१२ वी नंतरच्या संधी




१२ वी हा शिक्षणाचा मत्त्वाचा टप्पा आहे. १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी विद्यापीठातील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. कोणतेही पदवी शिक्षण घ्यावयाचे झाल्यास १२ वी परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. १२ वी परीक्षा मुख्यतः खालील तीन शाखांमध्ये विभागली गेली आहे.

विज्ञान
वाणिज्य
कला
विद्यार्थ्याने आपली पात्रता व त्याला ज्या क्षेत्रात व्यवसाय करावयाचा आहे, त्या व्यवसायाची आवड विचारात घेऊन १० वी नंतरच वरील तीनपैकी एक शाखा निवडावी व आपल्या आवडत्या व्यवसायास पूरक पदवी शिक्षणास वा इतर अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा.
सामान्यतः १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी शिक्षणासाठी खालील संधी उपलब्ध आहेत.
ज्या शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्या शाखेतून पदवी शिक्षण
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण
त्या शाखेशी निगडित इतर अभ्यासक्रम
व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या व नोकरीच्या विविध संधी सहजरीत्या प्राप्त होऊ शकतात. परंतु व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी चिकाटी, कौशल्ये, मेहनत, चिकित्सक वृत्ती व गणितीय विषयांची आवड असणे आवश्यक असते.
करिअर मार्गदर्शनाविषयीच्या विशेष माहितीसाठी येथे क्लिक करा.