सरकारी नोकरी - भारतीय वस्त्रोद्योग मंत्रालय

Powerloom Development and Export Promotion Council
PDEXCIL ही भारतीय वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकारने स्थापन केली आहे. ही एक विना नफा तत्वावर चालणारी एक संस्था आहे. जी भारतीय वास्त्रोद्याच्या विकासासाठी कार्य करते.
PDEXCIL मध्ये खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Executive Director
Deputy director
Assistant Director
Assistant Secretary
Assistant
1. कार्यकारी निर्देशक - जागा ०१
पगार - रु.१६४००-४५०-२००००/- प्र.म.
वयोमर्यादा - ४५ वर्ष
२. उप निर्देशक जागा - ०१
पगार - रु. १००००-३२५-१५२००/- प्र.म.
वयोमर्यादा - ४० वर्ष
३. सहाय्यक निर्देशक - जागा ०१
पगार - रु. ८०००-२७५-१३५००/-
वयोमर्यादा - ३५ वर्ष
४. सहाय्यक सचिव - जागा ०१
पगार ८०००-२७५-१३५००/- प्र.म.
वयोमर्यादा - ३५ वर्ष
५. सहाय्यक - जागा ०१
पगार - रु.४५००-१२५-७०००/- प्र.म.
वयोमर्यादा - ३० वर्ष
पत्ता.
PDEXCIL,
GC-2,Ground Floor,
Gundecha Onclave,
Kherani Road,
Saki Naka,Andheri (East),
Mumbai-400 072 India
अधिक माहितीसाठी Employment News 28 July-3 August 2012

अधिक सरकारी नोकऱ्यांसाठी - www.eonlineindia.blogspot.in or www.bjbjobs.co.cc

जेईई-आयआयटीसाठी अशी तयारी करा!


आयआयटी-जेईई ही परीक्षा सर्वात कठिण परीक्षांमध्ये गणली जाते. अभियांत्रिकी परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितो. म्हणूनच दरवर्षी जवळपास दोन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. आणि त्यातील फक्त तीन हजार विद्यार्थीच पास होतात.

दोन लाख विद्यार्थ्यांमधून फक्त तीनच हजार विद्यार्थी का बरे पास होतात? याच तुम्ही कधी विचार केलाय? ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी जीव तोडून प्रयत्न करतात, पण ज्या विद्यार्थ्यांची रणनीती अचूक असते, तेच यशस्वी होतात.

साधारणपणे या परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू करावी हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांजवळ तीन पर्याय असतात.... 

बारावीनंतर ड्रॉप घेऊन
अकरावीदरम्यान 
बारावीत असतान

आयआयटी-जेईईच्या सध्याच्या अभ्यासक्रमानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी फक्त दोनच संधी मिळतात. पहिली, विद्यार्थी बारावीत असताना आणि दुसरी तो बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल त्यावेळी. अशा परिस्थितीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच या परीक्षेचा अभ्यास सुरू करणे योग्य ठरेल. दहावी उत्तीर्ण झाल्याच्या काळात एकतर विद्यार्थी उत्साही असतो आणि आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी असते. 

विद्यार्थ्याच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट असतील तर त्याला फार अडथळे येत नाहीत. त्यासाठी आवश्यक आहे अचूक रणनीती आणि काही छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष देण्याची. त्यामुळे या परीक्षेसाठी आधीच एक रणनीती आखा आणि खाली दिलेल्या गोष्टींवर लक्ष द्या....

आत्मविश्वा
सुरवात नेहमी सकारात्मक दृष्टिकोण आणि आत्मविश्वासाने करावी. परीक्षेसंबंधात कुठलीही द्विधा मनस्थिती ठेवू नका. 'मी सर्व करू शकतो' असे मानून स्वतः:वर विश्वास ठेवा.

तयार
या परीक्षेची तयारी अकरावीतच सुरू करा. पहिल्या शंभरात येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये अशाच विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.

नेमके मार्गदर्श
परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लास आणि पत्राद्वारे देण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाची निवड करताना आधी त्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवा. त्यानंतरच निवड करा.

लक्ष केंद्रीत कर
एकाबरोबर बरेच कोर्स किंवा पुस्तकांपेक्षा एखाद्या अनुभवी विद्यार्थ्यांचा सल्ला घेऊन कोणत्याही एका कोर्सपासून तयारीला लागा. त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही.

अभ्यासाचे वेळापत्रक बनव
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आधी अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि आपले ध्येय केंद्रित ठेवून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.

आपले कच्चे दुवे ओळख
जो विषय किंवा मुद्दा कठीण वाटतो, त्यावर अधिक लक्ष देऊन आपला कच्चा दुवा पक्का करण्याचा प्रयत्न करा.

