व्यावसायिक अभ्यासक्रम


व्यावसायिक शिक्षण हे माणसाच्या मनगटातील बळ म्हटले तरी चालेल. त्याच्या बळावर माणूस हा जबाबदारीची कामे घेऊन ती पूर्ण करण्याची धमक त्याच्यात येते. १२वी विज्ञाननंतर व्यावसायिक शिक्षण म्हणून इंजिनिअरिंग अथवा मेडिकल या दोन क्षेत्रांकडे बघितले जाते.
अभियांत्रिकी अभ्यासक्रम
नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणार्‍या साधनांचा मानवी जीवन सुकर करण्यासाठी सुयोग्य वापर करून किमान खर्चात विविध बाबी उपलब्ध करून देण्याची प्राथमिक जबाबदारी अभियंत्यावर येते. समाजातील प्रत्येक भौतिक विकासाचे सारे श्रेय अभियंत्यांना जाते. नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध,उपलब्ध तंत्रज्ञानाचा विकास आणि तंत्रज्ञानाचा मानवी प्रगतीसाठी सकारात्मक वापर हे अभियंत्यांचे आद्यकर्तव्य आहे.
गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांमध्ये प्रावीण्य असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी या शाखेची दालने सदैव उघडी असतात. ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि निर्णयशक्ती अशा पाचही शक्तींचा संचय ठायी असणे ही या शाखेची मूलभूत गरज आहे. निरंतर शिक्षण, बदलत्या परिस्थितीचा मागोवा घेऊन बदल अंगीकारण्याची क्षमता, नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याची ऊर्मी, प्रयोगशील वृत्ती आणि समूहात काम करण्याची मानसिकता तथा शोधवृत्तीच्या व्यक्तींना या क्षेत्रात अनंत संधी आहेत.
बारावीत, गणित, विज्ञान व भौतिकशास्त्र या विषयात ५०% गुणांसह पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अभियांत्रिकीची सामाईक परीक्षा देणे बंधनकारक आहे.
केंद्रीय स्तरावरील JEE, AIEEE या प्रमुख सामाईक परीक्षा होतात तर राज्य स्तरावर MH. CET ही परीक्षा होते. सामाईक परीक्षेचा प्रकार, मिळालेले गुण व उपलब्ध जागा या नुसार आय आय टी, एन आय आय टी, स्वायत्त संस्था, शासकीय, अनुदानित संस्था व विनाअनुदानित संस्था या मध्ये प्रवेशाचे निकष ठरत असतात.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे,
IITs
बद्दलची माहिती , National Institutes बद्दलची माहिती, IISc Banglore, IISc Pune, संपूर्ण महाराष्ट्रातील अभियांत्रिकी कॉलेजेसची यादी, महाराष्ट्रातील संपूर्ण युनिवर्सिटीची यादी, मराठवाड्यातील कॉलेजेसची यादी, Government College of Engineering, Aurangabad, DBATU, DOEACC, NITIE, CITDवैद्यकीय अभ्यासक्रम
आरोग्य निरोगी राखणे ही प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज. स्वास्थ्य स्वस्थ असल्याखेरीज कोणताही सजीव असेपर्यंत या शाखेची गरज आणि विकास होतच राहणार आहे.
रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रामध्ये पारंगतता असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय क्षेत्र म्हणजे निश्चितपणे यशस्वितेकडे नेणारी शाखा. सखोल ज्ञानार्जनाची भूक, कौशल्यप्राप्तीची ओढ, पृथ:करण करण्याची क्षमता, विविध रसायनांच्या कमी/जास्तपणामुळे होणारे परिणाम, अत्यंत बारकाईने पाहण्याची दृष्टी, एखाद्या रसायनाचे सजीवांवर होणारे दुष्परिणाम, औषधी द्रव्यांच्या मात्रांचे सजीवांवर होणारे दुष्परिणाम, औषधी द्रव्यांच्या मात्रांचे सजीवाच्या रचनेवर होणारे परिणाम, सातत्याने आयुष्यभर अभ्यासण्याची प्रवृत्ती, मानसशास्त्राचा अभ्यास, सेवाभावी वृत्ती आणि तुलनेत थोडेसे उशिरापर्यंत आयुष्यात मिळण्यासाठीचा संयम या बाबी विद्यार्थ्यांकडे असणे अपेक्षित आहे. यश, कीर्ती, प्रतिष्ठा व पैसा सदैव या क्षेत्रातील व्यक्तींकडे राहण्यास तत्परतेने तयार असतात.
वैद्यकीय शाखेचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून बारावीत मिळालेल्या गुणानुसार तसेच आपापल्या क्षमतेनुसार अभ्यासक्रमाची निवड करता येवू शकेल. वैद्यकीय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम खालील प्रमाणे
एम. बी. बी. एस. (अॅलोपॅथी)
बी. ए. एम. एस. (आयुर्वेदिक)
बी. एच. एम. एस. / डी. एच. एम. एस. (होमिओपॅथिक)
बी. डी. एस. (दंतवैद्यक )
बी. पी. टी. एच. (फिजिओथेरपी)
बी. यू. एम. एस. (युनानी)
बी. ओ. टी. एच.
B. Sc. (
एच एल एस/ बीए एस एल पी)
पशु वैद्यकीय
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
महाराष्ट्रातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांची यादी . महाराष्ट्र युनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, नाशिक

