथे होते.
१८६४ मध्ये अमरावती मधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला. १९०३ मध्ये निजामाने वऱ्हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपूर्द केला.(ईस्ट इंडिया कंपनीला तो काही कालावधीसाठीच देण्यात आला होता.) १९०३ मध्ये वऱ्हाड मध्यप्रांताला जोडण्यात आला. आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने वऱ्हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला. मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता. १९५६ मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र व गुजरात वेगळा झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा दख्खनच्या पठारावर पूर्णपणे स्थानबद्ध आहे.
प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असं सांगतात.
अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचं नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे. १८९७ चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सी. शंकरन नायर हे होते.
अमरावती जिल्ह्याला अकोला,यवतमाळ, वर्धा , अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत.अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील अग्रगण्य संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.
प्रशासकीय विभाग
जिल्ह्याचे विभाजन १४ तालुके आणि ६ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.
१)अमरावती – अमरावती, भातकुली, नांदगाव(खंडेश्वर).
२)दर्यापुर – दर्यापूर, अंजनगाव.
३)अचलपूर – अचलपूर, चांदूर बाजार.
४)मोर्शी- मोर्शी, वरुड.
५)धारणी – धारणी, चिखलदरा.
६)चांदूर(रेल्वे)- चांदूर(रेल्वे),धामनगाव, तिवसा.
पर्यटनस्थळ
· अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे.अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदऱ्याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.
· सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षण आहेत.
· विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महानुभाव पंथीयांचे हे सर्वात प्रमुख तिर्थस्थळ आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.
· अचलपुर तालुक्यातील बहीरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहीरम (भैरव) या देवाची पुजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांत प्रसिद्ध आहे.
· अमरावती जिल्ह्यातील महत्वाचे पीक कापूस हे आहे. पूर्णा, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. वर्धा नदीवर सिंबोराजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. शहानुर नदीवर शहानुर प्रकल्प आहे. अमरावती शहरात वडाळी तलाव व छत्री तलावातून पाणी पुरवठा होतो.
· अमरावती येथे रासायनिक खताचा कारखाना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. १९४२ च्या चळवळीत या जिल्ह्याचे महत्वाचे योगदान आहे. ब्रिटिशांच्या दडपशाहीने जिल्हा हादरून गेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय आंदोलनास प्रेरित केले.
पर्यटन :
चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला ‘किचकदरा’ असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो. आताशा येथे मध व स्ट्रॉबेरी चे सुद्धा उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतल्या जात आहे. मेळघाट हा जंगलव्याप्त परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्या गेला आहे. १९७२ ला घोषित केल्यागेलेल्या देशातील १५ व्याघ्रप्रकल्पांतील हा एक. येथे १०० हून अधिक वाघ आहेत. वाघांव्यतिरिक्त हा प्रदेश चित्ते, अस्वल, सांबर, रानडुक्कर, जंगलीकुत्रे , मोर आदींसाठी प्रसिद्ध आहे.
चिखलदऱ्या जवळची काही आकर्षण केंद्रे :
१) मेळघाट व्याघ्रप्रकल्प , कोलखास आणि सीमाडोह हे निसर्गरम्य स्थळे.
२)गावीलगड किल्ला.
३)नर्नाळा किल्ला.
४)पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन
५)ट्रायबल म्युझीयम
अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण पॅराग्लाईडींगसाठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लाईडींग मोजक्याच ठिकाणी होतं. महाराष्ट्रातील हे तिसरे ठिकाण आहे.
शिक्षण:-
जिल्ह्यात तीन अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.
१) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
२)V.Y.W.S. अभियांत्रिकी महाविद्यालय , अमरावती
३)सीपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
वैद्यकीय महाविद्यालये -
१) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती.
२)विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती.
३)V.Y.W.S. दंतशल्यचिकित्सा महाविद्यालय, अमरावती.
४)श्री वल्लभ तखतमल होमीओपेथी महाविद्यालय, अमरावती.
५)पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ होमियोपेथीक मेडिकल सायन्सेस, अमरावती.
शारीरिक शिक्षण
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती.
ही शारीरिक शिक्षण क्षेत्रात जागतिक मान्यता असलेली संस्था म्हणजे अमरावतीचं भूषण आहे. जागतिक दर्जाच्या खेळ सुविधा येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. येथे शारीरिक शिक्षणाचा पदवी अभ्यासक्रम चालवल्या जातो.
