कमी कालावधीतील अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी किंवा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान कौशल्यावर आधारित उच्च माध्यमिक शिक्षण आपणास उपयोगी पडते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी उद्योग क्षेत्रात प्रवेश करू शकतो व ते नको असल्यास पुढील उच्च शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यास उपलब्ध होतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर
विद्यार्थ्यास व्दितीय वर्षाच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. तसेच त्याला कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमास जाता येते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे या अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात येते. हा अभ्यासक्रम बर्याचशा संस्थांमार्फत राबविला जातो. या संबंधीची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.