2014 – Success Mantra #1 – What, How Much To Read & Self Made Notes


Hi Friends

(This entire series of Success Mantra’s will be available at the bottom of this page)

Starting today, I am going to write a series of Success Mantra’s for those people who are preparing for 2014 exams. I hope this series will help not only for your preparation for Rajyaseva but also STI, PSI and Asst exams as well as UPSC Civil Services Exam.

परंतु मी हे सर्व मराठीतून लिहावे अशी माझी इच्छा आहे कारण माझ्या लिखाणाचा फायदा सर्वांनाच व्हावा आणि प्रत्येक जणाला ते समजायला सोपे असावे म्हणून. तर मित्रांनो पुढे आहे माझा पाहिला सक्सेस मंत्र आणि तो आहे “काय, किती पुस्तके वाचावेत आणि नोट्स का काढावेत” ह्या विषयावर!

Success Mantra #1

पहिला सक्सेस मंत्र – २०१४ साठी

मित्रांनो, तुम्ही आज फार खुश आहात, होय न? कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली म्हणून !!!
हो फार चांगलच आहे !!! पण कोणासाठी? जे राज्यसेवा २०१३ पूर्व परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी परंतु २०१४ ची तयारी करणाऱ्यांसाठी काय? जस्ट कुल !!! खास तुमच्यासाठी एक सक्सेस मंत्र देतोय २०१४ च्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी, ओके?

सफल होण्यासाठी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे तुमची तयारी आणि ती सुद्धा कशी? एकदम उत्तम! परंतु ती कशी करणार? तेच सांगतोय पण त्याआधी एक अनुभव सांगायचा आहे जो कारणीभूत झाला हे आर्टिकल लिहिण्यासाठी.

मागील २ ते ३ दिवसात मला जो अनुभव आला तो फार टचिंग होता. मी संध्याकाळी तुमच्यापैकी काही मुलांचे लोगिन करून त्यांचा प्रोफाईल अपडेट करत होतो तर कोल्हापूर जवळच्या खेडेगावात राहणारी एक मुलगी जवळच्या शहरात सायबर क्याफे मध्ये बसून प्रोफाईल अपडेट करण्याचा प्रयत्न करत होती. ते संपवून तिला घरी जायचे होते पण प्रोफाईल अपडेट होतच नव्हता तर तिचा मेसेज ब्लोगवर वाचला मग मी तिला बोललो कि तुमचे डीटेल्स मला पाठवा आणि जा घरी. मी त्या मुलीचा प्रोफाईल रात्री १ वाजून १३ मिनिटाला अपडेट केला आणि तिला मेसेज केला कि शांत झोप (ती आलरेडी झोपलेलीच असावी :)).

अशा परिस्थितीत खेडोपाडी राहणारे कशी आणि कितपत तयारी करत असतील!!! त्यांच्या जवळ काय मार्गदर्शन उपलब्ध आहे? मी मागील ३ वर्षांपासून हेच काम करत आहे कि त्यांच्या पर्यंत इंटरनेटद्वारे पोचावे आणि योग्य ते मार्ग दर्शन द्यावे.

मी स्वताही गाडी घेवून खेडोपाडी असलेल्या कॉलेजेस मध्ये फिरलोय २०११ मध्ये. ह्या बद्दल कदाचित तुम्ही वाचल असेल ब्लोगवर “Academy On The Move”. पण आता पेट्रोलचे भाव इतके झालेत कि मला स्व:खर्चाने फिरणे अशक्य आहे.

तर मित्रांनो, मी माझा प्रयत्न करत आहे (इंटरनेटद्वारे) सर्वांनाच सांगायचा की पुढील वर्षाच्या राज्यसेवेची तयारी कशी करावी.

तुम्हाला त्यासाठी तयारी कशी करायची?
माझ्या अनुभवानुसार सांगतोय कि जास्तीत जास्त उमेदवार फार कमीत कमी पुस्तकातून तयारी करतात आणि वर्षानुवर्षे परीक्षा दर परीक्षा देतच राहतात…तो मार्ग अगदी चुकीचा आहे. माझे ऐका आणि आता तुम्ही ज्या चुका केल्यात ते सर्व विसरून तुमची पुढील परीक्षा २०१४ मध्ये आहे त्यावर लक्ष केंद्रित करा.

