अकरावी प्रवेशाचे मार्गदर्शन



 
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत चा व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी 
 https://www.facebook.com/groups/271488426292523/ या संकेतस्थळावर जा
तुम्हाला तीतूनच व्हिडिओ डाऊनलोड करता येईल.

कधी नेट चालत नाही तर कधी पासवर्ड आठवत नाही. एकूणच अकरावीच्या ऑनलाइन अॅडमिशन प्रक्रियेबद्दल पालकांच्या आणि मुलांच्या मनात अनेक शंका असतात. त्याचंच निरसन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने ठाण्याच्या टिप टॉप प्लाझामध्ये एक सेमिनार आयोजित केलं होतं. यावेळी दिलेल्या काही टिप्स. 

अकारावीच्या प्रवेश प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे ऑनलाइन फॉर्म भरणं. अपुऱ्या माहितीमुळे या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. म्हणूनच महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या सेमिनारला विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी राज्यशासनाच्या ऑनलाइन प्रवेश कोअर कमिटीचे सदस्य प्रा. विक्रम करंदीकर आणि प्रा. रमेश देशपांडे यांनी मार्गर्शन केलं. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे अर्ज कसे भरायचे हे समजणं सोपं जावं यासाठी सेमिनारमध्ये थेट वेबसाइटवरून एका विद्यार्थीनीचा लॉगइन आयडी क्रिएट करून तिचा अर्ज भरेपर्यंतच्या सर्व प्रक्रियेचं लाइव्ह डेमोन्स्ट्रेशन करण्यात आलं. नेमक्या चुका कुठे होतात त्या कशा टाळायच्या आणि फॉर्मस कमीतकमी वेळात भरण्यासाठी काय काय करायचं याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. 

ऑनलाईन अर्ज भरताना ... 

ऑनलाईन अर्ज भरताना तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड हा लक्षात ठेवणे गरजेचं आहे. यासाठी आयडी आणि पासवर्ड याची डायरीत नोंद करुन ठेवावी. 

प्रवेश पुस्तिका घेताना आयडी आणि पासवर्ड दिला असला तरी तुम्हाला पासवर्ड बदलता येतो. तुमचं नाव जन्मतारीख असा पासवर्ड शक्यतो टाकू नये. पासवर्डमध्ये स्पेस टाकू नये. पासवर्ड विसरल्यास सिक्युरिटी प्रश्नाच्या आधारे तुम्हाला लॉगइन करणं शक्य होतं. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात राहील असंच ठेवा. 

पासवर्ड विसरल्यास शाळेच्या प्रिन्सिपलकडून तो रिकव्हर करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. मात्र लॉग इन आयडी विसरल्यास तुम्हाला नवीन फॉर्म घ्यावा लागेल. 

अर्ज अतिशय काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे. तुमचा सीटनंबर चुकू देऊ नका. चुकल्यास तुमचं आणि तो सीट नंबर असलेला विद्यार्थी या दोघांचाही नुकसान होईल. 

जात स्पोर्ट्स आणि माजी सैनिक कोट्यासाठी... 

जातीच्या आरक्षणाच्या कोट्यातून अर्ज केला असल्यास शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख किंवा जात प्रमाणपत्र दोनपैकी एक कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या कोट्यातून अप्लाय केल्यावर विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून यासंबंधीची कागदपत्रे प्रमाणीत करुन घ्यावीत. हीच पध्दत स्पोर्ट्स माजी सैनिक कोटा यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी वापरावी. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्टिफिकेट काळजीपूर्वक तपासून घ्यावीत. 

आयसीएसई आणि सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी 

आयसीएसई आणि सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मार्कही भरावे लागतील. तुम्ही ज्या शाळेतून परिक्षेसाठी बसला होता त्या शाळेतून तुमचं मार्कशीट प्रमाणीत करुन घ्यावं. तर मुंबईबाहेरील आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील कोणत्याही आयसीएसईच्या शाळेतून त्यांची मार्कशीट प्रमाणीत करुन घ्यावी. सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने मुंबईत चार सेंटर्स तयार केली असून त्यांनी या सेंटर्समधून मार्कशीट प्रमाणीत करुन घेणं अपेक्षीत आहे. बाहेरच्या राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी ते राहात असलेल्या ठिकाणाहून जवळच्या गायडन्स सेंटरमध्ये जाणं योग्य ठरेल. 

कॉलेज निवडताना 

कॉलेजचा प्राधान्यक्रम ठरवताना विद्यार्थ्यांना एमएमआर झोन आणि वॉर्ड असे तीन टप्पे देण्यात आले आहेत. हे तीन टप्पे मिळून विद्यार्थ्यांना किमान ३५ तर कमाल ६० कॉलेजचा पर्याय देणे आवश्यक आहे. यातील वॉर्डमध्ये कॉलेज निवडताना शाळेशी संलग्न असलेल्या ५ ज्युनिअर कॉलेजचा पर्याट देणं बंधनकारक आहे. काही कॉलेजेसमध्ये एडेड आणि अनएडेड असे दोन प्रकार असून यासाठी त्यांना कोडही वेगळे देण्यात आले आहे. कॉलेज निवडताना आधी एडेड आणि मग अनएडेडचा पर्याय निवडावा. बायफोकलसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचा पर्याय निवडताना त्या कॉलेजमध्ये बायफोकल आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. हे प्रवेश यंदा ऑफलाइन होणार आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यासाठी कॉलेजमध्ये जाऊन अर्ज भरावे लागतील. 

ऑनलाइन अर्ज भरताना सर्व माहिती भरा. एखादी माहिती नाही भरली तरी चालेेल असं करू नका. याचबरोबर तुम्हाला मिळणाऱ्या मार्कांच्या अंदाजावरून पुस्तकात देण्यात आलेल्या कटऑफ यादीनुसार तुम्हाला पाहिजे असलेल्या कॉलेजेसची प्रेफरन्स यादी तयार करून ठेवा. म्हणजे अर्ज भरताना वेळ वाचेल. 

प्रा. रमेश देशपांडे 

अर्ज भरण्यास आतापासूनच सुरूवात करा. निकाल लागेपर्यंत तुम्हाला बराच वेळ हातात असतो. त्या कालावधीत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ठेवा. यामुळे प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्यावेळी तुमचा वेळ वाचेल आणि धावपळही कमी होईल. कितीही अडचण आली तरी इतर कोणावर अवलंबून न राहता तुमच्या जवळच्या मार्गदर्शन केंद्रावर जा म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल. 

प्रा. विक्रम करंदीकर 

विद्यार्थ्यांचे प्रश्न- 

सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज शाळेव्दारेच भरणे आवश्यक आहे का 

उत्तर - शाळेव्दारे फॉर्म भरणे बंधनकारक नसले तरी तसा फॉर्म भरल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील शंकाचे निरसन होईल आणि फॉर्ममध्ये चुका टाळता येतील. 

स्पोर्ट्स कोट्याच्या परवानगीसाठी काय करावं लागतं 

उत्तर यासाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेल्या मागदर्शक पुस्तिकेतील नमुना प्रमाणपत्रावर सक्षम अधिकाऱ्यांची सही आणणं आवश्यक असतं. हे सक्षम अधिकारी कोण याची यादी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर देण्यात आली आहे
(हि माहिती महाराष्ट्र  taimes  मध्ये प्रसिद्ध झाली आहे )