सी. ए. Charterd Accountant


सध्याचे युग हे जागतिकीकरण व उदारीकरणाचे आहे. त्यामुळे व्यापाराला उदंड संधी आहेत. व्यापार आला की हिशोब व्यवस्थितपणा, करप्रणाली, अभ्यास इत्यादी बाबी आल्याच. त्यासाठी Charterd Accountant ची फार मोठया संख्येने गरज आहे. भारतात यासाठी मुबलक संधी आहेत. शिवाय वाणिज्य शाखेतील प्रत्येक विध्यार्थ्याला सी ए व्हावे वाटते कारण इंजीनिअर किंवा डॉक्टरइतकेच ल्गॅमर या व्यावसायिकाला दिसून येते. 

यात आर्थिक उत्पन्न ही चांगले मिळते. जागतिकीकरणामुळे सीए व्यक्तीला जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळू शकते. बँक, शैक्षणिक किंवा इतर मोठया संस्थांची आर्थिक तपासणी करण्यासाठी Charterd Accountant ची आवश्यकता असते. कर सल्लागार म्हणूनही या व्यक्ती काम करू शकतात. शिवाय संबंधित विविध क्षेत्रातही नोकरीच्या विविध संधी आहेत. स्वतंत्र व्यवसाय करता येतो.

पात्रता व निवड पद्धती :

बारावीच्या परीक्षा देणाऱ्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षा ( सीपीटी कॉमन प्रोफिशंसी टेस्ट ) देता येते. प्रथम, द्वितीय अथवा तृतीय वर्ष (पदवी) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश परीक्षेस बसता येते. एकूण दोनशे गुणांची ही प्रवेश परीक्षा असते. प्रवेश परीक्षेत एकूण शंभर गुण मिळविणे आवश्यक असते. या परीक्षेसाठी चुकीच्या गुणासाठी उणे मार्क -निगेटिव्ह मार्किंग ( एक चूक उत्तरासाठी ०.२५ गुण उणे होतात) पद्धत आहे. वरील सीपीटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवाराला व्यावसायिक Charterd Accountant कडे साडे तीन वर्षाची आर्टिकलशिप करावी लागते. सुरवातीच्या अठरा महिन्यांनंतर विद्यार्थी पीसीसी ( Professional Competency Course ) परीक्षेला बसू शकतो. अर्थात पूर्ण साडेतीन वर्षे ( बेचाळीस महिने ) आर्टिकलशिप केल्यावरच सी. ए. परीक्षेला बसता येते. सी.ए.परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेची जबाबदारी आय सी ए आय ( Institute of Charterd Accountants of India ) हि संस्था पार पाडते. Cost and Management Accountant ( सी एम ए ) सी.ए. (Charterd Accountant) प्रमाणेच हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी आहेत. प्रत्येक वस्तूचे भाव वाढण्याची प्रक्रिया चालू असते. यावर नियंत्रण ठेवावे लागते. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात. किंवा नोकरी प्राप्त करू शकतात. Cost Accountant म्हणून practice करता येते.

पात्रता व निवड पद्धती : कोणत्याही शाखेचा पदवीधर या कोर्ससाठी अर्ज करू शकतो. जे उमेदवार पदवीधर नाहीत त्यांना प्रथम प्रवेश परीक्षा द्यावी लागते. फौंडेशन परीक्षेसाठी प्रत्येकी १०० गुणांचे चार पेपर्स द्यावे लागतात. फौंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवार इंटरमिजीएट परीक्षेला बसू शकतो. नंतर उमेदवार अंतिम परीक्षा ( फायनल एक्झाम ) देऊ शकतो. अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन नंतर तीन वर्षे कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर विद्यार्थ्याला असोसिएट मेंबरशीप ( सीएमए ) मिळते. आय सी. डब्ल्यू. ए . ( The Institute of Cost and Works Accounts ) ही संस्था या प्रकारचे विविध अभ्यासक्रम नियंत्रित करते. कंपनी सेक्रेटरी (सीएम ) Charterd Accountant ( सी ए ) प्रमाणेच सी एम झालेल्या व्यक्तींनाही भरपूर संधी आहेत. कंपन्यांचे कायदेकानून जाणून त्याप्रमाणे कंपन्यांचा व्याप आणि कामकाज यावर नियंत्रण व कार्यपालन करावे लागते. Institute of Company Secretaries of India हि संस्था हा अभ्यासक्रम नियंत्रित करते. बारावीनंतर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ग्रहण केल्यानंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अर्थात फक्त बारावी परीक्षेपर्यंतच शिक्षण घेतलेल्यांसाठी सुरुवातीला फौंडेशन कोर्स आधी पूर्ण करावा लागतो. पदवीधारकांसाठी ही आवश्यकता नाही. यानंतर सर्वांना एक्झीक्युटीव्ह प्रोग्रामला प्रवेश घ्यावा लागतो. दोन module मध्ये हा प्रोग्राम व त्यानंतर १५ महिन्यांचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर संबंधितांना प्रोफेशनल प्रोग्रामला प्रवेश मिळू शकतो. जे विद्यार्थी प्रोफेशनल प्रोग्राम ५० टक्के गुण मिळवून पूर्ण करतात व management ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करतात त्यांनाच नंतर कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता येते. स्वयंरोजगार किंवा वेतन रोजगार यापैकी कुठलेही क्षेत्र आवडीप्रमाणे निवडण्याची संधी प्राप्त होते.