३ ते २४ महिने कालावधी चे अभ्यासक्रम

३ ते २४ महिने कालावधी चे अभ्यासक्रम
व्यवसाय शिक्षण हे अल्पावधीत नोकरी मिळविण्यासाठी तसेच छोटासा स्वयंरोजगार उभा करण्यासाठी उपयुक्त आहे. सदरील अभ्यासक्रमाची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात येते.
संगणकीय अभ्यासक्रम
वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत अभ्यासक्रम
तांत्रिक अभ्यासक्रम
अतांत्रिक अभ्यासक्रम
संगणकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास विद्यार्थाला सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये रोजगार मिळू शकतो. तर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रम निवडल्यास त्याला पॅथॉलॉजी लॅबमध्ये किंवा एखाद्या दवाखान्यात सहायक म्हणून रोजगार मिळू शकतो. तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यास विद्यार्थ्याला कुशल कारागीर म्हणून उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अतांत्रिक अभ्यासक्रम निवडल्यास विद्यार्थ्यास हॉटेल व्यवस्थापन, अन्नपदार्थ व्यवस्थापन, फॅशन व्यवस्थापन व शिलाईकामाच्या व्यवस्थापनामध्ये सहायक म्हणून नोकरी मिळू शकते. सदरील अभ्यासक्रम हे ८ वी उत्तीर्ण व त्यापुढील शैक्षणिक अर्हता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. ३ ते २४ महिने कालावधीचे व्यावसायिक शिक्षण हे खालील संस्थामार्फत दिले जाते.
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
विविध प्रशिक्षण संस्थांची यादी
Khadi & Village Industries Commision
MCED
MS-CIT
MITCON E-School