इतर अभ्यासक्रम


सृष्टीच्या निर्मितीचा शोध, अज्ञाताच्या प्रवासातून नवीन ज्ञानाचा शोध घेण्याचा मानवी ध्यास धारण करणार्‍यांची ही शाखा कार्यकारणभाव याचा अभ्यास करून त्यास कारणीभूत ठरणार्‍या नेमकेपणाचा शोध घेऊन त्याच–त्याच पद्धतीने वारंवारिता साधल्यास
तोच-तोच परिणाम साधण्याचे गमक शोधण्याचे शास्त्र म्हणजे विज्ञानशास्त्र.
सैनिक शिक्षण
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांची पूर्तता होताच निर्माण होणारी चौथी गरज म्हणजे सुरक्षितता. व्यक्तिगत गोष्टीची कौटुंबिक चाळीतील वा गावातील सुरक्षिततेची गरज आपणास ठाऊक आहे. तद्वत देशाच्या सीमांचे तथा अंतर्गत बंडाच्या वेळी सुरक्षा, शांतता व सलोखा राखण्यासाठी सैन्य दलाची आवश्यकता असते. देशाच्या सुरक्षाप्रणालीमध्ये कार्यरत असणारी मंडळी म्हणजे सैन्य. आजारी माणूस म्हणजे स्वतःचे व इतरांचे संरक्षण करू शकत नाही. त्यासाठी सशक्त, निरोगी, चपळ आणि नीती ठरवण्याची क्षमता आवश्यक असते. वेळ, आहार, व्यायाम आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी आवश्यक नियमितता तसेच धैर्य, चिकाटी, अन् साहसी प्रवृत्ती आणि घरापासून दूर विपरीत परिस्थितीत काम करण्याची सुदृढ मानसिकता ही अंगे सैनिकी शिक्षण घेण्यासाठी अत्यावश्यक ठरतात. दर्जाप्रमाणे विशिष्ट वयानंतर सैनिकी क्षेत्रातून निवृत्ती दिली जाते. देशाच्या रक्षणासाठी कार्य केल्याबद्दल केंद्र शासनाच्या अनेक सुविधा सैनिकांना बहाल केल्या जातात. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्यांना या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
List of colleges offering Military Education, NDA, INDIA
फॅशन डिझायनिंग
प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तू आपले अस्तित्व सौंदर्यपूर्ण ठेवेल तेव्हाच लक्ष वेधून घेते. तेव्हा तिचा आकार, रंगसंगती बनवताना लावलेली कौशल्ये आणि कालानुरूप अनुरूपता सिद्ध होते. फॅशन डिझायनिंग ही अभ्यासाची व संधीची अशी शाखा आहे, ज्यासाठी निश्चितच म्हणू शकतो, "जब तक सुरज चांद रहेगा, फॅशन तेरा नाम रहेगा." भौगोलिक परिस्थिती, परंपरा, कच्च्या मालाची उपलब्धता, निर्मितीक्षमता प्रतिभाशक्ती, सूक्ष्मदृष्टी, रंगाच्या तापमानातील फरक, आकाराची जाण, प्रतिभाशक्ती आणि समाजाच्या आवडीतील बदलांचा मागोवा घेऊन काळाच्या थोडेसे पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता या बाबी ह्या क्षेत्रातील यशस्वितेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. निरंतर नावीन्याची मागणी व गरजेनुरूप पुरवठा हे या क्षेत्रातील आर्थिक सूत्र असल्याने करिअर म्हणून निवड करण्यासाठी वरील गुणांची खाण असणार्‍यांनी हे क्षेत्र स्वीकारणे फायदेशीर ठरेल.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
www.fdci.org/ www.nifd.net/
प्रशासन व व्यवस्थापन क्षेत्र
प्रत्येक आस्थापनेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख करणे, भविष्यातील वाटचालीचा आढावा घेणे, आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवणे, ग्राहकांचे व कर्मचार्‍यांचे हित जोपासणे इत्यादी बाबींचा अभ्यास करणारे क्षेत्र म्हणजे व्यवस्थापन क्षेत्र. आस्थापनांचा वाढता व्यापार व तंत्रज्ञानाच्या या युगात आवश्यक झालेला नेटकेपणा यामुळे व्यवस्थापन क्षेत्राला सध्या खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे.
