UPSC – Expected New Exam Pattern Mains 2013

Posted on

यु.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षेची जाहिरात (२०१३) येत्या एक आठवड्यात येणार असून त्यात अपेक्षित असलेले महत्वाचे बदल खालीलप्रमाणे असू शकतात:
  • मुख्य परीक्षेत असणारे वैकल्पिक विषय जसेच्या तसे राहतील परंतु प्रत्येकी २ पेपर ऐवजी १-१ पेपर राहतील व त्यांचे गुण सुद्धा दोन्ही मिळून ६०० असतील म्हणजे प्रत्येक पेपर ला ३०० गुण.
  • मुख्य परीक्षेत असणारे सामान्य अध्यानाचे पेपर्स वाढून त्यांची संख्या ४ होईल व प्रत्येकी गुण असतील ३००. चारही पेपर्स चे गुण असतील १२००.
  • मुख्य परीक्षेत असणारे बाकी पेपर्स जसेच्या तसेच असतील – इंग्रजी, भाषा पेपर व निबंध
  • मुख्य परीक्षा मात्र लेखी परीक्षाच राहील, MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी होणार नाही.
ह्याबद्दल सर्व माहिती यु.पी.एस.सी. ह्या आठवड्यात नक्कीच जाहीर करेल असे वाटते.
गोंधळून जावू नका, त्यांच्या जाहिरातीची किंवा अधिसूचनेची वाट बघा.
सर्वांना गुड लक !!!

लिपीक-टंकलेखक परीक्षा


1. संवर्ग व पदे याबाबतचा संक्षिप्त तपशील :
1.१ राज्य शासनाच्या सेवेतील लिपिक टंकलेखक, गट-क संवर्गातील पदे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धतेनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात :-
1.2 पदांचा तपशील -
(1) संवर्ग : अराजपत्रित, गट - क, पदे - (एक) लिपिक टंकलेखक - मराठी (दोन)लिपिक टंकलेखक - इंग्रजी
(२) नियुक्तीचे ठिकाण : पदे फक्त बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या कार्यालयाकरिताच आहेत.
(3) वेतनबँड व ग्रेड वेतन : रुपये 5,200 - 20,200, 1,900 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
(४) उच्च पदावर बढतीची संधी : ज्येष्ठता व पात्रतेनुसार सहायक किंवा लघुलेखक तसेच पदोन्नतीसाठी सेवाप्रवेश
नियमानुसार उपलब्ध असलेल्या संबंधित कार्यालयातील पदावर.
1.3 शासनाच्या मागणीनुसार भरावयाच्या पदांचा तपशील, पदसंख्या, आरक्षण, अर्हता, इत्यादी बाबी जाहिरात/अधिसूचनेद्वारे उमेदवारांना उपलब्ध करु न देण्यात येईल.
2. परीक्षेचे टप्पे :- फक्त लेखी परीक्षा.
3. अर्हता :
3.1 महाराष्र्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस. सी.)
किंवा महाराष्र्ट शासनाने एस.एस.सी. शी समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता.
3.2 लिपिक टंकलेखक मराठी या पदासाठी - मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट अथवा लिपिक
टंकलेखक इंग्रजी या पदासाठी - इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय
वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
3.3 उमेदवाराला मराठी लिहिणे, वाचणे, बोलता येणे अत्यावश्यक आहे.


परीक्षा योजना :
१ प्रश्नपत्रिका : एक. प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :-
विषय (संकेतांक 013) माध्यम दर्जा प्रश्नांची संख्या एकूण गुण कालावधी परीक्षेचे स्वरुप
मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुध्दिमापन आणि अंकगणित इंग्रजी विषयाकिरता इंग्रजी , इंग्रजी वगळता इतर विषयांकिरता मराठी माध्यमिक शालांत परीक्षेसमान. 200 400 दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी


२ अभ्यासक्रम :
(1) मराठी- व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर .
(2) इंग्रजी- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
(3) सामान्यज्ञान- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र , सामाजिक व औघोगिक
सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य, सर्वसाधारणपणे भारताच्या,विशेषकरुन महाराष्ट्राच्या
इतिहासाची व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न.
(4) बुध्दिमापन विषयक प्रश्न- उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो, हे आजमावण्यासाठी प्रश्न.
(5) अंकगिणत - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक, सरासरी आणि टक्केवारी.

पोलीस भरती विषयी

पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदावरील निवडीसाठी उमेदवारांकडे खालील नमूद वय, शैक्षणिक व शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे.
1) अ) वय - कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 25 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या धोरणानुसार उच्चतम वयोमर्यादेत सूट असेल).
ब) शैक्षणिक अर्हता - इयत्ता 12 वी पास किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण.
क) शारीरिक पात्रता - महिलांकरिता पुरूषांकरिता
उंची 155 से.मी. पेक्षा कमी नसावी.
165 सें.मी. पेक्षा कमी नसावी. छाती
न फुगवता 79 से.मी. पेक्षा नसावी व
फुगवलेली व न फुगवलेली छाती यातील
फरक 5 सें.मी. पेक्षा कमी नसावा.


2) शैक्षणिक व शारीरिक पात्रततेत द्यावयाची सूट :
अ) नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद. इयत्ता 7 वी पास उत्तीर्ण. उंची - 2.5 सें.मी., छाती - मोजमापाची आवश्यकता नाही.
ब) पोलिस बँड :
अ) शैक्षणिक अर्हता : इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
ब) शारीरिक पात्रता : उंचीमध्ये 2.5 सें.मी. सवलत, छाती - 2 सें.मी न फुगवता व 1.5 सें.मी. फुगवून सवलत.
क) खेळाडू प्रवर्ग - उंचीच्या अटीमध्ये 2.5 सें.मी. इतकी सूट.


3) (1) शारीरिक चाचणी : (100 गुण)
अ) पुरूष उमेदवार :
ब) महिला उमेदवार
1) 5 कि.मी. धावणे - 20 गुण
1) 3 कि.मी. धावणे - 25 गुण
2) 100 मी. धावणे - 20 गुण
2) 100 मी. धावणे - 25 गुण
3) गोळा फेक - 20 गुण
3) गोळा फेक (4 कि.ग्रॅ.) - 25 गुण
4) लांब उडी - 20 गुण
4) लांब उडी - 25 गुण 5) 10 पुल अप्स् - 20 गुण
एकूण - 100 गुण एकूण - 100 गुण


4) लेखी परीक्षा : (100 गुण, वेळ : 90 मिनिटे) लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :
1) अंकगणित, 2) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, 3) बुध्दिमत्ता चाचणी, 4) मराठी व्याकरण.
लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे असतील.


5) आरक्षण :
1) खेळाडू प्रवर्ग : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानु सार उपलब्ध पदांच्या 5 टक्के पदे खेळाडूंसाठी राखीव असतील.
2) महिला : उपलब्ध असलेल्या एकूण पदांच्या 30 टक्के पदे राखीव असतील.


मित्रांनो
परवाच तुम्ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली, नाही का? मग आता काय निवांत?
तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नक्कीच विचार केला असेल की चला आता निवांत आठ पंधरा दिवस आराम करू या, खूप अभ्यास झाला मागील काही महिन्यान पासून, होय की नाही? अगदी बरोबर आहे तुमच पण काय हो इतके दिवस जास्त होत नाहीत का आराम करायला?
पण तसं पाहाल तर २ दिवस ठीक आहेत हो आराम करायला, मूड फ्रेश करायला कारण आता येणारी मुख्य परीक्षा म्हणजे फारच कठीण आहे आणि त्या परीक्षेसाठी तर अजूनच मेहनत करावी लागणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर २०१० मध्ये घेण्यात येईल. तुमच्याकडे फक्त ५ महिन्यांचा कालावधी आहे तयारीसाठी.
बऱ्याच जणांना माहित नसेल की ही एम पी एस सी मुख्य परीक्षा तुमच्या कॉलेजच्या परीक्षेपेक्षा फार वेगळी असते.
ह्या परीक्षेत सफल होण्यासाठी आणि मेरीट लिस्ट मध्ये चांगल्यापैकी नंबर मिळवायचा असेल तर मग तुमचं सर्व लक्ष आता ह्या लेखी परीक्षेवर केंद्रित कराव लागणार आहे, हे लक्षात ठेवा.
सर्वसाधारण पाहाल तर, एम पी एस सी ची परीक्षा देणारे फ्रेश पदवीधारक असतात. बरेचजण पहिल्यांदाच ही परीक्षा देत असतात. तुम्ही सुद्धा त्यातीलच असाल असं मला वाटते, हो ना?
पूर्वपरीक्षा मल्टीपल चोइस म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाची असते आणि मुख्य परीक्षा ही सब्जेक्तीव्ह स्वरूपाची असते. तुमच्या कॉलेजची परीक्षा असते तशीच असते पण उत्तरांचं स्वरूप खूप वेगळं असते. कॉलेजच्या परीक्षेत विषयाचं कितपर्यंत ध्ण्यान आहे हे तपासण्यासाठी प्रश्न विचारले असतात पण एम पी एस सी मुख्य परीक्षेचा उद्देश काही वेगळाच असतो. जे कोणी कोलेजच स्टायील मध्ये उत्तर लिहितात ते ह्या मुख्य परीक्षेत नापास होतात. ह्याच कारण हेच की एम पी एस सी निवड करते ती विद्वानाची नाही तर चांगले प्रशासक होवू शकतील अशांची, ज्यांच्याकडे वैचारिक शक्ती आहे त्यांची.
हे सांगायचं तात्पर्य हेच की मुख्य परीक्षेसाठी आकलनशक्ती लागते. प्रश्नांना समजून त्यांच उत्तरं लिहाव लागते. पण त्या आधी ते उत्तरं प्लान कराव लागतं. उत्तरात तुम्ही काय लिहिता ह्याला मार्क्स मिळत नाहीत तर तुम्ही काय लिहित नाही ह्याला मार्क्स मिळतात. समजल का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? जे नको आहे ते जर तुम्ही लिहिलं नाही त्यालाच छान उत्तरं म्हणतात.
मला माहित आहे तुम्ही फार हुशार आहात आणि मुख्य परीक्षेसाठी सिरीयस पण आहात. पण अशा खूप महत्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्हाला माहित नाहीत आणि कुणी सांगत पण नाही; कारण स्पर्धा खूप असते प्रत्येकामध्ये आणि आपणच सफल व्हावं हे उद्दिष्ट असते सर्वांपुढे म्हणून बर्याचशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात पण मी असं करत नाही आणि करणार पण नाही.
मी सर्व गोष्टी इथेच लिहित बसलो तर बरेच दिवस जातील आणि तुमच्याकडे इतका वेळ पण नाही. म्हणून मी एक वेगळा मार्ग शोधला आहे. तो म्हणजे एक संपूर्ण पुस्तकं लिहायचा, ज्यामध्ये सर्वच गोष्टी स्पष्ट करता येतील.
मी “एम पी एस सी सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” हे पुस्तकं लिहित आहे. हे पुस्तकं एम पी एस सी मुख्य परीक्षेसाठी यशाच एक मंत्रच राहणार आहे.
ह्यात काय राहणार आहे? हे बघा सध्या मार्केट मध्ये खूप सारं स्टडी मटेरियल आहे त्यामुळे माझं पुस्तकं असल्याप्रकारच राहणार नाही. मग वेगळं काय असेल ह्यात आणि आम्ही हे पुस्तकं का घ्यावं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल?
बघा जर का युद्धात लढायचं असेल, तलवारी पण असतील पण त्या कशा चालवायच्या हेच माहित नसेल तर युद्ध जिंकता येईल का?
तुमच्याकडे स्टडी मटेरियल खूप आहे पण त्याचा वापर योग्य प्रकारे कसा करायचा आणि मुख्य परीक्षेत पास कसं व्हायचं, मेरीट लिस्ट मध्ये वरती कसं येता येईल हेच माहित नसेल तर त्या महागड्या स्टडी मटेरियल चा काय फायदा?
म्हणून मी तुम्हाला यशाच मंत्र देणार आहे ह्या पुस्तकाच्या रुपात.
ह्या पुस्तकात खालील माहिती राहणार आहे:
  • मुख्य परीक्षा कशी असते?
  • ह्या परीक्षेसाठी कोणाला प्रवेश देण्यात येतो?
  • शैक्षणिक अहर्ता काय असावी लागते?
  • ही परीक्षा केव्हा असते?
  • ह्या परीक्षेचं फॉर्म कुठे मिळतो व फी किती असते?
  • कोण-कोणती कागदपत्रे लागतात?
  • फॉर्म कुठे जमा करायचा असतो?
  • फॉर्म जमा करण्यापूर्वी काय नोट करून ठेवायचं असतं?
  • परीक्षेच्या वेगवेळ्या स्टेजेस कोणत्या असतात?
  • किती पेपर्स असतात, कोणते, मार्क्स, प्रश्न किती?
  • कोण-कोणते विषय उपलब्ध असतात आणि कोणते विषय मी निवडायला पाहिजे, आणि का?
  • परीक्षा केंद्र कुठे असतात? कोणतं केंद्र निवडायला पाहिजे आणि का?
  • सर्वच जण ह्या परीक्षेत सफल होवू शकतात का? नाही तर मग कोण होवू शकते?
  • मी तर ऐकलं आहे की फक्त हुशार विद्यार्थीच सफल होतात मुख्य परीक्षेत, पण मी तर इतका हुशार नाही, मग माझ काय?
  • दररोज किती वेळ अभ्यास करावा लागेल ह्या परीक्षेत सफल व्हायला? आणि किती दिवस करावा लागेल?
  • जास्तीत जास्त उमेदवार का नापास होतात राज्यसेवा मुख्य परीक्षेत?
  • मुख्य परीक्षेत सफल कसा होवू शकतो मी?
  • मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि कसा असतो?
  • अनिवार्य विषय कोणते असतात आणि त्याला काय महत्व आहे मुख्य परीक्षेत?
  • कमीतकमी किती गुण मिळाले पाहिजे मुख्य परीक्षेत?
  • जर मला मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले पण मुलाखतीत नाही तर काय होणार?
  • कमीतकमी किती गुण मिळाले पाहिजे मुलाखतीत?
  • मुख्य परीक्षेत कसे प्रश्न येतात? त्यांचं स्वरूप कसं असतं आणि त्यांचे उत्तर कसे लिहावेत?
  • वेगवेगळ्या टर्म्स कोणत्या आहेत प्रश्नाच्या? काय अर्थ आहे त्यांचा?
  • मुख्य परीक्षेसाठी किती पुस्तकं असतात?
  • मी तर ऐकलं आहे की जवळपास ३० पुस्तके असतात तर मग इतक्या पुस्तकांचा अभ्यास कसा शक्य आहे? मला नाही जमणार हे.
  • ह्या पुस्तकांचा अभ्यास करायचाच असेल तर मग केव्हा आणि कसा करू? काही प्लानिंग करावं लागेल का?
  • स्टडी प्लान कसे बनवतात? दररोजचा/आठवड्याचा/महिन्याचा/तीन महिन्याचा/सहा महिन्याचा/एक वर्षाचा/दोन वर्षाचा स्टडी प्लान कसा तयार करू?
  • मला पर्सनल स्टडी प्लान बनवून मिळेल का?
  • प्रत्येक विषयासाठी कोणते पुस्तकं वापरू? कोणत्या टॉपिक साठी कोणतं पुस्तक वापरू?
  • कोणते विषय मी निवडू मुख्य परीक्षेला? कोणते निवडायला पाहिजेत?
  • स्टडी मटेरियल कसं आणि कुठून घेवू?
  • नोट्स कसे बनवू? कसे असतात हे नोट्स आणि जरुरी आहे का हे नोट्स बनवणं?
  • अभ्यास कसा करू? इंतेन्सीव की एकस्तेन्सीव?
  • कोणत्या टोपिक्सना महत्व द्यावं?
  • उत्तरं कसे असावेत आणि कसे लिहावेत? उत्तरं लिहितांना काही प्लानिंगची खरच गरज आहे का?
  • परीक्षकाला आमच्याकडून काय अपेक्षित असते उत्तरांमध्ये?
  • कोणती मासिकं वाचायला पाहिजेत?
  • परीक्षेत उत्तरं लिहितांना वेळेचं महत्व काय आहे आणि वेळ कसा म्यानेज करावा?
  • आता उपलब्ध असलेल्या वेळेत इतका अभ्यासक्रम कसा काय कम्प्लीट करू?
  • प्रश्न कसे असतील हे मला अगोदर कळेल का, म्हणजे मी तशी तयारी करून घेईल?
  • चालू घडामोडी वर कसे प्रश्न असतात, ह्याची तयारी कशी करू? कोणत्या महिन्यापर्यंत च्या घडामोडी वर लक्ष केंद्रित करू?
  • रेफरन्स पुस्तकं कोणते आहेत आणि कुठे मिळतील? इंडिया इयरबुक, मनोरमा इयरबुक, वगेरे?
  • ह्या रेफरन्स पुस्तकातून काय काय वाचू, हे पुस्तकं तर खूप मोठ-मोठे आहेत?
  • जुन्या प्रश्न पत्रिका कुठे मिळतील आणि त्या सोडवायचा सराव करू का? काय होईल नाही सराव केला तर?
  • रिविजन म्हणजे काय? सर्वच पुस्तकं परत परत वाचू का? असं करायची काय गरज आहे, मी तर अगोदरच त्यांचा अभ्यास केला आहे ना, मग?
  • रिविजन कशाची करू तर मग? आणि केव्हा करू?
  • मॉक एग्झाम काय असतात आणि त्यांचं महत्व तरी काय आहे?
  • मुख्य परीक्षेचा टाईम टेबल केव्हा आणि कुठून मिळेल?
  • मुलाखत काय असते आणि तिचं महत्व काय आहे मुख्य परीक्षेत?
  • मुलाखतीसाठी काय तयारी करावी लागते?
  • काय आणि कोणते कपडे घालू मुलाखती साठी?
  • तिथे मुलाखत रूम मध्ये कोण असते, कोणाला आधी नमस्कार करू?
  • खुर्चीवर केव्हा आणि कसं बसू? पाय कसे ठेवू? हसू की सिरिअस राहू?
  • मुलाखतीत काय विचारतात, कसे उत्तरं द्यावे लागतात?
  • मुलाखतीत जास्तीत जास्त गुण कसे मिळतील मला?
  • ते मला प्रश्न विचार म्हटले तर मी काय प्रश्न करू त्यांना?
  • फायनल मेरीट लिस्ट केव्हा लागते आणि माझा नंबर लागेल का त्यात?
  • आणि अनिल सर तुमच्या मदतीनं लागलाच तर मला काय कराव लागेल?
  • काही ट्रेनिंग राहील का मला माझ्या जॉबवर? की डायरेक्ट नौकरी सुरु?
  • असे प्रश्न तुमच्या मनात असतील आणि ह्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांचा तर तुम्ही स्वप्नातही विचार केलं नसेल, होय की नाही?
म्हणूनच तर म्हणतो की हे पुस्तकं म्हणजे एम पी एस सी मुख्य परीक्षेमध्ये यश मिळावं त्याचं मंत्रच आहे, तर मग आत काय कराल?
चला आजच ह्या पुस्तकाची बुकिंग करा कारण मी फक्त जे बुक करतील त्यांच्यासाठीच छापणार आहे.
जास्त माहिती करिता व कसं बुक करायचं ह्याबद्दल माहिती इथे आहे: http://anilmd.wordpress.com/mpsc-success-mantra-the-complete-manual/
आणि इथे सुद्धा: http://wp.me/PPyoH-5h
तर मग कशाची वाट बघता, कसला विचार करता आहात?
तुमची स्वताची एक प्रत आजच बुक करा, आजच काय आताच.
=====================================================

