म्हणे कसाबला फाशी


        २१ नोव्हेंबर सकाळी उठून ऎकतो, पहातो तर काय, अजमल कसाबला नुकतीच फाशी दिलेली. काल राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला. आज सकाळी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कसाबला फाशी. काय कमालीचा वेग आहे निर्णय आणि कार्यवाहीचा ! वेळात वेळ काढून महामहीम राष्ट्रपतींना हा निर्णय घेतल्याबद्दल मी आभार प्रकट करतो !
        आपल्या आधीच्या राष्ट्रपतींना अफजल गुरुबाबत असा निर्णय घ्यायला वेळ झाला नव्हता. फाशीच्या आणि दयेच्या अर्जाच्या लायनीत खरं म्हणजे अजमल कसाब अफजल गुरुच्या मागे होता. पण त्याला लायनीतनं पुढे काढलं. म्हणजे आपली नेते - मंत्री मंडळी दयेच्या अर्जावर अनुक्रमानं निर्णय घ्यायचा असतो, म्हणून अफजल गुरुबाबत अजून निर्णय घेतलेला नाही हे सांगत होते ते खोटं बोलत होते असा त्याचा अर्थ सिध्द होतो.
         काही म्हणा, अजमल कसाबला फासावर लटकवला, फौजदार तुकाराम ओंबाळेंच्या बलिदानाचं - पराक्रमाचं थोडं तरी चीज झालं. थोडं तरी. कारण कसाबची फाशी, म्हणजे जणू २६.११ चा विषय संपला असं अजिबात नाही. उलट दहशतवादाविरुद्ध - पाकिस्तान विरुद्ध गेली सुमारे पाच वर्षे सरकारनं काहीही कारवाई केलेली नाही, इतकेच काय, अशा घटना पुढे अजूनही घडू शकतात, त्यादृष्टीनं फारशी ठोस पावलं उचललेली नाहीत.
        अफजल गुरुबाबत निर्णयच घेतले जात नाही. याचा समाजाला खुलासा देण्याची सरकारची काही जबाबदारी आहे की नाही ? भारताच्या न्यायप्रक्रियेतून अफजल गुरुचा न्याय झालेला आहे की नाही ? त्याला स्वत:चा बचाव करण्याची संधी मिळाली होती की नाही ? सुप्रीम कोर्टानं सुध्दा संसदेवरच्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ठरवून त्याची फाशी कायम केली, त्यानंतर काही नवे पुरावे समोर आलेत का ? अफजल गुरु गुप्तपणे सरकारला दहशतवाद विरुद्ध - पाकिस्तानविरुध्द काही मदत करतोय म्हणून त्याला जिवंत ठेवायचं डीलआहे का ? राष्ट्रीय सुरक्षेशी काही मुद्दा आहे का ? या सर्वातलं काहीही असलं तरी जनतेला खुलासा करण्यात काय अडचण आहे ? नाही तर दुर्देवानं खाली एकच गोष्ट उरते ती म्हणजे अल्पसंख्याकांचा, काश्मीरी फुटीरवाद्यांचा अनुनय करण्याचं धोरण मागील पानावरून पुढे चालू आहे.
        कसाबच्या फाशीनं २६.११ चा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा सुद्धा संपत नाही. २००८ मधे हा हल्ला होत असतानाच हे स्पष्ट होतं की हा काही केवळ लष्कर - ए - तय्यबा नावाच्या नॉन - स्टेट अ‍ॅक्टरनं १० दहशतवाद्यांना प्रशिक्षित करून पाठवण्याचा उद्योग नाही. यामागे पध्दतशीरपणे ISI, पाकलष्कर आणि प्रत्यक्ष सरकारसुध्दा आहे. हे सर्व आता पुराव्यानं सिध्द झालंय.
      ’लष्कर - ए - तय्यबासंस्थापक मौलवी अझर मसूद. म्हणजे ३१ डिसेंबर १९९९ ला आपले तत्कालीन ज्येष्ठ मंत्री जसवंत सिंग ज्याला सन्मानपूर्वक कंदाहारला तालिबानच्या हवाली करून आले, तो संतपुरुष ! पाकिस्तानी दहशतवाद्यांनी IC 814 हे काठमांडू - दिल्ली विमान हायजॅक केलं होतं. त्यामागेसुध्दा पाकिस्तान सरकारचाच हात होता, हे आता सिध्द झालंय. विमानातल्या प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी आपण - नेहमीप्रमाणे दहशतवादासमोर गुडघे टेकले. अझर मसूदला सोडलं. त्यानं IC 814 मधल्या प्रवाशांच्या दसपट भारतीयांना एव्हाना दहशतवादी हल्ल्यांमधे मारलंय. २६.११ च्याही हल्ल्याचा हा एक सूत्रधार.
