इतर अभ्यासक्रम


१२ वी नंतरचे अभ्यासक्रम (कला) इतर अभ्यासक्रम
कल्पकता हा मनुष्याचा स्थायीभाव मानवी सौंदर्यदृष्टी विकसित होण्यासाठी निसर्गाचाच वाटा. निसर्गातील वैविध्यपूर्ण बाबींचा तथा इतिहास, साहित्य, नृंत्य, गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला, नाट्यशास्त्र, रंगशास्त्र इत्यादींचा
दैनंदिन जीवनात होणारा प्रभाव आणि या कलाक्षेत्रातून मानवी मानसिकतेचे संर्वधन करण्याची विलक्षण शक्ति असणारी ही अभ्यास शाखा. वाचन, चिकाटी, धैर्य आणि विविधता याची आवड असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी कला शाखा ही सुवर्णसंधी. बोजड इंग्रजी, गणित किंवा विज्ञान अशा विषयांत रस नसणार्‍या व्यक्तींसाठी अत्यंत रंजक अशी ही शाखा. सर्जनशीलता हा या क्षेत्रात यशस्वी होण्याचा पाया सातत्याने नवनिर्मिती करून समाजात कीर्तीच्या शिखरावर विराजमान करणारी ही एकमेव शाखा. निरीक्षणशक्ती, मांडणीक्षमता, भाषेचे सौंदर्य जाणण्याची वृत्ती व विवेकपूर्ण संहितानिर्मितीची क्षमता प्राप्त विद्यार्थांना हमखास यश देणारी ही कलाशाखा.
काही संकेत स्थळे खालील प्रमाणे
जेजे कॉलेज ऑफ फाईन आर्टस, Institutions at all India level , Arts, Law & Languages, Fine Arts, List of Law School in India.
एनिमेशन डिप्लोमा
काही वर्षांपर्यंत आपल्या इथे विदेशी एनिमेटेड कार्टून मिकी माउस, डोनाल्ड डक, टॉम ऐंड जेरी, स्पाइडर मैन, स्कूबी-डू आणि पोकेमॉन यांचेच नाव असायचे. पण आज भारतीय एनिमेटेड कार्टून हनुमान, तेनालीराम, कृष्ण, चाचा चौधरी, गणेश आदी. कोणा विदेशी कार्टूनपेक्षा कमी नाही. आजच्या डिजिटल युगात एनिमेशनचा वापर खूप वाढला आहे. दुसर्‍या देशात एनिमेशन इंडस्ट्रीची जाळे केवळ एक किवा दोन मोठ्या सिटीमध्येच आहे, पण भारतात ही स्थिती वेगळी आहे. इथे मुंबई, हैदराबाद, दिल्ली, पुणे. मेट्रोसिटी मध्ये एनिमेशनची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहे. दुसरी गोष्ट अशी की भारतात एनिमेशनची सुरुवात होऊन एक दशक पूर्ण झाले आहे. ह्याच काळात देशात एनिमेशनमध्ये खूप प्रगती झाली आहे आणि त्यामुळेच भारतात एनिमेशन फिल्डमध्ये करिअर करण्यास मोठा वाव आहे .
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded, www.animaster.com, www.framebox.in, www.icaat.in, www.maccindia.com, www.iitb.ac.in, DSK SIC, Animation Courses Maharashtra.