प्राथमिक शाळा: १७७८ माध्यमिक शाळा: ३६४ महाविद्यालये : ३६ अध्यापक विद्यालये: ८ आदिवासी आश्रमशाळा: ३६ अभियांत्रिकी महाविद्यालये : ३ तंत्रनिकेतन : ६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था: २ वैद्यकीय महाविद्यालये: ५
जिल्हा सामान्य रुग्णालय: १ जिल्हा स्त्री रुग्णालय : १ जिल्हा क्षय रुग्णालय : १ प्राथमिक आरोग्य केंद्र : ५६ ग्रामीण कुटुंब केंद्र : १४
अमरावती विद्यापीठ
अमरावती विद्यापीठा ची स्थापना १ मे इ.स. १९८३ मध्ये झाली. Education for Salvation of Soul हे अमरावती विद्यापीठा चे ब्रीद वाक्य आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम हे पाच जिल्हे अमरावती विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मोहन खेडकर हे आहेत.
पिका खालील क्षेत्र : ८०१ हजार हेक्टर
ओलीत क्षेत्र : ६२ हजार हेक्टर
मोठे प्रकल्प – १ मध्यम प्रकल्प – २ लाभक्षेत्र : १६ हजार हेक्टर शेती पतसंस्था : ३८१
.............................................................................................................................
यवतमाळ जिल्हा
यवतमाळ ह्या शहराचे नाव आधी यवत अथवा यवते असावे असे मानले जाते. या यवत किंवा यवतेचा माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) किंवा यवते चा महाल (परगणा किंवा विभाग) अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले असावे. अकबराच्या दरबारातील अबूल फजल याने लिहिलेल्या ऐन-ई-अकबरी मध्ये यवतचा योत-लोहार असा उल्लेख आढळतो. लोहार हे यवतमाळच्या पश्चिमेस पाच कि.मी. अंतरावर असलेले खेडेगाव असून योत हा यवताचा उर्दू अपभ्रंश असावा. गोंड, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या घराण्यांच्या सत्ता विविध कालखंडांत यवतमाळवर होत्या. ब्रिटिश काळात वर्हाड प्रांतात १८६४ साली या जिल्ह्याची स्थापना झाली. त्या वेळी हा जिल्हा वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात असे. १९०५ मध्ये या जिल्ह्याचे यवतमाळ असे नामांतर झाले. १९५६ पर्यंत हा जिल्हा मध्यप्रदेश राज्यात होता. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेत हा जिल्हा मुंबई राज्यात, तर दिनांक १ मे, १९६० पासून महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला.
शेती
कापूस म्हणजेच पांढरे सोने हे या जिल्ह्याचे मुख्य कृषिविषयक वैशिष्ट्य आहे. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ८,४७,६०० हेक्टर्स इतके आहे.ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून कापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे. जिल्ह्यात ज्वारी, तांदूळ, भुईमूग ही खरीप तर गहू, हरभरा ही रब्बी पिके घेतली जातात. पुसद, उमरखेड व महागाव या तालुक्यात उसाचे पीकही घेतले जाते. येथे काही ठिकाणी द्राक्षांचेही मळे आहेत. राळेगाव, कळंब या भागात संत्र्याच्या व केळीच्या बागा आहेत. लाडखेड, दारव्हा, दिगस व उमरखेड या ठिकाणी विड्याच्या पानांचे मळे आहेत.
लागवडीच्या क्षेत्राचा विचार करता यवतमाळ जिल्ह्याचा कापसाच्या क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक आहे. तसेच कापसाच्या उत्पादनातही यवतमाळचा क्रमांक पहिल्या तीन जिल्ह्यांत आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
यवतमाळ शहरात कृषी संशोधन केंद्र व कुक्कुट पैदास केंद्र आहे.
लागवडीच्या क्षेत्राचा विचार करता यवतमाळ जिल्ह्याचा कापसाच्या क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक आहे. तसेच कापसाच्या उत्पादनातही यवतमाळचा क्रमांक पहिल्या तीन जिल्ह्यांत आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
यवतमाळ शहरात कृषी संशोधन केंद्र व कुक्कुट पैदास केंद्र आहे.
पर्यटन :
कळंबः येथे २१ गणेशपीठांपैकी श्री चिंतामणी गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. मंदिर जमिनीपासून १२ मीटर खोल आहे. पायर्या उतरताच गणेशकुंड लागते. या कुंडाच्या शेवटी गणपतीची ४ फूट उंच डाव्या सोंडेची मूर्ती आहे. कळंब हे एक पुरातन गाव असून येथील उत्खननामध्ये सोन्याची नाणी व अनेक मूर्ती सापडल्या आहेत.