         आता जबाबदारी कोण पत्करेल ? जसवंतसिंग की चिदंबरम् ? आतातरी दहशतवाद्यांशी कसलीही तडजोड न करण्याचं आणि कठोर कारवाई करण्याचं धोरण सरकार-देश स्वीकारेल का ? दहशतवादी हल्ल्यात जो भारतीय नागरिक, अधिकारी मरेल ते त्याचं नशीब ! त्याला सरकार काय करणार.  ’लष्कर- ए-तय्यबाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असं अधिकृतरीत्या घोषित झाल्यावर त्यांनी बदललेली पार्टी म्हणजे  ’जमियत-उद्-दावा२६.११ चा हल्ला होत असताना BBC नं जमियत-उद्-दावावर स्टोरी केली होती, ती कशी शिक्षण आरोग्य क्षेत्रात काम करणारी सेवाभावी संघटना आहे, यावर. त्यावेळी जमियतच एक मुख्य नेता झाकी उल रहमानला लाखवी ताजमधल्या दहशतवाद्यांशी संपर्कात हा होता, हे आपल्या सरकारला तेंव्हाही माहिती होतं. नंतर UN च्या सुरक्षा परिषदेनं  ’जमियतला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलं. अझर मसूद, लाखवी आणि प्रा. हफ़ीज सईद यांना आंतरराष्ट्रीय  दहशतवादी म्हणून जाहीर केलं. सतत खोटं बोलणार्‍या पाकिस्तानी सरकारनं यातल्या कुणाही विरुद्ध काहीही अ‍ॅक्शन घेतलेली नाही. ती घ्यायला भारतानं पाकिस्तानला भाग पाडलेलं नाही.
        पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या दिशेने भारतानं पावलं उचलायला हवीत. आपण क्रिकेट खेळतोय, व्हिसा नियम शिथिल करतो आहोत, पाकिस्तानशी व्यापारसंबंधीची भाषा बोलतो आहोत, शतकानुशतकं पुन्हापुन्हा झालेली आक्रमणं आणी शत्रूकडून होणारा विश्वासघात यातून आपण काहीही शिकलेलो नाही आहोत. हे चीनच्या आक्रमणाच्या ५० व्या वर्षात !
        समजा, आंतर्राष्ट्रीय राजकारणाच्या काही अपरिहार्यतांमुळे भारत दहशतवादी पाकिस्तान बद्द्ल जरा सौम्य भूमिका घेतोय, हे मान्य केले, समजून घेतलं, तरी किमान देशांतर्गत तरी ठोस पावलं उचलायला हवीत, तेही केंद्र किंवा राज्य सरकार करताना दिसत नाही.अमेरिकेच्या तालिबान विरोधी अ‍ॅफ-पाक धोरणामुळं अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे. बिन लादेन पाकिस्तान मधेच सापडला, हे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना माहीत होत हे दिसून आले तरी अमेरिकेनं पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून जाहीर करण्याची पावलं उचललेली नाहीत. याची भारताच्या परराष्ट्र नीतीवर काही बंधन, काही मर्यादा आहे, हे एकवेळ समजून घेता येईल. (समर्थन करता येणार नाही) आता तर ओबामा पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यामुळे २०१४ मध्ये अमेरिका अफगाणिस्तान मधून सैन्य माघारी घेईल, हे आपण गृहीत धरायला हरकत नाही. त्यानंतर भारताला असलेला दहशतवाद्याचा धोका वाढणार आहे. त्याचा समर्थपणे मुकाबला करायला देशांतर्गत पावलं उचलता येतील की नाही? दहशतवाद विरोधी पोलीस पथकांचं विशेष प्रशिक्षण, केंद्र-राज्य समन्वयाची व्यवस्था, गुप्तवार्ता संकलनाची प्रभावी व्यवस्था उभी करणं सर्वसामान्य नागरिकाचं सुध्दा दहशतवादाबाबत लोकशिक्षण करणे...... यातलं काही म्हणजे काही करताना सरकार दिसत नाही.
    काय तर कसाबला फाशी दिली.
    तो कौनसा बहुत बडा तीर मार लिया !
    कसाबच्या फाशीचा तालिबाननं निषेध केला आहे.
        दहशतवादाचा फार मोठा धोका आजही आहे. देशांतर्गत फार मोठ्या प्रमाणावर स्लीपर सेलपुढच्या आदेशाची, संधीची वाट पहात दबा धरून बसलेत, याच्या निश्चित वार्ता सरकारकडेच आहेत. आता तर दहशतवाद्यांची नक्सलवादांशी मिलिभगत झाल्याच्याही वार्ता सरकारकडे आहेत. भारतीय राज्य आणि शासनव्यवस्था-लोकशाहीसुद्धा मोडून काढणं हे दहशवाद्यांचं, नक्सलवाद्यांचं उद्दिष्ट आहे. पाकिस्तानचा त्या उद्दिष्टाला पाठिंबा आहे. चीनचा पाकिस्तान य ऑल वेदर फ्रेंड ला या उद्दिष्टांबाबत आशीर्वाद आहे. भारताशी युद्धामधे कधीच जिंकता येणार नाही हे लक्षात घेऊन पाकिस्तानने आखलेली दुहेरी-दुधारी (दुतोंडीसुध्दा) नीती’ -म्हणजे एकीकडं अण्वस्त्रं की जे संपूर्णपणे आंतर्राष्ट्रीय चोरी आहे, जी कधीही दहशतवाद्यांच्या हातात पडू शकतात-नव्हे, नव्हे २६.११ घडवणारं पाकिस्तान डर्टी बॉम्बदहशतवाद्यांच्या हातात पडू देऊन नंतर आपण त्यातले नाहीअशी काखा वर करणारी भूमिका घेऊ शकतं- २६.११ प्रमाणेच. दुसरीकडे ब्लीड इंडिया विथ् अ थाउजंड कट्सह्या पाकिस्तान नीतीनुसार भारतात दहशतवादी कारवाया घडवल्या जातात.
    यावर पावलं उचलायला हवीत.
    तर म्हणे, कसाबला फाशी दिली.

