माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर


सर्वांसाठी करिअरची संधी असणारे आयटी (माहिती तंत्रज्ञान ) हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या क्षेत्रात आपले करिअरचे स्वप्न पूर्ण करू शकतो. संगणक कुशलतेने वापर करण्याचे ज्ञान व कौशल्य आपल्याजवळ असेल आणि इंग्रजी भाषेचा वापर योग्य तर्‍हेने करता येत असेल तर आपला करिअरचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा. या क्षेत्रातील विविध संधीचा हा थोडक्यात परिचय.



Call center व BPO मध्ये करिअर संबंधी संधी

या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. Call center आणि BPO या क्षेत्रात $ ३०० बिलियनपेक्षा कितीतरी अधिक रकमेचा व्यवसाय उपलब्ध होत आहे. त्याचा आपण फायदा घ्यायला हवा. Call center व BPO म्हणजे काय? आजकाल अनेक विकसित देशांमध्ये आणि भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये सुद्धा मोठमोठ्या व्यवस्थापनासाठी / उद्योग व्यवसायासाठी ग्राहक सेवा केंद्राची फार मोठया प्रमाणात गरज आहे. ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून घेणे, तक्रारी योग्य ठिकाणी पाठवणे, तांत्रिक माहिती देणे, टेली मार्केटिंग करणे, इ. कामांसाठी Call center मोठ्या व्यवस्थापनांना मदत करतात. Call center operator हे काम सहज करू शकतात. BPO म्हणजे Business process outsourcing. या ठिकाणी संगणकाद्वारे करता येण्याजोगी ठराविक स्वरुपाची नित्य कामे (हजेरीपत्रक - पे रोलची कामे, कर परतावा - TAX Return preparation, डेटाबेस अद्ययावत करणे, इत्यादी) केली जाऊ शकतात. या कामासाठी भरमसाठ पगार देऊन व्यावसायि क अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या पदवीधरांना नोकरी देण्याएवजी संगणकाचे ज्ञान असणारा कुठल्याही क्षेत्रातील पदविधराकडे हे outsourcing केले जाते. यात कंपन्यांना खूपच पैसा वाचतो व अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

आवश्यक पात्रता ( Qualification ) : कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो. इंग्रजीचे ज्ञान आणि संगणकाचा कुशलतेने वापर करता येणे आवश्यक आहेत. संभाषण कला असावी.

क्षमता ( Compitancy ) : संगणकामध्ये भरावयाची माहिती अचूक व जलद गतीने भरावयाची क्षमता असणार्‍यांना संधी जास्त आहे. बर्‍याच परदेशी (अमेरिका इत्यादी) व्यवस्थापनांची Call centers भारतात आहे. त्यासाठी परदेशी व्यक्तींचे उच्चार व बोलण्याची ढब समजणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उत्तर देण्यासाठी आपल्यालाही तसे उच्चार करणे गरजेचे ठरते. अर्थात हे शिक्षण देणार्‍या अनेक संस्था उपलब्ध आहेतच.छोटया प्रशिक्षणाने या गोष्टी आत्मसात करता येणे शक्य आहे. फ्रेंच, जर्मन, इत्यादी परदेशी भाषा (Foreign Language) शिकून घेणार्‍या व्यक्तींना करिअरमध्ये लवकर प्रगती करता येते.

सुसंधी (Opportunities) : या क्षेत्रात प्रगतीला खूप वाव आहे. सुरुवातीला साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये प्रतिमाह मिळू शकतो. कार्यक्षमता वाढवीत नेल्यास एकदोन वर्षात पंधरा हजार रुपये प्रती महिना प्राप्ती सहज होईल. आजकाल युवा व्यक्ती पदवी शिक्षण घेत असतांनाच संगणकाचे कौशल्य व ज्ञान सहज हस्तगत करू शकतात. त्यामुळे पदवीधर होताच करीअरची सुरुवात करता येउ शकते आणि व्यवसायात लवकर जम बसतो. संभाषण कला, वेळेचे नियोजन व तत्परता, सुस्पष्ट आवाज, नम्रता या बाबींमुळे लवकर प्रगती होते.



