राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करिता प्रवेश पत्र २ मे पासून मिळायला सुरुवात होईल.
एमपीएससी ने परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) बद्दल काही सूचना जारी केलेल्या आहेत, त्या खालील प्रमाणे:
एमपीएससी ने परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) बद्दल काही सूचना जारी केलेल्या आहेत, त्या खालील प्रमाणे:
- राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करिता ज्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाईल मधील माहिती अद्ययावत केलेली आहे, अशा उमेदवारांनी परीक्षेस येताना आपल्या सोबत स्वत:चा अलीकडील काळातील फोटो चिकटविलेले प्रवेश पत्र (उपलब्ध चौकोनात स्वाक्षरी करून) सोबत आणावे.
- प्रवेशपत्रात नमूद केलेल्या आपल्या माहितीत काही तृटि आढळल्यास आवश्यकतेनुसार सुधारणा करावी व परीक्षा संपल्यानंतर सदर प्रवेशपत्र समवेक्षकाकडे जमा करावे.
- ज्या उमेदवारांनी आपली माहिती अद्याप अपडेट केलेली नाही व ज्या उमेदवारांना आपल्या प्रोफाईल मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध झालेले नाही, अशा उमेदवारांनी स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र व त्याची एक झेरोक्स प्रत, परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा, तसेच स्वत:च्या अलीकडील काळातील पासपोर्ट साईझ फोटो परीक्षेकरिता येताना सोबत आणावा. परीक्षा केंद्रावर उपलब्ध असलेले प्रवेशपत्र (फोटोसह संपूर्ण माहिती भरून), त्यासोबत उपलब्ध असलेले हमीपत्र, तसेच ओळखपत्राची एक प्रत समवेक्षकाकडे जमा करावी.