            
                                                                                                          ___ अ. भ. धर्माधिकारी


“उपजिल्हाधिकारी ते आय.ए.एस.” किंवा “उप पोलीस अधिक्षक ते आय.पी.एस.”


मित्रांनो
केव्हा न केव्हा, एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी. ची तयारी करत असतांना तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आलाच असेल कि एकदा मी “उपजिल्हाधिकारी” झालो तर एक दिवस नक्कीच “आय.ए.एस.” होईल किंवा “उप पोलीस अधिक्षक” झालो तर “आय.पी.एस.” नक्कीच होईल.
ह्याबद्दल सविस्तर जाणण्यासाठी ही लिंक बघावी: Deputy Collector to IAS & Dy SP to IPS

MPSC Rajyaseva Prelims on 10th Feb 2013


मित्रांनो,
२०१३ मधील राज्यसेवा, पी.एस. आय. , एस.टी.आय. व असिस्टंट ह्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्याबद्दल सर्व माहिती इथे उपलब्ध आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा – १० फेब २०१३ व मुख्य परीक्षा ७, ८, व ९ जून २०१३
पी.एस.आय. पूर्व परीक्षा – २१ एप्रिल २०१३ व मुख्य परीक्षा ४ ऑगस्ट २०१३
एस. टी.आय.पूर्व परीक्षा – १२ मे २०१३ व मुख्य परीक्षा २२ सप्टेंबर २०१३
असिस्टंट पूर्व परीक्षा -१६ जून २०१३ व मुख्य परीक्षा २९ सप्टेंबर २०१३

Here is the schedule of exams to be conducted by MPSC in 2013:
Name of ExamAdvertisementPrelimsMain exam
State Services Exam (Rajyaseva) 2013 Feb 20137th Apr 201331st Aug, 1st & 2nd Sep 2013
PSI (Direct Entry) 2013February 201321 April 20134 Aug 2013
STI (Direct Entry) 2013March 201312 May 201322 Sep 2013
Assistant (Direct Entry) 2013April 201316 Jun 201329 Sep 2013
The examination shall be conducted if Government requisitions for the posts are received in time.

