पदवी अभ्यासक्रम


सृष्टीच्या निर्मितीचा शोध, अज्ञाताच्या प्रवासातून नवीन ज्ञानाचा शोध घेण्याचा मानवी ध्यास धारण करणार्‍यांची ही शाखा. कार्यकारणभाव याचा अभ्यास करून त्यास कारणीभूत ठरणार्‍या नेमकेपणाचा शोध घेऊन त्याच–त्याच पद्धतीने वारंवारिता साधल्यास
तोच-तोच परिणाम साधण्याचे गमक शोधण्याचे शास्त्र म्हणजे विज्ञानशास्त्र.
सारासार विवेक, व्यापक ज्ञानधारणेची वृत्ती, चाकोरीतील मानसिकता झुगारून वैज्ञानिक आधारावरच एखादी गोष्ट स्वीकारण्याची वृत्ती, गूढ बाबीकडे आकर्षण आणि त्यात सखोल अभ्यास करून उकल करण्याची प्रबळ इच्छाशक्ती, काळ-काम-वेग याचे सुयोग्य ज्ञान, गणित आकडेमोड करण्यात रस, पृथ:करणाचे अंग आणि कितीही ज्ञान / कौशल्य प्राप्त केली, तरीही अतृप्ततेची भावना या बाबी या शाखेकडे जाणार्‍या विद्यार्थ्यास आवश्यक आहेत.
बारावी (विज्ञान) ची परीक्षा विविध विषय घेऊन उतीर्ण करता येऊ शकते. परंतु आजही वैद्यकीय व अभियांत्रिकी असे दोन प्रमुख शैक्षणिक पर्याय उपलब्ध असल्यामुळे बारावी (विज्ञान) साठी सुद्धा जीवनशास्त्र (Biology) व गणित (Mathematics) असे दोन गट प्रामुख्याने समजण्यात येतात. बारावीनंतरच्या शिक्षणाच्या संधीसुध्दा विद्यार्थ्याने बारावीसाठी कोणते विषय घेतले यावर त्याच्या शिक्षणाच्या संधी ठरतात.
बारावी विज्ञान उतीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी वैद्यकीय, पशुवैद्यकीय, कृषी, कायदा संगणकशास्त्र, व्यवस्थापन इ. अंगे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध असले तरी शास्त्र विषयामध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन मूलभूत संशोधन, शिक्षण, उत्पादन व इतर विविध मार्गाने यश संपादन करणे सहज शक्य आहे.
बारावी नंतर पदवी (B Sc) अभ्यासक्रमासाठी अनेक विषय उपलब्ध असून आवडीनुसार, उपलब्धतेनुसार व नोकरीच्या उपलब्ध संधीत अनुसरून विषयांची निवड करता येऊ शकते.
पदवी अभ्यासक्रमासाठी सर्व साधारणपणे खालील विषय उपलब्ध आहेत.
मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, बॉरॅनी, झुलुओजी, केमिस्ट, फिजिक्स, बायोफिजिक्स, मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र), जिओलॉजी (भूगर्भशास्त्र), ओशनोग्राफी, होम सायन्स, फोरेन्सीक सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, पर्यावरणशास्त्र (इन्हॉव्हरमेंट), डेअरी अँड पॉस्टी, बायोटेक्नॉलॉजी, जीओफिजिक्स, इन्स्ट्रमेटेशन्, हायड्रोजीओलॉजी, ऑप्टोमेट्रिक, अप्लाइड एनर्जी स्टडीज इ.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालील प्रमाणे
Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University
Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded.
List of Colleges in Maharashtra
University of Pune
Courses in Astronomy & Astrophysics.