फॅशन डिझायनिंग
प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तू आपले अस्तित्व सौंदर्यपूर्ण ठेवेल तेव्हाच लक्ष वेधून घेते. तेव्हा तिचा आकार, रंगसंगती बनवतांना लावलेली कौशल्ये आणि कालानुरूप अनुरूपता सिद्ध होते. फॅशन डिझायनिंग ही अभ्यासाची व संधीची अशी शाखा आहे, ज्यासाठी निश्चितच म्हणू शकतो, "जब तक सुरज चांद रहेगा, फॅशन तेरा नाम रहेगा." भौगोलिक परिस्थिती, परंपरा, कच्च्या मालाची उपलब्धता, निर्मितीक्षमता प्रतिभाशक्ती, सूक्ष्मदृष्टी, रंगाच्या तापमानातील फरक, आकाराची जाण, प्रतिभाशक्ती आणि समाजाच्या आवडीतील बदलांचा मागोवा घेऊन काळाच्या थोडेसे पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता या बाबी ह्या क्षेत्रातील यशस्वितेसाठी करण्याची भूमिका बजावतात. निरंतर नावीन्याची मागणी व गरजेनुरूप पुरवठा हे या क्षेत्रातील आर्थिक सूत्र असल्याने करिअर म्हणून निवड करण्यासाठी वरील गुणांची खाण असणार्‍यांनी हे क्षेत्र स्वीकारणे फायदेशीर ठरेल.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
FDCI, NIFD, NIFT, Symbiosis Institute of Design, Top Fashion Designing Colleges
सैनिक शिक्षण
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांची पूर्तता होताच निर्माण होणारी चौथी गरज म्हणजे सुरक्षितता. व्यक्तिगत गोष्टीची कौटुंबिक चाळीतील या गावातील सुरक्षिततेची गरज आपणास ठाऊक आहे. तद्वत देशाच्या सीमांचे तथा अंतर्गत बंडाच्या वेळी सुरक्षा, शांतता व सलोखा राखण्यासाठी सैन्यदलाची आवश्यकता असते. देशाच्या सुरक्षाप्रणालीमध्ये कार्यरत असणारी मंडळी म्हणजे सैन्य. आजारी माणूस म्हणजे स्वतःचे व इतरांचे संरक्षण करू शकत नाही. त्यासाठी सशक्त, निरोगी, चपळ आणि नीती ठरवण्याची क्षमता आवश्यक असते. वेळ, आहार, व्यायाम आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी आवश्यक नियमितता तसेच धैर्य, चिकाटी अन् साहसी प्रवृत्ती आणि घरापासून दूर विपरीत परिस्थितीत काम करण्याची सुदृढ मानसिकता ही अंगे सैनिकी शिक्षण घेण्यासाठी अत्यावश्यक ठरतात. दर्जाप्रमाणे विशिष्ट वयानंतर सैनिकी क्षेत्रातून निवृत्ती दिली जाते. देशाच्या रक्षणासाठी कार्य केल्याबद्दल केंद्र शासनाच्या अनेक सुविधा सैनिकांना बहाल केल्या जातात. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्यांना या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत.
काही महत्व पूर्ण संकेत स्थळे खालील प्रमाणे
List of colleges offering Military Education, NDA, INDIA
फॅशन डिझायनिंग
प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तू आपले अस्तित्व सौंदर्यपूर्ण ठेवेल तेव्हाच लक्ष वेधून घेते. तेव्हा तिचा आकार, रंगसंगती बनवताना लावलेली कौशल्ये आणि कालानुरूप अनुरूपता सिद्ध होते. फॅशन डिझायनिंग ही अभ्यासाची व संधीची अशी शाखा आहे, ज्यासाठी निश्चितच म्हणू शकतो, "जब तक सुरज चांद रहेगा, फॅशन तेरा नाम रहेगा." भौगोलिक परिस्थिती, परंपरा, कच्च्या मालाची उपलब्धता, निर्मितीक्षमता प्रतिभाशक्ती, सूक्ष्मदृष्टी, रंगाच्या तापमानातील फरक, आकाराची जाण, प्रतिभाशक्ती आणि समाजाच्या आवडीतील बदलांचा मागोवा घेऊन काळाच्या थोडेसे पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता, या बाबी ह्या क्षेत्रातील यशस्वितेसाठी करण्याची भूमिका बजावतात. निरंतर नाविन्याची मागणी व गरजेनुरूप पुरवठा हे या क्षेत्रातील आर्थिक सूत्र असल्याने करिअर म्हणून निवड करण्यासाठी वरील गुणांची खाण असणार्‍यानी हे क्षेत्र स्वीकारणे फायदेशीर ठरेल.
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.
www.fdci.org, www.nifd.net
प्रशासन व व्यवस्थापन क्षेत्र
प्रत्येक आस्थापनेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख करणे, भविष्यातील वाटचालीचा आढावा घेणे, आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवणे, ग्राहकांचे व कर्मचार्यांचे हित जोपासणे इत्यादी बाबींचा अभ्यास करणारे क्षेत्र म्हणजे व्यवस्थापन क्षेत्र. आस्थापनांचा वाढता व्यापार व तंत्रज्ञानाच्या या युगात आवश्यक झालेला नेटकेपणा यामुळे व्यवस्थापन क्षेत्राला सध्या खूपच महत्व प्राप्त झाले आहे.
व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण हे बारावीनंतर ची पदवी, पदवी नंतरची पदविका, व पदव्युत्तर पदवी अशा वेगवेगळ्या स्वरुपात प्राप्त करता येते. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
अधिक माहिती साठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.
महाराष्ट्रातील कॉलेजेस ची यादी
कायदा व व्यवस्थापन क्षेत्र
भारतीय घटनेने प्रत्येकास स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. मुळातच घटनेचा संपूर्ण साचा हा स्वातंत्र्य समता व बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित आहे. घटनेने जरी स्वातंत्र्य दिलेले असले तरी देखील समाजात वावरतांना सर्वसामान्य चौकटीतच प्रत्येक नागरिकाची वागणूक अभिप्रेत आहे, अन्यथा समाजाचा प्रवास स्वातंत्र्याकडून स्वैरतेकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाची बांधणी चाकोरीबद्ध, कर्तव्ये व जबाबदाऱ्या या बाबत जाणीव असणारी आणि वर्तणुकीचे निकष ठरवून त्यातच वागणूक असण्यासाठी तसेच परस्पर तंटे तक्रारी सोडविण्यासाठी विविध कायदे केंद्र शासन तसेच राज्य शासनाने केले आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था योग्य राखून समाजातील सर्व घटकांना सलोख्याने राहून सर्वसाधारण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत. कायद्याच्या अभ्यासासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, व्यासंग आणि प्रखर स्मरणशक्ती तथा सातत्याने वाचनाची आणि लक्षपूर्वक ऐकण्याची कला अवगत असली पाहिजे. प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ माहिती असणे आणि वाक्यांचे विविध अर्थ काढण्याची मानसिकता या क्षेत्रातील व्यक्तीस निर्भेळ यश प्रदान करते.
अधिक माहिती साठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.
महाराष्ट्रातील कॉलेजेस ची यादी
उड्डाण क्षेत्र
एक आकर्षक क्षेत्र. विमानातील प्रवाशांच्या स्वस्थतेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या मनुष्याबळपासून ते विमानाचे परिरक्षक व वैमानिक होण्यासाठी या क्षेत्राची निवड केली जाते. प्रामुख्याने या क्षेत्राची वाणिज्यिक आणि सैनिकी अशी विभागणी केली जाते. भारतीय विमान पतन संचालनालय, दिल्ली, या केंद्रशासनाच्या विभागातर्फे उड्डाण क्षेत्रातील तांत्रिक बाबीच्या सर्व अभ्यासक्रमांना मान्यता दिली जाते. कौशल्यावर आधारित मनुष्यबळाची या क्षेत्रात जगभर प्रचंड मागणी आहे. भाषा, ज्ञान, कौशल्ये, शारीरिक ठेवण, सुदृढता, जबाबदारीची जाणीव, निर्णयक्षमता, दुर्दम्य इच्छाशक्ती, इत्यादी बाबी या क्षेत्रात जाण्यासाठी मुलभूत गरजा म्हणून संबोधल्या जातात.
अधिक माहिती साठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.
