शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे असं सरकारला कायद्याने सांगण्याची गरज पडते, यावरूनच शिक्षणाबद्दलची आस्था आणि अनास्था या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत हे सिद्ध होते. केवळ साक्षर असणं वेगळं आणि सुशिक्षित असणं त्याहूनही वेगळं. साक्षर किंवा सुशिक्षित असणं, तेही हव्या त्या नेमक्या अभ्यासक्रमासह, ही आज काळाची गरज झालेली आहे. आमच्या बीड, उस्मानाबादचं पोरगं अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीत जाऊन बसलं आहे, तसं त्याच गावांमधील राम्या अजूनही अक्षराविना धडपड करतो आहे. हीच शैक्षणिक विषमता आपल्याला खूप घातक आहे. मराठवाडा प्रांतातील सर्वांना सहजपणे हव्या त्या शिक्षणाची माहिती ज्याला-त्याला झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही वेबसाईट आहे.
दहावी-बारावीनंतर पुढे काय? पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर काय? असे प्रश्न पडतात. हे प्रश्न पडतात यालाच असेहि म्हणता येईल कि कोणत्या गावाला जायचं हे न ठरविता प्रवास सुरू केलेला असे,म्हणता येईल अशा एक ना अनेक चुकलेल्या प्रवाशांना समजावून घेणं ही एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. कारण दोष या प्रवाशांचा नाही तर तो एकूण व्यवस्थेचा म्हणा येईल किंवा परिस्थितीचा. आमच्या कार्यालयामार्फत वेबसाईटवर शिक्षणाविषयीच्या संधींची माहिती व पुढे करिअर म्हणून काय करता येईल याची सहायक यंत्रणा सुरू केली आहे.
शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे ह्या साठी सरकार नेहमीच धडपड करत असते. पंचवार्षिक तसेच वार्षिक योजना मध्ये शिक्षणा साठी अनेक तरतुदी करत असते. शैक्षणिक साधी ह्या केवळ विद्यार्थ्या पर्यंत मर्यादित नसून याचा फायदा शिक्षक व शाळा हे हि घेऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी Right to Education चा कायदा आमलात आणला आहे तर शिक्षक वर्ग साठी National Curriculam Framework हा उपक्रम राबविला जात आहे. एवढच नव्हे तर संस्था चे Center of Excellence मध्ये परिवर्तन व्हावे म्हून काही अमुलाग्र बदल घडवून आणत आहे.
नजीकच्या काळात शिक्षण हे समाजा पासून दुरावत चालले आहे असे दिसते. समाज आणि शिक्षण यांचे नाते धृद व्हावे हि काळाची गरज आपण ओळखली पाहिजे. शैक्षणिक बळावल भारत हा जगातील महासत्ता बनू शकतो हे आपण जाणले पाहिजे. आमचे प्रतिनिधी कायम आपल्या मदतीस तत्पर असतात. शैक्षणिक संस्था, शिक्षक वा विद्यार्थी या पैकी कोणालाही अधिक माहिती ची गरज असेल तर आपण मन मोकळे पणाने आम्हाला संपर्क करा हि विनंती.