भारतासारख्या शेतीप्रधान देशात Food technology सारख्या क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकतात. निवड निकष : केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री किंवा शेतीशास्त्र ( अॅग्रीकल्चर ) मधील पदवी धारण करणाऱ्यांना एम.एस्सी. साठी प्रवेश मिळू शकतो.
(दोन वर्षांचा अभ्यासक्रम) निवड प्रक्रिया : यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा (साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये) असते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेशासाठी उपलब्ध जागेच्या संख्येनुसार मुलाखतीला बोलाविण्यायोग्य उमेदवारांची संख्या निश्चित केली जाते. या मर्यादित संख्येच्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम निवड केली जाते. विविध विद्यापीठांमार्फतदेखील हा अभ्यासक्रम व प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.