Directorate General of Civil Aviation, BCAS
ललित कला
समाजातील साहित्याप्रमाणेच चित्रकला, वास्तुकला, संगीत, नृत्य इत्यादी ललितकलांतूनही समाजाचे जीवन दिसत असते; त्याच्या आशा आकांक्षा ललित कालान्द्वारे व्यक्त होत असतात. त्याचप्रमाणे पुष्कळदा ग्रंथकाराप्रमाणे ललितकलाकारही आपल्या स्वतंत्र प्रज्ञेतून समाजातील अशा निराळयाच विश्वात स्वत: जातो व इतरांनाही नेतो. त्यामुळे इतर कलां प्रमाणे आज ललित कलाला हि तितकाच वाव आहे. ललित कलाचे ३ प्रकार आहेत .१.नृत्य कला २. शिल्प कला ३.हस्त कला
अधिक माहिती साठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, www.unipune.ac.in, www.sirjjarchitecture.org
नृत्य कला
नृत्य कला हि कला ललित कालचाच एक प्रकार आहे. नृत्या द्य्वारे आशा-आकांक्षा व्यक्त करता येतात .प्राचीन काळापासून भारतीय ह्या कलेशी जुडलेले आहेत.देशातील राज्यांची संस्कृतीची विविधता आपल्याला ह्या कलेद्वारच दिसते.नृत्य कलेत पदवी घेतल्या नंतर आपण स्वयंरोजगार चालवू शकतात किंवा इतर नृत्य अकॅडमी मध्ये नौकरीच्या संधी मिळू शकतात.
अधिक माहिती साठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, www.saraswatimusiccollege.org, www.artindia.net, www.du.ac.in, www.unipune.ac.in www.mu.ac.in
संगीत शिक्षण
संगीताचे वेगवेगळे प्रकार सुगम संगीत । नाट्यसंगीत । भावगीते । भक्तिगीते । शास्त्रीय संगीत । संगीतातील राग. आजच्या युगात संगीतात विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहे उदा. जाहिराती, टीव्हीवरील गायन, समारंभात इ. त्यामुळे शहर आणि परिसरामध्ये गेल्या दहा वर्षांत शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. टीव्हीवरील गायन, संगीत कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन नावही उज्ज्वल करत आहेत.
अधिक माहिती साठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.
www.saraswatimusiccollege.org, www.artindia.net, www.du.ac.in, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, www.unipune.ac.in www.mu.ac.in
पत्रकारिता
प्रसारमाध्यमांची जननी म्हणून पत्रकारितेकडे मोठय़ा आदराने पाहिले जाते. पत्रकारितेमध्ये वृत्तसंकलन, लेखन, संपादन, छायाचित्रकारिता, वृत्तप्रसारण इ. बाबींचा समावेश होतो. पत्रकारितेमध्ये एखाद्या वृत्तसंस्थेत नोकरी अथवा मुक्त पत्रकार म्हणून काम करता येते. (स्थानिक, क्षेत्रीय, भाषिक, इंग्रजी, राष्ट्रीय वृत्तसंस्था) अथवा इतर नियतकालिके उदा. साप्ताहिक, पाक्षिक त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. वृत्तपत्र व्यवसायाचे स्वरूप, महत्त्व, सर्वसाधारण ओळख, वृत्तपत्र पत्रकारांसाठीची आचारसंहिता, वृत्तसंस्था, आक्षेपार्ह जाहिरातीचा कायदा, पहिला वृत्तपत्र आयोग, वृत्तपत्र कार्यालयातील विभाग, बातमीदाराकडे कोणते गुण असावेत, बातमीचे प्रकार, डी.टी.पी., जाहिरात, मुद्रितशोधन इ. बाबींचा अभ्यासक्रमात समावेश होतो.
अधिक माहिती साठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University,
Swami Ramanand Teerth Marthwada University, Nanded MGM's College of Journalism and Mass Communication
www.iimc.nic.in,www.nifms.edu.in,www.niaindia.org