बहुतांश तरूण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक क्षेत्रात करियर करण्याचे ठरवितात.काहीनी तर स्वत:भोवती एक ठराविक चौकटच आखून घेतलेली असते. ती चौकट ओलांडायची नाही, असा त्याचा पालकांचा आग्रह असतो. मग विद्यार्थी ही चौकट पार करणार तरी कसे? अशा गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. आताचा काळ बदलला आहे आणि पालकही. तरूणांसह त्यांचे पालकही आता बिंधास्त झाले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना करियर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याने काही होतकरू तरूण शिक्षण घेत असतानाच करियरची दिशा ठरवित असताना दिसतात.
न्यूयॉर्क फिल्म अकादमी अर्थात 'स्कूल ऑफ फिल्म अॅण्ड एक्टिंग' ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्था मानली जाते. येथे फिल्म मेकिंग, प्रोड्यूसिंग, स्क्रीप्ट राइटिंग, डिजिटल फिल्म मेकिंग, कॉम्प्यूटर एनिमेशन व एक्टिंगचे उत्कृष्ट व एक्सलन्स कोर्सस शिकविले जातात. विशेष म्हणजे न्यू ब्रॉन्ड रेड हाईडिफिनिशन व्हिडिओ कॅमरा येथील विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकासाठी हाताळण्यासाठी उपलब्ध करून देणारी ही एकमेव संस्था आहे. प्रतिवर्षी येथे जगातील सहा हजार विद्यार्थी एक्टिंग, डिरेक्शन इंटरटेनमेंटचे प्रशिक्षण घेत असतात.
ओवन क्लिने, मॅक्स स्पीलबर्ग, बेविन प्रिंस, रोज (लोनली गर्ल 15), पॉल डॅनो, इमरान खान सारखा हॉलिवूड व बॉलिवूडमधील स्टार न्यूयॉर्क अकादमीचे स्टूडेंट राहिले आहेत. एवढेच नव्हेतर 2008 चा मिस यूनिव्हर्स हा पुरस्कार प्राप्त करणारी डायना मेंडोजा ही देखील याच अकादमीची विद्यार्थिनी होती.
लर्निंग बाय डूइंग मेथड:
न्यूयॉर्क अकादमीमधील प्रशिक्षण प्रामुख्याने 'लर्निंग बाय डूइंग मेथड'वर आधारित असते. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित विशेषज्ज्ञ व सिनेअभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असते. विद्यार्थ्यांची अभिरूची लक्षात घेऊन त्यांना तशी नोकरीही उपलब्ध करून दिल्या जाते. 'करा आणि शिका' या गुरूमंत्राच्या आधारे विद्यार्थींना येथे पहिल्या दिवसापासून फिल्म राइटिंग, शूटिंग, डिरेक्शन, प्रोडक्शन एडिटिंग आदी कामे करण्याची संधी मिळत असते. थेअरी पेक्षा येथे प्रात्याक्षिकावरच अधिक भर फिल्म स्कूलमध्ये दिला जात असतो.
अकादमीचे विविध कोर्सेस:
फिल्म मेकिंग व एक्टिंग संबंधित येथे शार्ट टर्म कोर्सेसशिवाय एक व दोन वर्षाची कन्जर्वेंटरी व मास्टर ऑफ फाईन आर्टस् चे कोर्सेस शिकविले जातात. ते पुढील प्रमाणे...
डिग्री प्रोग्राम:
* एक व दोन वर्षीय कन्जर्वेटरी प्रोग्राम:
एक्टिंग, फिल्म मेकिंग, ब्रॉडकॉस्ट जर्नलिझम, थ्री डी एनिमेशन, म्यूझिकल थियेटर, प्रोड्यूसिंग फॉर फिल्म अॅण्ड टीव्ही, स्क्रीप्ट राइटिंग, डॉक्यूमेंट्री फिल्ममेकिंग, सिनेमॅटोग्राफी.
* मास्टर इन फाईन आर्टस्:
फिल्म मेकिंग, स्क्रीन राइटिं, एक्टिंग.
* दोन वर्षीय असोसिएट्स इन फाईन आर्टस्:
फिल्म मेकिंग, एक्टिंग.
शॉर्ट टर्म प्रोग्राम्स:
* शॉर्ट टर्म हॅन्डस् ऑन इन्टेंसिव्ह वर्कशॉप अॅण्ड इव्हेनिंग क्लासेस.
* हायस्कूल अॅण्ड प्री टीन वर्कशॉप अॅण्ड समर कॅम्प.
प्रतिष्ठित संस्थाद्वार पदवी मिळते:
दी न्यू स्कूल न्यूयॉर्क, सेंट जॉन्स यूनिव्हर्सिटी, फेअरलिन, डिकिन्सन यूनिव्हर्सिटी न्यूजर्सी, चार्टर ओक स्टेट कॉलेज कनेक्टिकट, नोवा साऊथ ईस्टर्न यूनिव्हर्सिटी फ्लोरिडा, लिन यूनिव्हर्सिटी फ्लोरिडा, अंटिऑक यूनिव्हर्सिटी लांस एंजिल्स आदी संस्थाद्वारा विद्यार्थ्यांना एनवायएफएच्या कोर्सेची पदवी ही प्रदान केली जात असते.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्यासाठी टिक्स स्कूल ऑफ द आर्टस्, कोलंबिया यूनिव्हर्सिटी, अमेरिकन फिल्म इंस्टिट्यूट कन्जर्वेटरी, यूनिव्हर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्निंया, स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटी, हावर्ड यूनिव्हर्सिटी, येल यूनिव्हर्सिटी व यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लांस एंजिल्स येथील विशेषज्ज्ञांना आमंत्रित केले जाते.
जानेवारी, मार्च, जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सत्र सुरू केले जातात. न्यूयार्क फिल्म अकादमीत प्रवेश मिळविल्यानंतर मागासवर्गिय भागातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली जाते.
'एकिंग' शिकविणार्या अमेरिकेतील विविध संस्था:
* यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निंया.
* यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लांस एंजिल्स.
* अमेरिकन फिल्म इंस्टिट्यूट कन्जर्वेटरी.
* कॅलिफोर्निंया इंस्टिट्यूट ऑफ दी आर्टस्.
* कोलंबिया यूनिव्हर्सिटी.
* स्कूल ऑफ दी आर्टस् ऑफ शिकागो.
* फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटी.
* नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटी
http://www.mumbaimantra.com/
http://www.imapictures.com/index.php