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम कसा राहील ह्याबद्दल सविस्तर माहिती ह्या पेजवर आहे : राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम

आयआयटी-जेईईसाठी अशी तयारी करा


आयआयटी-जेईईसाठी अशी तयारी करा
- नवनीत गुप्ता 

आयआयटी-जेईई ही परीक्षा सर्वात कठिण परीक्षांमध्ये गणली जाते. अभियांत्रिकी परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितो. म्हणूनच दरवर्षी जवळपास दोन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. आणि त्यातील फक्त तीन हजार विद्यार्थीच पास होतात.
दोन लाख विद्यार्थ्यांमधून फक्त तीनच हजार विद्यार्थी का बरे पास होतात? याच तुम्ही कधी विचार केलाय? ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी जीव तोडून प्रयत्न करतात, पण ज्या विद्यार्थ्यांची रणनीती अचूक असते, तेच यशस्वी होतात.

साधारणपणे या परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू करावी हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांजवळ तीन पर्याय असतात.... 

* बारावीनंतर ड्रॉप घेऊन
* अकरावीदरम्यान 
* बारावीत असतान

आयआयटी-जेईईच्या सध्याच्या अभ्यासक्रमानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी फक्त दोनच संधी मिळतात. पहिली, विद्यार्थी बारावीत असताना आणि दुसरी तो बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल त्यावेळी. अशा परिस्थितीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच या परीक्षेचा अभ्यास सुरू करणे योग्य ठरेल. दहावी उत्तीर्ण झाल्याच्या काळात एकतर विद्यार्थी उत्साही असतो आणि आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी असते. 

विद्यार्थ्याच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट असतील तर त्याला फार अडथळे येत नाहीत. त्यासाठी आवश्यक आहे अचूक रणनीती आणि काही छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष देण्याची. त्यामुळे या परीक्षेसाठी आधीच एक रणनीती आखा आणि खाली दिलेल्या गोष्टींवर लक्ष द्या....

आत्मविश्वास:
सुरवात नेहमी सकारात्मक दृष्टिकोण आणि आत्मविश्वासाने करावी. परीक्षेसंबंधात कुठलीही द्विधा मनस्थिती ठेवू नका. 'मी सर्व करू शकतो' असे मानून स्वतः:वर विश्वास ठेवा.

तयारीः 
या परीक्षेची तयारी अकरावीतच सुरू करा. पहिल्या शंभरात येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये अशाच विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.

नेमके मार्गदर्शन:
परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लास आणि पत्राद्वारे देण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाची निवड करताना आधी त्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवा. त्यानंतरच निवड करा.

लक्ष केंद्रीत करा:
एकाबरोबर बरेच कोर्स किंवा पुस्तकांपेक्षा एखाद्या अनुभवी विद्यार्थ्यांचा सल्ला घेऊन कोणत्याही एका कोर्सपासून तयारीला लागा. त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही.

अभ्यासाचे वेळापत्रक बनवा:
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आधी अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि आपले ध्येय केंद्रित ठेवून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.

आपले कच्चे दुवे ओळखा:
जो विषय किंवा मुद्दा कठीण वाटतो, त्यावर अधिक लक्ष देऊन आपला कच्चा दुवा पक्का करण्याचा प्रयत्न करा.

गुणवत्तेकडे लक्ष द्या :
तुम्ही किती प्रश्न सोडवीत आहात यापेक्षा तुम्ही ते कसे सोडवीत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडवा जे कठीण असतील. कोणताही प्रश्न सोडून देण्यापेक्षा तो सोडविण्याचा प्रयत्न करा.

स्वतःचीच परीक्षा घ्या:
एखाद्यावेळी स्वत:चीच परीक्षा घ्या. त्यामुळे तुम्ही किती पाण्यात आहात याचा अंदाज येईल. तुम्ही स्वतः:ची जितकी जास्त परीक्षा घ्याल तितके ते तुमच्यासाठीच हितकारक ठरेल.

या सोबतच आपल्या मित्रांशी यासंबंधी चर्चा करीत राहा आणि तयारीच्या आधुनिक तंत्राची माहिती ठेवा.

डिग्री महत्वाची का ज्ञान महत्वाचे?