तुमची तयारी कशावर आधारित आहे अगोदर ह्याचा विचार करा?
माझ्या मते तुम्हाला पुढीलप्रमाणे करायला पाहिजे:
  • पूर्व व मुख्य परीक्षेसाठी भरपूर पुस्तके (मी सुचवतो ७० ते ८०. ह्यामध्ये बेसिक ते अडव्हांस पुस्तके)
  • प्रत्येक महिन्यात ४ ते ५ मासिके (एक वर्षात – एकूण ४८ ते ६० प्रती)
  • दररोज कमीत कमी २ वर्तमानपत्रे (एक वर्षात – एकूण ७२० प्रती)
  • इंडिया इयर बुक
  • इंटरनेट: ह्या माध्यमातून तुम्ही बरीच माहिती विनापैश्यांची मिळवू शकता
वरीलपैकी सर्वच तुम्हाला लागेल जर व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर! तुमचं मुख्य ध्येय्य काय आहे ते विसरू नका त्यासाठी तुम्हाला हे करावेच लागेल.

मी नेहमी सांगत आलोय की स्वत:चे नोट्स बनवायचे अभ्यास करत असतांना तर आता ते बघूया कि का बर बनवायचेत?

वरील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल आणि तितका अवधी दिलाच पाहिजे. हाच तर खरा सक्सेस मंत्र आहे!

ओके, वरील साहित्याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने नोट्स न बनवता अभ्यास केला. लक्षात ठेवा नोट्स न बनवता!!! तर काय होईल?

जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा तुमच्याकडे फार कमी वेळ असेल आणि भरपूर रिविजन करायचं असेल. काल परवा सारख काही झाल तर तेव्हा तुमची तारांबळ उडेल. जरुरी नाही कि असच घडेल पण hope for the best and always be prepared for the worst.

जरी वरील परिस्थिती उद्भवली नाही तर काय होईल?

परीक्षा अगदी जवळ आल्यावर रिविजन करण्यासाठी जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा काय कराल? माझ्या पुढील प्रश्नांचे उत्तर तुम्ही स्वत:लाच द्यायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल कि मला काय म्हणायचे आहे.
  • प्रत्येक पुस्तक कमीत कमी २०० पानांचं असेल तर किती पुस्तके तुम्ही रिविजनसाठी (त्यावेळी) वाचून रिविजन करू शकाल?
  • तुम्ही जरी त्या पुस्तकात खुणा केलेल्या असतील तर त्या शोधून वाचून काढून समजून घ्यायला किती वेळ लागेल आणि हे सर्व प्रत्येक पुस्तकातून कराव लागेल तेव्हा सर्वच पुस्तकांना न्याय देता येईल का?
  • मासिकांच्या ४८ ते ६० प्रती सुद्धा उघडून खुणा बघून वाचाव्या लागतील तर त्याला किती वेळ जाईल आणि ते सर्व करू शकाल का?
  • दररोज तुम्ही वर्तमानपत्रे वाचत होतात तर नोट्स काढलेले नसतील तर तुम्ही वर्षभराच्या एकूण ७२० प्रती रेफर करू शकाल का इतक्या कमी वेळेत आणि ते सुद्धा वरील पुस्तके व मासिकांच्या सोबतच?
  • इंटर नेटच्या माध्यमातून जो अगोदर वर्ष भर अभ्यास केला होता त्याच काय जर नोट्स काढलेले नसतील तर?
मित्रांनो, ह्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वत: जेव्हा अभ्यास करता तेव्हा प्रत्येक विषयाच्या प्रत्येक मुद्द्यावर स्वत: नोट्स काढा म्हणजे तुम्हाला अगदी कमी वेळेत त्यांचे वाचन करता येईल.

रेडीमेड नोट्स वापरू नका कारण त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. ह्याबद्दल यावर Anil MD यांनी फार पूर्वी लिहून ठेवलं आहे ते वाचा: Read HERE