Dont Waste Your Precious Time – Start Your Preparation for MPSC Main Exam 2010

Hi Friends
Now your MPSC Prelims (Purvapariksha) is over. Please do not waste your time anymore. Start your preparation as soon as possible for the next hurdle, i.e. MPSC Main Exam which will be conducted in the month of Nov/Dec 2010.
MPSC Main Exam is NOT like your college exam. It is totally different. This is the toughest exam for Government services.
To succeed and secure a very good place in the final merit list, you need to give highest attention to this written exam. Usually, candidates are fresh graduates/post-graduates who appear in MPSC Exam, so they are trained for university exams that tests them for subject knowledge based on the range of their memory. They are habitual of writing complete and detailed answer on the subject matter and they try to answer in the same style in MPSC Main exam. And the result is that they FAIL in this exam. You know why?
MPSC does not recruit academicians, it recruits good administrators.
Therefore, you need to answer the questions in an analytical, critical, comparative way. This is what MPSC looks for in the candidates.
After reading and understanding the question in Main exam paper, you have to plan your answer before writing it. You get marks not for what you write but for what you don’t write. This is the trick to write very informative answer and not anything irrelevant.
I know you are very ambitious and very serious about MPSC Main Exam 2010 but you need proper guidance. Because the competition is very tough and you want to succeed in this attempt itself. Am I right?
Selection of books for optional subjects is also very important. There are so many issues that I can’t write about all of them here; so I have chosen a different way.
At this moment, I am writing the “MPSC Success Mantra – The Complete Manual” which will solve all of your problems. It will not be a study material type book but a guide that will deal with the following:
  • making you understand the structure of the exam
  • make you ready for the exam
  • Who is eligible?
  • Edn qualifications, Age, Attempts
  • Categories, Reservations
  • Exam notification
  • Where to get Exam forms
  • Fees
  • Any Certificates to be attached
  • Where to submit form
  • Recording of Form number for future use
  • Stages of exam
  • Papers, marks, types of questions, time allowed
  • What are the optional subjects available?
  • What are the exam centers for the Main Exam?
  • Can anyone be successful at this exam?
  • I heard that only intelligent candidates can clear this exam
  • How much time should you dedicate for the study everyday?
  • Why Most Candidates Fail in MPSC State Services Examination?
  • How to succeed in MPSC main exam?
  • Understanding the Main exam in detail
  • main exam Syllabus
  • Compulsory Subjects and their importance
  • Minimum Marks Required to Qualify for Interview
  • Understand question types, the terms, and how to solve question paper GS
  • Understand question types, the terms, and how to solve question paper Optionals
  • Study Plans – Yearly/Quarterly/Monthly/Weekly/Daily
  • Personal study plan – Main exam
  • What books to refer for each subject? Topics-wise books
  • what the examiner wants from you
  • choosing your optional subjects
  • collecting study material
  • planning your studies over next 1/3/6/12 months
  • various study plans
  • how to make notes during your preparation
  • intensive or extensive study
  • which books/magazines to refer/read
  • how to write the answers
  • time management during exam
  • what books to refer for the subjects
  • what portions to be given importance
  • how to cover the syllabus in given time
  • what types of questions will be asked
  • how you should write the answers
  • Current affairs
  • What to Study from India Year Book
  • Importance of solving old question paper sets and when to solve
  • Revision
  • Important topics to be specifically read
  • Mock exams and their importance
  • Exam time table, where to get it from
  • All about the Interview and scoring high in it.
  • and much more
So it will be a complete Bible like manual on how to succeed in MPSC Main Exam?
Please book your copy TODAY
More information is available at this location:
http://anilmd.wordpress.com/mpsc-success-mantra-the-complete-manual/
and
http://wp.me/PPyoH-5h
What are you waiting for?
Book your own copy of the Manual, TODAY

मध्यम व मोठा उद्योग


मराठवाडयातील सर्वसामान्य माणसांना उद्योगात पडण्यासाठी प्रोत्साहन हवे असते. त्याची आवश्यकता लक्षात घेऊन या वेबसाईट संबंधीत माहिती दिलेली आहे. जिल्हा उद्योग केंद्रात लघु उद्योग म्हणून नोंदणी करण्यापासून ते राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाकडे कशाप्रकारे अर्ज करावेत, याची लघु उद्योजकांना माहिती असणे आवश्यक आहे. उद्योग लघु, मध्यम वा मोठा असो, खेळत्या भांडवलापासून ते उद्दिष्टित व्यावसायिक उपक्रमांचे नियोजन करता आले पाहिजेत. आणि त्यानंतर या पूर्ततेसाठी कोणकोणत्या शासकीय संस्था, बँका, महामंडळे साहाय्यभूत ठरतात, हे या संकेतस्थळावर सांगितलेले आहे.



जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र व जिल्हा उद्योजकता केंद्र ह्या सारखे सरकारी कार्यालये उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत असतात. तुम्ही ठरवलेल्या व्यवसायाच्या लेखी आराखडा इथे घेऊन गेल्यास ते भांडवला पासून ते व्यवसाय सुरळीत चालू होई पर्यंत आपणास सहकार्य करतात.



अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.

Ministry of corporate Affairs

MIDC

mced.nic.in

www.dcmsme.gov.in

www.mitconindia.com

Bank of Maharashtra Schemes for Self Employment

ese.mah.nic.in

dget.nic.in

Ministry of Labour

Mahashram, MAH State Labour Laws

Schemes of Central Government

Industrial Development Bank of India



MSME च्या व इतर काही स्कीम्स

Scheme of Surveys, Studies and Policy Research

Entrepreneurship Development Institution Scheme

Scheme of Fund for Regeneration of Traditional Industries (SFURTI)

Rajiv Gandhi Udyami Mitra Yojana (RGUMY)

Marketing Assistance Scheme (Implemented through NSIC)

Performance and Credit Rating Scheme (Implemented through NSIC)

Industrial Licencing Policy

Technology Upgradation Fund Scheme

Infrastructure Strengthening of Leather Sector

Software Technology Parks Scheme

Prime Minister's Employment Generation Programme (PMEGP) (Implemented through KVIC)

Product Development, Design Intervention and Packaging (PRODIP) (Implemented through KVIC)

Khadi Karigar Janashree Bima Yojana for Khadi Artisans (Implemented through KVIC)

Interest Subsidy Eligibility Certification (ISEC).

Credit Guarantee Fund Scheme

National Small Industries Corporation Ltd.

National Manufacturing Competitiveness Council

Investment in Intellectual Property

कुटीर उद्योग


कुटीर उद्योग एक प्रकारचा निर्मिती उद्योग आहे, ज्यामध्ये अनेक उद्योजक घरातूनच वस्तूंचे उत्पादन करत असतात. उद्योगक्रांती येण्याअगोदर कुटीर उद्योगांचा चलनवाढीमध्ये व प्रगतीमध्ये मोठा सहभाग होता. तसेच भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे अजूनहि कुटीर उद्योग भारतात मोठ्या प्रमाणावर चालतात. कुटीर उद्योगासाठी लागणारे भांडवल आणि मनुष्य बळ अत्यंत कमी असल्या मुळे अजून हि कुटीर उद्योग भारतात लोकप्रिय आहेत. कुटीरद्योगांतर्गत विविध प्रकारचे गृहउद्योग असतात, जसे अगरबत्ती, कापडी पिशव्या बनवणे, शेवया बनवणे इत्यादी. अशा प्रकारच्या उद्योगास आज किराणा दुकान, कंपनी व इतर मेगामार्टस् मध्ये अशा घरगुती पदार्थांना खूप भाव असतो आणि खाद्यपदार्थांची विक्रीहि खूप असते.



जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र व जिल्हा उद्योजकता केंद्र ह्यासारखे सरकारी कार्यालये उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत असतात. तुम्ही ठरवलेला व्यवसायाचा लेखी आराखडा इथे घेऊन गेल्यास ते भांडवलापासून ते व्यवसाय सुरळीत चालू होईपर्यंत आपणास सहकार्य करतात.



अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.

