मित्रांनो, आता पी.एस.आय./एस.टी.आय./आय.ए.एस./राज्यसेवा परीक्षा फार जवळ आली आहे. अभ्यासाची तयारी करत असतांना सर्वच जण स्वतःला अभ्यासात झोकून देतात, सर्वस्वच विसरून जातात पण मित्रांनो, ह्यावेळी काय काळजी घ्यायला पाहिजे हे माहित आहे का?
पुढील एक महिन्यात, तुम्ही तुमची उपलब्ध असलेली जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी द्या पण खालील गोष्टी विसरू नका आणि योग्य ती काळजी घ्या म्हणजे परीक्षेदरम्यान तुमचं स्वास्थसुद्धा चांगलं राहील आणि परीक्षेत योग्य तो परफोर्मंस मिळेल.
- रोज कमीत कमी ६ ते १२ तास अभ्यास करावा. परीक्षा ३ दिवसावर आल्यावर मात्र ६ ते ८ तास अभ्यास करावा. जास्तीत जास्त (रात्री) झोप घ्यावी (८ तास कमीत कमी).
- रोज १० ते १२ ग्लास कोमट पाणी प्यावं म्हणजे रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे चालेल.
- ह्या एक महिन्यात जेवण साधं आणि योग्य प्रमाणात ठेवावं. एकाचवेळी जास्त जेवू नये. मांसाहार टाळावा. ५ ते ६ वेळा थोडं थोडं खावं.
- गाजर, पत्तागोभी, काकडी, टोम्याटो ह्यांची सलाड खावी. हे खाल्ल्याने तुमचा स्ट्रेस निघून जाईल.
- भात किंवा तांदळाचे पदार्थ जसे डोसा, इडली जास्त खावू नये. त्यामुळे झोप येईल.
- भाजलेले चणे आणि खरे शेंगदाणे खावेत.
- ज्या पदार्थात जास्त क्यालरी (Calorie) असतात ते खावू नये. तुम्हाला झोप येत राहील.
- बाहेरचं खावू नये, इन्फेक्शन होवू शकते.
- फिश, अंडे खावेत.
- ड्राय फ्रुट्स खावेत (एकावेळी जास्तीत जास्त १० पीस)
- संत्री, सफरचंद, केळी खावेत.
- तेलकट, तुपकट खावू नये, स्पेशली रात्रीच्या जेवणात.
- अभ्यास करत असतांना जर चहा किंवा कॉफी घेणार असाल तर सोबत बिस्कुट खावे.
- लक्षात ठेवा, जे काही तुम्ही खाल ते सर्व फ्रेश (बिस्कुट सोडून बर का!) असायला पाहिजे.
- अभ्यास करत असतांना, मध्ये एक तासाचा ब्रेक घ्यावा आणि आराम करावा. ह्या दरम्यान टी.व्ही. बघू नये किंवा दुसरं काही वाचू नये. डोळ्यांना सुद्धा आराम द्यावा.
हे करू नये:
- रस्त्यावरचं खावू/पिवू नये.
- जंक फूड (पाकिटातील) खावू नये
- शिळ अन्नं खावू नये.
- थंड पेय (कोल्ड ड्रिंक्स) पिवू नये.
*** अभ्यास करत असतांना, एकावेळी ३० मिनिटेच करावा आणि ५ मिनिटे ब्रेक घ्यावा. फ्रेश हवा खावी, एक ग्लास कोमट पाणी प्यावं आणि वाटल तर बिस्कुट किंवा फ्रुट खावं आणि ५ मिनिटांनी परत अभ्यासाला लागावं. प्रत्येक ३० मिनिटांनी ५ मिनिटांचा ब्रेक घ्यायला विसरू नये.***