खगोल शास्त्रात अवकाशातील ग्रह, तारे यांचा अभ्यास करून संशोधन क्षेत्रात चमचमते करियर करण्याची इच्छा असणार्यांसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. खगोलशास्त्र किंवा astro फिजिक्समध्ये संशोधन किंवा शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी आपली वाट पाहत आहेत.
पात्रता : एम.एस्सी.(physics- applied mathematics-astronomy) असणार्यांना प्रवेश परीक्षेद्वारे पीएच.डी. साठी नोंद आवश्यक आहे. साधारणपणे दरवर्षीच्या ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये याबाबत जाहिरात येते व नंतरच्या फेब्रुवारीमध्ये एंट्रन्स एक्झामिनेशन होते.प्रवेश परीक्षेचे स्वरूप : ऑब्जेक्टीव्ह प्रकारचे प्रश्न असतात. तसेच इतर काही परीक्षाप्रमाणे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असते. प्रवेश परीक्षेत सफलता मिळविल्यानंतर मुलाखतीसाठी उपस्थित राहून उत्तीर्ण व्हावे लागते. त्यानंतर संशोधन संस्थेत प्रवेश मिळतो. पीएच.डी. मिळाल्यानंतर लखलखते करिअर आपले करणे शक्य होते.