Khadi & Village Industries Commision

Maharashtra Industrial Development Corporation

Cottage Emporium India

India Business Website

Schemes of Central Government

Schemes for Self Employment

Maharashtra Centre For Enterpreneurship Development

Mitcon India

Ministry of Food Processing Industries

Minority Development, Maharashtra

Ministry of Labour

Mahashram, MAH State Labour Laws



कुटीर उद्योगासंबंधित काही उद्योग खालीलप्रमाणे

शेवया

पापड बनविणे

घरगुती खानावळ

चिक्की

फोटो ग्राफी

साडीचा पिको फॉल तयार करणे

अगरबत्ती

कापडी पिशव्या

सुगंधित सुपारी

शेती उद्योगातील संधी



आपला देश मुळातच कृषिप्रधान आहे. मराठवाडा काय, महाराष्ट्र काय आणि संपूर्ण भारत काय, जवळपास ७०% जणांना कृषि क्षेत्रातूनच जगण्यासाठी संजीवनी मिळते आहे. शेती भारताच्या आर्थिक विकासामध्ये सर्वात जास्त म्हणजे १८.५ % योगदान करते. RABO बँकेच्या अहवाला नुसार शेती क्षेत्रात ३०% हून अधिक वाढ झाली आहे. आधुनिक शेती कशी करावी, शेतमालाला कोणकोणती बाजारपेठ उपलब्ध आहे, पिकांची उत्पादकता कशी वाढवावी, नैसर्गिक संकटाच्या वेळी कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी, शेतकर्‍यांना शासनाकडून कोणकोणत्या सवलती मिळतात, शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन शिबिरे कशी होतात इत्यादिसंबंधीची माहिती या वेबसाईटवर दिलेली आहे.
शेती साठी अनुकूल असलेले वातावरण व शेतीवर आधारित अर्थ व्यवस्था ह्या मुळे शेती ला केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक प्राधान्य प्राप्त झाले आहे भारत हा नारळ, आंबा, केळी, काजू, हळद व अनेक इतर पिकांसाठी जगातील आघाडीचा देश आहे.
भारत सरकार ची Agriculture & Processed Food Export Development (APEDA) हि शेती शेती व्यापाराला प्रोत्साहन देणारी संस्था कार्यरत आहे. तसेच EXIM बँक आयात निर्यात करण्यासाठी साहाय्य पुरवीत असते. भारतात सध्या ६० नवीन ची घोषणा झाली आहे. हे सर्व असून हि निव्वळ असाक्षारता, योजनाची माहिती नसणे, योग्य व्यवस्थापन नसणे या कारणांमुळे उत्पादनात प्रचंड घट होत आहे.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.
www.agricoop.nic.in
Indian Governments Agricultural Portal
Department of Rural Development
List of all important agricultural websites in India
www.nabard.org
Agricultural market website
Maharashtra Government Agriculture Department
Ministry of Labour
Mahashram, MAH State Labour Laws
शेतीशी निगडित व इतर काही स्कीम्स.
Schemes of National Resource Management
Micro Management of Agriculture Schemes
Technology Mission for Oil Seeds, Pulses & Maize
Technology Mission on Horticulture
Technology Mission on Cotton
National Food Security Mission
Post Harvest Technology & Management
Watershed Bamboo Mission
Farm Training & Testing Institutes
Central Seed Certification Board
Protection of Plant varieties & Farmer's Rights legislation
Fertilizer Quality Control
Kisan Call Center
Integrated Nutrient Management
National Project on Organic Farming
Gramin Bhandaran Yojana
National Project on Management of Soil Health & Fertility
Trade Related aspects of Intellectual Property Rights
APMC
Agriculture Marketing Advisory
Small Farmers Agriculture Consortium
शेतीशी निगडित असलेले काही उद्योग खालीलप्रमाणे.
हॅचरी
कुक्कुट पालन
शेळीपालन
गांडूळ खत
इमू फार्मिंग
फुल शेती
धान्याची प्रतवारी करणे
फळांचा मुरब्बा
शुगर ग्लोबुल्स
वनौषधी वनस्पती लागवड
टाकाऊ शेतमालाचा उपयोग
ग्रामीण गोदाम योजना

लघुउद्योग

उद्योग-व्यवसाय करण्याची अनेकांची इच्छा असते. उद्योग करायची ज्यांनी ठरवले आहे, त्यांनी आधी उद्योगाबाबत योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. शिवाय अनेक बाबींचा अभ्यास होणेही आवश्यक आहे. उद्योगासाठी केवळ चर्चा करून उपयोग नाही तर गरज आहे ती आत्मपरीक्षण, चिंतन कृती आणि संघर्ष करण्याची गुप्त सृजनशीलतेचा वापर करून स्वत:तील गुण-दोष ओळखून, अचूक गुणांचा वापर करून उद्योग-व्यवसायात यशस्वी होण्याची. उद्योजक होण्यासाठी उत्पादनाची निवड, त्याची मागणी, त्यासाठी बाजारपेठेची उपलब्धता या सर्व गोष्टी जरी आवश्यक असल्या तरी नवनिर्मिती इर्षां, धडपड करण्याची तयारी, कष्ट करण्याची वृत्ती, सामथ्र्य असायलाच हवे.

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र व जिल्हा उद्योजकता केंद्र ह्या सारखे सरकारी कार्यालये उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत असतात. तुम्ही ठरवलेल्या व्यवसायाच्या लेखी आराखडा इथे घेऊन गेल्यास ते भांडवला पासून ते व्यवसाय सुरळीत चालू होई पर्यंत आपणास सहकार्य करतात.

अधिक माहिती साठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.
MAHARASHTRA SMALL SCALE INDUSTRIES DEVELOPMENT CORPORATION
www.msme.gov.in
Maharashtra States Portal for Employers
MIDC
www.business.gov.in
Ministry of Food Processing Industries
Minority Development, Maharashtra
Ministry of Labour
Mahashram, MAH State Labour Laws
Schemes of Central Government
Schemes for Self Employment
mced.nic.in
www.mitconindia.com

लघुउद्योगासंबंधित काही उद्योग खालीलप्रमाणे :
इंटरनेट सेंटर
इलेक्ट्रीशियन
ऑटो रिपेअरिंग
जॉब वर्क्स
नर्सरी
नर्सरी
मोटार वायडिंग
वॉच रिपेअरिंग
Fabrication उद्योग
I.Q.F-project
फिनेल निर्मिती उद्योग
कोल्ड स्टोरेज उद्योग
रेशीम उद्योग
सोलर उपकरण उद्योग
डाटा एन्ट्री
चप्पल व बूट विक्री
व्हिडिओ शूटिंग
P.V.C
Rubber Stamp
ब्युटीपार्लर
व्यांयांमशाळा
विमा क्षेत्र
जनरल इंजिनीरिंग कंपनी
एकाउंट कंपनी
Event management
सॉफ्टवेअर व वेब साईट कंपनी
कॉल सेंटर

सरकारी नोकरी


कॉपोर्रेट जगतात दिमाखाने वावरुन लाखो रुपये कमावण्याकडे हल्लीच्या पिढीचा ओढा दिसतो. पण नुकत्याच जाहीर झालेल्या सहाव्या वेतन आयोगामुळे आजच्या तरुणांचा हा दृष्टीकोन बदलला आहे. खाजगी क्षेत्राप्रमाणे सरकारी नोकरीतही भरपूर पगार मिळू लागले आहेत. सरकारी नौकरी म्हणजे जॉब सेकुरीटी हि आलीच, चांगला पगार, मिळवलेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची संधी आणि लोकांकडून मिळणारा मान सरकारी नोकरीत मिळतो.
शासनाकडे ज्या ज्या खात्यांमध्ये रिक्त जागा आहेत, त्यासंबंधी माहिती उपलब्ध करून देणार्‍या काही वेबसाईट येथे दिल्या आहेत. सुरक्षिततेची नोकरी म्हणून शासकीय नोकरीकडे पाहिले जाते. केंद्र व राज्य शासनाकडे कोणकोणत्या नोकर्‍या मिळू शकतात यासंबंधी रोजगार मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेली पत्रकेही येथे पाहता येतील.
१० वी व १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी क्षेत्रात अमाप संधी आहेत. १० वी, १२ वी नंतर विद्यार्थी फायरमन, जुनिअर क्लार्क, सफाई वाला, एलेक्त्रिशिअन अशा भरपूर पदांवर रुजू होऊ शकतो. १० वी पास झालेल्याला बहुत करून प्रत्येक सरकारी विभाग मध्ये लोवर डिविजन क्लार्क ची पदे असतात. तसेच पोस्ट ऑफिस, इंडिअन आर्मी या सरकारी ऑफिसेस मध्ये सुधा भरपूर पदे असतात.
पदवी धर विद्यार्थी राज्य सेवा परीक्षा किंवा संघ लोक सेवा आयोग सारख्या परीक्षा देऊन उच्च पदावर कार्यरत होऊ शकतो. मेहनत करण्याची तयारी असेल तर ह्या परीक्षा पास करणे अवघड नसते. 

खाजगी नोकरी



रोजगाराच्या संधी केवळ शासकीय यंत्रणेत आहेत, असे दिवस केव्हाच संपले आहेत. शासनाच्या विविध खात्यांमध्ये नेहमी नोकर भरती चालू असते, तसेच आता खाजगी क्षेत्रातही मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. प्रत्येक कार्यालयाला मनुष्यबळाची गरज ही असतेच.
खाजगी क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार पुरवणारी यंत्रणा म्हणून पुढे आली आहे. जरी सरकारी नोकरीसारखी सुरक्षितता नसली तरी खाजगी नोकरीत प्रगतीसाठी खूप संधी असते. कारण जर तुमच्यामध्ये मेहनत करण्याची तयारी आणि गुणवत्ता असेल तर तुम्ही खाजगी नोकरीत यशाचे शिखर लवकर गाठू शकतात. खाजगी नोकरी गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य देते त्यामुळे खाजगी क्षेत्रात जाणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एवढेच नव्हे तर खाजगी क्षेत्रामुळे सर्वसाधारण व्यक्तिमत्त्वही खुलते.
परदेशात जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. स्वखर्चावर परदेशात जाणे सोपे नसते. अशा वेळेस खाजगी नोकरी ही सर्वोत्तम म्हणता येईल. वाढत्या संगणकीकरणामुळे व विदेशी उद्योगांमुळे अनेकांना खाजगी नोकऱ्या परदेश जाण्याच्या संधी देत असतात.

सी. ए. Charterd Accountant


सध्याचे युग हे जागतिकीकरण व उदारीकरणाचे आहे. त्यामुळे व्यापाराला उदंड संधी आहेत. व्यापार आला की हिशोब व्यवस्थितपणा, करप्रणाली, अभ्यास इत्यादी बाबी आल्याच. त्यासाठी Charterd Accountant ची फार मोठया संख्येने गरज आहे. भारतात यासाठी मुबलक संधी आहेत. शिवाय वाणिज्य शाखेतील प्रत्येक विध्यार्थ्याला सी ए व्हावे वाटते कारण इंजीनिअर किंवा डॉक्टरइतकेच ल्गॅमर या व्यावसायिकाला दिसून येते. 

यात आर्थिक उत्पन्न ही चांगले मिळते. जागतिकीकरणामुळे सीए व्यक्तीला जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळू शकते. बँक, शैक्षणिक किंवा इतर मोठया संस्थांची आर्थिक तपासणी करण्यासाठी Charterd Accountant ची आवश्यकता असते. कर सल्लागार म्हणूनही या व्यक्ती काम करू शकतात. शिवाय संबंधित विविध क्षेत्रातही नोकरीच्या विविध संधी आहेत. स्वतंत्र व्यवसाय करता येतो.

पात्रता व निवड पद्धती :

बारावीच्या परीक्षा देणाऱ्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षा ( सीपीटी कॉमन प्रोफिशंसी टेस्ट ) देता येते. प्रथम, द्वितीय अथवा तृतीय वर्ष (पदवी) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश परीक्षेस बसता येते. एकूण दोनशे गुणांची ही प्रवेश परीक्षा असते. प्रवेश परीक्षेत एकूण शंभर गुण मिळविणे आवश्यक असते. या परीक्षेसाठी चुकीच्या गुणासाठी उणे मार्क -निगेटिव्ह मार्किंग ( एक चूक उत्तरासाठी ०.२५ गुण उणे होतात) पद्धत आहे. वरील सीपीटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवाराला व्यावसायिक Charterd Accountant कडे साडे तीन वर्षाची आर्टिकलशिप करावी लागते. सुरवातीच्या अठरा महिन्यांनंतर विद्यार्थी पीसीसी ( Professional Competency Course ) परीक्षेला बसू शकतो. अर्थात पूर्ण साडेतीन वर्षे ( बेचाळीस महिने ) आर्टिकलशिप केल्यावरच सी. ए. परीक्षेला बसता येते. सी.ए.परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेची जबाबदारी आय सी ए आय ( Institute of Charterd Accountants of India ) हि संस्था पार पाडते. Cost and Management Accountant ( सी एम ए ) सी.ए. (Charterd Accountant) प्रमाणेच हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी आहेत. प्रत्येक वस्तूचे भाव वाढण्याची प्रक्रिया चालू असते. यावर नियंत्रण ठेवावे लागते. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात. किंवा नोकरी प्राप्त करू शकतात. Cost Accountant म्हणून practice करता येते.

पात्रता व निवड पद्धती : कोणत्याही शाखेचा पदवीधर या कोर्ससाठी अर्ज करू शकतो. जे उमेदवार पदवीधर नाहीत त्यांना प्रथम प्रवेश परीक्षा द्यावी लागते. फौंडेशन परीक्षेसाठी प्रत्येकी १०० गुणांचे चार पेपर्स द्यावे लागतात. फौंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवार इंटरमिजीएट परीक्षेला बसू शकतो. नंतर उमेदवार अंतिम परीक्षा ( फायनल एक्झाम ) देऊ शकतो. अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन नंतर तीन वर्षे कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर विद्यार्थ्याला असोसिएट मेंबरशीप ( सीएमए ) मिळते. आय सी. डब्ल्यू. ए . ( The Institute of Cost and Works Accounts ) ही संस्था या प्रकारचे विविध अभ्यासक्रम नियंत्रित करते. कंपनी सेक्रेटरी (सीएम ) Charterd Accountant ( सी ए ) प्रमाणेच सी एम झालेल्या व्यक्तींनाही भरपूर संधी आहेत. कंपन्यांचे कायदेकानून जाणून त्याप्रमाणे कंपन्यांचा व्याप आणि कामकाज यावर नियंत्रण व कार्यपालन करावे लागते. Institute of Company Secretaries of India हि संस्था हा अभ्यासक्रम नियंत्रित करते. बारावीनंतर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ग्रहण केल्यानंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अर्थात फक्त बारावी परीक्षेपर्यंतच शिक्षण घेतलेल्यांसाठी सुरुवातीला फौंडेशन कोर्स आधी पूर्ण करावा लागतो. पदवीधारकांसाठी ही आवश्यकता नाही. यानंतर सर्वांना एक्झीक्युटीव्ह प्रोग्रामला प्रवेश घ्यावा लागतो. दोन module मध्ये हा प्रोग्राम व त्यानंतर १५ महिन्यांचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर संबंधितांना प्रोफेशनल प्रोग्रामला प्रवेश मिळू शकतो. जे विद्यार्थी प्रोफेशनल प्रोग्राम ५० टक्के गुण मिळवून पूर्ण करतात व management ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करतात त्यांनाच नंतर कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता येते. स्वयंरोजगार किंवा वेतन रोजगार यापैकी कुठलेही क्षेत्र आवडीप्रमाणे निवडण्याची संधी प्राप्त होते.

