एचआरमध्ये करीयरची संधी


कोणत्याही क्षेत्रात आपल्याला चांगले करिअर करायचे असेल तर त्यासाठी चांगली नोकरी मिळवणे आवश्यक आहे.परंतु, चांगली नोकरी मिळविणे एवढे सोपे नाही. 

मनुष्यबळ विकास विभागात मोबदला, कामाचे स्वरूप, मनुष्‍यबळ विकास नितीमूल्ये, कर्मचारी कल्याण, करिअर प्रोग्रेस इत्यादी बाबी हाताळाव्या लागतात. या विभागावर अनेक प्रकारच्या जबाबदार्‍या असतात. 
एचआर करिअर संधी
कोणत्याही संस्थेकडे (कंपनीकडे) मनुष्यबळ असल्यास ती संस्था प्रतिभावंताची खाण असते. त्या कंपनीसाठी मनुष्यबळ विकास विभाग एका तिजोरीप्रमाणे असते. कर्मचार्‍यांचा विकास, त्यांचे प्रशिक्षण आणि कौशल्य जाणून घ्यायचे काम या विभागाकडे असते. कर्मचार्‍यांच्या विकासाद्वारे कंपनीच्या संघटनात्मक विकासाचे लक्ष्य पूर्ण करण्याची जबाबदारी मनुष्यबळ विकास विभागावर असते.

मनुष्यबळ विभागाचे मुख्य कार्ये म्हणजे, नोकर भरती, त्यांना योग्य प्रशिक्षण, व्यवस्थापन, बदल, पर्क्स, पदोन्नती इत्यादी अनेक प्रकारची कामे करावी लागतात. 

मनुष्यबळ विकास विभागाची मदत
नियोजन, मसुदा तयार करणे आणि कंपनीच्‍या नीतीमूल्यांची जोपासना, नोकर भरती, पदोन्नत‍ी, नियम व प्रक्रियांचे पालन करण्यात होते.
प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करणे, रिफ्रेशर किंवा प्रशिक्षण कार्यक्रम, विकास व सेमिनार आयोजनाच्या योजना तयार करणे. 

कर्मचार्‍यांचा शोध आणि त्यांचे समाधान, चांगल्या कर्मचार्‍यांचा करार, त्यांचे प्रशिक्षण आणि इतर कार्यक्रमांची आखणी करण्याचे काम मनुष्यबळ विकास विभागाचे असते. आपला कर्मचारी चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करून कंपनीच्या उत्पदनात वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यवस्थापकीय कामे देखील या विभागामार्फत केले जातात. 

थोडक्यात, मनुष्यबळ विकास विभाग कोणत्याही संस्थेसाठी महत्त्वाचा आहे. या विभागाची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे कर्मचार्‍यांना खुश ठेवणे, कंपनीची उत्पादकता वाढविणे. उदाहरणार्थ. लवचिकता, ईएसपीओ, पक्र्स, कार्यक्षमतेनुसार पगार, कर्मचार्‍यांसाठी व्यक्तीगत प्रशिक्षण, 360 अंशाच्या कोनात मंजूरी आणि उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न मनुष्यबळ विकास विभागामार्फत केला जातो.

फेसबुकवर चॅटिंग करताय तर सावध राहा



जर तुम्ही फेसबुकवर चॅटिंग करताय तर सावध राहा.  कारण एक नवा कॉम्प्युटर व्हायरस फेसबुक चॅट मेसेंजरद्वारे पसरत चालला आहे. हा व्हायरस तुमच्या संगणकातील अँटिव्हायरसवर हल्ला करून संगणक निष्क्रिय करून टाकतो आहे. शिवाय तुमच्या मित्रांना लिंक पाठवतो आहे. 

इंटरनेट सिक्युरिटी एक्सपर्ट्सनी ग्रुप ट्रेंड मायक्रो यांनी steckt.Evl नावाचा हा नवा व्हायरस शोधून काढला आहे. हा व्हायरस फेसबुक चॅटमुळे पसरत चालल्याचा दावा आहे. तो संगणकाला लक्ष्य करतो आहे. हा चॅटच्या वेळी तुमच्या मित्राकडून आलेल्या संदेशाच्या रूपात दिसतो. संदेशात लिंक असते. त्याला क्लिक केल्यास तो तुमच्या प्रोफाइलमधून इतर मित्रांना जातो. 

संगणकात घुसताच तो अँटिव्हायरसवर हल्ला चढवतो. तो निष्क्रिय होतो. टेंड्र मायक्रो यांनी सांगितले, हा व्हायरस सध्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरून इन्स्टंट मेसेज या अ‍ॅप्लिकेशनद्वारे पसरत चालला आहे. या व्हायरसमुळे तुमच्या संगणकातील सुरक्षित केलेली खासगी माहिती चोरली जाऊ शकते. 