ही माझ्या एका मित्राची सत्यकथा आहे. शाळेमधे असताना त्याचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. त्याचे भाषा वीषय चांगले होते. त्याला मराठी, हिंदी या वीषयांच्या पेपरात चांगले मार्क्स पडायचे. आमच्या ग्रुपमधे बर्यातच जणांचा ओढा इंजिनीयरींगकडे होता. म्हणुन त्याने पण इंजिनीयरींगकडे जायचे ठरवले. त्याचे भाषा वीषय चांगईले आहेत म्हणुन त्याने आर्टसकडे जावे असे मी त्याला सुचवले तर त्याने मला वेड्यात काढले. पुर्वी इंजिनीअरींगच्या डिग्रीच्या ( बी.ई.) ऍडमीशन साठी कॉलेजची पी.डी.( प्री डिग्री ) व इंटर ( इंटर सायन्स ) अशी दोन वर्षे करावी लागत. ज्यांना इंटरला फर्स्ट क्लास मिळे त्यांनाच पुढे बी.ई. ला ऍडमीशन मिळे. माझा मित्र हा तसा गरीब मध्यमवर्गीय परिस्थितितुन आलेला. तरी सुध्धा त्याने हट्टाने कॉलेजमधे पी.डी. सायन्सला ऍडमीशन घेतली. इंटरला फर्स्ट क्लास मिळावा म्हणुन एक वर्ष ड्रॉप घेतला. इंटरला फर्स्ट क्लास मिळाला नाही म्हणुन इंजिनीयरींगच्या डिप्लोमाला ऍडमीशन घेतली. तीन वर्षांचा डिप्लोमा खस्ता खात पांच वर्षांत पुर्ण केला. म्हणजे मॅट्रीक झाल्यावर तो आठ वर्षे, म्हणजे पहिली ते आठवी, शीकत होता. इंजिनीयरींगमधील डिप्लोमा मिळाल्यावर तो एखाद्या कारखान्यात किंवा कंपनीत नोकरिला लागेल असा आमचा अंदाज होता. पण तो मित्राच्या ओळखिने स्टेट बँकेमधे कॅशीयर म्हणुन नोकरीस लागला. त्याला ती नोकरी आवडली. पुढे त्या नोकरीत प्रमोशन्स मिळावीत म्हणुन त्याने बी. ए. इकॉनॉमिक्स केले व स्टेट बँकेतुन उच्च पदावरुन निवृत्त झाला. इंजिनीयर होण्याच्या हव्यासापायी त्याने त्याच्या आयुष्याची आठ अमुल्य वर्षे वाया तर घालवलीच. पण इंजिनीयर झाल्यावर त्याने आपल्या या ज्ञानाचा काहीच उपयोग केला नाही त्याचे काय?

पुण्याच्या डिझेल इंजिने बनविणार्या एका कारखान्यात मी नोकरिला होतो. त्यावेळी राधाकृष्णन ( आम्ही त्याला राधा म्हणायचो ) नावाचा बी. ए. झालेला एक केरळी तरुण स्टेनो म्हणुन नोकरिला लागला. त्याला डिझेल इंजिनांमधे गोडी वाटु लागली. रोज तो आपली शिफ्ट संपल्यावर तासंतास वर्कशॉपमधे जाऊन बसत असे. तिथल्या माणसांना विचारुन विचारुन इंजिनाची व त्याला लागणार्याब महत्वाच्या पार्टसची माहिता घेत असे. त्यावर सुरेख नोट्स बनवत असे. इंजिनात काय काय बदल झाले आहेत व त्याची कारणे काय काय आहेत याचे त्याने सुरेख रेकॉर्ड ठेवले होते. अर्धात तो हे छंद म्हणुन करत होता. याचा त्याच्या नेहमिच्या कामाशी काही संबंध नव्हता. एकदा इंजिनामधे काहीतरी मोठा प्रॉब्लेम आला. तो सोडविण्यासाठी राधाच्या नोट्स उपयोगी पडल्या. कंपनिने त्याचो टॅलेन्ट ओळखले व त्याचे लंडनला सर्व्हिस मॅनेजरम्हणुन पोस्टींग केले. त्याने पण बरीच वर्षे सर्व्हिस मॅनेजर म्हणुन उत्तम काम केले.

एक डिप्लोमा होल्डर इंजिनीयर स्टेट बँकेत कॅशीयर होतो. तर एक बी.ए.झालेला माणुस उत्तम इंजिनीयर होऊ शकतो हे कशाचे द्योतक आहे?
नुकतेच ऍपलच्या स्टिव्ह जॉब्जचे नीधन झाले. अमेरीकन तज्ञांच्या मते स्टिव्ह जॉब्ज हा थॉमस अल्वा एडीसन नंतरचा सर्वात हुषार व कल्पक इंजिनीयर म्हणुन ओळाखला जाईल. एडीसन हा फक्त चौथी पर्यंत शीकलेला होता. तर स्टिव्ह कॉलेजमधे फक्त एक सेमिस्टर एव्हडाच शीकलेला होता. त्यांच्याकडे इंजिनीअरींगची कोठलिही डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट वा क्वालिफिकेशन नव्हते. मग ते जगातले सर्वश्रेष्ठ इंजिनीयर्स कसे होऊ शकले?