आयात निर्यात क्षेत्र


जगामध्ये आयात निर्यात क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. ज्यांना या क्षेत्रात रस आहे, त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पुणे विद्यापीठात उपलब्ध आहे.



निवड व पात्रता :

बारावी परीक्षेत ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण उमेदवारांना प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. प्रवेश परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश निश्चिती होते. पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम सहा सत्रामध्ये पूर्ण होतो.

हॉटेल व्यवस्थापनसंबंधी करिअर


आजकाल पर्यटन व्यवसायामुळे हॉटेलव्यवसायसुद्धा तेजीत आहे. त्यामुळे या नवीन क्षेत्रात करीअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम Hotel Management ( बी.एच.एम.सी.टी.) मध्ये उपलब्ध आहे. पुणे विद्यापिठात ही संधी उपलब्ध आहे.



निवड व पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावी परीक्षेतील गुणांच्या ( ओपन ५० टक्के / मागासवर्गीय ४५ टक्के ) आधारे प्रवेश देण्याची पद्धत काही संस्थांत अवलंबिली जाते. काही संस्था प्रवेश परीक्षा ( enterence test ) घेतात. हा अभ्यासक्रम आठ सेमीस्टर्स (सत्र) चा असतो. जे विद्यार्थी तीन वर्षांची एच.एम.सी.टी. पदविका उत्तीर्ण असतील त्यांना थेट चौथ्या वर्षात / सातव्या सत्रात प्रवेश मिळू शकतो.

नागरी सेवा स्पर्धा परीक्षा करिअर


पूर्वी ज्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे शक्य होत नसे ते विद्यार्थी संघ लोक सेवा आयोग (यु.पी.एस.सी.) किंवा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी.) परीक्षेला बसून आपले करिअर ठरवीत असत. आता परिस्थिती राहिली नाही.

किंबहुना अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवीधरसुद्धा संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आपला करिअरचा मार्ग बदलतात. लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा अ)#संघ लोकसेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यू.पी.एस.सी. कार्यक्षेत्र ) संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध नागरी सेवा स्पर्धा घेतल्या जातात. उदा. आय.ए.एस. (Indian Administrative Services ) ज्याद्वारे जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी,सचिव,आयुक्त इत्यादी पदांवर होता येते. आय.पी.एस. (indian police services ) ज्याद्वारे जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्त, पोलीस प्रमुख, महासंचालक इत्यादी पदांवर काम करून पोलीस खात्यात करिअर करता येते. आय.आर.एस. (Indian Revenue Services ) ज्यामध्ये कस्टम एक्साइज रेल्वे, पोस्ट इत्यादी क्षेत्रात काम करता येते. आय.एफ.एस. ( Indian Foreign Services ) ज्यामध्ये परदेशी दूतावास परराष्ट्र विभागात सेवा संधी. अशा प्रकारे Indian Forest Servises मध्ये भारतात खूप वाव आहे.

ह्या परीक्षां मध्ये यश मिळण्यासाठी वाचनाची आवड असावी. महत्वाचे मुद्द्यांचे टिपण काढण्याची सवय असावी. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा भरपूर मेहनत घेण्याची तयारी असावी. वरवर अभ्यास न करता सखोल वाचन हवे. परीक्षेचे तंत्र आणि मंत्र अवगत करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. ऐच्छिक विषय निवडतांना ज्या विषयात चांगले योग्य उत्तर देण्याची क्षमता आहे असेच विषय निवडावेत. मनन आणि चिंतनाची क्षमता वाढवावी. गटचर्चेमध्ये प्रभावी असावे. तोंडी परीक्षेसाठी आत्मविश्वास आणि विनयशीलता असावी. इंडियन पोलीस सर्व्हिस व Indian Forest Services साठी आवश्यक ती Physical Ability असणे आवश्यक आहे.



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा आयोजित परीक्षा

राज्य लोकसेवा आयोगाद्वारे नागरी सेवा स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्र शासनाच्या अस्थ्सापनेवरील विविध पदांच्या (उपजिल्हाधिकारी, उपजिल्हा पोलीस प्रमुख, तहसीलदार, सेल्स टेक्स ऑफिसर , गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद , ए आर टी ओ इ.) भरतीसाठी या परीक्षा घेतल्या जातात. पात्रते विषयक अटी : १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी २) वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे ३) शासन नियमानुसार आरक्षित प्रवर्ग / उपवर्गासाठी वयोमर्यादा शिथिलक्षम. आयोगाने निश्चित केलेल्या निवडक पोस्ट ऑफिस मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार अर्ज फक्त निवडक पोस्ट ऑफिसमध्ये स्विकारण्यात येतात. सविस्तर अर्हतेसाठी आयोगाच्या वेबसाईट वरील तपशील जाहिरात पहावी. आरक्षण शुल्क, निवडीचे सर्वसाधारण सावरूप इत्यादी बाबतचा तपशीलही वेबसाईट वर असतो. ( वेबसाईट www.mpsc.gov.in ) वरील सर्व पदांसाठी एकच समान परीक्षा घेतली जाते. निवड प्रक्रिया : उमेदवाराची अंतिम निवड तीन टप्प्यांतील परीक्षांमधून केली जाते. १) प्रिलिमिनरी परीक्षा २०० मार्कांची ( चाचणी परीक्षा ) असते. बहुपर्यायी ( Objective Multiple choice ) स्वरूपाचे प्रश्न असतात. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असतो. साधारणपणे दरवर्षी एक लाखाच्या जवळपास उमेदवार या परीक्षेसाठी बसतात. यातून पदांच्या संखेच्या साधारणपणे १२-१३ पट उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड होते. २) मुख्य परीक्षा : ही लेखी परीक्षा १६०० गुणांची असते. परीक्षा इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून देता येते. प्रत्यक्ष भरावयाच्या पद्संख्येच्या ३ पट उमेद्वारांचिऊ निवड (मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांतून ) तोंडी परीक्षेसाठी केली जाते. तोंडी परीक्षा : ही परीक्षा २०० गुणांची असते. उमेदवारांनी मुख्य परीक्षेत मिळवलेले १६०० पैकी गुण व तोंडी परीक्षेतील २०० पैकी गुण, अशा एकूण १८०० गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे अंतिम निवड होते. उपजिल्हा पोलीस प्रमुख, सहाय्यक आरटीओ, एकसाइझ उप अधीक्षक इत्यादी पदांसाठी शारीरिक क्षमतेचे निकषही पूर्ण करणे आवश्यक असते.



राज्य कृषी सेवा परीक्षा (State Agriculture Services Examination ) कृषी अधिकारी ग्रेड ए आणि ग्रेड बी पदासाठी या परीक्षा घेतल्या जातात. पात्रता : अग्रीकल्चर किवा अग्रीकल्चर अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक . निवड प्रक्रिया : ७५० गुणांची लेखी परीक्षा (Objective Multiple Choice) आणि त्यानंतर १०० गुणांची तोंडी परीक्षा ( इंटरव्ह्यू ) अशा एकूण ८५० गुणांच्या परीक्षेद्वारे प्राप्त गुणांच्या आधारावर उमेदवाराची अंतिम निवड होते. ही पदे राजपत्रित दर्जाची असतात व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात अधिकारी पदावर नियुक्ती होते.

व्यवस्थापन संबंधी विविध करिअर


ज्या संस्था ग्राहकोपयोगी उत्पादन करतात किंवा ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देतात ( उदाहरणार्थ बँक, दवाखाने, कार्यालय, दुकान, उपाहारगृह, संस्था इत्यादी) अशा सर्व ठिकाणी व्यवस्थापन करण्यासाठी management चे शिक्षण घेतलेल्या व्यक्ती कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडू शकतात. त्यामुळेच आजच्या युगात management क्षेत्रात करीअरच्या अनंत संधी आहेत.

व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप अनेक पटींनी वाढतो आहे. त्यासाठी एकाचवेळी अनेक शाखांद्वारे आपला व्यवसाय मॅनेज करण्याची कसरत करावी लागते. शिवाय स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात एवढी जबरदस्त वाढली आहे कि, व्यवस्थापनाचे तज्ञच केवळ हे काम व्यावसायीक दृष्टीकोन ठेवून करू शकतात. एखाद्या अभ्यासक्रमाची परीक्षा घेणेसुद्धा (विद्यार्थ्यांच्या प्रचंड संख्येमुळे ) प्रोफेशनल मॅनेजर्सकडे देणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे नोकरीच्या प्रचंड संधीही उपलब्ध होत आहेत. management काही कोर्सेस फुल time आहेत तर काही part time (नोकरी करणाऱ्यासांठी सोयीचे) आहेत. काही कोर्सेसबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती देण्यात येत आहे. एम.बी.ए. दोन वर्षे कालावधीचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम.

अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी management च्या विविध शाखांचे विषयांची ( all aspects of management ) तोंडओळख होते. कुठल्याही शाखेचा पदवीधर किंवा bachelor of business administration (बी.बी.ए.) पदवी प्राप्त विद्यार्थी या करीअरची निवड करू शकतात. एम.बी.ए. हा साधारणपणे सर्व समावेशक management कोर्स समजला जातो. स्पेशालायाझेशन ( विशिष्ट क्षेत्र ) विचारात घेतल्यास एम.एम.एम. ( Master of Marketing Management ), एम.सी.एम. (mastar of computer management ), एम.पी.एम.(Master of Personal Management ), एम.बी.ए. (Pharma), एम.बी.ए.(Construction), एम.बी.ए.(bio -tech), इत्यादी विषयात करियर करता येऊ शकते.



सीइटी ( Common Entrance Test ) या नावाने तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यातर्फे प्रवेश परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध management कोर्ससाठी प्रवेश घेण्याकरिता हि परीक्षा असते. अधिक माहितीसाठी www.dte.org .in या संकेतस्थळावरील प्रवेश परीक्षा विभाग पहावा. याच धर्तीच्या प्रवेश परीक्षा इतर राज्यातही घेतल्या जातात. त्यासाठी संबंधित संस्थांच्या वेबसाईटस् पहाव्यात. या परीक्षेची माहिती व वेळापत्रक, अर्ज मागविण्याची प्रक्रिया ही नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या बरीच आधी सुरु होत असल्यामुळे (साधारण ऑक्टोबरपासून) याबाबत विद्यार्थ्यांनी अधिक दक्ष राहणे हिताचे ठरते.



Indian Institute of Management (आयआयएम ) द्वारा घेतली जाणारी CAT (Common aptitude test ) प्रवेश परीक्षासुद्धा महत्वाची व उपयोगी मानली जाते. विविध संस्थाद्वारा जरी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्यात येत असल्या तरी सर्वांची परीक्षा पद्धती (लेखी परीक्षा) साधारणपणे दोन तासांची असते, ज्यामध्ये एकशेवीस ते दीडशे प्रश्न विचारले जातात. सर्वसामान्य ( जनरल नॉलेज ) इंग्रजी numerical ability , analatical ability इत्यादी प्रकारांवर आधारित हे प्रश्न असतात. त्यानंतर group discussion (गट चर्चा ) द्वारा विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. लेखी परीक्षा व group discussion मधील गुणांवर आधारित अंतिम निवड संस्थाच्या उपलब्ध जागांनुसार केली जाते. Management diploma course ज्यांना दोन वर्षांचा एम बी ए कोर्स करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी management चा साधारण दीड वर्ष अवधीचा डिप्लोमा करता येतो. तीन त्रैमासिक सत्र आणि त्यानंतर तीन ते सहा महिने अवधीची इंटर्नशिप असे स्वरूप असते.

अन्न तंत्रज्ञानमध्ये करिअर


भारतासारख्या शेतीप्रधान देशात Food technology सारख्या क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकतात. निवड निकष : केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री किंवा शेतीशास्त्र ( अॅग्रीकल्चर ) मधील पदवी धारण करणाऱ्यांना एम.एस्सी. साठी प्रवेश मिळू शकतो.
(दोन वर्षांचा अभ्यासक्रम) निवड प्रक्रिया : यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा (साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये) असते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेशासाठी उपलब्ध जागेच्या संख्येनुसार मुलाखतीला बोलाविण्यायोग्य उमेदवारांची संख्या निश्चित केली जाते. या मर्यादित संख्येच्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम निवड केली जाते. विविध विद्यापीठांमार्फतदेखील हा अभ्यासक्रम व प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.

करिअर इन बायोकेमिस्ट्री

वैद्यकीय शिक्षण व संशोधन यामध्ये बायोकेमिस्ट फार महत्वाची भूमिका बजावू शकतात. एड्स, कॅन्सर इत्यादी रोगाबाबत अनेक वैद्यकीय संस्था पुढाकार घेत आहेत. यासाठी दोन वर्षे कालावधीचा एम.एस्सी. बायोकेमिस्ट्री करणे श्रेयस्कर ठरते.

पात्रता : बायोलॉजी व केमिस्ट्री या विषयातील विज्ञान पदवीधर या अभ्यासक्रमासाठी पात्र समजले जातात. भारतातील फारच थोड्या विद्यापीठांमध्ये हा कोर्स शिकवण्याच्या संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व मुंबई विद्यापीठ येथे हि सोय आहे.

संधी : बायोकेमिस्ट्रीमध्ये करिअर करणाऱ्यांना अन्न उत्पादन, वाढ, अन्न साठवण, पेस्ट कंट्रोल, पिक संवर्धन इत्यादी विशेष संधी उपलब्ध आहे. करिअर इन bio -informatics सध्या भारतामध्ये bio -informatics क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. दोन वर्षे कालावधीचा एम.एस्सी. किंवा एम.टेक. हा bio -informatics चा कोर्स करून या क्षेत्रात चांगले करिअर घडविता येते. औषधनिर्माण , bio - medical , bio - technology विषयांवरील संशोधन करणाऱ्या संस्था/हॉस्पिटलमध्ये या विद्यार्थ्यांना चांगले भवितव्य आहे. महाराष्ट्रात पुणे विद्यापीठ येथे हा अभ्यासक्रम शिकविण्याची सोय आहे.