मित्रानो , धोक्याची सूचना - काळजीपूर्वक वाचा.
आज सकाळ पासून verify your account
हि सूचना (notification / application request)
फेसबुक वर येत आहे. या सूचनेवर कोणीही क्लिक करू नका.
verify your account हा एक व्हायरस आहे.,
सूचना पाठवणारा आपला कितीही जवळचा मित्र
असला तरीही त्यावर विश्वास ठेऊ नका. कारण तुमची प्रोफिले
या मुळे बंद होऊ शकते.
ज्यांनी कोणी Verify you Account वर क्लिक केली असेल,
त्यांनी
१) सर्वप्रथम पासवर्ड बदला.
२) Account Setting मध्ये जा. तिथे Applications
निवडा आणि
त्यातून ते ऍप्लिकेशन डिलीट करा
आपली प्रोफाईल सुरक्षित राहील.

सूचना -
हि माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत
पोहोचवण्यासाठी सर्वांनी शेअर करा !! धन्यवाद

So…you…think…you…can…clear…Prelims?


मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांची विकेट उडाली असेल राज्यसेवेची प्रिलिम्स देतांना, होय ना?
सर्वच जण म्हणताहेत कि पेपर फारच कठीण होता, बरोबर ना?
चूक, अगदी चूक. का?… जाणून घ्यायचं? तर पुढे वाचा.
ज्यांनी आमची राज्यसेवेची प्रिलिम्स साठी झालेली “टेस्ट सिरीज” दिली त्यांना माहित आहेच कि कसल्या प्रकारचे प्रश्न अपेक्षित होते. मला अगोदरच माहित होत कि आता मुख्य परोक्षेसाठी “ओब्जेक्टीव्ह” पटर्ण झाला आहे तर पेपर्स नक्कीच किचकट करून टाकेल एम. पी.एस.सी. म्हणून त्याच धर्तीवर आम्ही ”टेस्ट सिरीज” प्लान केली होती. तेव्हासुद्धा बऱ्याच जणांची विकेट उडाली होती.
मित्रांनो, पेपर फारच कठीण नव्हता! तुमची तयारीच त्या लेवल ची नव्हती!
आता पर्यंत जे सिरिअस नव्हते त्यांनी मात्र जमेल त्या २ ते ४ पुस्तकातून अभ्यास केला आणि परीक्षा दिली परंतु तसे न करता ज्यांनी १५ ते २० पुस्तकातून अभ्यास केला त्यांचा स्कोर नक्कीच १०० च्या पुढे असेल.
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठीच काय तर मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आता तुम्हाला विस्तृत (extensive) पणे अभ्यास करावा लागेल. कारण जो पर्यंत खोलवर वाचन करीत नाही तो पर्यंत मुख्य मुद्दे आणि concept कळणारच नाही. खोलवर वाचन करूनच चालणार नाही तर त्यावर मनन सुद्धा करावे लागेल. आणि मनन करूनच चालणार नाही तर त्यावर प्रश्न कसे येतील ह्यावर वेळ घालवावा लागेल. जो अभ्यास केला त्यावर काय प्रश्न येवू शकतील हे प्रत्यक्षात करून पाहावे लागेल आणि सकारात्मकच नव्हे तर नकारात्मक प्रश्न सुद्धा तयार करावे लागतील. प्रत्येक मुद्द्याचा सखोल अभ्यास करूनच हे जमेल. जो करणार नाही तो क्लियर होणार नाही हे नक्कीच!!! त्यामुळे ज्यांची तयारी हे सर्व करायची आहे त्यांनीच पुढे जावे अन्यथा वेळ वाया घालवून स्वत:चं जींवन अंधारात फेकू नका.
मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण आमचा पी.जी.पी. (पर्सनल गायडंस प्रोग्राम) काय आहे त्यात काय आहे हे बघत आले पण” फी जास्त आहे” असे म्हणून जॉईन व्हायचं टाळत आले. तर मित्रांनो, मला हे सर्व (कसल्या प्रकारचे प्रश्न अपेक्षित होते) आधीच माहित असल्यामुळे मी त्यासाठीच पी.जी.पी. त्याच पद्धतीने तयार केला होता. संपूर्ण भारतात एकही अकादमी नाही जी इतक सगळ साहित्य तुम्हास तुमच्या घरी देत असेल, नाही, कोणतीच नाही पण फक्त आमची “‘AD’s IAS Academy” देते. कारण ज्या पद्धतीने जसा अभ्यास करायचा त्याच पद्धतीने त्यासाठी अभ्यासाचं साहित्य सुद्धा लागते.
तर मित्रांनो, आता जे झालं ते झालं….आता तशी चूक करू नका. जमेल तितका अभ्यासच साहित्य जुळवा आणि वर सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला लागा. उगीच “cut -off काय असेल” ह्याची चिंता करू नका. रिझल्टची वाट जो पाहिलं त्याला २०१२ ची नाही तर २०१३ चीच परीक्षा द्यावी लागेल कारण रिझल्ट नंतर अभ्यासाला वेळ कुठे मिळेल?

By - AnilMD

अकरावी प्रवेशाचे मार्गदर्शन



 
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत चा व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी 
 https://www.facebook.com/groups/271488426292523/ या संकेतस्थळावर जा
तुम्हाला तीतूनच व्हिडिओ डाऊनलोड करता येईल.

