काही वर्षांपासून करियरच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. व्हिज्युअल व ग्राफिक आर्टचा आज सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. त्यामुळे तरुणांना ग्राफिक आर्टमध्ये करियरची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ज्या तरुणांना चित्रकला, कॉम्प्युटर आर्टच्या संबंधित कार्यात काम करण्याची आवड असेल, अशा विद्यार्थ्यांना 'ग्राफिक डिझायनिंग' एक चांगला पर्याय आहे. कला व विज्ञान या दोन विषय एकत्र आल्याने 'ग्राफिक डिझायनिंग'चा जन्म झाला. गत चार-पाच वर्षात एनिमेशन क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. त्याच्याशी संबंधीत ग्राफिक डिझायनिंगमध्ये करियर करण्याचा कल विद्यार्थ्यांमध्ये वाढला आहे. विषयाचे महत्त्व व त्याची गरज लक्षात घेता ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश करत आहेत. ग्राफिक डिझायनिंग असते तरी काय - व्हिज्युअलच्या संबंधित येणाऱ्या समस्यांवरील तोडगा म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. त्यात टेक्स्ट व ग्राफिकल एलिमेंटचा प्रयोग केला जात असतो. याचे मुख्य कार्य म्हणजे पेज व इतर प्रोग्राम आकर्षक व सुंदर करणे होय. ग्राफिक डिझाइनच्या माध्यमातून तयार होणारे आर्ट हे टेक्स्ट व ग्राफिकद्वारा तयार करण्यात आलेला संदेश प्रभावीपणे नागरिकासमोर पोहचवला जात असतो. ग्राफिक्स, लोगों, ब्रोशर, न्यूज लेटर, पोस्टर या प्रकारात संदेश अधिक आकर्षक केला जात असतो. ग्राफिक डिझायनिंग हा विषय लहान मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध झाला आहे. डिप्लोमा, पदवी व पदवीतर कोर्स सुरू झाले आहेत. करियर विशेषज्ञांनुसार या क्षेत्रात करियर करण्यास मोठी संधी आहे. जाहिरात संस्था, पब्लिक रिलेशन, वृत्तपत्रे कार्यालय, मॅगझिन, टीव्ही, प्रिटींग प्रेस येथे आपल्या योग्यतेनुसार नोकरी मिळू शकते. दिल्ली व मुंबई अनेक पब्लिशिंग हाउसेस आहेत. तेथे ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते. आता तर इंटरनेटच्या माध्यमातून आपण घरच्या घरी ऑनलाईन कामे करता येऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक मीडियात ग्राफिक डिझायनरसाठी संधी उपलब्ध आहे. टीव्ही चॅनल तसेच इंटरनेट पोर्टलची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने या क्षेत्रात करियरची अनेक कवाडं खुली झाली आहेत. वृत्तपत्र कार्यालयात ग्राफिक डिझायनरला मोठी संधी असते. कारण वृत्तपत्राला दररोज नवा लुक द्यावा लागत असतो. त्याशिवाय स्टेशनरी प्रिटींग, इंटीरियर आर्किटेक्चर, प्रॉडक्ट पॅकेज डिझायनिंग, फिल्म, एनिमेशन आदी क्षेत्रात ग्राफिक डिझायनरसाठी मोठी संधी उपलब्ध असते. |