शिक्षणाचा मुळ उद्देश ज्ञान देणे, कौशल्य वाढविणे, नवीन कौशल्य निर्माण करणे हा आहे. पण हल्ली शीक्षणाचा मुळ उद्देश डिग्रया व त्याची सर्टिफिकेटस देणे हा असावा असे वाटु लागले आहे. हल्ली शीक्षणातुन मीळणार्याय ज्ञानाकेक्षा त्यातुन मीळणार्यास डिग्रिला व डिग्रिच्या सर्टिफिकेटला नको येव्हडे महत्व प्राप्त झाले आहे. येन केन प्राकाराने एखादी डिग्री मीळवायची व त्या जोरावर एखादी चांगली नोकरी पटकावयाची असे अनेक लोकांचे प्लॅनींग असते. डिग्री हाच अनेकांच्या आयुष्याचा मुख्य पाया झाला आहे. मग डिग्री मीळविण्यासाठी अनेक परिक्षा द्याव्या लागतात. परिक्षेतील मार्कांवर ग्रेड ठरते. त्यावर पुढील भवितव्य ठरते. मग परिक्षेत पास होण्याचे, त्यात भरपुर मार्क्स मिळविण्याचे अनेक शॉर्ट कट्स उपलब्ध झाले आहेत. ते विद्यार्थांना ज्ञानार्थी बनविण्याऐनजी परिक्षार्थी बनवत आहेत. त्यामुळे ज्ञानापेक्षा डिग्रिला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास हे कधी कुठल्या शाळा कॉलेजमधे गेल्याचे किंवा त्यांच्या कडे कुठले डिग्री सर्टिफिकेट असल्याचे अजुनपर्यंत तरी आढळुन आलेले नाही. पण त्यांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदास स्वामिंचे दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ अजुनही लोकप्रीय आहेत. पिढ्यांन पिढ्या भक्तिभावाने त्यांचे वाचन व मनन चालु आहे. अजुनही हे ग्रंथ मरठितील बेस्ट सेलरकॅटेगरितल्या पुस्तकात मोडतात.

लक्षमणराव किर्लोस्कर ड्रॉइंग टीचर होते. तर धिरुभाई अंबानी फक्त मॅट्रीकपर्यंत शीकलेले होते. त्यांच्याकडे इंजिनीअरींग किंवा मॅनेजमेन्ट मधले कोणत्याही तर्हेपचे डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा क्वालि॑फिकेशन नव्हते. लक्षमणराव किर्लोस्करांनी किर्लोस्कर उद्योग समुहाची स्थापना केली. इंजिनीयरींगच्या क्षेत्रातील तो एक आघाडिचा उद्योग समुह म्हणुन ओळखला जातो. धिरुभाई अंबानिंनी रिलायन्स उद्योग समुहाची स्थापना केली. आज भारतातीतल खाजगी क्षेत्रातील सर्वांत मोठा उद्योग समुह म्हणुन रिलायन्स ओळखला जातो. अशी अनेक उदाहरणे आहेत.

कोणत्याही प्रकारची डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा कसलेही क्वालिफिकेशन नसताना वरील लोकांना हे कसे जमले? कारण त्यांनी ज्ञानाचे महत्व ओळखले होते. डिग्री आणि ज्ञान यातला फरक ते जाणुन होते. पण नुसतेच ज्ञान मीळवायचे नाही. तर प्रत्यक्ष जीवनात त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता याईल या दृष्टिने पण ते सतत प्रायत्नशील राहिले.