कधी नेट चालत नाही तर कधी पासवर्ड आठवत नाही. एकूणच अकरावीच्या ऑनलाइन अॅडमिशन प्रक्रियेबद्दल पालकांच्या आणि मुलांच्या मनात अनेक शंका असतात. त्याचंच निरसन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने ठाण्याच्या टिप टॉप प्लाझामध्ये एक सेमिनार आयोजित केलं होतं. यावेळी दिलेल्या काही टिप्स. 

अकारावीच्या प्रवेश प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे ऑनलाइन फॉर्म भरणं. अपुऱ्या माहितीमुळे या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. म्हणूनच महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या सेमिनारला विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी राज्यशासनाच्या ऑनलाइन प्रवेश कोअर कमिटीचे सदस्य प्रा. विक्रम करंदीकर आणि प्रा. रमेश देशपांडे यांनी मार्गर्शन केलं. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे अर्ज कसे भरायचे हे समजणं सोपं जावं यासाठी सेमिनारमध्ये थेट वेबसाइटवरून एका विद्यार्थीनीचा लॉगइन आयडी क्रिएट करून तिचा अर्ज भरेपर्यंतच्या सर्व प्रक्रियेचं लाइव्ह डेमोन्स्ट्रेशन करण्यात आलं. नेमक्या चुका कुठे होतात त्या कशा टाळायच्या आणि फॉर्मस कमीतकमी वेळात भरण्यासाठी काय काय करायचं याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. 

ऑनलाईन अर्ज भरताना ... 

ऑनलाईन अर्ज भरताना तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड हा लक्षात ठेवणे गरजेचं आहे. यासाठी आयडी आणि पासवर्ड याची डायरीत नोंद करुन ठेवावी. 

प्रवेश पुस्तिका घेताना आयडी आणि पासवर्ड दिला असला तरी तुम्हाला पासवर्ड बदलता येतो. तुमचं नाव जन्मतारीख असा पासवर्ड शक्यतो टाकू नये. पासवर्डमध्ये स्पेस टाकू नये. पासवर्ड विसरल्यास सिक्युरिटी प्रश्नाच्या आधारे तुम्हाला लॉगइन करणं शक्य होतं. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात राहील असंच ठेवा. 

पासवर्ड विसरल्यास शाळेच्या प्रिन्सिपलकडून तो रिकव्हर करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. मात्र लॉग इन आयडी विसरल्यास तुम्हाला नवीन फॉर्म घ्यावा लागेल. 

अर्ज अतिशय काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे. तुमचा सीटनंबर चुकू देऊ नका. चुकल्यास तुमचं आणि तो सीट नंबर असलेला विद्यार्थी या दोघांचाही नुकसान होईल. 

जात स्पोर्ट्स आणि माजी सैनिक कोट्यासाठी... 

जातीच्या आरक्षणाच्या कोट्यातून अर्ज केला असल्यास शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख किंवा जात प्रमाणपत्र दोनपैकी एक कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या कोट्यातून अप्लाय केल्यावर विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून यासंबंधीची कागदपत्रे प्रमाणीत करुन घ्यावीत. हीच पध्दत स्पोर्ट्स माजी सैनिक कोटा यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी वापरावी. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्टिफिकेट काळजीपूर्वक तपासून घ्यावीत. 

आयसीएसई आणि सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी 

आयसीएसई आणि सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मार्कही भरावे लागतील. तुम्ही ज्या शाळेतून परिक्षेसाठी बसला होता त्या शाळेतून तुमचं मार्कशीट प्रमाणीत करुन घ्यावं. तर मुंबईबाहेरील आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील कोणत्याही आयसीएसईच्या शाळेतून त्यांची मार्कशीट प्रमाणीत करुन घ्यावी. सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने मुंबईत चार सेंटर्स तयार केली असून त्यांनी या सेंटर्समधून मार्कशीट प्रमाणीत करुन घेणं अपेक्षीत आहे. बाहेरच्या राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी ते राहात असलेल्या ठिकाणाहून जवळच्या गायडन्स सेंटरमध्ये जाणं योग्य ठरेल. 

कॉलेज निवडताना 

कॉलेजचा प्राधान्यक्रम ठरवताना विद्यार्थ्यांना एमएमआर झोन आणि वॉर्ड असे तीन टप्पे देण्यात आले आहेत. हे तीन टप्पे मिळून विद्यार्थ्यांना किमान ३५ तर कमाल ६० कॉलेजचा पर्याय देणे आवश्यक आहे. यातील वॉर्डमध्ये कॉलेज निवडताना शाळेशी संलग्न असलेल्या ५ ज्युनिअर कॉलेजचा पर्याट देणं बंधनकारक आहे. काही कॉलेजेसमध्ये एडेड आणि अनएडेड असे दोन प्रकार असून यासाठी त्यांना कोडही वेगळे देण्यात आले आहे. कॉलेज निवडताना आधी एडेड आणि मग अनएडेडचा पर्याय निवडावा. बायफोकलसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचा पर्याय निवडताना त्या कॉलेजमध्ये बायफोकल आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. हे प्रवेश यंदा ऑफलाइन होणार आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यासाठी कॉलेजमध्ये जाऊन अर्ज भरावे लागतील. 

