तांत्रिक शिक्ष
उद्योगधंद्यांना लागणारे कुशल तंत्रज्ञ तयार करण्यासाठी दहावी नंतर ३ वर्षांचे व १२ वी (विज्ञान) नंतर २ वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. संपूर्ण देशातील पदविका अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता व किमान दर्जा राखण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे ह्या अभ्यासक्रमावर नियंत्रण असते. त्यामुळे हे अभ्यासक्रम निवडताना वरील परिषदेची मान्यता असल्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. ह्या मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रमास महाराष्ट् शासनाची मान्यता असणेसुध्दा आवश्यक आहे. तंत्रशिक्षण संचालनालय (म.रा.) मुंबई व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत, महाराष्ट्र शासन हे अभ्यासक्रम शिकविणार्या संस्थांवर नियंत्रण ठेवते. पदविका परीक्षेचा अभ्यासक्रम ठरविणे व त्याप्रमाणे परीक्षा घेणे व पदवी देणे हे कार्य महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे करण्यात येते. संस्थांवर प्रशासकीय नियंत्रण हे तंत्रशिक्षण संचालनालय (म.रा.) मुंबईव्दारे ठेवण्यात येते.
पदविका शिक्षण हे विविध शाखांमधून देण्यात येते. पदविका शिक्षण हे ७९ शाखांमधून देण्यात येते व त्याची विभागणी परंपरागत व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम अशी करण्यात येते. पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यास उद्योगधंद्यामध्ये तंत्रज्ञ म्हणून नोकरी मिळू शकते किंवा तो एखादा स्वतः चा उद्योग उभारू शकतो. स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी पदविका अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. हा अभ्यासक्रम प्रथमश्रेणीत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यास अभियांत्रिकी पदवीच्या व्दितीय वर्षास, तर व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यास अभियांत्रिकी पदवीच्या प्रथम वर्षास प्रवेश मिळतो.
प्रचलित नियमानुसार दहावी किंवा बारावी (विज्ञान) परीक्षा ४५% गुण मिळविणार्या खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किंवा ४०% गुण मिळविणार्या मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो.
तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाअंतर्गत मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम राबविणार्या संस्थांबद्दल अधिक माहितीसाठी त्या-त्या अभ्यासक्रमावर क्लिक करा.
- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण
- इंडो जर्मन टूल रूम, औरंगाबाद
- गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ लेदर टेक्नॉलॉजी, मुंबई
- शासकीय तंत्रनिकेतन मुंबई येथील रबर टेक्नॉलॉजी
- डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथील सरफेस टेक्नॉलॉजी
- सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टीक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी
- सागरीविज्ञान संस्था
- मिलिट्री इंजिनियरिंग कॉलेज, पुणे
- सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजी, औरंगाबाद.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, मुंबई
- शासकीय तंत्रनिकेतन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, नागपूर
- शासकीय दूरशिक्षण संस्था, पुणे
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी