biotechnology क्षेत्रात करीअरच्या उत्तम संधी अस्तित्वात आहेत; परंतु किमान biotechnology मध्ये पदव्युत्तर शिक्षण असणे हिताचे ठरते.
पात्रता : एम.एस्सी. biotechnology होण्यासाठी विज्ञान, शेती, अभियांत्रिकी, फार्मसी या विषयातील पदवी किमान ५५ टक्के मिळवून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी या परीक्षेच्या अंतिम वर्षात शिकत आहेत त्यांनाही प्रवेश परीक्षेला बसता येते. बी.एस्सी. साठी वनस्पतीशास्त्र , प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही यासाठी पात्र असतात. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच पदव्युत्तर प्रवेशासाठी विचार केला जातो. साधारणपणे दरवर्षी मे महिन्यामध्ये ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते.
प्रवेश परीक्षेची पद्धत : दोन भागामध्ये हि परीक्षा होते. पहिल्या भागामध्ये साठ गुणांचे साठ Objective प्रकारचे प्रश्न असतात. साधारणपणे बारावीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि बायोलॉजी या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्न असतात. एक चूक उत्तरासाठी अर्धा मार्क कापण्याची पद्धत आहे. त्यामुळे निश्चित माहीत असल्याशिवाय उत्तर लिहू नये. दुसर्या भागातही साठ प्रश्नांचा (गुण १८०) समावेश असतो. मात्र अभ्यासक्रम पदवी स्तरावरील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व mathematics या विषयावर आधारित असतो. याही ठिकाणी वरील प्रमाणेच उणे गुण (निगेटिव्ह मार्क) होऊ शकतात. प्रवेश परीक्षेची सूचना व सर्व माहिती साधारणपणे जानेवारी/फेब्रुवारीच्या साप्ताहिक employment news च्या अंकात उपलब्ध होऊ शकते.