नागरी सेवा स्पर्धा परीक्षा करिअर


पूर्वी ज्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे शक्य होत नसे ते विद्यार्थी संघ लोक सेवा आयोग (यु.पी.एस.सी.) किंवा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी.) परीक्षेला बसून आपले करिअर ठरवीत असत. आता परिस्थिती राहिली नाही.

किंबहुना अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवीधरसुद्धा संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आपला करिअरचा मार्ग बदलतात. लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा अ)#संघ लोकसेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यू.पी.एस.सी. कार्यक्षेत्र ) संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध नागरी सेवा स्पर्धा घेतल्या जातात. उदा. आय.ए.एस. (Indian Administrative Services ) ज्याद्वारे जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी,सचिव,आयुक्त इत्यादी पदांवर होता येते. आय.पी.एस. (indian police services ) ज्याद्वारे जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्त, पोलीस प्रमुख, महासंचालक इत्यादी पदांवर काम करून पोलीस खात्यात करिअर करता येते. आय.आर.एस. (Indian Revenue Services ) ज्यामध्ये कस्टम एक्साइज रेल्वे, पोस्ट इत्यादी क्षेत्रात काम करता येते. आय.एफ.एस. ( Indian Foreign Services ) ज्यामध्ये परदेशी दूतावास परराष्ट्र विभागात सेवा संधी. अशा प्रकारे Indian Forest Servises मध्ये भारतात खूप वाव आहे.

ह्या परीक्षां मध्ये यश मिळण्यासाठी वाचनाची आवड असावी. महत्वाचे मुद्द्यांचे टिपण काढण्याची सवय असावी. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा भरपूर मेहनत घेण्याची तयारी असावी. वरवर अभ्यास न करता सखोल वाचन हवे. परीक्षेचे तंत्र आणि मंत्र अवगत करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. ऐच्छिक विषय निवडतांना ज्या विषयात चांगले योग्य उत्तर देण्याची क्षमता आहे असेच विषय निवडावेत. मनन आणि चिंतनाची क्षमता वाढवावी. गटचर्चेमध्ये प्रभावी असावे. तोंडी परीक्षेसाठी आत्मविश्वास आणि विनयशीलता असावी. इंडियन पोलीस सर्व्हिस व Indian Forest Services साठी आवश्यक ती Physical Ability असणे आवश्यक आहे.



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा आयोजित परीक्षा

राज्य लोकसेवा आयोगाद्वारे नागरी सेवा स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्र शासनाच्या अस्थ्सापनेवरील विविध पदांच्या (उपजिल्हाधिकारी, उपजिल्हा पोलीस प्रमुख, तहसीलदार, सेल्स टेक्स ऑफिसर , गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद , ए आर टी ओ इ.) भरतीसाठी या परीक्षा घेतल्या जातात. पात्रते विषयक अटी : १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी २) वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे ३) शासन नियमानुसार आरक्षित प्रवर्ग / उपवर्गासाठी वयोमर्यादा शिथिलक्षम. आयोगाने निश्चित केलेल्या निवडक पोस्ट ऑफिस मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार अर्ज फक्त निवडक पोस्ट ऑफिसमध्ये स्विकारण्यात येतात. सविस्तर अर्हतेसाठी आयोगाच्या वेबसाईट वरील तपशील जाहिरात पहावी. आरक्षण शुल्क, निवडीचे सर्वसाधारण सावरूप इत्यादी बाबतचा तपशीलही वेबसाईट वर असतो. ( वेबसाईट www.mpsc.gov.in ) वरील सर्व पदांसाठी एकच समान परीक्षा घेतली जाते. निवड प्रक्रिया : उमेदवाराची अंतिम निवड तीन टप्प्यांतील परीक्षांमधून केली जाते. १) प्रिलिमिनरी परीक्षा २०० मार्कांची ( चाचणी परीक्षा ) असते. बहुपर्यायी ( Objective Multiple choice ) स्वरूपाचे प्रश्न असतात. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असतो. साधारणपणे दरवर्षी एक लाखाच्या जवळपास उमेदवार या परीक्षेसाठी बसतात. यातून पदांच्या संखेच्या साधारणपणे १२-१३ पट उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड होते. २) मुख्य परीक्षा : ही लेखी परीक्षा १६०० गुणांची असते. परीक्षा इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून देता येते. प्रत्यक्ष भरावयाच्या पद्संख्येच्या ३ पट उमेद्वारांचिऊ निवड (मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांतून ) तोंडी परीक्षेसाठी केली जाते. तोंडी परीक्षा : ही परीक्षा २०० गुणांची असते. उमेदवारांनी मुख्य परीक्षेत मिळवलेले १६०० पैकी गुण व तोंडी परीक्षेतील २०० पैकी गुण, अशा एकूण १८०० गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे अंतिम निवड होते. उपजिल्हा पोलीस प्रमुख, सहाय्यक आरटीओ, एकसाइझ उप अधीक्षक इत्यादी पदांसाठी शारीरिक क्षमतेचे निकषही पूर्ण करणे आवश्यक असते.



राज्य कृषी सेवा परीक्षा (State Agriculture Services Examination ) कृषी अधिकारी ग्रेड ए आणि ग्रेड बी पदासाठी या परीक्षा घेतल्या जातात. पात्रता : अग्रीकल्चर किवा अग्रीकल्चर अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक . निवड प्रक्रिया : ७५० गुणांची लेखी परीक्षा (Objective Multiple Choice) आणि त्यानंतर १०० गुणांची तोंडी परीक्षा ( इंटरव्ह्यू ) अशा एकूण ८५० गुणांच्या परीक्षेद्वारे प्राप्त गुणांच्या आधारावर उमेदवाराची अंतिम निवड होते. ही पदे राजपत्रित दर्जाची असतात व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात अधिकारी पदावर नियुक्ती होते.