गुणवत्तेकडे लक्ष द्या 
तुम्ही किती प्रश्न सोडवीत आहात यापेक्षा तुम्ही ते कसे सोडवीत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडवा जे कठीण असतील. कोणताही प्रश्न सोडून देण्यापेक्षा तो सोडविण्याचा प्रयत्न करा.

स्वतःचीच परीक्षा घ्य
एखाद्यावेळी स्वत:चीच परीक्षा घ्या. त्यामुळे तुम्ही किती पाण्यात आहात याचा अंदाज येईल. तुम्ही स्वतः:ची जितकी जास्त परीक्षा घ्याल तितके ते तुमच्यासाठीच हितकारक ठरेल.

या सोबतच आपल्या मित्रांशी यासंबंधी चर्चा करीत राहा आणि तयारीच्या आधुनिक तंत्राची माहिती ठेवा. 

कमी शिक्षणातही सरकारी नोकरी

आनंद मापुस्कर 
सरकारी नोकरी म्हणजे ग्रॅज्युएशन हवंच असा अनेकांचा समज असतो पण दहावी आणि बारावीनंतरही अनेक सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी असतात. सुरुवातीला अगदी छोट्या पदाची संधी असली तरी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. याच स्पर्धा परीक्षा आणि विविध संधींची माहिती

स्टाफ सिलेक्शन कमिशन 

कम्बाइन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन - २०१२

डेटा एण्ट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन क्लार्क भरती)

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध ऑफीसमध्ये डेटा एण्ट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी भरती केली जाते . या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना काही वर्षांनी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. या भरती परीक्षेतून उमेदवार २ गटात (एक्स व वाय)मध्ये नोकरीसाठी पसंती देऊ शकतात .

ग्रुप एक्स : 

यात निवडलेले उमेदवार खालील ऑफिसमध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणून काम करू शकतात .
आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स
निवडणूक आयोग
इंटेलिजन्स ब्युरो
कोस्ट गार्ड
इंडियन फॉरेन सर्व्हिस
सीबीआय
राष्ट्रपती सचिवालय
संसदीय कामकाज मंत्रालय
केंद्रीय दक्षता आयोग

ग्रुप वाय : 

यातले उमेदवार खालील ऑफिसमध्ये डेटा एण्ट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकतात.
कॅग
लेखा परीक्षक
संरक्षण दले लेखा विभाग
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण
वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे.
प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत : १० ऑगस्ट २०१२
परीक्षा फी : १०० रुपये ( महिला तसेच एससी , एसटी व अपंग उमेदवारांना फी नाही )
परीक्षा दिनांकः २१ व २८ ऑक्टोबर २०१२
विद्यार्थी प्रवेश अर्ज संबंधित विभागीय ऑफिसमध्ये अर्ज पाठवू शकतात किंवा ऑनलाइन भरू शकतात विद्यार्थ्यांनी केवळ एकच अर्ज भरावा. त्यापेक्षा जास्त अर्ज भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही. महाराष्ट्राचं विभागीय केंद्र मुंबईला असून परीक्षा केंद्र औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , नागपूर , पुणे , नाशिक , अमरावतीला आहेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (पश्चिम विभाग) 

हेल्प लाईन नं - ९८६९७३०७०० , ७७३८४२२७०५.

निवड प्रक्रिया -

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा , स्कील टेस्ट (डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी) , टायपिंग टेस्ट (लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी) द्वारे केली जाते

लेखी परीक्षा -

लेखी परीक्षा २०० गुणांची असून पेपरचं स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. २ तासांचा वेळ असतो. पेपर इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध असतील. कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मान्यता मिळाल्यास तसेच प्रिंटींग व तज्ञांची उपलब्धता झाल्यास या परीक्षेचे पेपर्स मराठी वा इतर भाषेतून तयार केले जातील असं कमिशनच्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. लेखी परीक्षेत चार विषयावर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातात.

विषय

सामान्य बुध्दीमापन
इंग्रजी भाषा
क्वांटीटिटीव्ह अॅप्टिटयुड ( अंकगणितीय क्षमता)

सामान्य ज्ञान

स्कील टेस्ट-

डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना स्कील टेस्टसाठी बोलावलं जाते. स्कील टेस्टमध्ये १५ मिनिटं इंग्रजी भाषेत टायपिंग करायला सांगितलं जातं. टायपिंगचा वेग तासाला ८००० की डिप्रेशन असायला हवा. त्यात केवळ पास होणं आवश्यक आहे. त्याला वेगळे गुण नसतात.