IISc क्षेत्रातील संधी


Indian Institute of Science, बंगळूर ही जगप्रसिद्ध संस्था विविध विषयांवर मूलभूत संशोधनपर पीएच.डी. करण्यासाठी संशोधक उमेदवार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देते. "इंटिग्रेटेड पीएच.डी. प्रोग्राम" या संशोधनपर कोर्ससाठी या संस्थेत प्रवेश मिळू शकतो.



आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी,झुलॉजी, mathematics , अॅग्रीकल्चर किंवा फार्मसी अभ्यासक्रम किमान प्रथमश्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणारे असतील, तेसुद्धा अर्ज करण्यास पात्र समजले जातात. निवड प्रक्रिया : इच्छुक उमेदवाराला प्रथम अखिल भारतीय प्रवेश परीक्षेला बसावे लागते. फिजिकल सायन्स, केमिकल सायन्स , mathematical सायन्स व बायोलॉजिकल सायन्स यापैकी एक विषय घेऊन परीक्षा देता येते. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काही अर्जदारांना गुणांकानुसार वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. यातूनच योग्य विद्यार्थ्याची निवड केली जाते.



शिष्यवृत्तीचा तपशील : निवड झालेल्यांना पहिल्या दोन वर्षांसाठी पाच हजार रुपये प्रतिमाह आणि नंतरच्या तीन वर्षांसाठी रुपये आठ हजार प्रतिमाह शिष्यवृत्ती मिळू शकते.



अधिक माहितीसाठी संपर्क : अधिक माहिती व तपशीलासाठी साप्ताहिक employment news (प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडा ) अंकातील जाहिरात पहावी किंवा संबंधित संस्थेची वेबसाईट पहावी.

समुद्रासृष्टी शास्त्र करियर

हे शास्त्र समुद्रासारखेच विस्तीर्ण आणि समुद्रात सापडणाऱ्या मोत्यासारखे श्रीमंत करणारे ठरू शकते. सागर किनारे, सागर संपत्ती, समुद्राचे पाणी, खाडी याबाबबताचे संशोधन आणि विकास यांचा अभ्यास करून मानवी जीवनासाठी उपयुक्तता होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. भारतासारख्या प्रचंड किनारा लाभलेल्या विकसनशील देशामध्ये या क्षेत्रात करीयरच्या महत्वपूर्ण संधी मिळू शकतात.

पात्रता : बी.एस्सी. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना एम.एस्सी. ओशनग्राफिमध्ये करता येते. भारतात अनेक राज्यांमध्ये यासाठी प्रवेशाच्या संधी आहेत. ज्यांना भूगर्भ शास्त्र (जिओलोजी), बायोलोजी, विज्ञान, अभियांत्रिकी शाखांची आवड आहे त्यांन या क्षेत्रामध्ये काम करण्यास रस वाटेल.

खगोलशास्त्रातील करिअर


खगोल शास्त्रात अवकाशातील ग्रह, तारे यांचा अभ्यास करून संशोधन क्षेत्रात चमचमते करियर करण्याची इच्छा असणार्‍यांसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. खगोलशास्त्र किंवा astro फिजिक्समध्ये संशोधन किंवा शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी आपली वाट पाहत आहेत.
पात्रता : एम.एस्सी.(physics- applied mathematics-astronomy) असणार्‍यांना प्रवेश परीक्षेद्वारे पीएच.डी. साठी नोंद आवश्यक आहे. साधारणपणे दरवर्षीच्या ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये याबाबत जाहिरात येते व नंतरच्या फेब्रुवारीमध्ये एंट्रन्स एक्झामिनेशन होते.
प्रवेश परीक्षेचे स्वरूप : ऑब्जेक्टीव्ह प्रकारचे प्रश्न असतात. तसेच इतर काही परीक्षाप्रमाणे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असते. प्रवेश परीक्षेत सफलता मिळविल्यानंतर मुलाखतीसाठी उपस्थित राहून उत्तीर्ण व्हावे लागते. त्यानंतर संशोधन संस्थेत प्रवेश मिळतो. पीएच.डी. मिळाल्यानंतर लखलखते करिअर आपले करणे शक्य होते.

जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर

biotechnology क्षेत्रात करीअरच्या उत्तम संधी अस्तित्वात आहेत; परंतु किमान biotechnology मध्ये पदव्युत्तर शिक्षण असणे हिताचे ठरते.

पात्रता : एम.एस्सी. biotechnology होण्यासाठी विज्ञान, शेती, अभियांत्रिकी, फार्मसी या विषयातील पदवी किमान ५५ टक्के मिळवून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी या परीक्षेच्या अंतिम वर्षात शिकत आहेत त्यांनाही प्रवेश परीक्षेला बसता येते. बी.एस्सी. साठी वनस्पतीशास्त्र , प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही यासाठी पात्र असतात. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच पदव्युत्तर प्रवेशासाठी विचार केला जातो. साधारणपणे दरवर्षी मे महिन्यामध्ये ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते.

प्रवेश परीक्षेची पद्धत : दोन भागामध्ये हि परीक्षा होते. पहिल्या भागामध्ये साठ गुणांचे साठ Objective प्रकारचे प्रश्न असतात. साधारणपणे बारावीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि बायोलॉजी या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्न असतात. एक चूक उत्तरासाठी अर्धा मार्क कापण्याची पद्धत आहे. त्यामुळे निश्चित माहीत असल्याशिवाय उत्तर लिहू नये. दुसर्‍या भागातही साठ प्रश्नांचा (गुण १८०) समावेश असतो. मात्र अभ्यासक्रम पदवी स्तरावरील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व mathematics या विषयावर आधारित असतो. याही ठिकाणी वरील प्रमाणेच उणे गुण (निगेटिव्ह मार्क) होऊ शकतात. प्रवेश परीक्षेची सूचना व सर्व माहिती साधारणपणे जानेवारी/फेब्रुवारीच्या साप्ताहिक employment news च्या अंकात उपलब्ध होऊ शकते.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर


सर्वांसाठी करिअरची संधी असणारे आयटी (माहिती तंत्रज्ञान ) हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या क्षेत्रात आपले करिअरचे स्वप्न पूर्ण करू शकतो. संगणक कुशलतेने वापर करण्याचे ज्ञान व कौशल्य आपल्याजवळ असेल आणि इंग्रजी भाषेचा वापर योग्य तर्‍हेने करता येत असेल तर आपला करिअरचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा. या क्षेत्रातील विविध संधीचा हा थोडक्यात परिचय.



Call center व BPO मध्ये करिअर संबंधी संधी

या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. Call center आणि BPO या क्षेत्रात $ ३०० बिलियनपेक्षा कितीतरी अधिक रकमेचा व्यवसाय उपलब्ध होत आहे. त्याचा आपण फायदा घ्यायला हवा. Call center व BPO म्हणजे काय? आजकाल अनेक विकसित देशांमध्ये आणि भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये सुद्धा मोठमोठ्या व्यवस्थापनासाठी / उद्योग व्यवसायासाठी ग्राहक सेवा केंद्राची फार मोठया प्रमाणात गरज आहे. ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून घेणे, तक्रारी योग्य ठिकाणी पाठवणे, तांत्रिक माहिती देणे, टेली मार्केटिंग करणे, इ. कामांसाठी Call center मोठ्या व्यवस्थापनांना मदत करतात. Call center operator हे काम सहज करू शकतात. BPO म्हणजे Business process outsourcing. या ठिकाणी संगणकाद्वारे करता येण्याजोगी ठराविक स्वरुपाची नित्य कामे (हजेरीपत्रक - पे रोलची कामे, कर परतावा - TAX Return preparation, डेटाबेस अद्ययावत करणे, इत्यादी) केली जाऊ शकतात. या कामासाठी भरमसाठ पगार देऊन व्यावसायि क अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या पदवीधरांना नोकरी देण्याएवजी संगणकाचे ज्ञान असणारा कुठल्याही क्षेत्रातील पदविधराकडे हे outsourcing केले जाते. यात कंपन्यांना खूपच पैसा वाचतो व अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

आवश्यक पात्रता ( Qualification ) : कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो. इंग्रजीचे ज्ञान आणि संगणकाचा कुशलतेने वापर करता येणे आवश्यक आहेत. संभाषण कला असावी.

क्षमता ( Compitancy ) : संगणकामध्ये भरावयाची माहिती अचूक व जलद गतीने भरावयाची क्षमता असणार्‍यांना संधी जास्त आहे. बर्‍याच परदेशी (अमेरिका इत्यादी) व्यवस्थापनांची Call centers भारतात आहे. त्यासाठी परदेशी व्यक्तींचे उच्चार व बोलण्याची ढब समजणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उत्तर देण्यासाठी आपल्यालाही तसे उच्चार करणे गरजेचे ठरते. अर्थात हे शिक्षण देणार्‍या अनेक संस्था उपलब्ध आहेतच.छोटया प्रशिक्षणाने या गोष्टी आत्मसात करता येणे शक्य आहे. फ्रेंच, जर्मन, इत्यादी परदेशी भाषा (Foreign Language) शिकून घेणार्‍या व्यक्तींना करिअरमध्ये लवकर प्रगती करता येते.

सुसंधी (Opportunities) : या क्षेत्रात प्रगतीला खूप वाव आहे. सुरुवातीला साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये प्रतिमाह मिळू शकतो. कार्यक्षमता वाढवीत नेल्यास एकदोन वर्षात पंधरा हजार रुपये प्रती महिना प्राप्ती सहज होईल. आजकाल युवा व्यक्ती पदवी शिक्षण घेत असतांनाच संगणकाचे कौशल्य व ज्ञान सहज हस्तगत करू शकतात. त्यामुळे पदवीधर होताच करीअरची सुरुवात करता येउ शकते आणि व्यवसायात लवकर जम बसतो. संभाषण कला, वेळेचे नियोजन व तत्परता, सुस्पष्ट आवाज, नम्रता या बाबींमुळे लवकर प्रगती होते.



करियर इन टेक्निकल रायटिंग

आजकाल इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा उपयोग लहान मुलांपासून मोठया व्यक्तींपर्यंत सर्वच जण घरीदारी करीत असतात. या उपकरणांची माहिती वापरण्याच्या पद्धती, देखभाल, दुरुस्ती, तांत्रिक ज्ञान याबद्दलची माहिती सर्वांनाच आवश्यक असते. त्यामुळे या उपकरणाबरोबर संबंधित माहिती असलेली माहितीपत्रिका, पुस्तिका देणे निर्माणकर्त्याला आवश्यक असते. हि पुस्तिका लिहिणे म्हणजे थोडक्यात टेक्निकल रायटिंग. या माहितीपत्रिकेत छान छान रंगीत छायाचित्रे दिल्यास त्याची उपयुक्तता वाढते व उपकरणे हाताळणे सोपे जाते. अशी माहिती-पुस्तिका तयार करण्याचे काम एक चांगले करीअर क्षेत्र बनले आहे. software manual तयार करणे याच प्रकारात मोडते. पात्रता: कुठल्याही शाखेतील पदवीधारक, ज्यांना इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असेल आणि लेखनशैलीचे कौशल्य असेल, त्या व्यक्ती हे करिअर सक्षमतेने करू शकतात.



Animation , Multimedia क्षेत्रातील करिअर

सध्याचे युग हे जाहिरातीचे युग समजले जाते. जेवढी जाहिरात आकर्षक व लक्षवेधी तेवढा व्यापार जास्त हे गणितच बनले आहे. आकर्षक रंगसंगतीबरोबरच मोजक्या शब्दांत महत्त्वाची माहिती देणे हे वैशिष्ट्य ठरत आहे. त्याशिवाय चित्रपट, टीव्ही मालिका, वेबसाईटस इत्यादीमध्ये animation चे महत्त्व उपयोग दिवसेंदिवस अनेक पटीने वाढते आहे. त्यासाठी या क्षेत्रात करिअर करणार्‍यांना अमाप संधी आहे. पात्रता : ज्य़ा व्यक्तिना चित्रकलेत आवड आणि नैपुण्य प्राप्त आहे आणि त्याच्याजवळ web designing, 2d, 3d, चे ज्ञान आहे किंवा शिकण्याची इच्छा आहे त्या व्यक्ती हे करिअर करू शकतील. सृजनशीलता, कल्पकता हे गुण जोपासणार्‍यांसाठी हे करिअर आयुष्यासाठी मैलाचा दगड (mile stone) ठरू शकते. विशेष म्हणजे पदवी शिक्षण घेत असतांनाही याबाबतचे कौशल्य देणारे अभ्यासक्रम पूर्ण केले जाऊ शकतात.



संगणक हार्डवेअर, नेट्वर्किंगमध्ये करिअर

सध्याचे युग हे संगणक युग मानले जाते. त्यामुळे संगणकाची संख्या जशी अमर्याद वाढत आहे तेवढेच अमर्याद करिअर संगणक देखभाल, दुरुस्ती इत्यादींचे होत आहे. सॉफ्टवेअरपेक्षा जास्त मागणी हार्डवेअरमध्ये दिसू लागली आहे. प्रत्येक घरात प्रत्येक व्यवसायात संगणक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे संगणक दुरुस्ती, विक्री, देखभाल, नेट्वर्किंग इत्यादी क्षेत्रे अमर्याद विकसित झाली आहेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. बँका, रेल्वे, विमान कंपन्या, मनोरंजन क्षेत्रे, बीपीओ इत्यादी ठिकाणी करिअर घडू शकते.
पात्रता : कुठल्या शाखेत पदवीधर आवश्यक ते संगणक ज्ञान, प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात येऊ शकतो. पदवी शिक्षण घेत असतांना मोकळ्या वेळेत संगणक ज्ञान व कौशल्य आत्मसात करता येऊ शकते. क्षमता : आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र ( एम.सी.पी., एम.सी.एस.ए. इत्यादी ) प्राप्त करून घेणार्‍यांना विशेष संधी आहेत. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारे कौशल्य देणाऱ्या प्रशिक्षण देणाऱ्या योजनाही उपलब्ध आहेत.



