पदवी अभ्यासक्रम


कल्पकता हा मनुष्याचा स्थायीभाव. मानवी सौंदर्यदृष्टी विकसित होण्यासाठी निसर्गाचाच वाटा. निसर्गातील वैविध्यपूर्ण बाबींचा तथा इतिहास, साहित्य, नृत्य, गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला, नाट्यशास्त्र, रंग शास्त्र इत्यादींचा
दैनंदिन जीवनात होणारा प्रभाव आणि या कलाक्षेत्रातून मानवी मानसिकतेचे संवर्धन करण्याची विलक्षण शक्ती असणारी ही अभ्यास शाखा.
वाचन, चिकाटी, धैर्य आणि विविधता याची आवड असणार्‍या विद्यार्थांसाठी कला शाखा ही सुवर्णसंधी. गणित किंवा विज्ञान अशा विषयात रस नसणार्‍या व्यक्तींसाठी अत्यंत रंजक अशी ही शाखा.
सर्जनशीलता हा या क्षेत्रात यशस्वी होण्याचा पाया. सातत्याने नवनिर्मिती करून समाजात कीर्तीच्या शिखरावर विराजमान करणारी ही एकमेव शाखा. निरीक्षणशक्ती, मांडणीक्षमता, भाषेचे सौंदर्य जाणण्याची वृत्ती व विवेकपूर्ण संहिता निर्मितीची क्षमता प्राप्त विद्यार्थांना हमखास यश देणारी ही कलाशाखा.
१२ वी (कला) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कला शाखेतील पदवी अभ्यासक्रमाची खालील दोन भागांत विभागणी करता येऊ शकेल. १२ वी (कला) शाखेतील पदवी अभ्यासक्रम ज्यामध्ये देशी वा विदेशी भाषा विषयासह तसेच सामाजिक शास्त्रांचे विषय घेऊन कला शाखेतील पदवी प्राप्त करता येते. १२ वी कला उत्तीर्ण झाल्यानंतर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातून पदवी प्राप्त करून विद्यार्थी विविध व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करू शकतात.
सुरुवातीपासूनच भारतात विविध संस्कृती असल्यामुळे कला क्षेत्रात चौफेर व नावीन्य पूर्ण प्रगती केली आहे. भारत देश हा कला शाखेसाठी माहितीचा खजिना राहिलेला आहे. देशातून व परदेशातूनसुद्धा भरपूर अभ्यासक कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी येथे येतात.
कला शाखेतील पदवी अभ्यासक्रम
१२ वी कला वा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यास कला शाखेतील अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. साधारणतः १२ वी कला शाखेनंतर भाषा विषय घेऊन वा सामाजिकशास्त्रे घेऊन वा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन विद्यार्थी पदवी शिक्षण पूर्ण करू शकतो.
मराठी, संस्कृत, उर्दू, गुजराथी, सिंधी, पाली, इंग्रजी, अर्धमागधी, रशियन, जर्मन, फ्रेंच, जपानीज, स्पॅनीश, अरेबिक, ललित कला, नाट्यशास्त्र, संगीत, राज्यशास्त्र, सामान्य प्रशासन, इतिहास, भूगोल, लायब्ररी, शिक्षण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शारीरिक शिक्षण अशा विषयांमध्ये पदवी प्राप्त करता येते.
कला शाखेचा अभ्यासक्रम १६२ विद्यापीठांमध्ये तसेच ७,४९४ महाविद्यालयांमध्ये घेतला जातो. पुणे हे विद्येचे व कलेचेमाहेर घर समजले जाते. कला शाखेच्या प्रगतीसाठी व विद्यार्थ्याची कला शाखेकडे ओढ वाढावी म्हणून काही संस्था कार्यरत आहेत. त्यातील काही संकेतस्थळे खालीलप्रमाणे,
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded