डिग्री महत्वाची का ज्ञान महत्वाचे?


ही माझ्या एका मित्राची सत्यकथा आहे. शाळेमधे असताना त्याचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. त्याचे भाषा वीषय चांगले होते. त्याला मराठी, हिंदी या वीषयांच्या पेपरात चांगले मार्क्स पडायचे. आमच्या ग्रुपमधे बर्यातच जणांचा ओढा इंजिनीयरींगकडे होता. म्हणुन त्याने पण इंजिनीयरींगकडे जायचे ठरवले. त्याचे भाषा वीषय चांगईले आहेत म्हणुन त्याने आर्टसकडे जावे असे मी त्याला सुचवले तर त्याने मला वेड्यात काढले. पुर्वी इंजिनीअरींगच्या डिग्रीच्या ( बी.ई.) ऍडमीशन साठी कॉलेजची पी.डी.( प्री डिग्री ) व इंटर ( इंटर सायन्स ) अशी दोन वर्षे करावी लागत. ज्यांना इंटरला फर्स्ट क्लास मिळे त्यांनाच पुढे बी.ई. ला ऍडमीशन मिळे. माझा मित्र हा तसा गरीब मध्यमवर्गीय परिस्थितितुन आलेला. तरी सुध्धा त्याने हट्टाने कॉलेजमधे पी.डी. सायन्सला ऍडमीशन घेतली. इंटरला फर्स्ट क्लास मिळावा म्हणुन एक वर्ष ड्रॉप घेतला. इंटरला फर्स्ट क्लास मिळाला नाही म्हणुन इंजिनीयरींगच्या डिप्लोमाला ऍडमीशन घेतली. तीन वर्षांचा डिप्लोमा खस्ता खात पांच वर्षांत पुर्ण केला. म्हणजे मॅट्रीक झाल्यावर तो आठ वर्षे, म्हणजे पहिली ते आठवी, शीकत होता. इंजिनीयरींगमधील डिप्लोमा मिळाल्यावर तो एखाद्या कारखान्यात किंवा कंपनीत नोकरिला लागेल असा आमचा अंदाज होता. पण तो मित्राच्या ओळखिने स्टेट बँकेमधे कॅशीयर म्हणुन नोकरीस लागला. त्याला ती नोकरी आवडली. पुढे त्या नोकरीत प्रमोशन्स मिळावीत म्हणुन त्याने बी. ए. इकॉनॉमिक्स केले व स्टेट बँकेतुन उच्च पदावरुन निवृत्त झाला. इंजिनीयर होण्याच्या हव्यासापायी त्याने त्याच्या आयुष्याची आठ अमुल्य वर्षे वाया तर घालवलीच. पण इंजिनीयर झाल्यावर त्याने आपल्या या ज्ञानाचा काहीच उपयोग केला नाही त्याचे काय?

पुण्याच्या डिझेल इंजिने बनविणार्या एका कारखान्यात मी नोकरिला होतो. त्यावेळी राधाकृष्णन ( आम्ही त्याला राधा म्हणायचो ) नावाचा बी. ए. झालेला एक केरळी तरुण स्टेनो म्हणुन नोकरिला लागला. त्याला डिझेल इंजिनांमधे गोडी वाटु लागली. रोज तो आपली शिफ्ट संपल्यावर तासंतास वर्कशॉपमधे जाऊन बसत असे. तिथल्या माणसांना विचारुन विचारुन इंजिनाची व त्याला लागणार्याब महत्वाच्या पार्टसची माहिता घेत असे. त्यावर सुरेख नोट्स बनवत असे. इंजिनात काय काय बदल झाले आहेत व त्याची कारणे काय काय आहेत याचे त्याने सुरेख रेकॉर्ड ठेवले होते. अर्धात तो हे छंद म्हणुन करत होता. याचा त्याच्या नेहमिच्या कामाशी काही संबंध नव्हता. एकदा इंजिनामधे काहीतरी मोठा प्रॉब्लेम आला. तो सोडविण्यासाठी राधाच्या नोट्स उपयोगी पडल्या. कंपनिने त्याचो टॅलेन्ट ओळखले व त्याचे लंडनला सर्व्हिस मॅनेजरम्हणुन पोस्टींग केले. त्याने पण बरीच वर्षे सर्व्हिस मॅनेजर म्हणुन उत्तम काम केले.

एक डिप्लोमा होल्डर इंजिनीयर स्टेट बँकेत कॅशीयर होतो. तर एक बी.ए.झालेला माणुस उत्तम इंजिनीयर होऊ शकतो हे कशाचे द्योतक आहे?
नुकतेच ऍपलच्या स्टिव्ह जॉब्जचे नीधन झाले. अमेरीकन तज्ञांच्या मते स्टिव्ह जॉब्ज हा थॉमस अल्वा एडीसन नंतरचा सर्वात हुषार व कल्पक इंजिनीयर म्हणुन ओळाखला जाईल. एडीसन हा फक्त चौथी पर्यंत शीकलेला होता. तर स्टिव्ह कॉलेजमधे फक्त एक सेमिस्टर एव्हडाच शीकलेला होता. त्यांच्याकडे इंजिनीअरींगची कोठलिही डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट वा क्वालिफिकेशन नव्हते. मग ते जगातले सर्वश्रेष्ठ इंजिनीयर्स कसे होऊ शकले?