ज्ञान मिळविण्याच्या मार्गात कधी शॉर्ट कटस नसतात. ज्ञान मिळविण्याचे अनेक मार्ग असतात. शाळा कॉलेजमधील शीक्षण हा एक मार्ग असतो. पण तो काही एकमेव मार्ग नव्हे. अर्थात ज्ञान मिळविण्याचा मार्ग खडतर तसेच वेळ घेणारा असतो. ज्या विषयाचे ज्ञान घ्यायचे त्याची मुळात आवड असावी लागते. अनेक लोकांना तांत्रीक वीषयात रुची असते. पण सगळ्यांनाच तंत्रशीक्षण घेणे जमतेच असे नव्हे. तंत्र शीक्षणाची कुठली पदवी किंवा सर्टिफिकेट आपल्याकडे नाही म्हणुन आपण काही करु शकणार नाही असे वाटुन ते आपल्यातील तांत्रीक वीषयातील रुची मारुन टाकत असतात. पण असे लोक सुध्धा उत्तम इंजिनीयर्स होऊ शकतात हे एडीसन किंवा स्टिव्ह जॉब्ज सारख्या लोकांनी दाखवुन दिले आहे.

याचा अर्थ लोकांनी डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट्स किंवा क्वलिफिकेशन्स मीळवु नयेत असा होत नाही. शीक्षण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्याला काही ना काहीतरी महत्व हे असतेच. तसेच प्रत्येक डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेटला महत्व हे असतेच. पण त्याहिपेक्षा ज्ञानाला जास्त महत्व असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. डिग्री मिळाली, सर्टिफिकेट मिळाले म्हणजे आपले शीक्षण संपले असे समजु नये. तसेच शीक्षण घेताना त्यातुन मीळणार्या ज्ञानाला जास्त महत्व द्यावे, डिग्रिला नव्हे. कारण येणारा जमाना हा ज्ञानी लोकांचा आहे, क्वालिफाईड लोकांचा नाही हे लक्षात घ्यावे..

विविध राज्यांतील गणेश


विविध राज्यांतील गणेश काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात अनेक ठिकाणी गणेशस्थाने आहेतत्यांपैकी काही परिचिततर अनेक अपरिचित आहेतत्यांपैकी काही स्थानांची थोडक्‍यात माहिती 

गोवा खांडोळ्याचा गणपती कामाक्षीदेवी कामरूपहून (आसामगोव्यात आलीत्याचप्रमाणे हा गणपतीही तिकडूनच आला अशी लोकांची श्रद्धा आहेतिसवाडी तालुक्‍यात दिवाडी गावाच्या नावेली येथे हा गणपती होता. 1560मध्ये या गणपतीची मूर्ती फोंडे तालुक्‍यातील खंडेपार येथे आणण्यात आलीनावेलीचे शेणवी नावेलकर हे गणेशभक्तगणेशाची मूर्ती हलविल्याने त्यांना खंडेपार येथे जाणे अवघड होऊ लागले.एका धनत्रयोदशीच्या रात्री नावेलकर मंडळींनी ही मूर्ती खंडेपार येथून पळविलीदिवाळीच्या पहाटे खंडेपारकरांना देवळात मूर्ती दिसेना म्हणून ते मूर्ती शोधण्यासाठी निघालेभाणस्तारच्या खाडीतून मूर्ती नेताना नावेलकरांना त्यांनी पकडलेदोघांत प्रचंड वादावादी झालीनंतर ठरले की दोघांनाही येण्याजाण्यासाठी सोयीच्या ठिकाणी मूर्ती ठेवावीत्यानुसार पणजी व फोंड्यापासून सारख्या अंतरावर असलेल्या खांडोळे या गावी मूर्तीची स्थापना करण्यात आलीनरक चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती गावातून गेली म्हणून शेणवी खंडेपारकर अजूनही दिवाळी साजरी करत नाहीततर दिवाळीच्या दिवशी मूर्ती गावी आणता आली नाही म्हणून नावेलकरही दिवाळी साजरी करत नाहीतकार्तिक शुद्ध प्रतिपदेला समेट झाल्याने दोन्ही घराण्यांत दीपोत्सव साजरा करण्यात येतोया गणपतीचे मंदिर खांडोळ्याला डोंगराच्या पायथ्याशी नारळांच्या आगरात आहेपाषाणाची भव्य गणेशमूर्ती विराजमान आहे
पुनळेकरांचा गणपती बार्देश महालात बस्तांदे येथे पुतळे वाडी आहेतेथे गणपतीचे देऊळ होतेते पोर्तुगिजांनी उद्‌ध्वस्त केलेत्यामुळे तेथील मूर्ती पेडणे महालातील धारगळ गावी नेण्यात आलीया गणपतीस पुनळेकरांचा गणपती म्हणतात
हरमलचा गणेश हरमल येथे इतिहासप्रसिद्ध नारायणाचे देऊळ आहेते आता पडक्‍या स्थितीत आहेया मंदिरात गणेशाची स्थापना केली आहेपोर्तुगिजांनी गणेशपूजनास बंदी घातल्याने भिंतीवरील चित्राची पूजा करण्याची प्रथा सुरू झालीअजूनही काही सारस्वत कुटुंबे कागदावरील गणपतीचे पूजन भाद्रपदात करतात.