यवतमाळ : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले श्री केदारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
वणी : या निरगुडा नदीकाठी वसलेल्या गावात श्री रंगनाथ स्वामी यांची समाधी आहे. सद्गुरू परमहंस जगन्नाथबाबा यांचे नंदेश्वर हे देवस्थान असून येथे विष्णू व शिव या दोघांच्याही मूर्ती आहेत. वणीपासून जवळच मंदर या गावाजवळ उत्खननात प्राचीन आवशेष सापडले आहेत.
पुसदः पूस या नदीच्या काठावरील पुसद हे एक प्राचीन ऐतिहासिक नगर आहे. येथे वाकाटककालीन शिवमंदिराचे अवशेष सापडले होते. नदीकाठावर करूणेश्वर, पंचलिंगेश्वर, हरकेश्वर व जागेश्वर ही पुरातन मंदिरे आहेत. पुसद तालुक्यातील बेलोरा येथे केदारलिंगाचे भव्य मंदिर आहे. येथे नदीचा आकार ज्योतिर्लिंगासारखा असल्याचा भासतो. पुसद तालुक्यातच हर्षी येथील टेकडीवर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. तसेच जवळच जगदंबा मातेचेही जागृत देवस्थान आहे.
मुरली : पैनगंगा नदीवर या गावाजवळ असलेला सहस्रकुंड धबधबा प्रसिद्ध आहे.
नागपूर जिल्हा
नागपूर म्हटले की आठवते ती नागपूरची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतलेली दीक्षाभूमी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व येथील जगप्रसिध्द संत्री.
सध्या महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर पूर्वीच्या मध्य प्रांताची राजधानी होते. विदर्भातील महत्त्वाचे शहर अशी आज नागपूरची ओळख आहे. नाग नदीवरून नागपूर शहराचे नाव पडले. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान व रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्या क्रमांकाचे हिरवे शहर असा नागपूरचा लौकिक आहे. शेती, संशोधन, विज्ञान, पर्यावरण या क्षेत्रांशी संबंधित राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक संस्था नागपूरमध्ये आहेत. याही दृष्टीने नागपूर एक वैशिष्ट्यपूर्ण केंद्र आहे.
महाराष्ट्राच्या उपराजधानीत दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. राज्याचा प्रमुख भाग असलेल्या विदर्भाचा विकास व्हावा, त्या भागातील प्रश्र्न ऐरणीवर यावेत यासाठी नागपूरचे हे अधिवेशन भरवले जाते.
सध्या महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर पूर्वीच्या मध्य प्रांताची राजधानी होते. विदर्भातील महत्त्वाचे शहर अशी आज नागपूरची ओळख आहे. नाग नदीवरून नागपूर शहराचे नाव पडले. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान व रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्या क्रमांकाचे हिरवे शहर असा नागपूरचा लौकिक आहे. शेती, संशोधन, विज्ञान, पर्यावरण या क्षेत्रांशी संबंधित राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक संस्था नागपूरमध्ये आहेत. याही दृष्टीने नागपूर एक वैशिष्ट्यपूर्ण केंद्र आहे.
महाराष्ट्राच्या उपराजधानीत दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. राज्याचा प्रमुख भाग असलेल्या विदर्भाचा विकास व्हावा, त्या भागातील प्रश्र्न ऐरणीवर यावेत यासाठी नागपूरचे हे अधिवेशन भरवले जाते.
इतिहास
नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स. ९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचागोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणिहोशंगाबाद यांचा समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली. त्याने जवळजवळ ३३ वर्षे राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले.राजा चांद सुलतान याच्या मॄत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले.इ.स.१७४२ मधेरघूजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले. इ.स. १८१७ मधे सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला. इ.स.१८६१ मध्ये नागपूर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी करण्यात आली.
सीताबर्डीचा किल्ला
इ.स.१८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला.त्याच एम्प्रेस व मॉडेल मिल होत. भारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉँग्रेसची दोन अधिवेशने नागपुरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या १९२०च्या अधिवेशनापासून सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार भारतातील एक प्रांत बनला. १९५० साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली व नागपूरला या राज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला. १९५६च्या राज्य पुनर्रचना आयोगाने नागपूरसह वर्हाड(बेरार) बॉम्बे(मुंबई) प्रान्त राज्यात घातला. कालांतराने मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व वर्हाड (विदर्भ)नव्या राज्यात आला. एके काळी देशाच्या भौगोलिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता. आज, नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
पर्यटन
रामटेक -
रामटेक -
नागपूरपासून ४८ कि.मी. अंतरावर असलेल्या रामटेक येथे प्रभू श्रीरामचंद्राने काही काळ वास्तव्य केले होते अशी कथा आहे. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे काव्य येथेच लिहिले असे मानले जाते. येथे महाकवी कालिदासाचे स्मारक उभारण्यात आले असून प्राचीन साहित्य, शास्त्र यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. येथील रामसागर, अंबाला तलाव प्रसिध्द आहे.