ऑनलाइन अर्ज भरताना सर्व माहिती भरा. एखादी माहिती नाही भरली तरी चालेेल असं करू नका. याचबरोबर तुम्हाला मिळणाऱ्या मार्कांच्या अंदाजावरून पुस्तकात देण्यात आलेल्या कटऑफ यादीनुसार तुम्हाला पाहिजे असलेल्या कॉलेजेसची प्रेफरन्स यादी तयार करून ठेवा. म्हणजे अर्ज भरताना वेळ वाचेल. 

प्रा. रमेश देशपांडे 

अर्ज भरण्यास आतापासूनच सुरूवात करा. निकाल लागेपर्यंत तुम्हाला बराच वेळ हातात असतो. त्या कालावधीत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ठेवा. यामुळे प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्यावेळी तुमचा वेळ वाचेल आणि धावपळही कमी होईल. कितीही अडचण आली तरी इतर कोणावर अवलंबून न राहता तुमच्या जवळच्या मार्गदर्शन केंद्रावर जा म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल. 

प्रा. विक्रम करंदीकर 

विद्यार्थ्यांचे प्रश्न- 

सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज शाळेव्दारेच भरणे आवश्यक आहे का 

उत्तर - शाळेव्दारे फॉर्म भरणे बंधनकारक नसले तरी तसा फॉर्म भरल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील शंकाचे निरसन होईल आणि फॉर्ममध्ये चुका टाळता येतील. 

स्पोर्ट्स कोट्याच्या परवानगीसाठी काय करावं लागतं 

उत्तर यासाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेल्या मागदर्शक पुस्तिकेतील नमुना प्रमाणपत्रावर सक्षम अधिकाऱ्यांची सही आणणं आवश्यक असतं. हे सक्षम अधिकारी कोण याची यादी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर देण्यात आली आहे
(हि माहिती महाराष्ट्र  taimes  मध्ये प्रसिद्ध झाली आहे )

फोटोग्राफी एक उज्ज्वल करियर




फोटोग्राफी ही एक कला आहे. छायाचित्रकाला एक चांगली दृष्टी असावी लागते, असे म्हटले जाते. तसेच त्याने या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानही अवगत करणे आवश्यक असते. मात्र फोटोग्राफी हे एकमेव माध्यम आहे की त्यात भाषेची आवश्यकता नसते. या क्षेत्रात शब्दापेक्षा प्रतिमेचा अधिक प्रभाव पडत असतो. एक छायाचित्रे दहा हजार शब्दांची गरज भागवते. फोटोग्राफी ही अशी कला आहे की त्यात आपल्याला उज्ज्वल करियर करण्‍याची संधी आहे.

एक यशस्वी छायाचित्रकार बनण्यासाठी आपल्याकडे वास्तविक सौंदर्य पाहण्याची दृष्टी व तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. आपले नाजूक डोळे कुठल्याही वस्तुचे छायचित्र व्हिज्यूलाईज करू शकतात. वरील सगळे गुण आपल्यात असून फोटोग्राफीमध्ये करियर करायची इच्छा आहे तर या क्षेत्रातील सगळी कवाडं आपल्यासाठी खूली आहेत... 

आवश्यक पात्रता-
फोटोग्राफी हे एक क्रिएटीव्ह माध्यम असल्याने त्यासाठी विशेष पात्रतेची आवश्यकता नसते. आपली दृष्टी एखाद्या कविसारखी पाहिजे. 'जे ना देखे रवी... ते पाहे कवी !' असे म्हटले जाते. कवीकडे ज्याप्रमाणे नवीन पाहण्याची दृष्टी असते, त्याप्रमाणे छायाचित्रकाराची दृष्टी असायला पाहिजे. 
फोटोग्राफीच्या प्रशिक्षणासाठी आपली शैक्षणिक पात्रता १०+२ असली पाहिजे. तसे पाहिले तर शाळेत विद्यार्थ्याना एक्स्ट्रा एक्टिव्हीटी म्हणून फोटोग्राफी शिकवली जाते. देशात फोटोग्राफीचा अभ्यासक्रम शिकवणार्‍या अनेक संस्था असून त्यात फोटोग्राफीतील पदवी, डिप्लोमा किंवा सर्टीफिकेट कोर्स उपलब्ध आहेत. फोटोग्राफीच्या अंगी कल्पनाशक्ती हा महत्त्वाचा गुण असतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याचा प्रात्याक्षिकाचे ज्ञानावर अधिक भर असतो. 

जाहिरात, पत्रकारीता व फॅशनसोबत मॉडेलींग क्षेत्रात फोटॉग्राफीचे क्षेत्र कमा‍लीचे विस्तारले आहे. त्यामुळे या क्षेत्रात होतकरू तरूणासाठी मोठ्या प्रमाणात करियरच्या संधी उपलब्ध आहेत. 

प्रेस फोटोग्राफर-
प्रेस फोटोग्राफरला 'फोटो जर्नलिस्ट' या नावाने ओळखले जाते. प्रेस फोटॉग्राफर स्थानिक व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र, मासिके तसेच वृत्तसंस्थेसाठी काम करत असतात. पत्रकाराप्रमाणे प्रेस फोटोग्राफरची ही प्रचंड धावपळ असते. कमी वेळात अधिक क्षण टिपण्यातच फोटोग्राफरचे कौशल्य असते. 

