व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण


एखाद्या व्यवसायात कमी कालावधीत प्रवेश करावयाचा असल्यास ३ ते २४ महिने कालावधीचे व्यावसायिक शिक्षण उपयोगी ठरते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी कुशल कारागीर म्हणून नोकरी करू शकतो वा आपला स्वत:चा छोटासा उद्योग उभारू शकतो. Directorate of Vocational Education & Training, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, एन.एफ.टी.आय.; यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ ह्या व अशासारख्या इतर संस्थांव्दारे हे अभ्यासक्रम राबविले जातात.