नागपूर -
नागपूर -
हे राज्याच्या उपराजधानीचे शहर असून येथील सीताबर्डीचा किल्ला प्रेक्षणीय आहे. येथील दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्माचा स्वीकार केला. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गाने घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. नागपूर हे बौध्द धर्मीयांचे आदराचे स्थान असून येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व बौद्ध स्तूप उभारण्यात आला आहे. अदासा येथील गणपतीचे जागृत पुरातन देवस्थान, अंबोला येथील चैतन्येश्वर मंदिर आणि श्री हरिहर स्वामींची समाधी, काटोलमधील भवानी मंदिर ही जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. तसेच धापावाडा येथे श्री कोतोबा स्वामींचा मठ असून येथील विठ्ठल मंदिरामुळे हे विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिध्द आहे.
कामठीमध्ये-
कामठीमध्ये-
भव्य ड्रॅगन प्लॅनेट टेंपल आहे. येथील बुध्द मूर्ती जपानतर्फे भेट मिळाली असून मूर्ती पूर्ण चंदनाची व ८६४ किलो वजनाची आहे. जिल्ह्यातील नागार्जुन टेकडी हा आयुर्वेदीक औषध वनस्पतींनी संपन्न असलेला परिसर आहे. तसेच जिल्ह्यातील पारशिवनी येथील शिवगड हा किल्ला प्रसिध्द आहे. मराठीतील लोकप्रिय नाटककार राम गणेश गडकरी यांचे खिंडसी (तालुका सावनेर) येथे १९१९ मध्ये निधन झाले. येथेच त्यांचे स्मारक विकसित करण्यात आले आहे.
पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान - (व्याघ्र प्रकल्प, पेंच ,नागपूर.)
पवनी गावापासून २० कि.मी. अंतरावर हा व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच नदीवर तोतला डोह या ठिकाणी विशाल धरण बांधण्यात आले आहे. या २५७. ९८ चौ. कि.मी. क्षेत्राच्या उद्यानास १४ नोव्हेंबर, १९९० मध्ये पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले. उद्यानात वाघ, बिबळ्या, रानगवे, रानम्हशी, रानडुकरे, अस्वले इत्यादी हिंस्र प्राणी पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यानातील काही वन्यजीव आढळतात. तसेच बोर येथील अभयारण्याने जिल्ह्याचा काही भाग व्यापला आहे. जिल्ह्यात सेमीनरी हिल व रामटेक येथेही वनोद्याने आहेत.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्था
· दिनांक ४ ऑगस्ट , १९२३ रोजी स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठाचे पुढील काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. सुमारे ४४२ महाविद्यालये संलग्न असणारे हे विद्यापीठ देशातील जुन्या विद्यापीठांपैकी एक होय. महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठानंतर स्थापन झालेले हे दुसरे विद्यापीठ होय.
· राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड युज प्लॅनिंग , राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, इंडियन स्टँडर्डस इन्स्टिट्यूट (आय. एस. आय), रमण विज्ञान केंद्र, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांसारख्या अनेक संस्थांमुळे तसेच राज्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठामुळे नागपूर हा राज्यातीलच नव्हे तर देशातील एक महत्त्वाचा जिल्हा बनला आहे.
· केंद्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था - १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे नाव प्रथम केंद्रीय सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी संशोधन संस्था असे नाव होते. मानवी आरोग्य, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन यांविषयी प्रथम संशोधन व कार्य चालायचे, पर्यावरणाविषयीच्या जाणीवा जागृत झाल्यामुळे व या विषयाचा आवाका वाढत गेल्यामुळे १९७४ मध्ये या संस्थेचे रुपांतर छएएठख मध्ये करण्यात आले. ही संस्था कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (उडखठ) या संस्थेची घटक म्हणून कार्य करते. छएएठख चे मुख्यालय नागपूर येथे असून, देशपातळीवर काम करणार्या या संस्थेची ५ विभागीय कार्यालये चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, कोलकता व मुंबई येथे आहेत. प्रामुख्याने पर्यावरण शास्त्र व अभियांत्रिकी या विषयांचे संशोधन व विकासात्मक अभ्यास या संस्थेच्या माध्यमातून केला जातो.