शिक्षणाचा मुळ उद्देश ज्ञान देणे, कौशल्य वाढविणे, नवीन कौशल्य निर्माण करणे हा आहे. पण हल्ली शीक्षणाचा मुळ उद्देश डिग्रया व त्याची सर्टिफिकेटस देणे हा असावा असे वाटु लागले आहे. हल्ली शीक्षणातुन मीळणार्याय ज्ञानाकेक्षा त्यातुन मीळणार्यास डिग्रिला व डिग्रिच्या सर्टिफिकेटला नको येव्हडे महत्व प्राप्त झाले आहे. येन केन प्राकाराने एखादी डिग्री मीळवायची व त्या जोरावर एखादी चांगली नोकरी पटकावयाची असे अनेक लोकांचे प्लॅनींग असते. डिग्री हाच अनेकांच्या आयुष्याचा मुख्य पाया झाला आहे. मग डिग्री मीळविण्यासाठी अनेक परिक्षा द्याव्या लागतात. परिक्षेतील मार्कांवर ग्रेड ठरते. त्यावर पुढील भवितव्य ठरते. मग परिक्षेत पास होण्याचे, त्यात भरपुर मार्क्स मिळविण्याचे अनेक शॉर्ट कट्स उपलब्ध झाले आहेत. ते विद्यार्थांना ज्ञानार्थी बनविण्याऐनजी परिक्षार्थी बनवत आहेत. त्यामुळे ज्ञानापेक्षा डिग्रिला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास हे कधी कुठल्या शाळा कॉलेजमधे गेल्याचे किंवा त्यांच्या कडे कुठले डिग्री सर्टिफिकेट असल्याचे अजुनपर्यंत तरी आढळुन आलेले नाही. पण त्यांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदास स्वामिंचे दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ अजुनही लोकप्रीय आहेत. पिढ्यांन पिढ्या भक्तिभावाने त्यांचे वाचन व मनन चालु आहे. अजुनही हे ग्रंथ मरठितील बेस्ट सेलरकॅटेगरितल्या पुस्तकात मोडतात.

लक्षमणराव किर्लोस्कर ड्रॉइंग टीचर होते. तर धिरुभाई अंबानी फक्त मॅट्रीकपर्यंत शीकलेले होते. त्यांच्याकडे इंजिनीअरींग किंवा मॅनेजमेन्ट मधले कोणत्याही तर्हेपचे डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा क्वालि॑फिकेशन नव्हते. लक्षमणराव किर्लोस्करांनी किर्लोस्कर उद्योग समुहाची स्थापना केली. इंजिनीयरींगच्या क्षेत्रातील तो एक आघाडिचा उद्योग समुह म्हणुन ओळखला जातो. धिरुभाई अंबानिंनी रिलायन्स उद्योग समुहाची स्थापना केली. आज भारतातीतल खाजगी क्षेत्रातील सर्वांत मोठा उद्योग समुह म्हणुन रिलायन्स ओळखला जातो. अशी अनेक उदाहरणे आहेत.

कोणत्याही प्रकारची डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा कसलेही क्वालिफिकेशन नसताना वरील लोकांना हे कसे जमले? कारण त्यांनी ज्ञानाचे महत्व ओळखले होते. डिग्री आणि ज्ञान यातला फरक ते जाणुन होते. पण नुसतेच ज्ञान मीळवायचे नाही. तर प्रत्यक्ष जीवनात त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता याईल या दृष्टिने पण ते सतत प्रायत्नशील राहिले.

ज्ञान मिळविण्याच्या मार्गात कधी शॉर्ट कटस नसतात. ज्ञान मिळविण्याचे अनेक मार्ग असतात. शाळा कॉलेजमधील शीक्षण हा एक मार्ग असतो. पण तो काही एकमेव मार्ग नव्हे. अर्थात ज्ञान मिळविण्याचा मार्ग खडतर तसेच वेळ घेणारा असतो. ज्या विषयाचे ज्ञान घ्यायचे त्याची मुळात आवड असावी लागते. अनेक लोकांना तांत्रीक वीषयात रुची असते. पण सगळ्यांनाच तंत्रशीक्षण घेणे जमतेच असे नव्हे. तंत्र शीक्षणाची कुठली पदवी किंवा सर्टिफिकेट आपल्याकडे नाही म्हणुन आपण काही करु शकणार नाही असे वाटुन ते आपल्यातील तांत्रीक वीषयातील रुची मारुन टाकत असतात. पण असे लोक सुध्धा उत्तम इंजिनीयर्स होऊ शकतात हे एडीसन किंवा स्टिव्ह जॉब्ज सारख्या लोकांनी दाखवुन दिले आहे.

याचा अर्थ लोकांनी डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट्स किंवा क्वलिफिकेशन्स मीळवु नयेत असा होत नाही. शीक्षण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्याला काही ना काहीतरी महत्व हे असतेच. तसेच प्रत्येक डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेटला महत्व हे असतेच. पण त्याहिपेक्षा ज्ञानाला जास्त महत्व असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. डिग्री मिळाली, सर्टिफिकेट मिळाले म्हणजे आपले शीक्षण संपले असे समजु नये. तसेच शीक्षण घेताना त्यातुन मीळणार्या ज्ञानाला जास्त महत्व द्यावे, डिग्रिला नव्हे. कारण येणारा जमाना हा ज्ञानी लोकांचा आहे, क्वालिफाईड लोकांचा नाही हे लक्षात घ्यावे..