ज्या संस्था ग्राहकोपयोगी उत्पादन करतात किंवा ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देतात ( उदाहरणार्थ बँक, दवाखाने, कार्यालय, दुकान, उपाहारगृह, संस्था इत्यादी) अशा सर्व ठिकाणी व्यवस्थापन करण्यासाठी management चे शिक्षण घेतलेल्या व्यक्ती कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडू शकतात. त्यामुळेच आजच्या युगात management क्षेत्रात करीअरच्या अनंत संधी आहेत.
व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप अनेक पटींनी वाढतो आहे. त्यासाठी एकाचवेळी अनेक शाखांद्वारे आपला व्यवसाय मॅनेज करण्याची कसरत करावी लागते. शिवाय स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात एवढी जबरदस्त वाढली आहे कि, व्यवस्थापनाचे तज्ञच केवळ हे काम व्यावसायीक दृष्टीकोन ठेवून करू शकतात. एखाद्या अभ्यासक्रमाची परीक्षा घेणेसुद्धा (विद्यार्थ्यांच्या प्रचंड संख्येमुळे ) प्रोफेशनल मॅनेजर्सकडे देणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे नोकरीच्या प्रचंड संधीही उपलब्ध होत आहेत. management काही कोर्सेस फुल time आहेत तर काही part time (नोकरी करणाऱ्यासांठी सोयीचे) आहेत. काही कोर्सेसबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती देण्यात येत आहे. एम.बी.ए. दोन वर्षे कालावधीचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम.
अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी management च्या विविध शाखांचे विषयांची ( all aspects of management ) तोंडओळख होते. कुठल्याही शाखेचा पदवीधर किंवा bachelor of business administration (बी.बी.ए.) पदवी प्राप्त विद्यार्थी या करीअरची निवड करू शकतात. एम.बी.ए. हा साधारणपणे सर्व समावेशक management कोर्स समजला जातो. स्पेशालायाझेशन ( विशिष्ट क्षेत्र ) विचारात घेतल्यास एम.एम.एम. ( Master of Marketing Management ), एम.सी.एम. (mastar of computer management ), एम.पी.एम.(Master of Personal Management ), एम.बी.ए. (Pharma), एम.बी.ए.(Construction), एम.बी.ए.(bio -tech), इत्यादी विषयात करियर करता येऊ शकते.
सीइटी ( Common Entrance Test ) या नावाने तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यातर्फे प्रवेश परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध management कोर्ससाठी प्रवेश घेण्याकरिता हि परीक्षा असते. अधिक माहितीसाठी www.dte.org .in या संकेतस्थळावरील प्रवेश परीक्षा विभाग पहावा. याच धर्तीच्या प्रवेश परीक्षा इतर राज्यातही घेतल्या जातात. त्यासाठी संबंधित संस्थांच्या वेबसाईटस् पहाव्यात. या परीक्षेची माहिती व वेळापत्रक, अर्ज मागविण्याची प्रक्रिया ही नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या बरीच आधी सुरु होत असल्यामुळे (साधारण ऑक्टोबरपासून) याबाबत विद्यार्थ्यांनी अधिक दक्ष राहणे हिताचे ठरते.
Indian Institute of Management (आयआयएम ) द्वारा घेतली जाणारी CAT (Common aptitude test ) प्रवेश परीक्षासुद्धा महत्वाची व उपयोगी मानली जाते. विविध संस्थाद्वारा जरी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्यात येत असल्या तरी सर्वांची परीक्षा पद्धती (लेखी परीक्षा) साधारणपणे दोन तासांची असते, ज्यामध्ये एकशेवीस ते दीडशे प्रश्न विचारले जातात. सर्वसामान्य ( जनरल नॉलेज ) इंग्रजी numerical ability , analatical ability इत्यादी प्रकारांवर आधारित हे प्रश्न असतात. त्यानंतर group discussion (गट चर्चा ) द्वारा विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. लेखी परीक्षा व group discussion मधील गुणांवर आधारित अंतिम निवड संस्थाच्या उपलब्ध जागांनुसार केली जाते. Management diploma course ज्यांना दोन वर्षांचा एम बी ए कोर्स करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी management चा साधारण दीड वर्ष अवधीचा डिप्लोमा करता येतो. तीन त्रैमासिक सत्र आणि त्यानंतर तीन ते सहा महिने अवधीची इंटर्नशिप असे स्वरूप असते.