फीचर फोटोग्राफर-
एखादी कथा विविध छायाचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित करण्‍याची कला फीचर फोटोग्राफरच्या अंगी असते. फोटोग्राफरला संबंधित विषयाचे सखोल ज्ञान आवश्यक असते. छायाचि‍त्राच्या माध्यामतून विविध कथा, प्रसंग प्रेक्षकासमोर अथवा वाचकासमोर प्रसिद्ध केले जात असते. फीचर फोटोग्राफी क्षेत्रात विषय हे नेहमी बदलत असतात. वन्यजीवन, क्रीडा, यात्रा वृत्तांत, पर्यावरण यादी विषय असू शकतात. 

कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफर-
कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफरचे कार्य एका ठराविक कंपनी किंवा कारखान्यासाठी चालत असते. गृहपत्रिका, जाहिराती, यंत्राचे छायाचित्रे काढणे आदी कामे त्यांना करावी लागतात. आपल्या उत्पादनाविषयी आकर्षक छायाचित्राच्या माध्यामातून जनतेला माहिती करून देणे, हे कमर्शियल फोटॉग्राफरचे मुख्य कार्य असते. 

जाहिरात फोटॉग्राफर-
जाहिरात एजन्सी, मॉडेलिंग स्टुडिओमध्ये जाहिरात फोटोग्राफर नेमले जातात. बाजारात येणार्‍या नवीन उत्पादनाच्या लोकप्रियेतेमागे खरे कौशल्य जाहिरात फोटोग्राफरचे असते. त्यांचे कार्य सगळ्यात आव्हानात्मक असते. 

फॅशन फोटॉग्राफर-


फोटोग्राफी क्षेत्रात फॅशन फोटॉग्राफीची मोठी क्रेझ आहे. फॅशन क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. स्मार्ट वर्क आणि चांगली मिळकत तसेच स्वत:चे नाव होण्यासाठी तरूण-तरूणी मोठ्या संख्येने 'फॅशन फोटोग्राफी' हे क्षे‍त्र करियर म्हणून निवडतात. मॉडेलिंगच्या क्षेत्रातील जाहिरात एजन्सी व फॅशन स्टुडिओमध्ये कुशल फोटॉग्राफरची नेहमी आवश्यकता भासत असते. फॅशन फोटॉग्राफरला मुंबई  दिल्ली सारख्या मोठ्या शहरातच जास्त कामे मिळत असतात. तसेच फॅशन हाउस, डिझायनर, फॅशन जर्नल्स, वर्तमानपत्रे, खाजगी वाहिनी येथेही फॅशन फोटॉग्राफरला संधी मिळत असते. 

याचप्रमाणे पोर्टेट किंवा वेडींग फोटॉग्राफी, नेचर व वाईल्डलाईफ फोटॉग्राफी, फॉरेंन्सिक फोटॉग्राफी, डिजिटल फोटॉग्राफी, फाईन आर्ट्स फोटॉग्राफी, ट्यूरिष्ट फोटोग्राफी या विविध प्रकारातही आपल्याला करियर करता येते

नोकरीसाठी जाताना....

 career


तुमचे व्यक्तिमत्व जितके विकसित तितका तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. कोणतेही काम करताना तुमचे त्या कामातून झळकणारे व्यक्तीमत्वच तुमची खरी ओळख असते. त्यामुळे आजकाल व्यक्तिमत्व विकासासाठी स्पेशल कोर्सही लावले जातात. या माध्यमातून तुम्हाला एक नवीन दृष्टीकोन मिळत असतो.

तुम्ही जेव्हा तुमचे शिक्षण पुर्ण करून नोकरी शोधण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला याची जाणीव होते, की इतरांच्या मानाने तुम्ही केवळ तुमच्या नकारात्मक व्यक्तिमत्त्वामुळे मागे पडलात. मग दु:ख करण्‍यात तुम्ही तुमचे पुढचे आयुष्यही बरबाद करता. त्यापेक्षा नोकरीवर जाण्यापूर्वीच काही गोष्टींची माहिती तुम्हाला होणे गरजेचे आहे. 

संपूर्ण माहिती घ्या: 
ज्या कंपनीत तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला असेल त्या कंपनीची माहिती आधी जमा करा. त्या कंपनीचा अभ्यास करा. त्या कंपनीचा इतिहास, तिची होणारी वाढ आणि हो नुकसानही कंपनीच्या वरिष्ठांना सांगाल म्हणजे तुम्ही कंपनीचा केलेला अभ्यास त्यांना जाणवेल. तुमच्या आवाजात कोणताही आक्रमकपणा जाणवू देऊ नका. वायफळ बडबड टाळा. एका वाक्यात मुळीच उत्तरे देऊ नका. 