टायपिंग टेस्ट - 

लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना टायपिंगच्या परीक्षेसाठी बोलावले जाते. ही टेस्ट हिंदी किंवा इंग्लीशची असते. इंग्लीश टायपिंगचा वेग ३५ शब्द प्रती मिनिट तर हिंदीचा वेग ३० शब्द प्रती मिनिट असावा लागतो. टायपिंगची परीक्षा कम्प्युटरवर घेतली जाते त्यात १० मिनीटात दिलेला उतारा टाइप करायचा असतो.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग 

क्लार्क-टायपिस्ट ( इंग्रजी - मराठी)
मंत्रालयीन विभाग व मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील क्लार्क आणि मराठी व इंग्रजी टायपिस्ट या गट क संवर्गातील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेण्यात येते.

वयोमर्यादा -

किमान १८ वर्षे व कमाल ३३ वर्षे.

शैक्षणिक पात्रता -

दहावी पास
क्लार्क-टायपिस्ट (मराठी) साठी मराठी टायपिंग वेग ३० शब्द प्रति मिनिट
तर क्लार्क-टायपिस्ट (इंग्रजी)साठी इंग्रजी टायपिंग वेग ४० शब्द प्रति मिनिट हवा.
उमेदवाराला मराठी बोलता , वाचता व लिहीता येणं गरजेच आहे.

परीक्षा टप्पे -फक्त लेखी परीक्षा घेतली जाईल.

लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असून ४०० गुणांसाठी २०० प्रश्न असतील. वेळ दोन तास असेल. इंग्रजी विषयाकरिता इंग्रजी माध्यम तर अन्य सर्व विषयांसाठी मराठी माध्यम असेल.

अभ्यासक्रम

मराठी - व्याकरण , सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
इंग्रजी - स्पेलिंग , व्याकरण , सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
सामान्यज्ञान - दैनंदिन घटना , नेहमीचे अनुभव , धर्म , साहित्य , राजकारण , शास्त्र , सामाजिक व औद्योगिक सुधारणा , क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये , सर्वसाधारणपणे , भारताच्या विशेष करुन महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न.
बुध्दिमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो , हे आजमावण्यासाठी प्रश्न.
अंकगणित - बेरीज , वजाबाकी , गुणाकार , भागाकार , दशांश अपूर्णांक , सरासरी व टक्केवारी.
क्लार्क व टायपिस्ट पदांसाठीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते. यासाठी महाराष्ट्रातील शासकीय परीक्षा मंडळाची टायपिंग परीक्षा पास असणं आवश्यक असतं. नुसतंच टायपिंग येऊन उपयोग नाही.

सौजन्य -महाराष्ट्र टाईम्स 

न्यूयॉर्कमध्ये शिका 'एक्टिंग'


करियर

बहुतांश तरूण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक क्षेत्रात करियर करण्याचे ठरवितात.काहीनी तर स्वत:भोवती एक ठराविक चौकटच आखून घेतलेली असते. ती चौकट ओलांडायची नाही, असा त्याचा पालकांचा आग्रह असतो. मग विद्यार्थी ही चौकट पार करणार तरी कसे? अशा गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. आताचा काळ बदलला आहे आणि पालकही. तरूणांसह त्यांचे पालकही आता बिंधास्त झाले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना करियर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य द‍िले असल्याने काही होतकरू तरूण शिक्षण घेत असतानाच करियरची दिशा ठरवित असताना दिसतात.

न्यूयॉर्क फिल्म अकादमी अर्थात 'स्कूल ऑफ फिल्म अ‍ॅण्ड एक्टिंग' ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्था मानली जाते. येथे फिल्म मेकिंग, प्रोड्यूसिंग, स्क्रीप्ट राइटिंग, डिजिटल फिल्म मेकिंग, कॉम्प्यूटर एनिमेशन व एक्टिंगचे उत्कृष्ट व एक्सलन्स कोर्सस ‍शिकविले जातात. विशेष म्हणजे न्यू ब्रॉन्ड रेड हाईडिफिनिशन व्हिडिओ कॅमरा येथील विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकासाठी हाताळण्यासाठी उपलब्ध करून देणारी ही एकमेव संस्था आहे. प्रत‍िवर्षी येथे जगातील सहा हजार विद्यार्थी एक्टिंग, डिरेक्शन इंटरटेनमेंटचे प्रशिक्षण घेत असतात.

ओवन क्लिने, मॅक्स स्पीलबर्ग, बेविन प्रिंस, रोज (लोनली गर्ल 15), पॉल डॅनो, इमरान खान सारखा हॉलिवूड व बॉलिवूडमधील स्टार न्यूयॉर्क अकादमीचे स्टूडेंट राहिले आहेत. एवढेच नव्हेतर 2008 चा मिस यूनिव्हर्स हा पुरस्कार प्राप्त करणारी डायना मेंडोजा ही देखील याच अकादमीची विद्यार्थिनी होती. 

