तुमचे व्यक्तिमत्व जितके विकसित तितका तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. कोणतेही काम करताना तुमचे त्या कामातून झळकणारे व्यक्तीमत्वच तुमची खरी ओळख असते. त्यामुळे आजकाल व्यक्तिमत्व विकासासाठी स्पेशल कोर्सही लावले जातात. या माध्यमातून तुम्हाला एक नवीन दृष्टीकोन मिळत असतो.
तुम्ही जेव्हा तुमचे शिक्षण पुर्ण करून नोकरी शोधण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला याची जाणीव होते, की इतरांच्या मानाने तुम्ही केवळ तुमच्या नकारात्मक व्यक्तिमत्त्वामुळे मागे पडलात. मग दु:ख करण्यात तुम्ही तुमचे पुढचे आयुष्यही बरबाद करता. त्यापेक्षा नोकरीवर जाण्यापूर्वीच काही गोष्टींची माहिती तुम्हाला होणे गरजेचे आहे.
संपूर्ण माहिती घ्या:
ज्या कंपनीत तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला असेल त्या कंपनीची माहिती आधी जमा करा. त्या कंपनीचा अभ्यास करा. त्या कंपनीचा इतिहास, तिची होणारी वाढ आणि हो नुकसानही कंपनीच्या वरिष्ठांना सांगाल म्हणजे तुम्ही कंपनीचा केलेला अभ्यास त्यांना जाणवेल. तुमच्या आवाजात कोणताही आक्रमकपणा जाणवू देऊ नका. वायफळ बडबड टाळा. एका वाक्यात मुळीच उत्तरे देऊ नका.
अधिकार्याने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर प्रामाणिकपणे ते कबूल करा. उगाच खोटे उत्तर द्याल तर अडकाल.
कंपनीच्या कोणत्याही अधिकार्याला ओळखत असाल तरी त्याचे नाव सारखे सारखे इंटव्ह्यूमध्ये सांगू नका. अशाने अधिकार्यांचे तुमच्याबद्दलचे मत खराब होईल.
काही टेबल प्रोटोकॉल पाळा. तुमच्यासाठी चहा आणला असेल तरी तुम्ही अधिकार्यांनी तो चहा घेण्यापूर्वी पिण्याची घाई करु नका. कंपनीच्या आगामी दिशेविषयीच्या तुमच्या काही कल्पना असतील तर त्या अधिकार्यांना नुसत्या सांगूच नका तर त्यांना त्या पटवून देण्याचा प्रयत्न करा.
या बाबींकडे प्रकर्षाने लक्ष द्या:
1. तुमचे पाय सरळ ठेवा. तुम्ही पाय जर विळखा घातल्यासारखे ठेवले तर याचा अर्थ असा होतो, की तुम्ही नकारात्मक विचार करत आहात आणि तुम्हाला भीती वाटत आहे.
2. इंटरव्ह्यू घेणार्या अधिकार्याच्या डोळ्यात डोळे घालून बोला. तुम्ही जर असे केले तर तुमचा आत्मविश्वास त्यातून दिसून येईल आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी खर्या आहेत हे पटेल.
3. तुमच्या खाद्यांना जरासेच पुढच्या बाजुने झुकवत समोरच्या वक्तीशी संवाद साधा. याचा अर्थ असा होतो की तुमचे मन साफ आहे. हो पण जास्त पुढे झुकु नका. त्याने तुम्ही समोरच्याची खुशमस्करी करत असल्याचे दिसून येते.
4. समोरची व्यक्ती किंवा अधिकारी तुम्हाला काही सुचना करत असतील तर त्यांचे वाक्य पुन्हा बोलू नका. तो त्यांचा अपमान समजला जातो. तुम्ही केवळ मानेने होकार देऊ शकता.
5 चेहर्यावर तेज दिसण्यासाठी त्या दिवशी मनात सकारात्मक विचार करा.
6 उनाडपणा करणे टाळा.
या काही महत्वाच्या टिप्स पाळाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.