अधिकार्‍याने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर प्रामाणिकपणे ते कबूल करा. उगाच खोटे उत्तर द्याल तर अडकाल. 
कंपनीच्या कोणत्याही अधिकार्‍याला ओळखत असाल तरी त्याचे नाव सारखे सारखे इंटव्ह्यूमध्ये सांगू नका. अशाने अधिकार्‍यांचे तुमच्याबद्दलचे मत खराब होईल. 
काही टेबल प्रोटोकॉल पाळा. तुमच्यासाठी चहा आणला असेल तरी तुम्ही अधिकार्‍यांनी तो चहा घेण्यापूर्वी पिण्याची घाई करु नका. कंपनीच्या आगामी दिशेविषयीच्या तुमच्या काही कल्पना असतील तर त्या अधिकार्‍यांना नुसत्या सांगूच नका तर त्यांना त्या पटवून देण्याचा प्रयत्न करा. 

या बाबींकडे प्रकर्षाने लक्ष द्या: 
1. तुमचे पाय सरळ ठेवा. तुम्ही पाय जर विळखा घातल्यासारखे ठेवले तर याचा अर्थ असा होतो, की तुम्ही नकारात्मक विचार करत आहात आणि तुम्हाला भीती वाटत आहे. 

2. इंटरव्ह्यू घेणार्‍या अधिकार्‍याच्या डोळ्यात डोळे घालून बोला. तुम्ही जर असे केले तर तुमचा आ‍त्मविश्वास त्यातून दिसून येईल आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी खर्‍या आहेत हे पटेल. 

3. तुमच्या खाद्यांना जरासेच पुढच्या बाजुने झुकवत समोरच्या वक्तीशी संवाद साधा. याचा अर्थ असा होतो की तुमचे मन साफ आहे. हो पण जास्त पुढे झुकु नका. त्याने तुम्ही समोरच्याची खुशमस्करी करत असल्याचे दिसून येते. 

4. समोरची व्यक्ती किंवा अधिकारी तुम्हाला काही सुचना करत असतील तर त्यांचे वाक्य पुन्हा बोलू नका. तो त्यांचा अपमान समजला जातो. तुम्ही केवळ मानेने होकार देऊ शकता. 

चेहर्‍यावर तेज दिसण्यासाठी त्या दिवशी मनात सकारात्मक विचार करा. 

उनाडपणा करणे टाळा. 

या काही महत्वाच्या टिप्स पाळाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. 

ऐकलेले वाक्य स्वत: बोलण्याचा सराव- 
सगळ्यात आधी संदर्भ दृश्यावरून बहुतेक गोष्टी कळून जातात. ऐकलेली लहान लहान वाक्ये आपण स्वत: तयार करून त्याची एक टिप्पणी तयार करून त्याचे पाठांतर करावे. टिप्पणीतील नावाच्या जागी आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे टाकून आपण स्वत: अधिक वाक्ये तयार करून ती लिहू, बोलू शकतो. इतर भाषांप्रमाणे इंग्रजी भाषा आधी बोलणे, त्यानंतर लिहिणे व मग वाचणे शिकले पाहिजे. 

आपल्या मित्र मंडळीत किंवा आपल्या भाऊ बहिणींशी बोलताना आपण इंग्रजीत बोलण्याचा सराव केला पाहिजे. सुरूवातीला बोलताना चुका होतील. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. 

भाषेतील शब्दसंपत्ती वाढवा- 
भाषा ही अक्षर, शब्द व वाक्यांनी बनली आहे. मात्र, अक्षरानी बनलेल्या शब्दाना व शब्दांपासून बनलेल्या वाक्यांच्या योग्य त्या समन्वयाने भाषा बनत असते. कुठल्याही शब्दाचे स्पेलिंग किंवा अर्थ पाठ करून घेणे पुरेसे नाही. तर त्याचा योग्य संदर्भासहीत वाक्यात उपयोगही करता आला पाहिजे. त्यामुळे इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्यासाठी शब्दकोष जवळ असणे आवश्यक आहे. 

काही शब्द चमत्कारीक असतात. त्यांचा अर्थ वाक्यानुरूप अथवा स्थळानुरूप बदलत असतो. त्यामुळे त्या शब्दाचे वाक्यात रूपांतर करणे आधी शिकले पाहिजे. शब्द भांडार वाढवल्याने भाषा शिकणे अधिक सोपे जाते.

व्याकरणाची मदत-
व्याकरण शिकल्यानंतरच भाषा शिकली जाते, असे नाही. लहानपणापासून बोलत असलेली मातृभाषा शिकताना कुठे आपण आधी व्याकरण शिकलो होतो. इंग्रजी भाषा परिपूर्ण शिकण्यासाठी व्याकरणाची मदत होत असते. इंग्रजी बोलताना आपण हळूहळू व्याकरणाचाही अभ्यास करता येऊ शकतो. 

ऐकणे व बोलणे शिकल्यानंतर लिहिणे-वाचणे शिकावे- 
भाषा ही मुख्यत: बोलण्यासाठी असते. परंतु, आपण ती ‍लिहिण्यासाठी व लिहिलेले वाचण्याची कला आत्मसात करून घेतली आहे. प्रत्येक भाषा बोलण्याचे एक विशिष्ट प्रकारचे तंत्र असते. त्याचप्रमाणे इंग्रजी शिकण्याचे तंत्र आहे. परंतु, इंग्रजी शिकत असताना मातृभाषाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी




आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे. करीयरचे सुनियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात. हे विद्यार्थ्यांच्या पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. 
दहावीनंतर विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. गुण चांगले आहेत, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडलेला असतो. पण त्यासाठी सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याला कुठल्या विषयात करीयर करायचे आहे, हे समजून घ्या. मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत? त्याचे मन त्या विषयात रमेल काय? याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे. त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे. 

पालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता अक्षरश: त्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माण होते व तो करीयरच्या पहिल्या पायरीवरच डगमगतो. 

कोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी स्वत:चा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत. साधारणपणे एप्रिल ते जून या महिन्याच्या कालावधीत या चाचण्या घेतल्या जातात.

करीयरची संधी- 
विविध प्रकारच्या कौशल्यात प्राविण्य मिळवलेल्यांची समाजाला गरज असते. या कौशल्याच्या जोरावर भरपूर पैसा व प्रतिष्ठा मिळवता येते. पालकांनी विद्यार्थ्यांना या बाबी सांगितल्या पाहिजेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना व्यवहारज्ञान तसे फारसे नसतेच. तसेच त्यांना अभ्यास एके अभ्यास या पलीकडे काय असते याची जाणीव नसते. त्यामुळे चांगल्या करीयरची निवड करताना ते गोंधळून जातात. या परिस्थितीत पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहाराच्या चार गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. त्याच्या चांगल्या करीयरच्या दृष्टीने आपल्या शहरात अथवा शहराबाहेर कुठल्या महाविद्यालयात कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात याची माहिती काढली पाहिजे. 

करीयरची नवी क्षितीजे-
जाहिरात शास्त्र, बॅकिंग, ब्युटिशियन, बिझनेस मॅनेजमेंट, सिरॅमिक्स, चार्टर्ड अकाऊंटन्सी, रसायन शास्त्र, सिव्हील सव्हिसेस, विमानतळ व्यवस्था, कंपनी सेक्रटरी, स्थापत्यशास्त्र, हवाई दल, भूदल, नौदल, अर्थशास्त्र, शिक्षणाशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, पत्रकारिता, इंजिनिअरिंग, प्रदूषण नियंत्रण, व्यापारशास्त्र, फॅशन डिझायनिंग, फॅशन जर्नालिझम, मॉडेलिंग, फिल्म बनवणे, फायनान्स मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, फार्मसी, नाट्यशास्त्र, जनसंपर्कशास्त्र, प्रकाशन व्यवस्था , लायब्ररी शास्त्र, कायदा, मानसशास्त्र, इव्हेन्ट मॅनेजमेंट, औद्योगिक प्रशिक्षण या सारख्या अनेक नव्या क्षेत्रात करीयरच्या संधी आहेत

ग्राफिक डिझायनिंग- उत्तम करियर



काही वर्षांपासून करियरच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. व्हिज्युअल व ग्राफिक आर्टचा आज सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. त्यामुळे तरुणांना ग्राफिक आर्टमध्ये करियरची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

ज्या तरुणांना चित्रकला, कॉम्प्युटर आर्टच्या संबंधित कार्यात काम करण्याची आवड असेल, अशा विद्यार्थ्यांना 'ग्राफिक डिझायनिंग' एक चांगला पर्याय आहे. कला व विज्ञान या दोन विषय एकत्र आल्याने 'ग्राफिक डिझायनिंग'चा जन्म झाला. गत चार-पाच वर्षात एनिमेशन क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. त्याच्याशी संबंधीत ग्राफिक डिझायनिंगमध्ये करियर करण्याचा कल विद्यार्थ्यांमध्ये वाढला आहे. विषयाचे महत्त्व व त्याची गरज लक्षात घेता ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश करत आहेत. 

ग्राफिक डिझायनिंग असते तरी काय - व्हिज्युअलच्या संबंधित येणाऱ्या समस्यांवरील तोडगा म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. त्यात टेक्स्ट व ग्राफिकल एलिमेंटचा प्रयोग केला जात असतो. याचे मुख्य कार्य म्हणजे पेज व इतर प्रोग्राम आकर्षक व सुंदर करणे होय. ग्राफिक डिझाइनच्या माध्यमातून तयार होणारे आर्ट हे टेक्स्ट व ग्राफिकद्वारा तयार करण्यात आलेला संदेश प्रभावीपणे नागरिकासमोर पोहचवला जात असतो. ग्राफिक्स, लोगों, ब्रोशर, न्यूज लेटर, पोस्टर या प्रकारात संदेश अधिक आकर्षक केला जात असतो. 

ग्राफिक डिझायनिंग हा विषय लहान मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध झाला आहे. डिप्लोमा, पदवी व पदवीतर कोर्स सुरू झाले आहेत. 
करियर विशेषज्ञांनुसार या क्षेत्रात करियर करण्यास मोठी संधी आहे. जाहिरात संस्था, पब्लिक रिलेशन, वृत्तपत्रे कार्यालय, मॅगझिन, टीव्ही, प्रिटींग प्रेस येथे आपल्या योग्यतेनुसार नोकरी मिळू शकते. दिल्ली  मुंबई अनेक पब्लिशिंग हाउसेस आहेत. तेथे ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते. आता तर इंटरनेटच्या माध्यमातून आपण घरच्या घरी ऑनलाईन कामे करता येऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक मीडियात ग्राफिक डिझायनरसाठी संधी उपलब्ध आहे. 