कर्नाटक कौण्डिण्य महागणपती 
कुरुडुमळे (जिकोलारया गावात हे गणपती मंदिर आहेकौण्डिण्य ऋषींचा आश्रय या ठिकाणी होतात्यामुळे याला "कौण्डिण्य क्षेत्रअसेही संबोधिले जातेत्रिपुरासुराशी लढायला जाण्यापूर्वी ब्रह्मा,विष्णू व महेश आणि इतर देवांनी या ठिकाणी महागणपतीची आराधना केली होतीम्हणून याला गणेशगिरी किंवा कुटाचल असेही संबोधले जातेयेथील महागणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय गणेशयात्रा पूर्ण होत नाहीअशी धारणा आहेमंदिराच्या मुख्य देवळाच्या गर्भगृहात महागणपतीची मूर्ती नऊ फूट उंचीची असूनहिरव्या संगमरवराची आहे.
इडगुंजी महागणपती इडगुंजी गावातील हा गणपती पंचखाद्यप्रिय महागणपती म्हणून ओळखला जातोहे गाव गोकर्ण क्षेत्रापासून 25 मैलांवर आहेएकदा नारद पार्वतीकडे गेले होतेतेथे गणपती गोड खाऊसाठी रडत होतात्या वेळी नारदांनी आश्‍वासन दिलेकी तुला रोज पंचखाद्य इत्यादी गोड खाऊ देववितोतू माझ्याबरोबर शरावती काठी इडाकुंज क्षेत्री चलपुढे तेथे विश्‍वकर्म्याने गणेशाची स्थापना केली,अशीकथा आहेही गणेशाची द्विहस्त मूर्ती आहेबालब्रह्मचारी रूपातील ही मूर्ती आहेविशेष म्हणजे या मूर्तीचे डोळे अतिशय बारीक असूनदोन्ही सुळे सारख्या आकाराचे आहेतइडलीसारखा पदार्थ मूर्तीच्या चारी बाजूंनी डोक्‍यापर्यंत अर्पण करण्याची पद्धत येथे आहेदुपारच्या आरतीच्या वेळी पंचखाद्य नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे.

गोकर्ण 
राक्षसाधीश रावणाच्या हातून शंकराचे आत्मलिंग वाचविणारा ब्राह्मण बटूच्या रूपातील गणेश म्हणून गोकर्णच्या गणेशाची ख्याती आहेही दोन हाती उभी सुमारे पाच फूट उंचीची पाषाणमूर्ती आहेही मूर्ती पाचव्या शतकातील असावीया मूर्तीला मुकुट नाहीरावणाने ठोसा मारल्याची खूण या मूर्तीच्या डोक्‍यावर दाखविली जातेहा गणपती गोकर्ण महाबळेश्‍वरच्या आवारातचपण स्वतंत्र मंदिरात आहे.
तमिळनाडू शंकराचार्यस्थापित गणेश श्रीरंगम स्थानकाच्या जवळच जंबुकेश्‍वराचे मंदिर आहेत्याच्या शेजारीच जगदंबेचे मंदिर आहेया मंदिराच्या समोरच गणेशमंदिर आहेही मूर्ती शंकराचार्यांनी स्थापन केली आहेजगदंबेची मूर्ती पूर्वी तेजस्वी आणि उग्र होतीतिचे उग्र तेज शांत करण्यासाठी शंकराचार्यांनी गणेशाची स्थापना तिच्यासमोरच केली अशी कथा सांगितली जाते.
उत्तर प्रदेश धुंडीराज (श्रीक्षेत्र काशीकाशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिराच्या परिसरात ही गणेशमूर्ती आहेभारतातील 21 गणेशस्थानांपैकी हे एक स्थान आहेभस्मासुराचा मुलगा दुरासद याचा नाश करण्यासाठी देवांच्या प्रार्थनेवरून दिव्य अवतार धारण करून त्याचा नाश केलाअशी कथा आहेकाशी क्षेत्रात 56 विनायक असल्याची नोंद आहे.
sakal.com