· रमण विज्ञान केंद्र - नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेले हे केंद्र आहे. वैज्ञानिक तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी ही संस्था कार्य करते. विविध प्रदर्शने, सायन्स पार्क, अँनिमल पार्क, वैज्ञानिक माहिती देणारा लाईट अँड साऊंड शो, थ्री डी (त्रिमिती) चित्रपटगृह व तारांगण या सर्व घटकांच्या माध्यमातून ही संस्था वैज्ञानिक प्रबोधन करते. या संस्थेचे फिरते विज्ञान प्रदर्शन देखील आहे. याच्या माध्यमातून तसेच प्रश्र्नमंजुषा स्पर्धा, परिसंवाद, व्याख्याने या माध्यमातून रमण विज्ञान केंद्र प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यात कार्य करते.
मेट्रो
बहुचर्चित आणि नागपूरची नवी ओळख निर्माण करणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. हा प्रकल्प सुमारे २५ किलोमीटर लांबीचा राहणार असून, याचे कार्य जानेवारी २०१३ पासून सुरू होणार आहे. नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर मेट्रो रेल्वेसाठी तयार झाले असून, या कार्यावर १२५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जानेवारी २०१३ पासून कार्याला प्रारंभ होईल आणि डिसेंबर २०१६ मध्ये ते पूर्णत्वास जाईल. नागपूरची लोकसंख्या वर्तमानात २५ लाख असून, २०३० पर्यंत ही आकडेवारी ५० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर शहर मेट्रो रेल्वे सेवेसाठी पात्र ठरणार आहे. मिहान प्रकल्पाच्या प्रारंभी प्रकल्प सल्लागार एल ऍण्ड टी रॅम्बोल यांनी २००१ मध्ये आपल्या सक्षमता अहवालात मेट्रो रेल्वेची प्रस्तावना केलेली आहे. त्यांनी तर १०० किलोमीटरपर्यंत मेट्रो रेल्वे प्रस्तावित केली होती. मात्र शासनाने २५ किलोमीटर पर्यंत तिचा मार्ग राहील असे म्हटले आहे. दरम्यान यातील दुसऱ्या टप्प्यात पारडी नाका ते वाडी नाका, कस्तुरचंद पार्कचा एक विभाग जोडण्यात येईल. तर तिसऱ्या टप्प्यात फुटाळा तलाव ते धंतोली असा मार्ग प्रस्तावित केला होता. एकंदरीत हा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प नागपूरसाठी वरदान ठरेल असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
विमान वाहतूक
नागपूर विमानतळ हे देशाच्या मध्यभागी असल्याने देश-विदेशातील विमाने नागपूरच्या आकाशातून जातात. त्यामुळे नागपूर स्टॅण्डबाय एरपोर्ट म्हणून मान्यता मिळाली आहे. येथे एकूण दोन एरोब्रिज स्थापित झाले आहेत. नागपूर विमानतळ आता अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज होत असून येत्या ०६ फेब्रुवारी २०१२ विमानतळावरील दोन्ही एअरोब्रिज प्रवासी सेवेत रुजू होणार आहेत.नागपुरातील विमानवाहतूक नियंत्रण केंद्र देशातील सर्वांत व्यस्त आहे व ३०० हून जास्त उड्डाणे शहरावरून होतात. देशातर्गत विमानवाहतूक सेवा इंडियन एयरलाइन्स, जेट, एयर डेक्कन, इंडिगो, गो एयर, स्पाईस जेट, जेट लाईट इत्यादी नागपूरला मुंबई, दिल्ली, हैद्राबाद व कोलकाता,पुणे,बंगरुळ, चेन्नई, इंदूर, अहमदाबाद, जयपूर, कोची, नांदेड, औरंगाबाद, रायपूर या शहरांना जोडतात. १ ऑक्टोबर २००५ रोजी नागपुरातील सोनेगाव विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला व त्याचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. नागपूर हा मध्यवर्ती भारतातील महत्त्वाचा विमानतळ असून एयर अरेबिया (शारजा), इंडियन एर लाइन्स(बँकॉक), कतार एयरवेज (दोहा)(नियोजित) यांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे येथून होतात.
नागपूर देशातील हवाई नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवीत आहे. इ.स.२००६ साली मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट अॅट नागपूर अर्थात मिहान प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. नागपुराच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकासप्रकल्पांमधल्या चालू प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडील व पश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे. या मालवाहतूक प्रकल्पामुळे नागपूर शहराची तसेच विदर्भ विभागाची आर्थिक प्रगती जोमाने होईल. विमानउत्पादक कंपन्यांमधील अग्रगण्य अश्या बोइंग कंपनीचे येथे निर्वहन केंद्र उभारले जाणार असून त्यासाठी १८.५ कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक प्रस्तावित आहे.