लर्निंग बाय डूइंग मेथड: 
न्यूयॉर्क अकादमीमधील प्रशिक्षण प्रामुख्याने 'लर्निंग बाय डूइंग मेथड'वर आधारित असते. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित विशेषज्ज्ञ व सिनेअभ‍िनेत्यांसोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असते. विद्यार्थ्यांची अभिरूची लक्षात घेऊन त्यांना तशी नोकरीही उपलब्ध करून दिल्या जाते. 'करा आणि शिका' या गुरूमंत्राच्या आधारे विद्यार्थींना येथे पहिल्या दिवसापासून फिल्म राइटिंग, शूटिंग, डिरेक्शन, प्रोडक्शन एडिटिंग आदी कामे करण्याची संधी म‍िळत असते. थेअरी पेक्षा येथे प्रात्याक्षिकावरच अधिक भर फिल्म स्कूलमध्ये दिला जात असतो. 

अकादमीचे विविध कोर्सेस:
फिल्म मेकिंग व एक्टिंग संबंधित येथे शार्ट टर्म कोर्सेसशिवाय एक व दोन वर्षाची कन्जर्वेंटरी व मास्टर ऑफ फाईन आर्टस् चे कोर्सेस शिकविले जातात. ते पुढील प्रमाणे...

डिग्री प्रोग्राम:
* एक व दोन वर्षीय कन्जर्वेटरी प्रोग्राम:
एक्टिंग, फिल्म मेकिंग, ब्रॉडकॉस्ट जर्नलिझम, थ्री डी एनिमेशन, म्यूझिकल थियेटर, प्रोड्यूसिंग फॉर फिल्म अ‍ॅण्ड टीव्ही, स्क्रीप्ट राइटिंग, डॉक्यूमेंट्री फिल्ममेकिंग, सिनेमॅटोग्राफी. 
* मास्टर इन फाईन आर्टस्:
फिल्म मेकिंग, स्क्रीन राइटिं, एक्टिंग.
* दोन वर्षीय असोसिएट्‍स इन फाईन आर्टस्:
फिल्म मेकिंग, एक्टिंग.

शॉर्ट टर्म प्रोग्राम्स:
* शॉर्ट टर्म हॅन्डस् ऑन इन्टेंसिव्ह वर्कशॉप अ‍ॅण्ड इव्हेनिंग क्लासेस.
* हायस्कूल अ‍ॅण्ड प्री टीन वर्कशॉप अ‍ॅण्ड समर कॅम्प. 

प्रतिष्ठित संस्थाद्वार पदवी मिळते:
दी न्यू स्कूल न्यूयॉर्क, सेंट जॉन्स यूनिव्हर्सिटी, फेअर‍लिन, डि‍किन्सन यूनिव्हर्सिटी न्यूजर्सी, चार्टर ओक स्टेट कॉलेज कनेक्टिकट, नोवा साऊथ ईस्टर्न यून‍िव्हर्सिटी फ्लोरिडा, लिन यूनिव्हर्सिटी फ्लोरिडा, अंटिऑक यूनिव्हर्सिटी लांस एंजिल्स आदी संस्थाद्वारा विद्यार्थ्यांना एनवायएफएच्या कोर्सेची पदवी ही प्रदान केली जात असते. 

विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्‍यासाठी टिक्स स्कूल ऑफ द आर्टस्, कोलंबिया यूनिव्हर्सिटी, अमेरिकन फिल्म इंस्टिट्यूट कन्जर्वेटरी, यूनिव्हर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्निंया, स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटी, हावर्ड यूनिव्हर्सिटी, येल यूनिव्हर्सिटी व यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लांस एंजिल्स येथील विशेषज्ज्ञांना आमंत्रित केले जाते.

जानेवारी, मार्च, जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सत्र सुरू केले जातात. न्यूयार्क फिल्म अकादमीत प्रवेश मिळविल्यानंतर मागासवर्गिय भागातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली जाते.

'
एकिंग' शिकविणार्‍या अमेरिकेतील विविध संस्था:
* यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निंया.
* यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लांस एंजिल्स.
* अमेरिकन फिल्म इंस्टिट्यूट कन्जर्वेटरी.
* कॅलिफोर्निंया इंस्टिट्यूट ऑफ दी आर्टस्.
* कोलंबिया यूनिव्हर्सिटी.
* स्कूल ऑफ दी आर्टस् ऑफ शिकागो.
* फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटी.
* नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटी


http://www.mumbaimantra.com/
http://www.imapictures.com/index.php

MPSC Rajyaseva 2011 – Final Result


Hi Friends,
MPSC has declared final result of Rajyaseva 2011.
Congratulations to those who made it to the successful list!!!
Here are the complete details of those candidates:
http://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva/results/final-result-rajyaseva-2011/
Good luck to unlucky candidates who couldn’t make it to the final list.
Don’t worry dear, you can still make to the successful candidates’ list of 2012, 2013.

By - AnilMD