MPSC Rajyaseva Prelims – 18th May 2013
Paper I – 10:30 AM to 1 PM (actual exam starts 11AM)
Paper II – 2:30 PM to 5 PM (actual exam starts 3PM)
Hall Ticket – परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशप्रमाणपत्र समावेक्षकाकडे जमा करणे आवश्यक आहे .
उमेदवाराने सकाळी 10.30 व दुपारी 2.30 वाजता परीक्षा कक्षात हजर रहाणे आवश्यक आहे. सकाळी 10.30 ते 11.00 व दुपारी 2.30 ते 3.00 हा कालावधी हजेरी तपासणे, उत्तरपत्रिका देणे व सूचना देणे यासाठी राहील. परीक्षेचा कालावधी दोन तासाचा असेल व त्याप्रमाणे प्रत्यक्ष परीक्षा सकाळी 11.00 वाजता व दुपारी 3.00 वाजता सुरु होईल. सकाळी 11.00 व दुपारी 3.00 वाजल्यानंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षा कक्षात आणण्यास परवानगी असलेले साहित्य :- प्रवेशप्रमाणपत्र, काळया शाईचे बॉल पॉइंट पेन.
इतर कोणतेही साहित्य परीक्षा कक्षात स्वत:जवळ ठेवण्यास सक्त मनाई आहे.
प्रवेशप्रमाणपत्रावर तसेच परीक्षेच्यावेळी पुरविण्यात येणा-या उत्तरपत्रिकेवर व प्रश्नपुस्तिकेवर दिलेल्या सूचना अत्यंत काळजीपूर्वक वाचून त्यांचे अनुपालन करावे. केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक आदींकडून तसेच आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील.
परीक्षा सुरु झाल्यानंतर ते परीक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही उमेदवारास कोणत्याही कारणासाठी परीक्षा कक्षाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

परीक्षेच्यावेळी परिगणकासारख्या (CALCULATOR) कोणत्याही साधनांचा उपयोग करण्यास सक्त मनाई आहे. तसेच कोणतीही पुस्तके, वहया, बॅग्ज, अनाधिकृत वस्तू इ. साहित्य परीक्षा कक्षात स्वत:जवळ ठेवण्यास सक्त मनाई आहे.
डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल फोन इत्यादी सारखी दूरसंचार साधने परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास व स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना ते परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर शिस्तभंगविषयक कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरिता बंदी घालण्यात येईल.
परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरील नोंदी काळजीपूर्वक भराव्यात. हजेरीपटावर विहित जागेत उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपुस्तिकेचा छापील अनुक्रमांक लिहून शेवटच्या रकान्यात संपूर्ण स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. हजेरीपटावर केलेली स्वाक्षरी परीक्षेच्या अर्जावर व उत्तरपत्रिकेवर केलेल्या स्वाक्षरीशी जुळणारी असावी.
प्रश्नपुस्तिकेच्या मुख पृष्ठावर इंग्रजी आद्याक्षर (A,B,C,D) हे संच क्रमांक दर्शविते. प्रश्नपुस्तिकेवरील सदर संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर अचूकपणे नमूद करणे व संबंधित वर्तुळ छायांकित करणे आवश्यक आहे. संच क्रमांकासंदर्भातील उत्तरपत्रिकेवरील कोडींग अचूकपणे न केल्यास शून्य गुण देण्यात येतील. कोडींग करण्यात त्रुटी राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील व या संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
सदर परीक्षेची प्रश्नपुस्तिका बहुपर्यायी उत्तरे असलेल्या वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. प्रश्नपुस्तिका मिळाल्यावर प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी प्रश्नपुस्तिकेतील पृष्ठे क्रमाने बरोबर आहेत काय, तसेच प्रश्नपुस्तिकेतील सर्व प्रश्न अनुक्रमाने आहेत किंवा नाहीत किंवा इतर मुद्रणदोष आहे काय, याची खात्री करुन घ्यावी व त्यात काही दोष असल्यास प्रश्नपुस्तिका तात्काळ बदलून घ्यावी.
उत्तरपुस्तिकेवर प्रश्नपुस्तिका क्रमांक व संच क्रमांक इ. माहिती लिहून झाल्यावर प्रश्नपुस्तिका बदलून दिली जाणार नाही. तसेच या संदर्भात परीक्षेनंतर आलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपुस्तिका सोबत घेऊन जाण्याची परवानगी आयोगाने दिली आहे.
इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत जेंव्हा प्रश्न छापलेले असतात, तेंव्हा इंग्रजीतील किंवा मराठीतील प्रश्नांमध्ये मुद्रणदोषामुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास पर्यायी भाषेतील प्रश्नाशी तो प्रश्न ताडून पहावा.
उत्तरपत्रिकेवरील माहिती भरण्याकरीता फक्त काळया शाईचे बॉल पॉईंट पेन वापरण्यास परवानगी आहे. ब्लेड, खेाडरबर किंवा पांढरा द्रव (Whitener) वापरुन उत्तरपत्रिकेवर खाडाखोड करण्यास सक्त मनाई आहे.
उत्तरपत्रिकेवर एकूण 200 प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची सोय आहे. या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेमधील सर्व प्रश्न अनिवार्य असतील. प्रत्येक प्रश्नक्रमांकासमोर O O O O अशी चार वर्तुळे असून, प्रत्येक वर्तुळात पर्यायी उत्तरांचे आकडे दिलेले आहेत. प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेतील संबंधित वर्तुळात छायांकित करावीत.