करियर इन टेक्निकल रायटिंग

आजकाल इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा उपयोग लहान मुलांपासून मोठया व्यक्तींपर्यंत सर्वच जण घरीदारी करीत असतात. या उपकरणांची माहिती वापरण्याच्या पद्धती, देखभाल, दुरुस्ती, तांत्रिक ज्ञान याबद्दलची माहिती सर्वांनाच आवश्यक असते. त्यामुळे या उपकरणाबरोबर संबंधित माहिती असलेली माहितीपत्रिका, पुस्तिका देणे निर्माणकर्त्याला आवश्यक असते. हि पुस्तिका लिहिणे म्हणजे थोडक्यात टेक्निकल रायटिंग. या माहितीपत्रिकेत छान छान रंगीत छायाचित्रे दिल्यास त्याची उपयुक्तता वाढते व उपकरणे हाताळणे सोपे जाते. अशी माहिती-पुस्तिका तयार करण्याचे काम एक चांगले करीअर क्षेत्र बनले आहे. software manual तयार करणे याच प्रकारात मोडते. पात्रता: कुठल्याही शाखेतील पदवीधारक, ज्यांना इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असेल आणि लेखनशैलीचे कौशल्य असेल, त्या व्यक्ती हे करिअर सक्षमतेने करू शकतात.



Animation , Multimedia क्षेत्रातील करिअर

सध्याचे युग हे जाहिरातीचे युग समजले जाते. जेवढी जाहिरात आकर्षक व लक्षवेधी तेवढा व्यापार जास्त हे गणितच बनले आहे. आकर्षक रंगसंगतीबरोबरच मोजक्या शब्दांत महत्त्वाची माहिती देणे हे वैशिष्ट्य ठरत आहे. त्याशिवाय चित्रपट, टीव्ही मालिका, वेबसाईटस इत्यादीमध्ये animation चे महत्त्व उपयोग दिवसेंदिवस अनेक पटीने वाढते आहे. त्यासाठी या क्षेत्रात करिअर करणार्‍यांना अमाप संधी आहे. पात्रता : ज्य़ा व्यक्तिना चित्रकलेत आवड आणि नैपुण्य प्राप्त आहे आणि त्याच्याजवळ web designing, 2d, 3d, चे ज्ञान आहे किंवा शिकण्याची इच्छा आहे त्या व्यक्ती हे करिअर करू शकतील. सृजनशीलता, कल्पकता हे गुण जोपासणार्‍यांसाठी हे करिअर आयुष्यासाठी मैलाचा दगड (mile stone) ठरू शकते. विशेष म्हणजे पदवी शिक्षण घेत असतांनाही याबाबतचे कौशल्य देणारे अभ्यासक्रम पूर्ण केले जाऊ शकतात.



संगणक हार्डवेअर, नेट्वर्किंगमध्ये करिअर

सध्याचे युग हे संगणक युग मानले जाते. त्यामुळे संगणकाची संख्या जशी अमर्याद वाढत आहे तेवढेच अमर्याद करिअर संगणक देखभाल, दुरुस्ती इत्यादींचे होत आहे. सॉफ्टवेअरपेक्षा जास्त मागणी हार्डवेअरमध्ये दिसू लागली आहे. प्रत्येक घरात प्रत्येक व्यवसायात संगणक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे संगणक दुरुस्ती, विक्री, देखभाल, नेट्वर्किंग इत्यादी क्षेत्रे अमर्याद विकसित झाली आहेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. बँका, रेल्वे, विमान कंपन्या, मनोरंजन क्षेत्रे, बीपीओ इत्यादी ठिकाणी करिअर घडू शकते.
पात्रता : कुठल्या शाखेत पदवीधर आवश्यक ते संगणक ज्ञान, प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात येऊ शकतो. पदवी शिक्षण घेत असतांना मोकळ्या वेळेत संगणक ज्ञान व कौशल्य आत्मसात करता येऊ शकते. क्षमता : आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र ( एम.सी.पी., एम.सी.एस.ए. इत्यादी ) प्राप्त करून घेणार्‍यांना विशेष संधी आहेत. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारे कौशल्य देणाऱ्या प्रशिक्षण देणाऱ्या योजनाही उपलब्ध आहेत.