टीव्ही चॅनल तसेच इंटरनेट पोर्टलची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने या क्षेत्रात करियरची अनेक कवाडं खुली झाली आहेत. वृत्तपत्र कार्यालयात ग्राफिक डिझायनरला मोठी संधी असते. कारण वृत्तपत्राला दररोज नवा लुक द्यावा लागत असतो. त्याशिवाय स्टेशनरी 
प्रिटींग, इंटीरियर आर्किटेक्चर, प्रॉडक्ट पॅकेज डिझायनिंग, फिल्म, एनिमेशन आदी क्षेत्रात ग्राफिक डिझायनरसाठी मोठी संधी उपलब्ध असते.

गणपती विसर्जन पाण्यामध्येच का करतात ?


सर्व देव देवतांमध्ये गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. गणेशोत्सवानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करतात. असे करण्यामागे काय कारण आहे हे समजून घेऊ या...

गणपती हा बुद्धीचा देव आहे. माणसाची बुद्धी कुशाग्र असेल तर कामात अडचणी येत नाहीत. अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करता येते. हे विश्व पाच महाभूतांनी मिळून बनले आहे. या पाच तत्त्वांपैकी एक तत्त्व आहे जल. जलाचा अधिपती आहे गणपती. माणसाच्या मेंदूचा अधिकांश भाग तरल आहे, असे विज्ञानानेही मान्य केले आहे. त्यामुळेच गणपतीला बुद्धीची देवता मानण्यात येते व गणपतीचे विसर्जन पाण्यात करतात. गणपतीचा निवास पाण्यात असतो, अशी मान्यता आहे.

मनुष्याची उत्पत्तीही जलापासूनच झाली आहे. भगवंताचा पहिला अवतार मत्स्य अवतार आहे. हा अवतार पाण्यात जन्मास आला. त्यामुळे मानवी संस्कृतीत जलाला पूज्य स्थान आहे. भगवान गणपती जल तत्त्वाची अधिपती देवता आहे. त्यामुळे गणपतीला प्रथम पूज्य मानण्यात येते. गणपती विसर्जन पाण्यात करण्यामागेही हेच कारण आहे.
गणपती बाप्पाचे वाहन उंदीरमामाकडून शिका यशस्वी जीवनाचे फंडे

धर्म शास्त्रानुसार देवी-देवतांचे वेगवेगळे आणि विचित्र वाहन आहेत. साधारणपणे हे वाहन अंध:कार आणि अज्ञानाचे प्रतीक असतात आणि संबंधित देवता या शक्तींचे नियंत्रण करतात. गणपतीचे वाहन आहे मूषक अर्थात उंदीर. गणपतीचे वर्णन 'विशालकाय' या शब्दाने केले जाते. परंतु मूषक मात्र लघुकाय आहे. लाईफ मॅनेजमेंटचे अनेक फंडे आपल्याला हा उंदीरमामा सांगतो. या गोष्टी आत्मसात केल्यास आपले जीवन यशस्वी बनते.

उंदीर बिळात राहतो. आपल्याला बिळातील उंदीर दिसत नाही. ईश्वराचेही असेच आहे. तो सर्वत्र व्याप्त आहे, तरीही सहजगत्या दिसत नाही. मोह, माया, अज्ञान, अविद्या यामुळे आपण देवाला पाहू शकत नाही. त्यामुळे आपण अहंकाराचा त्याग करून परमात्म्याला समजून घ्यावे. त्याची उपासना करावी.

गणपती बाप्पा हे बुद्धी आणि ज्ञानदेवता आहेत. त्यांचे वाहन असलेला उंदीर कोणत्याही पदार्थाचे तुकडे-तुकडे करून टाकतो, त्यानुसार आपणही आपल्या बुद्धीच्या प्रभावाने जीवनातील समस्यांचे तुकडे-तुकडे अर्थात विश्लेषण केले पाहिजे. सत्य आणि ज्ञानापर्र्यंत पोहोचले पाहिजे. ज्या लोकांवर बाप्पांची कृपा असते त्यांना बुद्धी आणि ज्ञान मिळते.

बिळात लपून बसणारा अंध:कारप्रिय प्राणी म्हणजे उंदीर. अंधकार आणि नकारात्मक विचारांचा त्याग केल्यानंतरच माणसाच्या जीवनात यश प्राप्त होते.

उंदीर सदैव सतर्क आणि जागरूक असतो. आपणही कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. उंदीर अन्नधान्याचा शत्रू आहे. आपली संपत्ती, धान्य आदी सांभाळून ठेवण्यासाठी विनाशकारी जीवजंतुंवर नियंत्रण मिळविले पाहिजे. त्याचप्रकारे आपल्या जीवनात जे लोक हानी पोहोचवू शकतात, अशांवर नियंत्रण मिळविले पाहिजे. असे केल्यास जीवनातील समस्या दूर होऊन जीवन यशस्वी बनते