उत्तरपत्रिकेमध्ये खालील नमुन्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे योग्य उत्तराचे निवडलेले वर्तुळ फक्त काळया शाईच्या बॉलपेनने संपूर्णपणे छायांकित करुन प्रत्येक प्रश्नांचे उत्तर नमूद करावे. अयोग्य पध्दतीने नमुद केलेल्या उत्तरास गुण दिले जाणार नाहीत.
उत्तरपत्रिकेमध्ये विहित केलेल्या ठिकाणीच आपली उत्तरे नमूद करावीत. प्रश्नपुस्तिकेवर वा अन्य ठिकाणी उत्तरे लिहिल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केले आहे, असे समजून कारवाई करण्यात येईल.
एकदा नमूद केलेली माहिती वा उत्तरे खोडता येणार नाहीत. अथवा त्यामध्ये बदल करता येणार नाहीत. उत्तरपत्रिकेत नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने नमूद केल्यास अथवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केल्यास त्याचे ते उत्तर ग्राहय मानले जाणार नाही व अशा उत्तरांना शून्य गुण देण्यात येतील.
आयोगाने नकारात्मक गुणांकनाची (Negative Marking) पध्दत लागू केली असल्यामुळे प्रश्नांची अचूक उत्तरेच नमूद करावीत. प्रश्नपत्रिका क्र. 1 मध्ये 100 प्रश्न, 200 गुण विहित करण्यात आले आहे. सदर प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक चुकीच्या उत्तराबद्दल एक तृतीयांश गुण वजा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच प्रश्नपत्रिका क्र. 2 मध्ये 80 प्रश्न, 200 गुण विहित करण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका क्र. 2 मधील अभ्यासक्रमातील “Decision Making and Problem Solving” हा घटक वगळून उर्वरीत प्रश्नांच्या प्रत्येक चुकीच्या उत्तराबद्दल एक तृतीयांश गुण वजा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
प्रश्नपुस्तिकेत काही त्रुटी आढळल्यास याबाबतचे लेखी निवेदन उपसचिव (गोपनीय), महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँक ऑफ इंडियाची इमारत, 3 रा मजला, महात्मा गांधी मार्ग, हुतात्मा चौक, मुंबई- 400001 यांच्याकडे संपूर्ण तपशीलासह परीक्षेच्या दिनांकापासून आठ दिवसांच्या आत सादर करावे.
आयोगाच्या परवानगीशिवाय कोणत्याही परिस्थितीत लेखनिकाची मदत घेता येणार नाही.
उत्तरपत्रिका किंवा प्रश्नपुस्तिका परीक्षा कालावधीत परीक्षा कक्षाबाहेर घेऊन जाता येणार नाही. तसेच, परीक्षेच्या कालावधीत संपूर्ण उत्तरपत्रिका आणि परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग-1 परीक्षा कक्षाबाहेर घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.
परीक्षा कालावधी पूर्ण होण्यास पाच मिनिटे असताना इशारा घंटा दिली जाईल. त्यानंतर पेपर संपल्याची अंतिम घंटा झाल्यावर उत्तरे लिहिणे लगेच थांबविले पाहिजे. आपल्या उत्तरपत्रिका परीक्षा कालावधी संपल्यानंतर लगेचच समवेक्षकांच्या ताब्यात द्याव्यात. तसेच सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिका समवेक्षकांनी गोळा केल्यावर मोजून त्यांचा हिशोब लागेपर्यंत आपापल्या जागेवर बसावे.
आयोगाच्या वेबसाईटवरील स्पर्धा परीक्षा अंतर्गत “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” तसेच “परीक्षा” या विभागातील “राज्यसेवा परीक्षा” मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सर्व तरतुदी काळजीपूर्वक वाचाव्यात.
परीक्षेस प्रवेश दिला, म्हणून आयोगाने उमेदवारी स्वीकारली, असा अर्थ होत नाही. उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र असल्याचे आढळून आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
ऑनलाईन अर्जप्रणालीव्दारे सादर केलेली माहिती या प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेली आहे. त्यामध्ये चूक / विसंगती आढळल्यास त्यासंबंधीचे लेखी निवेदन उमेदवाराने आयोगाच्या http://www.mpsconline.gov.in या वेबसाईटवरुन अभिप्राय/सूचना (Feed-Back) व्दारे अथवा admin@mpsconline.gov.in या ई-मेलवर स्वत:च्या तपशीलासह परीक्षेच्या दिनांकापासून 8 दिवसांच्या आत सादर करावे. अशी चूक/विसंगती बाबतचे निवेदन आयोगास सादर केलेल्या ऑनलाईन अर्जातील दाव्याप्रमाणे असावे.
प्रवेशप्रमाणपत्राच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारावरच राहील. अन्य व्यक्तीकडून कोणत्याही कारणाकरिता सदर प्रवेशप्रमाणपत्राचा दुरुपयोग केला गेला, तर त्या व्यक्तीकडून मदत घेतली नसल्याचे सिध्द करण्याची जबाबदारी उमेदवारावर राहील.
परीक्षेसंदर्भात आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांबाबत आयोगाच्या वेबसाईटचे http://www.mpsc.gov.in अवलोकन करणे उमेदवाराच्या हिताचे राहील.
टीप : या परीक्षेसाठी काही जिल्हा केंद्रावर उमेदवारांच्या अर्जांची नोंदणी अधिक संख्येने झाल्याने व या परीक्षेच्या दिवशी सीबीएसई व इतर परीक्षा असल्याकारणाने संबंधीत जिल्हा केंद्रावर सर्व उमेदवारांची बैठकव्यवस्था करणे शक्य झाले नाही. यास्तव सदर जिल्हाकेंद्रावरील काही उमेदवारांची बैठकव्यवस्था नजिकच्या जिल्हा केंद्रांवर करण्यात आलेली आहे, याबाबत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.