व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण हे बारावीनंतरची पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी अशा वेगवेगळ्या स्वरुपात प्राप्त करता येते. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
महाराष्ट्रातील कॉलेजेसची यादी
कायदा व व्यवस्थापन क्षेत्र
भारतीय घटनेने प्रत्येकास स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. मुळातच घटनेचा संपूर्ण साचा हा स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित आहे. घटनेने जरी स्वातंत्र्य दिलेले असले तरीदेखील समाजात वावरताना सर्वसामान्य चौकटीतच प्रत्येक नागरिकाची वागणूक अभिप्रेत आहे, अन्यथा समाजाचा प्रवास स्वातंत्र्याकडून स्वैरतेकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाची बांधणी चाकोरीबद्ध, कर्तव्ये व जबाबदार्‍या याबाबत जाणीव असणारी आणि वर्तणुकीचे निकष ठरवून त्यातच वागणूक असण्यासाठी तसेच परस्पर तंटे, तक्रारी सोडविण्यासाठी विविध कायदे केंद्र शासन तसेच राज्य शासनाने केले आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था योग्य राखून समाजातील सर्व घटकांना सलोख्याने राहून सर्वसाधारण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत. कायद्याच्या अभ्यासासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, व्यासंग आणि प्रखर स्मरणशक्ती तथा सातत्याने वाचनाची आणि लक्षपूर्वक ऐकण्याची कला अवगत असली पाहिजे. प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ माहिती असणे आणि वाक्यांचे विविध अर्थ काढण्याची मानसिकता या क्षेत्रातील व्यक्तीस निर्भेळ यश प्रदान करते.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
महाराष्ट्रातील कॉलेजेसची यादी
उड्डाण क्षेत्र
एक आकर्षक क्षेत्र. विमानातील प्रवाशांच्या स्वस्थतेसाठी सदैव तत्पर असणार्‍या मनुष्यबळापासून ते विमानाचे परिरक्षक व वैमानिक होण्यासाठी या क्षेत्राची निवड केली जाते. प्रामुख्याने या क्षेत्राची वाणिज्यिक आणि सैनिकी अशी विभागणी केली जाते. भारतीय विमान पतन संचालनालय, दिल्ली या केंद्र शासनाच्या विभागातर्फे उड्डाण क्षेत्रातील तांत्रिक बाबीच्या सर्व अभ्यासक्रमांना मान्यता दिली जाते. कौशल्यावर आधारित मनुष्यबळाची या क्षेत्रात जगभर प्रचंड मागणी आहे. भाषा, ज्ञान, कौशल्ये, शारीरिक ठेवण, सुदृढता, जबाबदारीची जाणीव, निर्णयक्षमता, दुर्दम्य इच्छाशक्ती इत्यादी बाबी या क्षेत्रात जाण्यासाठी मूलभूत गरजा म्हणून संबोधल्या जातात.
अधिक माहितीसाठी आपण खालीदिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
Directorate General of Civil Aviation, BCAS
फार्मसी
दैनंदिन प्रवाहात फार्मासिस्टची गरज नेहमीच भासते. नुसतेच औषध विकणे हे त्याचे काम नसून एखादे इफेक्टिव्ह औषध बनवण्यामध्ये फार्मासिस्ट मोठा हातभार लावतात, म्हणून तो सायंटिफिक स्टडीशी जोडला गेलेला अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो.
काही महत्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Directorate Technical Education
नर्सिंग
नर्सिंग हा एक नोबेल प्रोफेशन म्हणून ओळखला जातो लहान मुलांपासून ते आबालवृद्धापर्यंत सर्वच लोकांची काळजी घेण्याचे काम हे करतात. डॉक्टर जेवढा महत्त्वाचा तेवढाच नर्स हा महत्त्वाचा घटक असे म्हटले तरी चालेल. नर्सेस हे प्रत्येक हॉस्पिटल चे अविभाज्य घटक समजले जातात.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
MGM Group, MIT, Godavari College of Nursing,Jalgaon
खगोल-विज्ञान
खगोलशास्त्र हे ब्रम्हांडातील सेलेस्तिअल घटकांशी निगडित असलेले विद्याशास्त्र. नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुलळे खगोलशास्त्राला नवीन जीवनदान तर मिळाले आहेच, पण त्याचा अभ्यास करणेही सोपे झाले आहे. आर्यभट्ट आणि भास्कर यांच्या सारखे काही खगोलशास्त्रज्ञ भारतामध्ये होऊन गेले ज्यांनी भारताचे व खगोलशास्त्राचे नाव मोठे केले आहे.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
www.iiap.res.in,www.iisc,ernet.in
Nano टेक्नोलोजी
नॅनो टेक्नॉलॉजी ही एक नवीन कार्यक्षम आणि झपाट्याने वाढणारी टेक्नॉलॉजी म्हणून ओळखली जाते. एखाद्या पदार्थाला त्याच्या सर्वात लहान रुपामध्ये परिवर्तीत केल्यावर त्याच्या मूळ गुणधर्मात काही बदल घडून येतात, त्याचाच अभ्यास म्हणजे Nano टेक्नॉलॉजी.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded, www.unipune.ac.in, www.jncasr.ac.in, www.mu.ac.in
बायो केमिस्ट्री
झपाटयाने प्रगती करणार्‍या मेडिकल क्षेत्रासोबत बायो केमिस्ट्री सुद्धा झपाटयाने वाढत आहे. मनुष्याच्या दैनंदिन जीवनाचा अभ्यास व ते अजून कसे सुधारता येईल याचा अभ्यास म्हणजे बायो केमिस्ट्री.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University, www.unipune.ac.in, Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded, www.mu.ac.in
पर्यावरण शास्त्र
पर्यावरणाची काळजी न घेण्याचे दुष्परिणाम माणसाला आता दिसू लागले आहेत. पर्यावरण शास्त्र हा पर्यावरणातील होणारे बदल, ऊर्जा वाचवण्याचे उपाय अशा काही पर्यावरणाशी निगडीत घटकांचा अभ्यासक्रम.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, www.unipune.ac.in, Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded, www.mu.ac.in
जीओलॉजीस्ट, होम सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, बायो इन्फोर्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, फोरेंसिक सायन्स या सारख्या काही कोर्सेसचे पर्यायही मुलांसमोर उपलब्ध असतात. अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.
Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University, www.unipune.ac.in, Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded, www.mu.ac.in