मास्टर ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन

विविध शाखेतील पदवीधारकांसाठी संगणक क्षेत्रातील चांगले करियर करण्याची संधी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळू शकते. कार्यक्षेत्र : आयटी कंपन्यांमध्ये प्रोग्रामर (योजक) म्हणून काम करता येईल. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए., इत्यादी पदवीधारक हा अभ्यासक्रम पूर्ण करून आयटी क्षेत्रात करियर करू शकतात. निवड निकष : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत यासाठी साधारणतः मार्च मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. साधारणपणे २ तासामध्ये १०० प्रश्न सोडवावे लागतात आणि २०० गुणांची परीक्षा होते. गणित, इंग्रजी, लॉजिकशी संबंधित हे प्रश्न असतात. अतिशय सावधानपूर्वक आणि खात्री असल्यासच प्रश्नोत्तर देणे योग्य ठरते कारण उत्तर चुकल्यास गुण उणे होतात हे लक्षात ठेवावे. इंतेरांचे test मध्ये मिळालेले गुण आणि पाहिजे असलेल्या संस्थांसाठी भरलेला ऑप्शन फॉर्म, यांच्यावर आधारित विध्यार्थ्यांना एम.सी.ए. च्या शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळतो. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात गणित विषयाबरोबर संगणकासंबंधी सोफ्टवेअर, हार्डवेअर, प्रोग्रामिंग लांग्वेजेस इत्यादीबद्दल शिक्षण दिले जाते. शेवटच्या वर्षी एखाद्या कंपनीत प्रोजेक्टचे कामही करावे लागते. केम्पस इंटरव्यू विविध परीक्षांतील सातत्यपूर्ण गुणवत्ता टिकविणाऱ्या विद्यार्थांची निवड प्राधान्याने होते. यावेळी गटचर्चा मुलाखत याद्वारे निवड निश्चित केली जाते. क्षमता वृद्धी : शिकत असतांनाच काही परदेशी भाषा शिकणे, लवकर नोकरी मिळविण्यासाठी फायदेशीर ठरते.



मास्टर ऑफ कॉम्प्युटर मेनेजमेंट

संगणकाच्या मदतीने व्यवस्थापन क्षेत्रातील कामे सुकर होतात. कार्यक्षेत्र : माहिती तंत्रज्ञान शाखेत करियर करता येते. पात्रता : आर्ट्स, कॉमर्स, इत्यादी शाखेमधील पदवी. हा पदव्युत्तर कोर्स करतांना व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रातील तांत्रिक विषयांचा अभ्यास करावा लागतो.शिवाय सोफ्टवेअर मार्केटिंग इत्यादी विषयही शिकावे लागतात. संशोधन (रिसर्च) करणाऱ्यांसाठी करीयरच्या संधी अनेकांना संशोधन कार्य करण्याची आवड असते पण त्याचा कालावधी, रोजगाराची संधी, विविध कार्यप्रणाली भविष्यकालीन उत्कर्ष इत्यादीबद्दल अज्ञात असते.

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पी.एच.डी. मिळवून पुढे संशोधन क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या व्यक्ती यासाठी पत्र समजल्या जातात. पी.एच.डी. मिळविल्यावर साधारणपणे तीन ते चार वर्ष संशोधन कार्य करावे लागते.

क्षमता : स्वतःचे स्वतः ( स्वअध्ययन ) करण्याची सवय, अवलोकन कौशल्य, चिकाटी, दिर्घोद्योगाची आवड, पृथ:करण, इत्यादी गुण असणार्या व्यक्ति या क्षेत्रात लवकर पारंगत होतात.

पदवीनंतरच्या संधी



पदवी शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय करायचं, असा प्रश्न मला बरेच विद्यार्थी विचारतात. उद्योगजगताशी चर्चा करीत असताना असे दिसून आले की, पदवी शिक्षण घेणार्‍यास प्रचंड संधी उपलब्ध आहेत; पण याची खोलवर माहिती नसल्याने
व त्या अनुषंगाने तयारी न केल्यामुळे पदवीधारक अनेक संधी गमावताना दिसत आहे .
करीयर निवडणे आणि ते घडवणे हि आयुष्यातील प्रमुख बाब आहे. शिक्षणाची वाट निवडतांना आपण बर्‍यापैकी माहिती घेऊन महाविद्यालयात प्रवेश घेतो. पदवी शिक्षणही करतो परंतु करिअरच्या माहितीअभावी पुढे काय करायचे, असा प्रश्न येतो
मित्रांनो, आर्टस, कॉमर्स, सायन्स, बी.बी.ए., बी.सी.ए., अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान इत्यादीसारखे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक करिअरच्या वाटा आहेत. आपणास योग्य असे करिअर निवडल्यास यास आवश्यक कौशल्य आणि तयारी करणे सोयीचे होते.
विद्यार्थ्यांची सोय व्हावी याकरिता, अभ्यासक्रमांची वेगळी वर्गवारी करण्यात आली आहे. त्या अभ्यासक्रमांच्या अधिक माहितीसाठी डावीकडील अभ्यासक्रमवार क्लिक करा.

इतर अभ्यासक्रम


बारावी कॉमर्सनंतर पदवीचा अभ्यास (B. Com.) करता ICWA, CAI, CSI च्या परीक्षा देता येतात व CA तसेच कॉस्ट & वर्क्स अकाऊंन्ट किंवा कंपनी सेक्रेटरी बनता येते. बी. कॉम. च्या पदवीनंतर कायद्याची पदवी किंवा
टॅक्सेशन ची पदवी घेऊन वकिली किंवा कर सल्लागारचे करिअर घडवता येते. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर बिजनेस मॅनेजमेन्ट, टॅक्स मॅनेजमेन्ट, फायनान्शियल मॅनेजमेन्ट, इंपोर्ट/एक्सपोर्ट मॅनेजमेन्ट इत्यादी मॅनेजमेन्टचे अभ्यासक्रम सोपे व फायद्याचे ठरतात. B.Com. पदवीनंतर M. Com, Ph.d. करून शिक्षण क्षेत्रात ही काम करता येते.
विधि
१२ वी वाणिज्यनंतर विधि क्षेत्रात सुद्धा करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध असतात. जर तुमच्यामध्ये काउंसेलिंग निगडित कला गुण आहे तर तुम्ही नक्कीच या क्षेत्राकड़े करिअरचा पर्याय म्हणून पाहू शकता.
काही महत्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
महाराष्ट्रातील विधी महाविद्यालायांची यादी
बैचलर ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन
१२ वी वाणिज्य झालेले विद्यार्थी बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशनकड़ेसुद्धा वळू शकतात. ही पदविका कोर्स केल्यानंतर त्यांना कोणत्याही कंपनी मध्ये नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.
काही महत्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
महाराष्ट्रातील BCA महाविद्यालयांची यादी
बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट
१२ वी वाणिज्य ज़लेले विद्यार्थी बैचलर ऑफ़ बिसनेस मॅनेजमेन्टकड़े सुद्धा वळू शकतात. ही पदविका कोर्स केल्यानंतर त्यांना कोणत्याही कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.
काही महत्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
महाराष्ट्रातील BBA महाविद्यालयांची यादी
सैनिक शिक्षण
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांची पूर्तता होताच निर्माण होणारी चौथी गरज म्हणजे सुरक्षितता. व्यक्तिगत गोष्टीची कौटुंबिक चाळीतील या गावातील सुरक्षिततेची गरज आपणास ठाऊक आहे. तद्वत देशाच्या सीमांचे तथा अंतर्गत बंडाच्या वेळी सुरक्षा, शांतता व सलोखा राखण्यासाठी सैन्यदलाची आवश्यकता असते. देशाच्या सुरक्षाप्रणालीमध्ये कार्यरत असणारी मंडळी म्हणजे सैन्य. आजारी माणूस म्हणजे स्वतःचे व इतरांचे संरक्षण करू शकत नाही. त्यासाठी सशक्त, निरोगी, चपळ आणि नीती ठरवण्याची क्षमता आवश्यक असते. वेळ, आहार, व्यायाम आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी आवश्यक नियमितता तसेच धैर्य, चिकाटी, अन् साहसी प्रवृत्ती आणि घरापासून दूर विपरीत परिस्थितीत काम करण्याची सुदृढ मानसिकता, ही अंगे सैनिकी शिक्षण घेण्यासाठी अत्यावश्यक ठरतात. दर्जाप्रमाणे विशिष्ट वयानंतर सैनिकी क्षेत्रातून निवृत्ती दिली जाते. देशाच्या रक्षणासाठी कार्य केल्याबद्दल केंद्र शासनाच्या अनेक सुविधा सैनिकांना बहाल केल्या जातात. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्यांना या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
List of colleges offering Military Education, NDA, INDIA
फॅशन डिझायनिंग
प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तू आपले अस्तित्व सौंदर्यपूर्ण ठेवेल तेव्हाच लक्ष वेधून घेते. तेव्हा तिचा आकार, रंगसंगती बनवतांना लावलेली कौशल्ये आणि कालानुरूप अनुरूपता सिद्ध होते. फॅशन डिझायनिंग हि अभ्यासाची व संधीची अशी शाखा आहे, ज्यासाठी निश्चितच म्हणू शकतो, "जब तक सुरज चांद रहेगा, फेशन तेरा नाम रहेगा." भौगोलिक परिस्थिती, परंपरा, कच्च्या मालाची उपलब्धता, निर्मितीक्षमता प्रतिभाशक्ती, सूक्ष्मदृष्टी, रंगाच्या तापमानातील फरक, आकाराची जाण, प्रतिभाशक्ती आणि समाजाच्या आवडीतील बदलांचा मागोवा घेऊन काळाच्या थोडेसे पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता या बाबी ह्या क्षेत्रातील यशस्वितेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. निरंतर नावीन्याची मागणी व गरजेनुरूप पुरवठा हे या क्षेत्रातील आर्थिक सूत्र असल्याने करिअर म्हणून निवड करण्यासाठी वरील गुणांची खाण असणाऱ्यांनी हे क्षेत्र स्वीकारणे फायदेशीर ठरेल.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
www.fdci.org/ www.nifd.net/
प्रशासन व व्यवस्थापन क्षेत्र
प्रत्येक आस्थापनेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख करणे, भविष्यातील वाटचालीचा आढावा घेणे, आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवणे, ग्राहकांचे व कर्मचार्यांचे हित जोपासणे इत्यादी बाबींचा अभ्यास करणारे क्षेत्र म्हणजे व्यवस्थापन क्षेत्र. आस्थापनांचा वाढता व्यापार व तंत्रज्ञानाच्या या युगात आवश्यक झालेला नेटकेपणा यामुळे व्यवस्थापन क्षेत्राला सध्या खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे.
व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण हे बारावीनंतरची पदवी, पदवीनंतरची पदविका व पदव्युत्तर पदवी अशा वेगवेगळ्या स्वरुपात प्राप्त करता येते. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
महाराष्ट्रातील कॉलेजेसची यादी
कायदा व व्यवस्थापन क्षेत्र
भारतीय घटनेने प्रत्येकास स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. मुळातच घटनेचा संपूर्ण साचा हा स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित आहे. घटनेने जरी स्वातंत्र्य दिलेले असले तरीदेखील समाजात वावरताना सर्वसामान्य चौकटीतच प्रत्येक नागरिकाची वागणूक अभिप्रेत आहे, अन्यथा समाजाचा प्रवास स्वातंत्र्याकडून स्वैरतेकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाची बांधणी चाकोरीबद्ध, कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबत जाणीव असणारी आणि वर्तणुकीचे निकष ठरवून त्यातच वागणूक असण्यासाठी तसेच परस्पर तंटे, तक्रारी सोडविण्यासाठी विविध कायदे केंद्र शासन तसेच राज्य शासनाने केले आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था योग्य राखून समाजातील सर्व घटकांना सलोख्याने राहून सर्वसाधारण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत. कायद्याच्या अभ्यासासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, व्यासंग आणि प्रखर स्मरणशक्ती तथा सातत्याने वाचनाची आणि लक्षपूर्वक ऐकण्याची कला अवगत असली पाहिजे. प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ माहिती असणे आणि वाक्यांचे विविध अर्थ काढण्याची मानसिकता या क्षेत्रातील व्यक्तीस निर्भेळ यश प्रदान करते.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
महाराष्ट्रातील कॉलेजेसची यादी
उड्डाण क्षेत्र
एक आकर्षक क्षेत्र. विमानातील प्रवाशांच्या स्वस्थतेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या मनुष्याबळापासून ते विमानाचे परिरक्षक व वैमानिक होण्यासाठी या क्षेत्राची निवड केली जाते. प्रामुख्याने या क्षेत्राची वाणिज्यिक आणि सैनिकी अशी विभागणी केली जाते. भारतीय विमान पतन संचालनालय, दिल्ली या केंद्र शासनाच्या विभागातर्फे उड्डाण क्षेत्रातील तांत्रिक बाबीच्या सर्व अभ्यासक्रमांना मान्यता दिली जाते. कौशल्यावर आधारित मनुष्यबळाची या क्षेत्रात जगभर प्रचंड मागणी आहे. भाषा, ज्ञान, कौशल्ये, शारीरिक ठेवण, सुदृढता, जबाबदारीची जाणीव, निर्णयक्षमता, दुर्दम्य इच्छाशक्ती इत्यादी बाबी या क्षेत्रात जाण्यासाठी मूलभूत गरजा म्हणून संबोधल्या जातात.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
Directorate General of Civil Aviation, BCAS