पशुवैद्यकशास्त्र
माणूस आणि प्राणी हे सातत्याने एकमेकांना पूरक ठरण्याची भूमिका बजावत आले आहेत. गाय या प्राण्याचे दुध सर्वांत सकस, तर बैल हा शेतकर्‍याचा सच्चा मित्र. बैलाचे महत्त्व आजही आधुनिक युगात आणि यंत्रक्रांतीच्या काळातही कमी झालेले नाही. शहरी भागात पाळीव कुत्र्यांच प्रमाण मोठे आहे. मानवाला साहाय्यभूत ठरणार्‍या प्राण्यांना सांभाळणे, ही मानवाची स्वार्थी गरज आहे. या स्वार्थपुर्तीसाठीच पशुवैद्यकीयशास्त्राचा जन्म झाला.
प्राणी आणि पशू यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या शरीररचनेनुसार आवश्यक खनिजे, प्रथिने यांचे संतुलन आहारातून करणे, प्राण्यांच्या आरोग्यासाठी विविध औषधींचा वापर, प्राण्यांतही प्रतिकारक्षम जातींची निर्मिती करण्यासाठी संशोधन करणे, संकरित प्राण्यांची पैदास करून; वसुंधरेचे संवर्धन, संगोपन तथा संतुलन ठेवून मानवी जीवन सुकर करण्याचे कार्य या क्षेत्रांमध्ये केले जाते.
जीवशास्त्राचा अभ्यास, रसायनांची प्रक्रिया शृंखला, ग्रामीण भागात काम करण्याची आवड, प्राण्यांच्या आरोग्यासाठीच्या विविध चाचण्या आणि प्रतीजैविकांची प्राण्यांचे आरोग्य संवर्धनासाठी सुयोग्य वापर करण्याची दृष्टी या बाबींची हे क्षेत्र निवडण्यासाठी आवश्यकता असते.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
MAFSU, Veternary counsil of India, Maharashtra State Veterinary Council, Nagpur,
महाराष्ट्रातील काही कॉलेजेसची यादी, Veternary Colleges in India, , AGRICULTURE AND VETERINARY UNIVERSITIES in India

कृषी / कृषी तंत्रज्ञान क्षेत्र
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी उत्पादनावर अवलंबून आहे. जगात लोकसंख्येच्या बाबत दोन नंबरवर. आपला देश भाजीपाला, फळे व दुग्ध उत्पादनातही जगात दुसरे स्थान बाळगून आहे. तरीदेखील भारतातील कृषी क्षेत्रातील उत्पादनक्षमता जगाच्या तुलनेत खूप कमी असून, त्यात काम करण्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत.
वनस्पतीमधील शारीरिक वाढ नियंत्रित करून त्यातील घटकांच्या व्यवस्थापनाने अधिकाधिक फलोत्पादन कसे होईल, यासाठी सदर शाखा कार्य करते. शेती-उद्योगातील अवजारे, वाहतुकीची साधने, सेंद्रिय आणि रासायनिक खते यांचे योग्य गुणोत्तर, कीड प्रतिबंधक जैविकांचा वापर, विविध धान्ये आणि फळांच्या जनुकीय बदलांतून संकरीत नवीन जातींचा शोध लावून उत्पादन वाढविणे, जमिनीचे आणि पाण्याचे व्यवस्थापन, भौगोलिक आणि वातावरणाचा सखोल अभ्यास करून अनुरूप पीक पद्धतीचे निकासन इत्यादी क्षेत्रात कृषी तंत्रज्ञान क्षेत्र पोहोचले आहे.
फळ प्रक्रिया उद्योगाची क्षमता सध्याच्या २% वरून ४% जरी केली तरी भारतास अब्जावधी रुपयांचे परकीय चलन मिळेल. ग्रामीण भागात राहण्याची मानसिकता, निसर्गचक्राचा अभ्यास, मातीचा पोत आणि घटक, वातावरणात येणार्‍या धान्यांचा अभ्यास, आधुनिकतेची शेतीस जोड देण्याची वृत्ती असणार्‍यांना हे क्षेत्र खूपच छान आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतीच्या उत्पन्नावर आयकर शून्य.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
काही कृषी विद्यापीठांची यादी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, महाराष्ट्रातील काही कॉलेजेसची यादी, AGRICULTURE AND VETERINARY UNIVERSITIES in India

