“उपजिल्हाधिकारी ते आय.ए.एस.” किंवा “उप पोलीस अधिक्षक ते आय.पी.एस.”


मित्रांनो
केव्हा न केव्हा, एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी. ची तयारी करत असतांना तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आलाच असेल कि एकदा मी “उपजिल्हाधिकारी” झालो तर एक दिवस नक्कीच “आय.ए.एस.” होईल किंवा “उप पोलीस अधिक्षक” झालो तर “आय.पी.एस.” नक्कीच होईल.
ह्याबद्दल सविस्तर जाणण्यासाठी ही लिंक बघावी: Deputy Collector to IAS & Dy SP to IPS

MPSC Rajyaseva Prelims on 10th Feb 2013


मित्रांनो,
२०१३ मधील राज्यसेवा, पी.एस. आय. , एस.टी.आय. व असिस्टंट ह्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्याबद्दल सर्व माहिती इथे उपलब्ध आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा – १० फेब २०१३ व मुख्य परीक्षा ७, ८, व ९ जून २०१३
पी.एस.आय. पूर्व परीक्षा – २१ एप्रिल २०१३ व मुख्य परीक्षा ४ ऑगस्ट २०१३
एस. टी.आय.पूर्व परीक्षा – १२ मे २०१३ व मुख्य परीक्षा २२ सप्टेंबर २०१३
असिस्टंट पूर्व परीक्षा -१६ जून २०१३ व मुख्य परीक्षा २९ सप्टेंबर २०१३

Here is the schedule of exams to be conducted by MPSC in 2013:
Name of ExamAdvertisementPrelimsMain exam
State Services Exam (Rajyaseva) 2013 Feb 20137th Apr 201331st Aug, 1st & 2nd Sep 2013
PSI (Direct Entry) 2013February 201321 April 20134 Aug 2013
STI (Direct Entry) 2013March 201312 May 201322 Sep 2013
Assistant (Direct Entry) 2013April 201316 Jun 201329 Sep 2013
The examination shall be conducted if Government requisitions for the posts are received in time.

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम कसा राहील ह्याबद्दल सविस्तर माहिती ह्या पेजवर आहे : राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम

आयआयटी-जेईईसाठी अशी तयारी करा


आयआयटी-जेईईसाठी अशी तयारी करा
- नवनीत गुप्ता 

आयआयटी-जेईई ही परीक्षा सर्वात कठिण परीक्षांमध्ये गणली जाते. अभियांत्रिकी परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितो. म्हणूनच दरवर्षी जवळपास दोन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. आणि त्यातील फक्त तीन हजार विद्यार्थीच पास होतात.
दोन लाख विद्यार्थ्यांमधून फक्त तीनच हजार विद्यार्थी का बरे पास होतात? याच तुम्ही कधी विचार केलाय? ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी जीव तोडून प्रयत्न करतात, पण ज्या विद्यार्थ्यांची रणनीती अचूक असते, तेच यशस्वी होतात.

साधारणपणे या परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू करावी हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांजवळ तीन पर्याय असतात.... 

* बारावीनंतर ड्रॉप घेऊन
* अकरावीदरम्यान 
* बारावीत असतान

आयआयटी-जेईईच्या सध्याच्या अभ्यासक्रमानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी फक्त दोनच संधी मिळतात. पहिली, विद्यार्थी बारावीत असताना आणि दुसरी तो बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल त्यावेळी. अशा परिस्थितीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच या परीक्षेचा अभ्यास सुरू करणे योग्य ठरेल. दहावी उत्तीर्ण झाल्याच्या काळात एकतर विद्यार्थी उत्साही असतो आणि आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी असते. 

विद्यार्थ्याच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट असतील तर त्याला फार अडथळे येत नाहीत. त्यासाठी आवश्यक आहे अचूक रणनीती आणि काही छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष देण्याची. त्यामुळे या परीक्षेसाठी आधीच एक रणनीती आखा आणि खाली दिलेल्या गोष्टींवर लक्ष द्या....

आत्मविश्वास:
सुरवात नेहमी सकारात्मक दृष्टिकोण आणि आत्मविश्वासाने करावी. परीक्षेसंबंधात कुठलीही द्विधा मनस्थिती ठेवू नका. 'मी सर्व करू शकतो' असे मानून स्वतः:वर विश्वास ठेवा.

तयारीः 
या परीक्षेची तयारी अकरावीतच सुरू करा. पहिल्या शंभरात येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये अशाच विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.

नेमके मार्गदर्शन:
परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लास आणि पत्राद्वारे देण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाची निवड करताना आधी त्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवा. त्यानंतरच निवड करा.

लक्ष केंद्रीत करा:
एकाबरोबर बरेच कोर्स किंवा पुस्तकांपेक्षा एखाद्या अनुभवी विद्यार्थ्यांचा सल्ला घेऊन कोणत्याही एका कोर्सपासून तयारीला लागा. त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही.

अभ्यासाचे वेळापत्रक बनवा:
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आधी अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि आपले ध्येय केंद्रित ठेवून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.

आपले कच्चे दुवे ओळखा:
जो विषय किंवा मुद्दा कठीण वाटतो, त्यावर अधिक लक्ष देऊन आपला कच्चा दुवा पक्का करण्याचा प्रयत्न करा.

गुणवत्तेकडे लक्ष द्या :
तुम्ही किती प्रश्न सोडवीत आहात यापेक्षा तुम्ही ते कसे सोडवीत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडवा जे कठीण असतील. कोणताही प्रश्न सोडून देण्यापेक्षा तो सोडविण्याचा प्रयत्न करा.

स्वतःचीच परीक्षा घ्या:
एखाद्यावेळी स्वत:चीच परीक्षा घ्या. त्यामुळे तुम्ही किती पाण्यात आहात याचा अंदाज येईल. तुम्ही स्वतः:ची जितकी जास्त परीक्षा घ्याल तितके ते तुमच्यासाठीच हितकारक ठरेल.

या सोबतच आपल्या मित्रांशी यासंबंधी चर्चा करीत राहा आणि तयारीच्या आधुनिक तंत्राची माहिती ठेवा.