व्यावसायिक अभ्यासक्रम


कॉस्ट व मॅनेजमेन्ट अॅकाऊंटट
ही वाणिज्य शाखेतील तशी नवीन समजली जाणारी शाखा. वाढती स्पर्धा आणि आर्थिक दबाव या कारणामुळे कॉस्ट व मॅनेजमेन्ट अॅकाऊंटटला चांगले दिवस आले आहेत.
काही महत्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
www.icwai.org
चार्टर्ड अॅकाऊंटट
चार्टर्ड अॅकाऊंटट हा एक व्यवसायिक अभ्यासक्रम असून भरपूर फलदायी आहे. चार्टर्ड अॅकाऊंटट व्यक्ती स्वतः चा व्यवसाय किंवा कोणत्याही मोठ्या कंपनीत मोठया पदावर जॉब करू शकतो. वाणिज्य हा कोणत्याही व्यवसायाचा कणा असतो म्हणून या अभ्यासक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे.
काही महत्व पूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
www.icai.org
कंपनी सेक्रेटरी
कंपनी सेक्रेटरीचे बेसिक काम हे एका कंपनीच्या लीगल अडवायझरचे असते. कंपनी सेक्रेटरी हा मॅनेजमेन्टचा महत्वपूर्ण घटक असतो.
काही महत्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
www.icsi.edu
स्टॉक ब्रोकिंग
शेअर मार्केटमध्ये दररोज किती तरी करोड़ रुपयांची उलाढाल होत असते. स्थानिक तसेच विदेशी गुंतवणूकदार सतत स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. असे असताना आपण स्टॉक मार्केट अनालिस्टचे काम सांभाळू शकतो.
काही महत्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
www.icsi.edu, www.bseindia.com
गणित आणि सांख्यिकी
आजकाल गणित आणि सांख्यिकी विषयांना त्यांच्या संशोधनाच्या अभ्यासावर खूप प्रसिद्धी मिळाली आहे. या शाखेतील पदवी तुम्हाला एका चांगल्या नोकरीची हमी देऊ शकते. या दोन्ही शाखांच्या अभ्यासक्रम झाल्यानंतर संगणक, सोसिअल सायन्स आणि अभियांत्रिकीमध्ये संशोधनाच्या संधी भेटू शकतात.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
www.imsc.res.in , www.unipune.ac.in, www.isical.ac.in

पदवी अभ्यासक्रम


वाणिज्य ही व्यापार व अर्थशास्त्र यांच्याशी संबंधित ज्ञान देणारी शाखा आहे. वस्तूची देवाणघेवाण किंवा पैशाच्या मोबदल्यात वस्तू किंवा कोणती सेवा याचा हिशेब व नियंत्रण ठेवणे म्हणजे वाणिज्य. ग्लोबलायझेशनमुळे वाणिज्य शाखेचे महत्त्व खूप वाढले आहे. वाणिज्य शाखेत अर्थशास्त्र, टॅक्सेशन, वाणिज्य व व्यापार, अकौंटन्सी व बुक कीपिंग, गणित, कॉस्टिंग इत्यादी विषयांचा अभ्यास करावा लागतो.
बारावी कॉमर्सनंतर पदवीचा अभ्यास (B. Com) करताना ICWA, CAI, CSI च्या परीक्षा देता येतात व CA तसेच कॉस्ट अॅन्ड वर्क्स accountant किंवा कंपनी सेक्रेटरी बनता येते. बी कॉम च्या पदवीनंतर कायद्याची पदवी किंवा टॅक्सेशन याची पदवी घेऊन वकिली किंवा कर सल्लागारचे करिअर घडवता येते. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर बिजनेस मॅनेजमेन्ट, टॅक्स मॅनेजमेन्ट, फायनान्सिअल मॅनेजमेन्ट, इंपोर्ट/एक्सपोर्ट मॅनेजमेन्ट इत्यादी मॅनेजमेन्टचे अभ्यासक्रम सोपे व फायद्याचे ठरतात. वाणिज्य पदवीधर हा शिक्षक, बँक, तसेच मोठ्या कंपन्या मध्ये चांगल्या पगाराच्या पदावर कार्यरत होऊ शकतो. B.Com. पदवीनंतर M.Com, Ph.d. करून शिक्षण क्षेत्रात तसेच संशोधन क्षेत्रातही काम करता येते.
वाणिज्य पदवीधर हा शिक्षक, बँक, तसेच मोठया कंपन्यांमध्ये चांगल्या पगाऱ्याच्या पदावर कार्यरत होऊ शकतो.
काही महत्व पूर्ण संकेत स्थळे खालील प्रमाणे
मराठवाड्यातील कॉलेजेस ची यादी
Swami Ramananad Tirth University
पुणे विद्यापीठ
महाराष्ट्रातील संपूर्ण युनिवर्सिटी ची यादी
भारतातील नावाजलेले वाणिज्य महाविद्यालयाची यादी
commerce.nic.in  

इतर अभ्यासक्रम


सृष्टीच्या निर्मितीचा शोध, अज्ञाताच्या प्रवासातून नवीन ज्ञानाचा शोध घेण्याचा मानवी ध्यास धारण करणार्‍यांची ही शाखा कार्यकारणभाव याचा अभ्यास करून त्यास कारणीभूत ठरणार्‍या नेमकेपणाचा शोध घेऊन त्याच–त्याच पद्धतीने वारंवारिता साधल्यास
तोच-तोच परिणाम साधण्याचे गमक शोधण्याचे शास्त्र म्हणजे विज्ञानशास्त्र.
सैनिक शिक्षण
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांची पूर्तता होताच निर्माण होणारी चौथी गरज म्हणजे सुरक्षितता. व्यक्तिगत गोष्टीची कौटुंबिक चाळीतील वा गावातील सुरक्षिततेची गरज आपणास ठाऊक आहे. तद्वत देशाच्या सीमांचे तथा अंतर्गत बंडाच्या वेळी सुरक्षा, शांतता व सलोखा राखण्यासाठी सैन्य दलाची आवश्यकता असते. देशाच्या सुरक्षाप्रणालीमध्ये कार्यरत असणारी मंडळी म्हणजे सैन्य. आजारी माणूस म्हणजे स्वतःचे व इतरांचे संरक्षण करू शकत नाही. त्यासाठी सशक्त, निरोगी, चपळ आणि नीती ठरवण्याची क्षमता आवश्यक असते. वेळ, आहार, व्यायाम आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी आवश्यक नियमितता तसेच धैर्य, चिकाटी, अन् साहसी प्रवृत्ती आणि घरापासून दूर विपरीत परिस्थितीत काम करण्याची सुदृढ मानसिकता ही अंगे सैनिकी शिक्षण घेण्यासाठी अत्यावश्यक ठरतात. दर्जाप्रमाणे विशिष्ट वयानंतर सैनिकी क्षेत्रातून निवृत्ती दिली जाते. देशाच्या रक्षणासाठी कार्य केल्याबद्दल केंद्र शासनाच्या अनेक सुविधा सैनिकांना बहाल केल्या जातात. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्यांना या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
List of colleges offering Military Education, NDA, INDIA
फॅशन डिझायनिंग
प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तू आपले अस्तित्व सौंदर्यपूर्ण ठेवेल तेव्हाच लक्ष वेधून घेते. तेव्हा तिचा आकार, रंगसंगती बनवताना लावलेली कौशल्ये आणि कालानुरूप अनुरूपता सिद्ध होते. फॅशन डिझायनिंग ही अभ्यासाची व संधीची अशी शाखा आहे, ज्यासाठी निश्चितच म्हणू शकतो, "जब तक सुरज चांद रहेगा, फॅशन तेरा नाम रहेगा." भौगोलिक परिस्थिती, परंपरा, कच्च्या मालाची उपलब्धता, निर्मितीक्षमता प्रतिभाशक्ती, सूक्ष्मदृष्टी, रंगाच्या तापमानातील फरक, आकाराची जाण, प्रतिभाशक्ती आणि समाजाच्या आवडीतील बदलांचा मागोवा घेऊन काळाच्या थोडेसे पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता या बाबी ह्या क्षेत्रातील यशस्वितेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. निरंतर नावीन्याची मागणी व गरजेनुरूप पुरवठा हे या क्षेत्रातील आर्थिक सूत्र असल्याने करिअर म्हणून निवड करण्यासाठी वरील गुणांची खाण असणार्‍यांनी हे क्षेत्र स्वीकारणे फायदेशीर ठरेल.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
www.fdci.org/ www.nifd.net/
प्रशासन व व्यवस्थापन क्षेत्र
प्रत्येक आस्थापनेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख करणे, भविष्यातील वाटचालीचा आढावा घेणे, आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवणे, ग्राहकांचे व कर्मचार्‍यांचे हित जोपासणे इत्यादी बाबींचा अभ्यास करणारे क्षेत्र म्हणजे व्यवस्थापन क्षेत्र. आस्थापनांचा वाढता व्यापार व तंत्रज्ञानाच्या या युगात आवश्यक झालेला नेटकेपणा यामुळे व्यवस्थापन क्षेत्राला सध्या खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे.
व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण हे बारावीनंतरची पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी अशा वेगवेगळ्या स्वरुपात प्राप्त करता येते. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
महाराष्ट्रातील कॉलेजेसची यादी
कायदा व व्यवस्थापन क्षेत्र
भारतीय घटनेने प्रत्येकास स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. मुळातच घटनेचा संपूर्ण साचा हा स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित आहे. घटनेने जरी स्वातंत्र्य दिलेले असले तरीदेखील समाजात वावरताना सर्वसामान्य चौकटीतच प्रत्येक नागरिकाची वागणूक अभिप्रेत आहे, अन्यथा समाजाचा प्रवास स्वातंत्र्याकडून स्वैरतेकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाची बांधणी चाकोरीबद्ध, कर्तव्ये व जबाबदार्‍या याबाबत जाणीव असणारी आणि वर्तणुकीचे निकष ठरवून त्यातच वागणूक असण्यासाठी तसेच परस्पर तंटे, तक्रारी सोडविण्यासाठी विविध कायदे केंद्र शासन तसेच राज्य शासनाने केले आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था योग्य राखून समाजातील सर्व घटकांना सलोख्याने राहून सर्वसाधारण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत. कायद्याच्या अभ्यासासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, व्यासंग आणि प्रखर स्मरणशक्ती तथा सातत्याने वाचनाची आणि लक्षपूर्वक ऐकण्याची कला अवगत असली पाहिजे. प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ माहिती असणे आणि वाक्यांचे विविध अर्थ काढण्याची मानसिकता या क्षेत्रातील व्यक्तीस निर्भेळ यश प्रदान करते.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
महाराष्ट्रातील कॉलेजेसची यादी
उड्डाण क्षेत्र
एक आकर्षक क्षेत्र. विमानातील प्रवाशांच्या स्वस्थतेसाठी सदैव तत्पर असणार्‍या मनुष्यबळापासून ते विमानाचे परिरक्षक व वैमानिक होण्यासाठी या क्षेत्राची निवड केली जाते. प्रामुख्याने या क्षेत्राची वाणिज्यिक आणि सैनिकी अशी विभागणी केली जाते. भारतीय विमान पतन संचालनालय, दिल्ली या केंद्र शासनाच्या विभागातर्फे उड्डाण क्षेत्रातील तांत्रिक बाबीच्या सर्व अभ्यासक्रमांना मान्यता दिली जाते. कौशल्यावर आधारित मनुष्यबळाची या क्षेत्रात जगभर प्रचंड मागणी आहे. भाषा, ज्ञान, कौशल्ये, शारीरिक ठेवण, सुदृढता, जबाबदारीची जाणीव, निर्णयक्षमता, दुर्दम्य इच्छाशक्ती इत्यादी बाबी या क्षेत्रात जाण्यासाठी मूलभूत गरजा म्हणून संबोधल्या जातात.
अधिक माहितीसाठी आपण खालीदिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
Directorate General of Civil Aviation, BCAS
फार्मसी
दैनंदिन प्रवाहात फार्मासिस्टची गरज नेहमीच भासते. नुसतेच औषध विकणे हे त्याचे काम नसून एखादे इफेक्टिव्ह औषध बनवण्यामध्ये फार्मासिस्ट मोठा हातभार लावतात, म्हणून तो सायंटिफिक स्टडीशी जोडला गेलेला अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो.
काही महत्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Directorate Technical Education
नर्सिंग
नर्सिंग हा एक नोबेल प्रोफेशन म्हणून ओळखला जातो लहान मुलांपासून ते आबालवृद्धापर्यंत सर्वच लोकांची काळजी घेण्याचे काम हे करतात. डॉक्टर जेवढा महत्त्वाचा तेवढाच नर्स हा महत्त्वाचा घटक असे म्हटले तरी चालेल. नर्सेस हे प्रत्येक हॉस्पिटल चे अविभाज्य घटक समजले जातात.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
MGM Group, MIT, Godavari College of Nursing,Jalgaon
खगोल-विज्ञान
खगोलशास्त्र हे ब्रम्हांडातील सेलेस्तिअल घटकांशी निगडित असलेले विद्याशास्त्र. नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुलळे खगोलशास्त्राला नवीन जीवनदान तर मिळाले आहेच, पण त्याचा अभ्यास करणेही सोपे झाले आहे. आर्यभट्ट आणि भास्कर यांच्या सारखे काही खगोलशास्त्रज्ञ भारतामध्ये होऊन गेले ज्यांनी भारताचे व खगोलशास्त्राचे नाव मोठे केले आहे.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
www.iiap.res.in,www.iisc,ernet.in
Nano टेक्नोलोजी
नॅनो टेक्नॉलॉजी ही एक नवीन कार्यक्षम आणि झपाट्याने वाढणारी टेक्नॉलॉजी म्हणून ओळखली जाते. एखाद्या पदार्थाला त्याच्या सर्वात लहान रुपामध्ये परिवर्तीत केल्यावर त्याच्या मूळ गुणधर्मात काही बदल घडून येतात, त्याचाच अभ्यास म्हणजे Nano टेक्नॉलॉजी.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded, www.unipune.ac.in, www.jncasr.ac.in, www.mu.ac.in
बायो केमिस्ट्री
झपाटयाने प्रगती करणार्‍या मेडिकल क्षेत्रासोबत बायो केमिस्ट्री सुद्धा झपाटयाने वाढत आहे. मनुष्याच्या दैनंदिन जीवनाचा अभ्यास व ते अजून कसे सुधारता येईल याचा अभ्यास म्हणजे बायो केमिस्ट्री.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University, www.unipune.ac.in, Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded, www.mu.ac.in
पर्यावरण शास्त्र
पर्यावरणाची काळजी न घेण्याचे दुष्परिणाम माणसाला आता दिसू लागले आहेत. पर्यावरण शास्त्र हा पर्यावरणातील होणारे बदल, ऊर्जा वाचवण्याचे उपाय अशा काही पर्यावरणाशी निगडीत घटकांचा अभ्यासक्रम.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, www.unipune.ac.in, Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded, www.mu.ac.in
जीओलॉजीस्ट, होम सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, बायो इन्फोर्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, फोरेंसिक सायन्स या सारख्या काही कोर्सेसचे पर्यायही मुलांसमोर उपलब्ध असतात. अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.
Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University, www.unipune.ac.in, Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded, www.mu.ac.in