मास्टर ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन

विविध शाखेतील पदवीधारकांसाठी संगणक क्षेत्रातील चांगले करियर करण्याची संधी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळू शकते. कार्यक्षेत्र : आयटी कंपन्यांमध्ये प्रोग्रामर (योजक) म्हणून काम करता येईल. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए., इत्यादी पदवीधारक हा अभ्यासक्रम पूर्ण करून आयटी क्षेत्रात करियर करू शकतात. निवड निकष : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत यासाठी साधारणतः मार्च मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. साधारणपणे २ तासामध्ये १०० प्रश्न सोडवावे लागतात आणि २०० गुणांची परीक्षा होते. गणित, इंग्रजी, लॉजिकशी संबंधित हे प्रश्न असतात. अतिशय सावधानपूर्वक आणि खात्री असल्यासच प्रश्नोत्तर देणे योग्य ठरते कारण उत्तर चुकल्यास गुण उणे होतात हे लक्षात ठेवावे. इंतेरांचे test मध्ये मिळालेले गुण आणि पाहिजे असलेल्या संस्थांसाठी भरलेला ऑप्शन फॉर्म, यांच्यावर आधारित विध्यार्थ्यांना एम.सी.ए. च्या शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळतो. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात गणित विषयाबरोबर संगणकासंबंधी सोफ्टवेअर, हार्डवेअर, प्रोग्रामिंग लांग्वेजेस इत्यादीबद्दल शिक्षण दिले जाते. शेवटच्या वर्षी एखाद्या कंपनीत प्रोजेक्टचे कामही करावे लागते. केम्पस इंटरव्यू विविध परीक्षांतील सातत्यपूर्ण गुणवत्ता टिकविणाऱ्या विद्यार्थांची निवड प्राधान्याने होते. यावेळी गटचर्चा मुलाखत याद्वारे निवड निश्चित केली जाते. क्षमता वृद्धी : शिकत असतांनाच काही परदेशी भाषा शिकणे, लवकर नोकरी मिळविण्यासाठी फायदेशीर ठरते.



मास्टर ऑफ कॉम्प्युटर मेनेजमेंट

संगणकाच्या मदतीने व्यवस्थापन क्षेत्रातील कामे सुकर होतात. कार्यक्षेत्र : माहिती तंत्रज्ञान शाखेत करियर करता येते. पात्रता : आर्ट्स, कॉमर्स, इत्यादी शाखेमधील पदवी. हा पदव्युत्तर कोर्स करतांना व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रातील तांत्रिक विषयांचा अभ्यास करावा लागतो.शिवाय सोफ्टवेअर मार्केटिंग इत्यादी विषयही शिकावे लागतात. संशोधन (रिसर्च) करणाऱ्यांसाठी करीयरच्या संधी अनेकांना संशोधन कार्य करण्याची आवड असते पण त्याचा कालावधी, रोजगाराची संधी, विविध कार्यप्रणाली भविष्यकालीन उत्कर्ष इत्यादीबद्दल अज्ञात असते.

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पी.एच.डी. मिळवून पुढे संशोधन क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या व्यक्ती यासाठी पत्र समजल्या जातात. पी.एच.डी. मिळविल्यावर साधारणपणे तीन ते चार वर्ष संशोधन कार्य करावे लागते.

क्षमता : स्वतःचे स्वतः ( स्वअध्ययन ) करण्याची सवय, अवलोकन कौशल्य, चिकाटी, दिर्घोद्योगाची आवड, पृथ:करण, इत्यादी गुण असणार्या व्यक्ति या क्षेत्रात लवकर पारंगत होतात.