आर्किटेक्चर (वास्तुविशारद)
ह्या अभ्यासक्रमाअंतर्गत संकल्पनेवर आधारित वस्तूची रचना व संकल्पचित्रे तयार करण्याचे कालाधारित शास्त्र शिकविले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यास वास्तुविशारद म्हणून काम करता येते व त्यांतर्गत तो जमिनीची रेखांकने तयार करणे इमारतींची संकल्पचित्रे तयार करण्याचे कार्य करू शकतो. मुख्यत्वे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करता येतो. ह्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी तीन केंद्रिभूत परीक्षा (CET) घेण्यात येतात. AIEEE (Architecture), MHTCET, Architecture AIEEE. Architecture परीक्षेच्या गुणांवर केंद्र शासनाच्या संस्थांमध्ये शिकविल्या जाणार्‍या Architecture अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो, तर एमएचसीइटी Architecture परीक्षेच्या मार्गावर राज्य शासनाच्या अखत्यारीतील अनुदानित व विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
IIA-INDIA, Maharashtra Association Of Schools of Architecture, Council of Architecture, NATA,
महाराष्ट्रातील काही कॉलेजेसची यादी

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र
चालू दशकास माहितीच्या विस्फोटकाचे दशक समजले जाते. दरवर्षी माहितीमध्ये वाढ होत असून तिचा सर्वसाधारण दर प्रतिवर्षी दुप्पट होण्याचा आहे. इतक्या प्रचंड माहितीचे संकलन, व्यवस्थापन, साठवणूक, वैशिष्ट्यपूर्ण माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय नेमकेपणा साध्य होत नाही. विशिष्ट प्रकारच्या माहितीची उपलब्धता, वर्गीकरण, पृथ:करण आणि उपयोगितेसाठी उपयोगात आणणारे शास्त्र म्हणजे माहिती तंत्रज्ञानशास्त्र. जगभर ढिसाळ स्वरुपात उपलब्ध असणारी माहिती वापरास अनुकूल बनविण्यासाठी, या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. सेवाक्षेत्रातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी शाखा म्हणून माहिती तंत्रज्ञान शाखेचा दबदबा कायम आहे.
भारतीय विद्यार्थ्यांची गणितीय क्षमता, भाषेवरील प्रभुत्व, तर्कसंगती, विचारसरणी, सुयोग्य आकलन क्षमता, तासन्तास एकाच ठिकाणी बसून अथक काम करण्याची सवय, अचूक आणि दर्जेदार क्षमता इत्यादी बाबींच्या जोरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने जगात वर्चस्व प्रस्थापित केलेले असल्याने आणि बी पी ओ, के पी ओ, आणि एलपीओ क्षेत्राने नोकरीच्या प्रचंड संधी जगभर निर्माण केलेल्या आहेत.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Department of Information tehcnology, India,
महाराष्ट्रातील काही कॉलेजेस ची यादी:Animation Courses Maharashtra, BCA Courses, Information on BPO, IGNOU BCA Info, Indian Institues of Information Technology, Information on KPO

संगणक क्षेत्र
कृषिक्रांती आणि औद्योगिक क्रांती नंतर देशात संगणक क्रांतीने आर्थिक आणि व्यवस्थापन क्रांती झाली आहे. मानवी सातत्याच्या मर्यादा लक्षात घेऊन अभियंत्यांनी सातत्यपूर्ण आणि अचूक प्रक्रियेसाठी संगणकाचा शोध लावला. ज्यामुळे क्लिष्टता जाऊन सुकरता पूर्ण प्रक्रिया पुन्हा करण्याएवजी फक्त चुकांच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेमुळे वाचणारा वेळ व पैसा, कमी जागेत अधिक माहितीची सुरक्षित साठवणूक, डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे माहिती प्रक्रियेचे स्वस्त व जलद वहन, एका ठिकाणी बसून जगातील कुठलीही कामे करण्याची क्षमता मानवाला प्रदान करणारे हे संगणक क्षेत्र.
भौतिकशास्त्र, गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांत गती असणार्‍यांसाठी एक उत्तम क्षेत्र. प्रामुख्याने यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन शाखा. प्रतिभा, सूत्रबद्धता, तर्कसंगती आणि नैसर्गिक साखळीस ध्यानी ठेवून कार्य करण्याची पद्धती ज्याच्यात विकसित झालेली आहे, अशांना या शाखेत सहज यश प्राप्त होते. प्रत्येक क्षेत्र संगणक नियंत्रणामुळे व्यापलेले असल्याने व त्याची व्याप्ती वाढतच असल्याने या क्षेत्राची झपाटयाने वाढ होत आहे.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Department of Information tehchnology, India.
महाराष्ट्रातील काही कॉलेजेसची यादी