जीवघेणी स्पर्धा आणि परिक्षांचा वाढता ताण


मित्रांनो,
बऱ्याच दिवसानंतर मला वेळ मिळाला तुमच्याशी बोलायला.
तुमची आवडती एम्.पि.एस.सी. राज्यसेवा परीक्षा लवकरच येत आहे, हो ना? मग लागलात की नाही तयारीला? तुमच्यापैकी बहुतेक बऱ्याच जणांनी अभ्यासाला सुरवात केलेली असेल आणि बाकी फ़क्त परिक्षेची जाहिरात केव्हा येते ह्याचीच वाट पाहत बसलेले असतील, तुम्ही तर त्यापैकी नाही ना?
एक लक्षात असू दया की कसलीही परीक्षा असो, त्यात स्पर्धा तर असणारच पण राज्यसेवेसराखी परीक्षा असली तर मग ही स्पर्धा जीवघेणी होवून जाते कारण प्रत्येकाला वाटत असते की आपण उप-जिल्हाधिकारी व्हाव. बरोबर ना?
राज्यसेवा म्हणा की यु.पि.एस.सी. सिविल सर्विसेस परीक्षा म्हणा, स्पर्धा ही जीवघेणीच असते. प्रत्येकजन जोमाने तयारीला लागतो (आपली मराठी मुल मात्र ह्या बाबतीत फार मागे आहेत). ह्या परीक्षा डोक्यावर फार ताण आणून देतात. पण ताण येण्या सारख काय असेल बर ह्याचा विचार कधी केलात का? आपण काय करतो की जो पर्यंत परीक्षा अगदी डोक्यावर येत नाही तो पर्यंत अभ्यासाला सुरवातच करत नाही आणि मग मात्र जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा आपण तयारीला लागतो, अभ्यासाला लागतो. जसजशी परीक्षा जवळ येते तसा ताण मग डोक्यावर पडायला सुरुवात होते आणि तो शेवट पर्यंत वाढतच जातो जर का आपला अभ्यास पूर्ण झाला नाही तर!
मित्रांनो, तुम्हाला माहित तर असेलच की ह्या परीक्षेला कमीत कमी एक वर्षाची तयारी तरी लागते.
म्हणून आता वेळ वाया ना घालवता परिक्षेच्या तयारीला लागा.
* सर्वात आधी पुस्तकांची यादी बनवा आणि विकत घ्या.
* दररोज न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा.
* किती वेळ उपलब्ध आहे दररोज अभ्यास करायला ते बघा
* प्रत्येक पुस्तकाच प्लानिंग करा आणि त्याप्रमाणे सिल्याबस पूर्ण करा.
* खुप प्रश्न पत्रिका सोडवा.
* दररोज जितका अभ्यास व्हायला पाहिजे तो पूर्ण कराच, मागे ठेवू नका नाहीतर उगाच डोक्यावर टेंशन येवून बसेल.
* फ़क्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लानिंग, प्लानिंग, प्लानिंग, आणि फ़क्त प्लानिंग. त्याशिवाय मार्गच नाही बर का!
प्रत्येकाला प्लानिंग जमत नाही त्यासाठी आम्ही आहोत ना! आम्ही मात्र प्लानिंग मध्ये एक्सपर्ट आहोत हे लक्षात असू दया, जर आमची मदत लागली तर लगेच आमचा १५ किंवा २७ महिन्यांचा पर्सनल गायडंस प्रोग्राम तुमच्या मदतीला धावून येइल. सर्वाच्या सर्व पुस्तक आम्ही देवू, तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही, त्या प्रत्येक पुस्तकाच प्लानिंग आम्हीच करून देवू.