व्यावसायिक अभ्यासक्रम


व्यावसायिक शिक्षण हे माणसाच्या मनगटातील बळ म्हटले तरी चालेल. त्याच्या बळावर माणूस हा जबाबदारीची कामे घेऊन ती पूर्ण करण्याची धमक त्याच्यात येते. १२वी विज्ञाननंतर व्यावसायिक शिक्षण म्हणून इंजिनिअरिंग अथवा मेडिकल या दोन क्षेत्रांकडे बघितले जाते.
अभियांत्रिकी अभ्यासक्रम
नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणार्‍या साधनांचा मानवी जीवन सुकर करण्यासाठी सुयोग्य वापर करून किमान खर्चात विविध बाबी उपलब्ध करून देण्याची प्राथमिक जबाबदारी अभियंत्यावर येते. समाजातील प्रत्येक भौतिक विकासाचे सारे श्रेय अभियंत्यांना जाते. नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध,उपलब्ध तंत्रज्ञानाचा विकास आणि तंत्रज्ञानाचा मानवी प्रगतीसाठी सकारात्मक वापर हे अभियंत्यांचे आद्यकर्तव्य आहे.
गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांमध्ये प्रावीण्य असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी या शाखेची दालने सदैव उघडी असतात. ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि निर्णयशक्ती अशा पाचही शक्तींचा संचय ठायी असणे ही या शाखेची मूलभूत गरज आहे. निरंतर शिक्षण, बदलत्या परिस्थितीचा मागोवा घेऊन बदल अंगीकारण्याची क्षमता, नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याची ऊर्मी, प्रयोगशील वृत्ती आणि समूहात काम करण्याची मानसिकता तथा शोधवृत्तीच्या व्यक्तींना या क्षेत्रात अनंत संधी आहेत.
बारावीत, गणित, विज्ञान व भौतिकशास्त्र या विषयात ५०% गुणांसह पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अभियांत्रिकीची सामाईक परीक्षा देणे बंधनकारक आहे.
केंद्रीय स्तरावरील JEE, AIEEE या प्रमुख सामाईक परीक्षा होतात तर राज्य स्तरावर MH. CET ही परीक्षा होते. सामाईक परीक्षेचा प्रकार, मिळालेले गुण व उपलब्ध जागा या नुसार आय आय टी, एन आय आय टी, स्वायत्त संस्था, शासकीय, अनुदानित संस्था व विनाअनुदानित संस्था या मध्ये प्रवेशाचे निकष ठरत असतात.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे,
IITs
बद्दलची माहिती , National Institutes बद्दलची माहिती, IISc Banglore, IISc Pune, संपूर्ण महाराष्ट्रातील अभियांत्रिकी कॉलेजेसची यादी, महाराष्ट्रातील संपूर्ण युनिवर्सिटीची यादी, मराठवाड्यातील कॉलेजेसची यादी, Government College of Engineering, Aurangabad, DBATU, DOEACC, NITIE, CITDवैद्यकीय अभ्यासक्रम
आरोग्य निरोगी राखणे ही प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज. स्वास्थ्य स्वस्थ असल्याखेरीज कोणताही सजीव असेपर्यंत या शाखेची गरज आणि विकास होतच राहणार आहे.
रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रामध्ये पारंगतता असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय क्षेत्र म्हणजे निश्चितपणे यशस्वितेकडे नेणारी शाखा. सखोल ज्ञानार्जनाची भूक, कौशल्यप्राप्तीची ओढ, पृथ:करण करण्याची क्षमता, विविध रसायनांच्या कमी/जास्तपणामुळे होणारे परिणाम, अत्यंत बारकाईने पाहण्याची दृष्टी, एखाद्या रसायनाचे सजीवांवर होणारे दुष्परिणाम, औषधी द्रव्यांच्या मात्रांचे सजीवांवर होणारे दुष्परिणाम, औषधी द्रव्यांच्या मात्रांचे सजीवाच्या रचनेवर होणारे परिणाम, सातत्याने आयुष्यभर अभ्यासण्याची प्रवृत्ती, मानसशास्त्राचा अभ्यास, सेवाभावी वृत्ती आणि तुलनेत थोडेसे उशिरापर्यंत आयुष्यात मिळण्यासाठीचा संयम या बाबी विद्यार्थ्यांकडे असणे अपेक्षित आहे. यश, कीर्ती, प्रतिष्ठा व पैसा सदैव या क्षेत्रातील व्यक्तींकडे राहण्यास तत्परतेने तयार असतात.
वैद्यकीय शाखेचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून बारावीत मिळालेल्या गुणानुसार तसेच आपापल्या क्षमतेनुसार अभ्यासक्रमाची निवड करता येवू शकेल. वैद्यकीय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम खालील प्रमाणे
एम. बी. बी. एस. (अॅलोपॅथी)
बी. ए. एम. एस. (आयुर्वेदिक)
बी. एच. एम. एस. / डी. एच. एम. एस. (होमिओपॅथिक)
बी. डी. एस. (दंतवैद्यक )
बी. पी. टी. एच. (फिजिओथेरपी)
बी. यू. एम. एस. (युनानी)
बी. ओ. टी. एच.
B. Sc. (
एच एल एस/ बीए एस एल पी)
पशु वैद्यकीय
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
महाराष्ट्रातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांची यादी . महाराष्ट्र युनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, नाशिक

पशुवैद्यकशास्त्र
माणूस आणि प्राणी हे सातत्याने एकमेकांना पूरक ठरण्याची भूमिका बजावत आले आहेत. गाय या प्राण्याचे दुध सर्वांत सकस, तर बैल हा शेतकर्‍याचा सच्चा मित्र. बैलाचे महत्त्व आजही आधुनिक युगात आणि यंत्रक्रांतीच्या काळातही कमी झालेले नाही. शहरी भागात पाळीव कुत्र्यांच प्रमाण मोठे आहे. मानवाला साहाय्यभूत ठरणार्‍या प्राण्यांना सांभाळणे, ही मानवाची स्वार्थी गरज आहे. या स्वार्थपुर्तीसाठीच पशुवैद्यकीयशास्त्राचा जन्म झाला.
प्राणी आणि पशू यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या शरीररचनेनुसार आवश्यक खनिजे, प्रथिने यांचे संतुलन आहारातून करणे, प्राण्यांच्या आरोग्यासाठी विविध औषधींचा वापर, प्राण्यांतही प्रतिकारक्षम जातींची निर्मिती करण्यासाठी संशोधन करणे, संकरित प्राण्यांची पैदास करून; वसुंधरेचे संवर्धन, संगोपन तथा संतुलन ठेवून मानवी जीवन सुकर करण्याचे कार्य या क्षेत्रांमध्ये केले जाते.
जीवशास्त्राचा अभ्यास, रसायनांची प्रक्रिया शृंखला, ग्रामीण भागात काम करण्याची आवड, प्राण्यांच्या आरोग्यासाठीच्या विविध चाचण्या आणि प्रतीजैविकांची प्राण्यांचे आरोग्य संवर्धनासाठी सुयोग्य वापर करण्याची दृष्टी या बाबींची हे क्षेत्र निवडण्यासाठी आवश्यकता असते.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
MAFSU, Veternary counsil of India, Maharashtra State Veterinary Council, Nagpur,
महाराष्ट्रातील काही कॉलेजेसची यादी, Veternary Colleges in India, , AGRICULTURE AND VETERINARY UNIVERSITIES in India

कृषी / कृषी तंत्रज्ञान क्षेत्र
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी उत्पादनावर अवलंबून आहे. जगात लोकसंख्येच्या बाबत दोन नंबरवर. आपला देश भाजीपाला, फळे व दुग्ध उत्पादनातही जगात दुसरे स्थान बाळगून आहे. तरीदेखील भारतातील कृषी क्षेत्रातील उत्पादनक्षमता जगाच्या तुलनेत खूप कमी असून, त्यात काम करण्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत.
वनस्पतीमधील शारीरिक वाढ नियंत्रित करून त्यातील घटकांच्या व्यवस्थापनाने अधिकाधिक फलोत्पादन कसे होईल, यासाठी सदर शाखा कार्य करते. शेती-उद्योगातील अवजारे, वाहतुकीची साधने, सेंद्रिय आणि रासायनिक खते यांचे योग्य गुणोत्तर, कीड प्रतिबंधक जैविकांचा वापर, विविध धान्ये आणि फळांच्या जनुकीय बदलांतून संकरीत नवीन जातींचा शोध लावून उत्पादन वाढविणे, जमिनीचे आणि पाण्याचे व्यवस्थापन, भौगोलिक आणि वातावरणाचा सखोल अभ्यास करून अनुरूप पीक पद्धतीचे निकासन इत्यादी क्षेत्रात कृषी तंत्रज्ञान क्षेत्र पोहोचले आहे.
फळ प्रक्रिया उद्योगाची क्षमता सध्याच्या २% वरून ४% जरी केली तरी भारतास अब्जावधी रुपयांचे परकीय चलन मिळेल. ग्रामीण भागात राहण्याची मानसिकता, निसर्गचक्राचा अभ्यास, मातीचा पोत आणि घटक, वातावरणात येणार्‍या धान्यांचा अभ्यास, आधुनिकतेची शेतीस जोड देण्याची वृत्ती असणार्‍यांना हे क्षेत्र खूपच छान आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतीच्या उत्पन्नावर आयकर शून्य.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
काही कृषी विद्यापीठांची यादी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, महाराष्ट्रातील काही कॉलेजेसची यादी, AGRICULTURE AND VETERINARY UNIVERSITIES in India

आर्किटेक्चर (वास्तुविशारद)
ह्या अभ्यासक्रमाअंतर्गत संकल्पनेवर आधारित वस्तूची रचना व संकल्पचित्रे तयार करण्याचे कालाधारित शास्त्र शिकविले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यास वास्तुविशारद म्हणून काम करता येते व त्यांतर्गत तो जमिनीची रेखांकने तयार करणे इमारतींची संकल्पचित्रे तयार करण्याचे कार्य करू शकतो. मुख्यत्वे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करता येतो. ह्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी तीन केंद्रिभूत परीक्षा (CET) घेण्यात येतात. AIEEE (Architecture), MHTCET, Architecture AIEEE. Architecture परीक्षेच्या गुणांवर केंद्र शासनाच्या संस्थांमध्ये शिकविल्या जाणार्‍या Architecture अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो, तर एमएचसीइटी Architecture परीक्षेच्या मार्गावर राज्य शासनाच्या अखत्यारीतील अनुदानित व विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
IIA-INDIA, Maharashtra Association Of Schools of Architecture, Council of Architecture, NATA,
महाराष्ट्रातील काही कॉलेजेसची यादी

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र
चालू दशकास माहितीच्या विस्फोटकाचे दशक समजले जाते. दरवर्षी माहितीमध्ये वाढ होत असून तिचा सर्वसाधारण दर प्रतिवर्षी दुप्पट होण्याचा आहे. इतक्या प्रचंड माहितीचे संकलन, व्यवस्थापन, साठवणूक, वैशिष्ट्यपूर्ण माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय नेमकेपणा साध्य होत नाही. विशिष्ट प्रकारच्या माहितीची उपलब्धता, वर्गीकरण, पृथ:करण आणि उपयोगितेसाठी उपयोगात आणणारे शास्त्र म्हणजे माहिती तंत्रज्ञानशास्त्र. जगभर ढिसाळ स्वरुपात उपलब्ध असणारी माहिती वापरास अनुकूल बनविण्यासाठी, या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. सेवाक्षेत्रातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी शाखा म्हणून माहिती तंत्रज्ञान शाखेचा दबदबा कायम आहे.
भारतीय विद्यार्थ्यांची गणितीय क्षमता, भाषेवरील प्रभुत्व, तर्कसंगती, विचारसरणी, सुयोग्य आकलन क्षमता, तासन्तास एकाच ठिकाणी बसून अथक काम करण्याची सवय, अचूक आणि दर्जेदार क्षमता इत्यादी बाबींच्या जोरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने जगात वर्चस्व प्रस्थापित केलेले असल्याने आणि बी पी ओ, के पी ओ, आणि एलपीओ क्षेत्राने नोकरीच्या प्रचंड संधी जगभर निर्माण केलेल्या आहेत.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Department of Information tehcnology, India,
महाराष्ट्रातील काही कॉलेजेस ची यादी:Animation Courses Maharashtra, BCA Courses, Information on BPO, IGNOU BCA Info, Indian Institues of Information Technology, Information on KPO

संगणक क्षेत्र
कृषिक्रांती आणि औद्योगिक क्रांती नंतर देशात संगणक क्रांतीने आर्थिक आणि व्यवस्थापन क्रांती झाली आहे. मानवी सातत्याच्या मर्यादा लक्षात घेऊन अभियंत्यांनी सातत्यपूर्ण आणि अचूक प्रक्रियेसाठी संगणकाचा शोध लावला. ज्यामुळे क्लिष्टता जाऊन सुकरता पूर्ण प्रक्रिया पुन्हा करण्याएवजी फक्त चुकांच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेमुळे वाचणारा वेळ व पैसा, कमी जागेत अधिक माहितीची सुरक्षित साठवणूक, डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे माहिती प्रक्रियेचे स्वस्त व जलद वहन, एका ठिकाणी बसून जगातील कुठलीही कामे करण्याची क्षमता मानवाला प्रदान करणारे हे संगणक क्षेत्र.
भौतिकशास्त्र, गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांत गती असणार्‍यांसाठी एक उत्तम क्षेत्र. प्रामुख्याने यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन शाखा. प्रतिभा, सूत्रबद्धता, तर्कसंगती आणि नैसर्गिक साखळीस ध्यानी ठेवून कार्य करण्याची पद्धती ज्याच्यात विकसित झालेली आहे, अशांना या शाखेत सहज यश प्राप्त होते. प्रत्येक क्षेत्र संगणक नियंत्रणामुळे व्यापलेले असल्याने व त्याची व्याप्ती वाढतच असल्याने या क्षेत्राची झपाटयाने वाढ होत आहे.
काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळे खालीलप्रमाणे
Department of Information tehchnology, India.
महाराष्ट्रातील काही कॉलेजेसची यादी